This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जेंव्हा कोणी सोबत नसते तेंव्हा एकटेपणा खूप खातो.
मनात न बोललेले शब्द साठत जातात.
गर्दीत असूनही मन एकटे पडते.
आठवणींचे ओझे हळूहळू वाढत जाते.
हसऱ्या चेहऱ्यामागे वेदना लपतात.
अशा क्षणी आधाराची गरज भासते.
एक समजून घेणारी व्यक्ती संपूर्ण जगासारखी वाटते...
मनात न बोललेले शब्द साठत जातात.
गर्दीत असूनही मन एकटे पडते.
आठवणींचे ओझे हळूहळू वाढत जाते.
हसऱ्या चेहऱ्यामागे वेदना लपतात.
अशा क्षणी आधाराची गरज भासते.
एक समजून घेणारी व्यक्ती संपूर्ण जगासारखी वाटते...
❤4👍3😢2🤩1
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
https://youtu.be/tFqBzt8VFJw?si=KJzb0VMU4a70vbl-
मैत्रीच्या आठवणींचा हिंदोळा मनात
सतत हलत राहतो,
हसणं-रडणं, प्रत्येक क्षण
त्यात जपलेला असतो.
आयुष्य कितीही बदललं तरी,
त्या हिंदोळ्यावरची मैत्री कधीच
जुनी होत नाही... 🌿
खूप छान मराठी Short Film आहे.
सर्वांनी नक्की पहा...
सतत हलत राहतो,
हसणं-रडणं, प्रत्येक क्षण
त्यात जपलेला असतो.
आयुष्य कितीही बदललं तरी,
त्या हिंदोळ्यावरची मैत्री कधीच
जुनी होत नाही... 🌿
खूप छान मराठी Short Film आहे.
सर्वांनी नक्की पहा...
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
सवय..
"रोज बोलण हे फक्त नवरा बायकोच्या नात्यात असतं,किंवा ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या नात्यात असतं.. इतर नात्यात रोज रोज बोलण झालंच पाहिजे असं नाही.. अश्या नात्यात रोज रोज बोलण्यापेक्षा अधूनमधून बोलत राहणं जास्त आनंददायी असतं.. कारण रोज रोज बोलण्याने त्या व्यक्तीची सवय लागून जाते, नंतर त्या व्यक्ती सोबत बोललं नाही तर दिवस कटत नाही आणि करमत पण नाही. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे कोणतंही काम आपण रोज करत गेलो तर आपल्याला त्याची सवय लागून जाते.. काही सवयी खूप चांगल्या असतात त्याने आपलं जीवन बदलून जातं.. पण काहीची एकदा सवय लागली आणि नंतर ती व्यक्ती अचानक काही कामानिमित्त बाहेर गेली किंवा त्या व्यक्तीचा मोबाईल खराब झाला किंवा इतर कोणतीही घटना झाली ज्यामुळे तो व्यक्ती तुमच्या संपर्कात राहू शकला नाही तर,आपल्याला प्रचंड त्रास होतो.. त्यामुळे जीवनातं काहीहीं करा पण कोणाचीच कायमची सवय लावून घेवू नका.. बायकोची सुद्धा 😂कारण बायको पण कधी कधी आपल्याला सोडून जाते.. कारण 'Nothing is permanent 'कोणतीही गोष्ट स्थायी नाही.. त्यामुळे कायमच कोणाच्याहीं अधीन होणं थोडं त्रासदायक आहे..कारण सवय लावणारे सवय लावून देतात आणि नंतर मध्येच सोडून जातात तेव्हा मात्र आपल्याला प्रचंड त्रास होतो.. त्यामुळे कुठेतरी कोणाचीही सवय लागणार नाही यांची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.. सवय लागावी ती चांगल्या गोष्टीची, अभ्यासाची, सत्त्य बोलण्याची, इमानदारदारीने काम करण्याची कारण ह्या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात.. "
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
(हा लेख तुम्हाला कसा वाटला..? याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा..)
