नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
5.58K subscribers
5.87K photos
440 videos
10 files
313 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache

Admin Contact: @Nmcontactbot

Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u
Download Telegram
माणसांसाठी वेळ देणं हे नुसतं कर्तव्य नाही, तर आयुष्याची गुंतवणूक असते. आपण त्यांना दिलेले काही क्षण त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी ऊब निर्माण करतात. कारण नाती हे बोलण्याने नव्हे, तर साथ देण्याने टिकतात. कितीही कामं असली, कितीही धावपळ असली, तरी आपल्या लोकांसाठी थोडं थांबणं गरजेचं असतं—नाहीतर एक दिवस असा येतो की कामं तर असतात, पण ज्यांच्यासाठी करतो ती माणसंच हातातून निसटतात. आणि मग उरते फक्त वेळ… पण त्याला देण्यासाठी कोणीच नसतं. म्हणूनच—ज्यांना आपल्या मनात स्थान आहे, त्यांना आपल्या दिवसातून थोडं स्थान देणं विसरू नका. नाती जपली तर वेळ आपोआप सुंदर होतो, आणि माणसं जपली तर आयुष्य...

Good Night

Credit goes to writer
5👌2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'इमानदारी आणि इथली व्यवस्था.!'
हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा 👍
👍3
Forwarded from ओम sm शेळके
आपल्यापेक्षा तो खूपच सुखी आहे असं प्रत्येकाला वाटतं मात्र त्यांच्या जीवनातील संघर्ष त्यालाच माहिती असतो आपण फक्त वरून दिसण्यावर तो आनंदी आहे असा तर्क काढत राहतो पण खरा अभिनय तोच करत असतो दिवसभर सुखी असण्याचा बाजार मांडून रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यातून दुःखाच्या वेदना बाहेर काढत असतो कारण तो पण एक माणूसच असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
1
Forwarded from B K
"जीवनाचे महत्त्व" स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण असा माझा लेख साप्ताहिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला..नक्की पूर्ण वाचा, आवडल्यास नक्की शेअर करा..😇✍️
लेखन -B.S.Kendre(stu)
Tele id-@Bskendre5
👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
' अभ्यास एक छंद..'हा माझा लेख आज प्रकाशित झाला नक्की वाचा👍👍
👏1
जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात ,
जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात ,
जेव्हा life मध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही ,
जेव्हा खूप दुःख असतात ,problems असतात तरी आपल्याला ते कोणाला सांगता नाही येत ,
जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,आता मी हारलो ,आता मला नाही जमणार ,मी थकलो …
जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्याला पासून लांब जातात ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते ,
जेवहा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्याच्या ,सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे ,

कस असतं ना प्रत्येक जण या phase मधून जातो एकदा तरी कारण तो आपल्या life चा एक भागच आहे यार ,तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार ,तुम्हाला पाहिजे तस नाही होणार कारण life ने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल ,

म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा रे ,आज दिवस वाईट आहे ,उद्याचा अजून वाईट पण पर्वा चा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेव कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं ,सांगायचं असतं ,तुमचे patience बघायचे असतात ,तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या ..

अस धीर सोडू नका यार ,आणि सर्वात पहिले negative विचार आणू नका की अस नाही झालं तर ,मला हे नाही जमलं तर ,जर तर च विचार करून काही होणार आहे ,उलट अस विचार करा मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे chances अजून वाढतील ,

चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्ह तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की ‘ चल ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं ,मला माहित आहे मी नक्की यशस्वी होणार आहे ,आज नाही जमलं उद्या नक्की जमेल ,तुम्हाला स्वतःलाच motivate करायचं आहे कारण कोणी येणार आहे , की तू अस कर किंवा तस कर ,जे काही आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच सामोर जायचं आहे …

मला माहीत आहे तुम्ही या सगळया गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल ,मला खात्री आहे कारण मला माहित आहे तुम्ही strong आहात ,तुम्ही अशे लगेच हार नाही मानणार ,मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात ,फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट ,अवघड दिवसांना सामोर जावं लागत आहे ,हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींना सामोर जातात हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ….

तुम्हाला life मध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्तिथी मध्ये अजून negative गोष्टी सांगतील की सोडून दे ,नको याच्या मागे लागूस ,काही होणार नाही ,आपलं काहीतरी काम शोध ,या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे ,उगाच वेळ घालवू नकोस ,

ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते ,कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देईला येतील ,फोटो काढायला येतील कारण वेळेसोबत सगळं बदलतं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ,कुठे जायचं आहे ..

एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेऊ नका ,कारण हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोर जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असुद्या ,जे काही सुख दुःख असतील त्या सोबत जगायचं आहे ..

निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा ,नवीन प्रेरणा घेऊन सुरवात करायची आहे ,ही वेळ ,हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार ,दुःख असेल ,problems असतील ,tension असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे ,ही वेळ ही निघून जाईल आणि होईल सगळं ठीक ..❤️😊

share करा त्या प्रत्येक मित्र- मैत्रिणी सोबत जे ह्या phase मधून जात आहेत ,त्यांना नक्कीच थोडा आधार आणि प्रेरणा मिळेल.

Credit Goes to writer
5👍2👌2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जेंव्हा कोणी सोबत नसते तेंव्हा एकटेपणा खूप खातो.
मनात न बोललेले शब्द साठत जातात.
गर्दीत असूनही मन एकटे पडते.
आठवणींचे ओझे हळूहळू वाढत जाते.
हसऱ्या चेहऱ्यामागे वेदना लपतात.
अशा क्षणी आधाराची गरज भासते.
एक समजून घेणारी व्यक्ती संपूर्ण जगासारखी वाटते...
4👍3😢2🤩1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
जगणं मुलांच हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा 👍👍
👍31
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
https://youtu.be/tFqBzt8VFJw?si=KJzb0VMU4a70vbl-
मैत्रीच्या आठवणींचा हिंदोळा मनात
सतत हलत राहतो,
हसणं-रडणं, प्रत्येक क्षण
त्यात जपलेला असतो.
आयुष्य कितीही बदललं तरी,
त्या हिंदोळ्यावरची मैत्री कधीच
जुनी होत नाही... 🌿


खूप छान मराठी Short Film आहे.
सर्वांनी नक्की पहा...
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
' मनाची स्थिरता आणि अभ्यास..'हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा 👍👍❤️
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
सवय..
"रोज बोलण हे फक्त नवरा बायकोच्या नात्यात असतं,किंवा ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या नात्यात असतं.. इतर नात्यात रोज रोज बोलण झालंच पाहिजे असं नाही.. अश्या नात्यात रोज रोज बोलण्यापेक्षा अधूनमधून बोलत राहणं जास्त आनंददायी असतं.. कारण रोज रोज बोलण्याने त्या व्यक्तीची सवय लागून जाते, नंतर त्या व्यक्ती सोबत बोललं नाही तर दिवस कटत नाही आणि करमत पण नाही. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे कोणतंही काम आपण रोज करत गेलो तर आपल्याला त्याची सवय लागून जाते.. काही सवयी खूप चांगल्या असतात त्याने आपलं जीवन बदलून जातं.. पण काहीची एकदा सवय लागली आणि नंतर ती व्यक्ती अचानक काही कामानिमित्त बाहेर गेली किंवा त्या व्यक्तीचा मोबाईल खराब झाला किंवा इतर कोणतीही घटना झाली ज्यामुळे तो व्यक्ती तुमच्या संपर्कात राहू शकला नाही तर,आपल्याला प्रचंड त्रास होतो.. त्यामुळे जीवनातं काहीहीं करा पण कोणाचीच कायमची सवय लावून घेवू नका.. बायकोची सुद्धा 😂कारण बायको पण कधी कधी आपल्याला सोडून जाते.. कारण 'Nothing is permanent 'कोणतीही गोष्ट स्थायी नाही.. त्यामुळे कायमच कोणाच्याहीं अधीन होणं थोडं त्रासदायक आहे..कारण सवय लावणारे सवय लावून देतात आणि नंतर मध्येच सोडून जातात तेव्हा मात्र आपल्याला प्रचंड त्रास होतो.. त्यामुळे कुठेतरी कोणाचीही सवय लागणार नाही यांची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.. सवय लागावी ती चांगल्या गोष्टीची, अभ्यासाची, सत्त्य बोलण्याची, इमानदारदारीने काम करण्याची कारण ह्या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात.. "
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
(हा लेख तुम्हाला कसा वाटला..? याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा..)
✍️संपर्क-8806379959
✍️संपर्क -
@ABCs1432
4👍1😢1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
माझं प्रेम तुझ्या स्वप्नांना
मारू नये म्हणून
मी आज तुझ्यापासून दूर आहे

माहिती आहे सखे,
मला माझ्यापेक्षा जास्त
तुझा वेळ तुझ्यासाठी अनमोल आहे,
तो वेळ खर्च होऊ देऊ नकोस
कोणाच्या आठवणीत,
कोणाच्या वाट पाहण्यात

म्हणून सांगतो सखे,
सर्व काही पणाला लावून
तु तुझ्या इच्छा, अपेक्षा
आणि स्वप्नं पूर्ण कर,
कारण तुझं यश
हेच माझं खरं प्रेम आहे

मी आहे ना तुझ्यासोबत,
सखे सदैव, प्रत्येक क्षणी,
जरी दिसत नसलो
तरी तुझ्या धाडसात आहे,
तुझ्या मेहनतीत आहे,
तुझ्या प्रत्येक विजयामागे आहे

