नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
5.8K subscribers
5.63K photos
418 videos
10 files
312 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache

Admin Contact: @Nmcontactbot

Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u
Download Telegram
💫⚡️💫
       🌺 *आजचा सुविचार* 🌺
💫⚡️💫

════════════════════
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ════════════════════

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात, ध्येय असतात. पण सर्वजण ते पूर्ण करू शकत नाही. कारण तुमची स्वप्ने, ध्येय पूर्ण करायला जिद्द, चिकाटी, निरंतर प्रयत्न, शिस्त इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचा हँडल तुमच्या हातात घेत नाही तोपर्यंत तुम्ही जीवनात यशस्वी नाही होऊ शकत. तो हँडल प्रत्येक गोष्टीचा असतो मग. आपण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप, युट्युब सारख्या माध्यमांवर तासंतास वेळेचा अपव्यय करत असतो. तोच वेळ आपण काहीतरी कला कौशल्य विकसित करण्यासाठी घालवू शकतो. ज्याचा भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो. आपण आयुष्यात अपयशी झालो तर सरळ इतर व्यक्तींवर, गोष्टींवर दोषारोप करून मोकळे होतो. ही सवय बदलायला हवी मित्रानो. आपले आई वडीलानी आपल्याला वाढविण्यासाठी किती कष्ट घेतले याची आपल्याला जाणीव नसते. तुम्हाला काहीतरी खरच करून दाखवायचं असेल तर स्वतःवर विश्वास असू द्या, पूर्णपणे तुमच्या ध्येयासाठी झोकुन द्या स्वतःला. तुम्ही स्वतः तुमचं पुढचं आयुष्य कसं जगायचं हे ठरवत असतात. म्हणून कुणीतरी म्हणून गेलंय "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".

Credit goes to Writer 🌼🙏
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
════════════════════
     💥Join : @natemanache💥
════════════════════
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
*कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच, पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते. कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही...!!*
        *जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो. आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे, तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको आधार हवा...!!*
         *आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा - पाठ , होम - हवन केले, तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले, तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही...!!*

     
Forwarded from 𝐕.𝐒.𝐊𝐡𝐚𝐥𝐬𝐞.
🛐 गणपती गेले, चाकरमानी निघाले. नातवंड पतवंडांनी भरलेलं घर पुन्हा एकदा रिकामे झाले. कोकणातील प्रत्येक आजोबा आज एकटेच दाराबाहेर पाहात असतील. "बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या" असं गणरायाला साकडं घालत असतील. निघताना पाणावलेल्या डोळ्यांनी 'सावकाश जावा रे. घरी पोचल्यावर फोन करा' असं म्हणणाऱ्या सर्व आजी आजोबांना देव उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना. 🙏🏼
*कवितेचे नाव :-  तू मात्र धीर सोडू नकोस*


बारा महिने होऊन गेलेत                                                               व्यवहार सारे ठप्प झालेत .
साठवलेले चार पैसे कधीच                                                             सारे फस्त झालेत .
मांडणीच्या वरच्या कप्प्यातले                                                                                                      धान्यांचे डब्बे रिते झालेत .
आता मोजून मापून तेलाची फोडणी                                                   भाजीला द्यावी लागतेय .
सध्या या साऱ्या परिस्थितीत                                                                                                    सामान्य माणूस जगत आहे .
पण तु सुरक्षित तर आहेस ना ?                                                        मग सैरभैर होऊ नकोस
हे ही दिवस जातील                                                                                  तू मात्र धीर सोडू नकोस .......
काळ वाईट आहे पण आपल्या नकळत                                        जगणं शिकवून जातोय .
अन्न वस्त्र निवारा यांचं                                                                  महत्व पटवून देतोय .
लाखों रुपयांत न होणारी लग्न                                                                                                  काही हजारांत होत आहेत .
कित्येक मुलींच्या बापाच्या                                                              खांद्याचे भार हलके होत आहेत .             
बाहेर खेळायला जाण्याचा हट्ट                                                            मुलांनी कधीच सोडून दिलाय .
गजबजलेल्या रस्त्यांचा आवाज
भयाण शांततेने वेढून गेलाय .
वाहवत चाललेल्या माणसाला                                                                                                          एका विश्रांतीची गरज होतीच                                                                           
ती मिळाली पण ,                                                                            तू मात्र हताश होऊ नकोस
हे ही दिवस जातील .                                                                         तू मात्र धीर सोडू नकोस ........
सर्वात जास्त हाल                                                                                                                                  हातावर पोट असणाऱ्यांचे झालेत ,
दिवसभर राबून संध्याकाळी                                                                                                                      तेल मीठ आणणाऱ्यांचे झालेत .
व्यापारी वर्ग सद्य परिस्थितीत                                                                                                        पुरता कोलमडून पडला आहे .
कमाई शून्य पण मागणाऱ्यांचा                                                 त्याच्या डोक्यावर बडगा आहे .
मध्यमवर्गीय माणूस आपलं                                                              उघडपण दाखवायला घाबरतोय .
लोक काय म्हणतील ???                                                                या विचाराने अजूनही बावरतोय .
सगळीच माणसं चार भिंतीत                                                             मनाविरुद्ध कोंडून बसलीत ,
हा शरीराचा कोंडमारा मनावर                                                          जड होऊ देऊ नकोस .
हे ही दिवस जातील                                                                              तू मात्र धीर सोडू नकोस ....
@natemanache