✍️संपर्क-8806379959
✍️संपर्क -@ABCs1432

❤3👍1😢1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
माझं प्रेम तुझ्या स्वप्नांना
मारू नये म्हणून
मी आज तुझ्यापासून दूर आहे
माहिती आहे सखे,
मला माझ्यापेक्षा जास्त
तुझा वेळ तुझ्यासाठी अनमोल आहे,
तो वेळ खर्च होऊ देऊ नकोस
कोणाच्या आठवणीत,
कोणाच्या वाट पाहण्यात
म्हणून सांगतो सखे,
सर्व काही पणाला लावून
तु तुझ्या इच्छा, अपेक्षा
आणि स्वप्नं पूर्ण कर,
कारण तुझं यश
हेच माझं खरं प्रेम आहे
मी आहे ना तुझ्यासोबत,
सखे सदैव, प्रत्येक क्षणी,
जरी दिसत नसलो
तरी तुझ्या धाडसात आहे,
तुझ्या मेहनतीत आहे,
तुझ्या प्रत्येक विजयामागे आहे
त्यामुळे स्वतःला एकटं समजू नकोस,
ना कधी भिऊ नकोस,
ना घाबरू नकोस,
कारण तू जेव्हा उभी राहशील
स्वतःच्या पायावर अभिमानानं,
तेव्हा माझं प्रेम
तुझ्या डोळ्यांतून हसताना दिसेल
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
माझं प्रेम तुझ्या स्वप्नांना
मारू नये म्हणून
मी आज तुझ्यापासून दूर आहे
माहिती आहे सखे,
मला माझ्यापेक्षा जास्त
तुझा वेळ तुझ्यासाठी अनमोल आहे,
तो वेळ खर्च होऊ देऊ नकोस
कोणाच्या आठवणीत,
कोणाच्या वाट पाहण्यात
म्हणून सांगतो सखे,
सर्व काही पणाला लावून
तु तुझ्या इच्छा, अपेक्षा
आणि स्वप्नं पूर्ण कर,
कारण तुझं यश
हेच माझं खरं प्रेम आहे
मी आहे ना तुझ्यासोबत,
सखे सदैव, प्रत्येक क्षणी,
जरी दिसत नसलो
तरी तुझ्या धाडसात आहे,
तुझ्या मेहनतीत आहे,
तुझ्या प्रत्येक विजयामागे आहे
त्यामुळे स्वतःला एकटं समजू नकोस,
ना कधी भिऊ नकोस,
ना घाबरू नकोस,
कारण तू जेव्हा उभी राहशील
स्वतःच्या पायावर अभिमानानं,
तेव्हा माझं प्रेम
तुझ्या डोळ्यांतून हसताना दिसेल
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤7
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
येशू.... 🙏❤
✍️ "मला येशू ख्रिस्त यामुळे आवडतो,कि लोकांनी ज्यावेळी त्यांच्या हातापायात खिळे ठोकून त्यांना कृसावर लटकवलं.. त्यांचा अमानवीय छळ केला. त्या लोकांसाठी सुद्धा येशूने पार्थना केली.कि देवा यांना माफ कर, कारण हे काय करतं आहेत?हेच त्यांना माहित नाही .ते माझ्याबद्दल आज्ञानी आहे..खरं तर जीवनात असे अनेक लोकं असतात. ज्याचं तुम्ही रुपयाच नुकसान केलेलं नसतं. तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे? तेही या व्यक्तीना काहीच माहित नसतं.पण तरीही या व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुम्हाला नाव ठेवतं असतात. व , तुमच्यावर टीका करतं असतात.खरं तर अश्या लोकांना सु्बुद्धी मिळण्याची गरज आहे. कारण ते काय करतं आहे?हे त्यांनाच माहित नाही."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
Happy Christmas Day🥰
25 डिसेंबर 2025
✍️संपर्क -8806379959
✍️संपर्क -:@ABCs1432

❤5
Forwarded from Vinayak Bhise
सोसले दुःख वेदना असंख्य सखे तू,
हसण्याआड लपवलं किती रडणं,
लोकांसमोर सावरलेले डोळे
रात्री उशीवर ओघळले…
ते मला दिसतं
माहित आहे मला सखे,
काही वेदना अशा असतात
ज्या वेळही बऱ्या करत नाही,
त्या फक्त माणसाला
हळूहळू शांत करत जातात
आतून रिकामं करत जातात
मी तुझ्या भूतकाळातली ती
आठवणी नाही पुसू शकत,
कारण त्या तुझ्या श्वासात मिसळल्या आहेत.