त्यामुळे स्वतःला एकटं समजू नकोस,
ना कधी भिऊ नकोस,
ना घाबरू नकोस,
कारण तू जेव्हा उभी राहशील
स्वतःच्या पायावर अभिमानानं,
तेव्हा माझं प्रेम
तुझ्या डोळ्यांतून हसताना दिसेल

✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
7
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
येशू.... 🙏
✍️ "मला येशू ख्रिस्त यामुळे आवडतो,कि लोकांनी ज्यावेळी त्यांच्या हातापायात खिळे ठोकून त्यांना कृसावर लटकवलं.. त्यांचा अमानवीय छळ केला. त्या लोकांसाठी सुद्धा येशूने पार्थना केली.कि देवा यांना माफ कर, कारण हे काय करतं आहेत?हेच त्यांना माहित नाही .ते माझ्याबद्दल आज्ञानी आहे..खरं तर जीवनात असे अनेक लोकं असतात. ज्याचं तुम्ही रुपयाच नुकसान केलेलं नसतं. तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे? तेही या व्यक्तीना काहीच माहित नसतं.पण तरीही या व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुम्हाला नाव ठेवतं असतात. व , तुमच्यावर टीका करतं असतात.खरं तर अश्या लोकांना सु्बुद्धी मिळण्याची गरज आहे. कारण ते काय करतं आहे?हे त्यांनाच माहित नाही."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
Happy Christmas Day🥰
25 डिसेंबर 2025
✍️संपर्क -8806379959
✍️संपर्क -:
@ABCs1432
5
Forwarded from Vinayak Bhise
सोसले दुःख वेदना असंख्य सखे तू,
हसण्याआड लपवलं किती रडणं,
लोकांसमोर सावरलेले डोळे
रात्री उशीवर ओघळले…
ते मला दिसतं

माहित आहे मला सखे,
काही वेदना अशा असतात
ज्या वेळही बऱ्या करत नाही,
त्या फक्त माणसाला
हळूहळू शांत करत जातात
आतून रिकामं करत जातात

मी तुझ्या भूतकाळातली ती
आठवणी नाही पुसू शकत,
कारण त्या तुझ्या श्वासात मिसळल्या आहेत.
तुला दिलेल्या त्या जखमा
भरू शकत नाही,
कारण काही जखमा
भरल्यासारख्या दिसतात
पण स्पर्श झाला की पुन्हा उघडतात

म्हणूनच सखे,
मी तुला सावरण्याची भाषा नाही करणार,
“सगळं ठीक होईल” असं
खोटं धीरही देणार नाही

मी फक्त तुझ्या वेदनेशेजारी
गप्प बसून राहीन,
कारण कधी कधी
सोबत असणं
हाच मोठा आधार असतो

तुझ्या डोळ्यांतलं पाणी
पुसायचा हक्क नाही माझा,
पण ते ओघळताना
कोणीतरी पाहतंय,
कोणीतरी थांबतंय,
ही जाणीव
एकटेपणाला थोडी कमी करते

तु जशी आहेस तशीच स्वीकारतो सखे,
तुझ्या तुटलेल्या शांततेसह,
तुझ्या न सांगता येणाऱ्या वेदनांसह,
कारण मला
तुझं हसणं नाही,
तुझं खरं असणं प्रिय आहे

सखे सदैव प्रत्येकक्षणी
तुझ्यासोबत आहे 

विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
4👍1
Forwarded from ओम sm शेळके
आपण आपला छंद जपायला हवा मग लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं तरी चालेल कारण ज्यांनी ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकल त्यांनी पण आपला छंद जोपासुन  स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं म्हणून आपलं आयुष्य आहे आपल्या आवडीने जगा पण याचा त्रास कोणाला होत तर नाही ना एवढ मात्र नक्की बघा कारण कोणाला दुःख देऊन घेतलं सुखं एखाद्या कर्जा सारखं असते ते थोड्या दिवसात आपल्यालाचं व्याजाबरोबर ते परत करावं लागतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
👌2
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
जगू या थोडंसं बेभान होऊन,
थोडं भान ठेवून,
थोडंसं भान हरवून,
तुझं-माझं न
आपलं म्हणुनी…

नको कोणती बंधनं,
ना नकोस वचनं,
ना कोणत्या शपथा सखे,
नकोस काहीच…

शब्दांविनाही असावं
आपलं बोलणं,
ना रुसणं,
ना फुगणं,
भांडण नाही,
ना कोणताच तंटा…

कारण विनाकारण
असावं सखे
आपलं हक्कानं बोलणं,
एकमेकांना न बोलताही
समजून घेणं…

चल सखे,
उद्याची पर्वा न करता
कालचे दुःख सारे विसरूनी
आजचा, आताचा प्रत्येक क्षण
जगू या एकमेकांसोबत…
आनंदाने,
जसा हा शेवटचा क्षण आहे
आपल्या आयुष्याचा…

कारण सखे,
उद्याचं आयुष्य
कुणी पाहिलेलं नाही

विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo.7798150143
5