*घुसमट*

*घुसमट  होतेय माझी....*
मला माझ्या आईवडीलांसोबत  राहायचं आहे, आणि तिला तिच्या,
अखेर वाद नको म्हनुन तिचंच मान्य केल...कारण,
तिच्या हातात शब्दांची तलवार..., प्रत्येक गोष्टीत कारणं काढून ती, मला खालिपणा दाखवू शकते.
*म्हणून घुसमट  होतेय माझी..*

कोण म्हणतं दोन वेळेच जेवण, अंगभर कपडा, आणि नवऱ्याचं प्रेम पुरेसं असत एका स्त्री ला...
मला विचारा, सगळं मिळत असूनही, तिने मला माझ्या जन्मदात्यानं पासून वेगळं केल...
*तेव्हा घुसमट  होतेय माझी....*

तिला पाहता क्षणी वाटलं होत, माझ्या परिवाराला सांभाळून घेईल...
पण, मला जेव्हा पासून समजल, माझ्या परिवाराला तिने अजूनही आपला परिवार मानलंच नाही *तेव्हा घुसमट होते माझी...*

तिला खूप आवड तिच्या माहेरची... मग माझ्या माहेरच काय...??
बायको मुलांसाठी मी गेलोना तिच्या माहेरच्या गावी...
मी बायकोचा बैल नाही... पण रोजचे होणारे घरातले वाद बघवतही नाही...
*म्हणून  घुसमट होतेय माझी....*

मी कोणालाच बोलत नाही माझ्या भावना, मला काय वाटतंय... कोण विचारतही नाही...!!
सगळ्यांना वाटतंय  मी सूट दिली...पण तसं नाही...
माझे संस्कार होतेते जे एका स्त्री पासून तीच स्वातंत्र्य हिरावून घेऊ नको, असच सांगत होते, पण संस्कार तर तिच्यावर पण आहेत ना...? तिला तिच्या भावाने आईवडिलांचा  सांभाळ  केलेला हवा...मग तिची माझ्याकडून वेगळी अपेक्षा का...?? *म्हणून घुसमट होतेय माझी...*

सगळे चांगले आहेत... खूपदा विचार केला जाऊ आणि सासर च्या सगळ्यांना सांगू, बघा... मला तुमच्या इथे नाही माझ्या आईवडिलांच्या इथे राहायचं आहे.
तुमच्या मुलीला सांगा, ते घर खरं तीच आहे, त्या घरातच तिला लग्न करून आणलं होत ना, मग निर्णय का बदलला नंतर, पण पुन्हा बायको  बद्दल तक्रार करतोय हे बोललं जाईल. वाद वाढतील आणि बळजबरी  तिला नेलं तरी सुधारणा होतील का..?? म्हणून शांत राहणं योग्य समजतो...
*म्हणून घुसमट होतेय माझी...*

मान्य आहे मला मी पण खूप चुका केल्या असतील....चुका सगळेच करतात... पण आपल्या पाठीमागे प्रत्येकाला एक खम्भीर भक्कम हाथ हवा असतो...जेव्हा तो हाथ नसतो माझ्या मागे....
*तेव्हा घुसमट होते माझी....*

माझा स्वभाव आणि तिचा स्वभाव खूप वेगळा... एकही गोष्ट जुळत नाही आमची... तरी संसार करतोय आम्ही...
ती स्वयंपाक करते.. त्यात तिच्या आवडीचं सगळं असत.. पण माझ्या आवडीचं काय...?? मी बोलुनही ती नाही बनवत असेल काही, तर.... *तेव्हा घुसमट होते माझी...*