तुला दिलेल्या त्या जखमा
भरू शकत नाही,
कारण काही जखमा
भरल्यासारख्या दिसतात
पण स्पर्श झाला की पुन्हा उघडतात
म्हणूनच सखे,
मी तुला सावरण्याची भाषा नाही करणार,
“सगळं ठीक होईल” असं
खोटं धीरही देणार नाही
मी फक्त तुझ्या वेदनेशेजारी
गप्प बसून राहीन,
कारण कधी कधी
सोबत असणं
हाच मोठा आधार असतो
तुझ्या डोळ्यांतलं पाणी
पुसायचा हक्क नाही माझा,
पण ते ओघळताना
कोणीतरी पाहतंय,
कोणीतरी थांबतंय,
ही जाणीव
एकटेपणाला थोडी कमी करते
तु जशी आहेस तशीच स्वीकारतो सखे,
तुझ्या तुटलेल्या शांततेसह,
तुझ्या न सांगता येणाऱ्या वेदनांसह,
कारण मला
तुझं हसणं नाही,
तुझं खरं असणं प्रिय आहे
सखे सदैव प्रत्येकक्षणी
तुझ्यासोबत आहे
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
हसण्याआड लपवलं किती रडणं,
लोकांसमोर सावरलेले डोळे
रात्री उशीवर ओघळले…
ते मला दिसतं
माहित आहे मला सखे,
काही वेदना अशा असतात
ज्या वेळही बऱ्या करत नाही,
त्या फक्त माणसाला
हळूहळू शांत करत जातात
आतून रिकामं करत जातात
मी तुझ्या भूतकाळातली ती
आठवणी नाही पुसू शकत,
कारण त्या तुझ्या श्वासात मिसळल्या आहेत.
तुला दिलेल्या त्या जखमा
भरू शकत नाही,
कारण काही जखमा
भरल्यासारख्या दिसतात
पण स्पर्श झाला की पुन्हा उघडतात
म्हणूनच सखे,
मी तुला सावरण्याची भाषा नाही करणार,
“सगळं ठीक होईल” असं
खोटं धीरही देणार नाही
मी फक्त तुझ्या वेदनेशेजारी
गप्प बसून राहीन,
कारण कधी कधी
सोबत असणं
हाच मोठा आधार असतो
तुझ्या डोळ्यांतलं पाणी
पुसायचा हक्क नाही माझा,
पण ते ओघळताना
कोणीतरी पाहतंय,
कोणीतरी थांबतंय,
ही जाणीव
एकटेपणाला थोडी कमी करते
तु जशी आहेस तशीच स्वीकारतो सखे,
तुझ्या तुटलेल्या शांततेसह,
तुझ्या न सांगता येणाऱ्या वेदनांसह,
कारण मला
तुझं हसणं नाही,
तुझं खरं असणं प्रिय आहे
सखे सदैव प्रत्येकक्षणी
तुझ्यासोबत आहे
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤4👍1
Forwarded from ओम sm शेळके
आपण आपला छंद जपायला हवा मग लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं तरी चालेल कारण ज्यांनी ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकल त्यांनी पण आपला छंद जोपासुन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं म्हणून आपलं आयुष्य आहे आपल्या आवडीने जगा पण याचा त्रास कोणाला होत तर नाही ना एवढ मात्र नक्की बघा कारण कोणाला दुःख देऊन घेतलं सुखं एखाद्या कर्जा सारखं असते ते थोड्या दिवसात आपल्यालाचं व्याजाबरोबर ते परत करावं लागतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌2
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
जगू या थोडंसं बेभान होऊन,
थोडं भान ठेवून,
थोडंसं भान हरवून,
तुझं-माझं न
आपलं म्हणुनी…
नको कोणती बंधनं,
ना नकोस वचनं,
ना कोणत्या शपथा सखे,
नकोस काहीच…
शब्दांविनाही असावं
आपलं बोलणं,
ना रुसणं,
ना फुगणं,
भांडण नाही,
ना कोणताच तंटा…
कारण विनाकारण
असावं सखे
आपलं हक्कानं बोलणं,
एकमेकांना न बोलताही
समजून घेणं…
चल सखे,
उद्याची पर्वा न करता
कालचे दुःख सारे विसरूनी
आजचा, आताचा प्रत्येक क्षण
जगू या एकमेकांसोबत…
आनंदाने,
जसा हा शेवटचा क्षण आहे
आपल्या आयुष्याचा…
कारण सखे,
उद्याचं आयुष्य
कुणी पाहिलेलं नाही
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo.7798150143
जगू या थोडंसं बेभान होऊन,
थोडं भान ठेवून,
थोडंसं भान हरवून,
तुझं-माझं न
आपलं म्हणुनी…
नको कोणती बंधनं,
ना नकोस वचनं,
ना कोणत्या शपथा सखे,
नकोस काहीच…
शब्दांविनाही असावं
आपलं बोलणं,
ना रुसणं,
ना फुगणं,
भांडण नाही,
ना कोणताच तंटा…
कारण विनाकारण
असावं सखे
आपलं हक्कानं बोलणं,
एकमेकांना न बोलताही
समजून घेणं…
चल सखे,
उद्याची पर्वा न करता
कालचे दुःख सारे विसरूनी
आजचा, आताचा प्रत्येक क्षण
जगू या एकमेकांसोबत…
आनंदाने,
जसा हा शेवटचा क्षण आहे
आपल्या आयुष्याचा…
कारण सखे,
उद्याचं आयुष्य
कुणी पाहिलेलं नाही
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo.7798150143
❤5
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
════════════════════
मी काय विसरलो???
.
.
.
घरात टी वी आला, मी वाचन विसरलो...
दारात गाडी आली, मी चालणे विसरलो...
हातात मोबाईल आला, मी पञलेखन विसरलो...
कॅलक्युलेटर वापरामुळे, पाढेच म्हणणे विसरलो...
ए सी च्या संगतीने, झाडाखालचा गारवा विसरलो...
शहरात राहीले मुळे, मातीचा वासच विसरलो...
बँकखाती संभाळताना, पैशाची किंमत विसरलो...
बिभत्स चित्रामुळे, सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने, फ़ुलांचा सुगंध विसरलो...
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात, तृप्तीची ढेकर विसरलो...
स्वार्थी नाती जपल्यामुळे, खरे प्रेम करणे विसरलो...
क्षणीक सुखाचे लोभात, सत्कर्मातला आनंद विसरलो...
माझीच तुमडी भरताना, दुस-यांचा विचार करणे विसरलो...
सतत धावत असताना, क्षणभर थांबणं विसरलो...