थोडाही उंच आवाज झाला माझा कि, तिचा तांडव सुरु होतो आणि माझ्या सगळ्या चुका (ज्या झाल्या असतील किंवा नसतील ही.... पण तिच्या मते त्या झाल्या असतील) ती उकरून काढते. त्या वेळी मी एकटा पडतो...पूर्ण परिवार असताना माझा मी एकटा तिच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. *तेव्हा घुसमट  होते माझी...*

तिला आमच्या मुलांच्या सांभाळासाठी तिचे आईवडील योग्य वाटतात, पण मला माझ्या मुलांना माझ्या घरी खेळताना पाहून समाधानि व्हायचं आहे....त्याच काय... ??
*म्हणून घुसमट होतेय माझी...*

माझ्या आईवडिलांना नको का मी न्याय द्यायला. अखेर माझी इतकी घुसमट होत आहे, तर त्यांची ही होतच असेल कि...!! त्यांना वाटतंच असेल ना आपला मुलगा बायको आली म्हणून बदलला... पण नाही..., मी, बदललो नाही,  काही गोष्टी विचारात घेतल्या, आणि शांत झालो कायमचा.
*म्हणून घुसमट  होतेय माझी...*

आयुष्यभर कष्ट केलेल्या माझ्या आईवडिलांना आता कुठे थोडा विसावा मिळत आहे, त्यात ही अशी रोजची कटकट नको म्हणून दूर गेलो त्यांच्यापासून...
*म्हणून घुसमट होतेय माझी...*

खुपदा बोलावंसं वाटलं कि मला तुमची गरज आहे... माझ्या मागे तुम्ही आहातच, पण प्रत्यक्षात मला हवे आहात. पण, कितीही विचार केला तरी नाही बोलू शकत त्यांना काही मी... कदाचित ते म्हणतील, आता का बोलत आहेस हे सगळं आधी सुचलं नाही का...??
*म्हणून घुसमट होतेय माझी....*

खरंतर मला ज्या वेळी जे योग्य वाटलं तेच करत गेलो मी, पण आता जेव्हा माझंअसं अस्तित्व सगळंच तिच्यात समावत आहे *तेव्हा घुसमट होते माझी....*

ती माझी सुखदुःखाची भागीदार असूनही माझ्या प्रत्येक चुकीला फक्त मीच जबाबदार आहे, हे जेव्हा ती सिद्ध करते आणि आपली जबाबदारी अलगद झटकते *तेव्हा घुसमट  होतेय माझी..*

काहीच नको होत मला... आणि पुढेही काही अपेक्षा  नाही आता... फक्त ति समजली असती मला आपलं, तरी खूप होत माझ्यासाठी, पण.. ती अजूनही तिच्या सीमा रेषा माझ्या पासून वेगळ्या आखते... *तेव्हा घुसमट  होतेय माझी...*

मला जेव्हा ती हवी असते एक अर्धांगिनी, एक मैत्रीण म्हणून तेव्हाही फक्त ती एक मुलगीच असते एका परिवाराची.
तिचे सगळे विषय तिच्यातच गुरफटलले असतात.... *तेव्हा घुसमट  होते माझी...*

तिच्या आयुष्यात फक्त मी नावाला आहे तिचा नवरा म्हणून, याची जेव्हा जाणीव होते मला
*तेव्हा घुसमट  होते माझी....*

*तेव्हा घुसमट होतेय माझी....*


✍🏻 *©® Amrit Kaur (Virar)*
जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना...
परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.

💢 Good Night 💢
Join: @natemanache

════════════════════

स्वार्थी लोकांना माहीत नसतं ते स्वार्थी बनत आहेत. ते असं समजून घेत असतात की, ते छान व्यक्ती आहेत जे स्वतःच्या आनंदाला इतरांच्या आनंदापेक्षा जास्त महत्व देतात. अशा लोकांसोबत जर तुमचे काही नाते असेल तर ते तुमच्यातील आपुलकीचा आणि आनंदाचा अर्क शोषून घेते असतात.

════════════════════
@natemanache

निखळ हसर्या चेहर्याला सौंदर्याची गरज

कधीच नसते...!

अंतरमनात कितीही

संघर्ष असला तरी,

चेहर्यावर हास्य दाखविणे हाच,

जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय


   शुभ रात्री
इतरांकडून आपण किंवा आपले विचार स्वीकारले जात नाहीत म्हणून आपण दुःखी, निराश, चिंतीत असतो.