❤8👌3👍1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे,
2025 उद्या नाही
माझ्यासाठी आजच संपलं,
आता 2026 ला
कष्टाला बाप म्हणून
रात्रदिवस स्वतःला झोकून द्यायचं
बक्कळ पैसा कमवायचा,
तोही इमानदारीनं,
कारण भीक मागून जगायचं नाही
आणि वाकूनही नाही
स्वाभिमान हा माझा श्वास आहे सखे
आता आळस, कंटाळा,
कामचुकारपणा, हलगर्जीपणा
सगळं मागे टाकायचं,
कारण स्वप्नं झोपाळू लोकांची नसतात,
ती पेटलेल्या माणसांची असतात
वेळेला सर्वस्व म्हणायचं सखे,
घड्याळाशी भांडायचं,
रात्रीचा थकवा चिरडून
सकाळी पुन्हा उभं राहायचं,
जोपर्यंत पाहिलेली स्वप्नं
रक्तातून आकार घेत नाहीत
तोपर्यंत थांबायचं नाही
लोक काय म्हणतील
याचं ओझं आता उतरवलंय,
कारण जगणं माझं आहे,
हिशेब देणं कोणालाच नाही
सखे मला माझी स्वप्नं पूर्ण करायच्यात,
आता कोणत्याही परिस्थितीतमध्ये
फक्त सखे तु सोबत रहा
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक,मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
2025 उद्या नाही
माझ्यासाठी आजच संपलं,
आता 2026 ला
कष्टाला बाप म्हणून
रात्रदिवस स्वतःला झोकून द्यायचं
बक्कळ पैसा कमवायचा,
तोही इमानदारीनं,
कारण भीक मागून जगायचं नाही
आणि वाकूनही नाही
स्वाभिमान हा माझा श्वास आहे सखे
आता आळस, कंटाळा,
कामचुकारपणा, हलगर्जीपणा
सगळं मागे टाकायचं,
कारण स्वप्नं झोपाळू लोकांची नसतात,
ती पेटलेल्या माणसांची असतात
वेळेला सर्वस्व म्हणायचं सखे,
घड्याळाशी भांडायचं,
रात्रीचा थकवा चिरडून
सकाळी पुन्हा उभं राहायचं,
जोपर्यंत पाहिलेली स्वप्नं
रक्तातून आकार घेत नाहीत
तोपर्यंत थांबायचं नाही
लोक काय म्हणतील
याचं ओझं आता उतरवलंय,
कारण जगणं माझं आहे,
हिशेब देणं कोणालाच नाही
सखे मला माझी स्वप्नं पूर्ण करायच्यात,
आता कोणत्याही परिस्थितीतमध्ये
फक्त सखे तु सोबत रहा
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक,मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤4👍2
Forwarded from ओम sm शेळके
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला टेन्शन येत ते येणं पण स्वाभाविक आहे मात्र ते घेणं न घेणं आपल्या हातात आहे आपल्याला थोड्या थोड्या गोष्टीत आनंद शोधता आला की मोठ्या मोठ्या गोष्टींचा ताण येत नाही शेवटी ज्याला काहीच टेन्शन नाही अशी व्यक्ती पूर्ण जगात एक पण सापडणार नाही मग उगाच कशाला टेन्शन घेत बसायचं नाही कारण मानवी जीवन एकदाच मिळत राव ते मनसोक्त जगून घ्यायचं की!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
2026😍
✍️"अनेक नवे वर्ष येतात आणि जातात पण त्या प्रत्येक नव्या वर्षात आपण नवं काय करतो?हे जास्त महत्वाच आहे.. प्रत्येक नव्या वर्षात यशाच्या नव्या वाटा शोधत यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणं आवश्यक आहे.. प्रत्येक वर्षात अशी काही कामगिरी करा की, त्या कामगिरीमुळे तुमच्यासाठी ते वर्ष अविस्मरणीय ठरेल..नवीन वर्षाच्या सर्व वाचक, हितचिंतक, ग्रुप ऍडमिन व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.. हे वर्ष आपणास सुख समृद्धी आणि भरभराटीच जावो हिच सदिच्छा..
Happy New Year 2026
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण दि.1जानेवारी 2026
✍️संपर्क -: @ABCs1432

2026 ची
सुरुवात सखे पासूनच झाली,
तु सोबत आहेस तर काय मागावं
या नवीन वर्षाच मी देवाला,
हेच मला समजत नाही
तरी पण मी सखे,
अंघोळ करून झाल्याबरोबरच
देवापुढं नतमस्तक होऊन सखे
तुझ्यासाठी दीर्घायुष्य मागितलं
2026 मध्ये सखे
तुझ्या सर्व इच्छा, अपेक्षा, स्वप्नं
पूर्ण कर
आणि माझ्या सखीला
सदैव प्रत्येक क्षणी
निरोगी, सुखी, आनंदी ठेव
बस एवढंच कर
हात दोन पायावर बसुनी सखे
तुझ्यासाठी मागणं मागितलं,
माझ्यासाठी काहीच नाही…
कारण तू हसत असलीस ना,
तर माझं आयुष्यच
देवाने दिलेलं वरदान वाटतं
या वर्षात सखे,
तुझ्या डोळ्यांत कधी अश्रू नसावेत,
आणि असलेच तर
ते आनंदाचेच असावेत
मी सोबत असेन सखे,
छायेसारखा,
शब्दांपलीकडे जपणारा…
प्रत्येक जन्मात, प्रत्येक वर्षात
✍ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#सखे
#2026NewBeginnings
#PureLove
#MarathiPoetry
#HeartTouching
#NewYearVibes
#LoveBeyondWords
#VinayakBhise
#MarathiViral
#EmotionalWords
सुरुवात सखे पासूनच झाली,
तु सोबत आहेस तर काय मागावं
या नवीन वर्षाच मी देवाला,
हेच मला समजत नाही
तरी पण मी सखे,
अंघोळ करून झाल्याबरोबरच
देवापुढं नतमस्तक होऊन सखे
तुझ्यासाठी दीर्घायुष्य मागितलं
2026 मध्ये सखे
तुझ्या सर्व इच्छा, अपेक्षा, स्वप्नं
पूर्ण कर
आणि माझ्या सखीला
सदैव प्रत्येक क्षणी
निरोगी, सुखी, आनंदी ठेव
बस एवढंच कर
हात दोन पायावर बसुनी सखे
तुझ्यासाठी मागणं मागितलं,
माझ्यासाठी काहीच नाही…
कारण तू हसत असलीस ना,
तर माझं आयुष्यच
देवाने दिलेलं वरदान वाटतं
या वर्षात सखे,
तुझ्या डोळ्यांत कधी अश्रू नसावेत,
आणि असलेच तर
ते आनंदाचेच असावेत
मी सोबत असेन सखे,
छायेसारखा,
शब्दांपलीकडे जपणारा…
प्रत्येक जन्मात, प्रत्येक वर्षात
✍ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#सखे
#2026NewBeginnings
#PureLove
#MarathiPoetry
#HeartTouching
#NewYearVibes
#LoveBeyondWords
#VinayakBhise
#MarathiViral
#EmotionalWords
❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
बाबासाहेब.. 💙
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार इथल्या प्रत्येक समाजासाठी आहेतं आणि त्यांच कार्य सुद्धा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.. पण दुर्दैव हेच आहे की,आपण महापुरुषांना सुद्धा जातीत वाटून टाकलं,त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बौध्द समाज सोडून इतरांनी फारसे वाचले नाही.. ते इतरांपर्यंत पोहोचण खूप आवश्यक आहे..बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका!संघटित व्हा!!संघर्ष करा!!!हा मुलमंत्र प्रत्येकाने ध्यानी घेतला तर नक्कीच प्रत्येक समाज प्रगती करेल..."
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 1जानेवारी 2026
फोटो -शौर्य दिवस रुईखेड (मा )ता. जि. बुलढाणा
✍️संपर्क - @ABCs1432

👏1