महत्वाचं हे आहे की, आधी आपण आपला स्वतःचा स्वीकार करायला हवा.

पण जर आपले विचार खरंच चांगले असतील, आपली भूमिका चांगल्या कामासाठी असेल तरi इतर लोक काय विचार करतात काही फरक पडत नसतो,

कारण...


कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना...😀
ब्रेक्स 👌
    

एकदा फिजिक्सच्या टिचरने मुलांना प्रश्न विचारला,
" कारमधे ब्रेक्स का लावलेले असतात ? "

त्यावर निरनिराळी उत्तरे आली,
थांबण्यासाठी

वेग कमी करण्यासाठी

अपघात टाळण्यासाठी

परंतू सर्वात चांगले उत्तर होते,
"जास्त वेगाने जाता येण्यासाठी..!!"

गोंधळले असाल ना अशा उत्तराने..... मग असे कसे..? जरा विचार करा.....!

जर तुमच्या कारमधे ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल..?
कारला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.

      जीवनातही तुम्हाला *आई* *वडील, सासु सासरे , बायको, कुटुंब इ. रूपात *ब्रेक्स मिळतात. तुम्हाला वाटते की, ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी चिडचिडे होतात.

परंतु लक्षात ठेवा, जीवनात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.

म्हणूनच जीवनात अधुनमधून येणाऱ्या अशा " ब्रेक्सची "  जाण ठेवा.
*समजुतीच्या शब्दांचा पण ताण पडतो. कारण ते वायफळ वाटतात. बोलणाऱ्याच्या अंतःकरणातून जरी ते येत असेल, तरी ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत ते पोहोचत नाहीत. शेवटी, ज्याचं ओझं त्याचं त्यालाच पेलावं लागतं. एखाद्यानं काही काळ आपलं सामान उचललं, तरी त्या मदतीच्या भारानं आपण वाकलेलेच असतो*. -

व.पु
यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक, स्वतःवर विश्वास ठेवा

एका गावामध्ये एक साधू राहत होता. हे साधू जेव्हा-जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. गाकरीसुद्धा साधूवर खूप खुश होते. जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते, तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा.


> एके दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण आले. गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले. त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले. साधुसमोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले.


> मुले म्हणाली- आज आम्ही नाचतो, आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल. मुलांनी एक-एक करून नाचण्यास सुरुवात केली. पहिला मुलगा 10 मिनिट नाचला परंतु पाऊस पडला नाही, दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशाप्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊस पडला नाही.


> आता साधू नाचू लागले परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही. अशाप्रकारे साधू नाचत-नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. हे पाहून मुले अचंबित झाली.


> मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की- एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर. दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो, मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही.

लाईफ मॅनेजमेंट
जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरु करता तेव्हा अनेकवेळा अपयश पदरी पडते. त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता. याउलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात. अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा. स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही.
बलाढ्य स्पर्धक असतानाही तुम्हाला  जिंकायचेय ?
मग तीन मिनिटे काढून वाचा !!

एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र  दिली जाते.
गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"
आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"
मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल.  इतकेही मला पुरेसे आहे"

ठरलेल्या दिवशी शंभरेक  सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या.  जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "

सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते.

तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "

सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"
राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."

सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात.

: इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !!
म्हणून महत्वाची इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!
तुम्हाला आयुष्यात नेहमी तेच लोक भेटणार नाहीत ज्यांची तुम्ही अपेक्षा केली होती. कधीकधी आयुष्य तुम्हाला अशा लोकांना भेटवते जे की तुम्हाला मदत करतील, जे तुम्हाला त्रास देतील, जे सोडून जातील, जे तुमच्यावर प्रेम करतील,
आणि नंतर हळुहळू तुम्हाला
एक बळकट व्यक्ती बनवेल...
👇👇 ध्येय 👇👇

       गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत.
त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला, दरबारात सर्व जमलेले असतात.
गाढव शहाणपणा करत सर्वांचा समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो की हिरव असत...
तुम्ही आता सांगा की खर काय आणि खोट काय.
सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांचा समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत.
आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जाते.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरव असत, तरीही का मला शिक्षा केली.
सिंह बोलला, मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही.
पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली...

Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण करणार्यांकडे लक्ष न देता    ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण पुढे ध्येय महत्वाचं आहे...!!