Forwarded from Swati Chavan
🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀
*"मामा....."*
*©doctorforbeggars.*
*शुक्रवार .... मस्जिद बाहेरचे पेशंटस् तपासुन निघतच होतो तेव्हढ्यात एक आज्जी आली... गोळ्या घेवुन म्हणाली... एक विनंती हाय, पलीकडल्या फुटपाथ वर माझी मुलगी राहते, तीला रिक्षानं उडवलंय, बहुतेक खांदा मोडलाय, तीला बघता का?*
*चला.... म्हणत चालत तीच्याबरोबर निघालो... वाटेत ती सांगत होती.... ही माजी पोरगी.. मेघा...!*
*दिनकर नावाच्या माणसाशी आमी लगीन लावुन दिलं... त्येज्यापासुन तीला 3 पोरं झाली अक्षय, सनी सारीका...दिनकर काही कारणानं गेला... मग गफुर खान नावाच्या माणसानं हिच्याशी लग्न केलं... याच्यापासुन पण तीला 3 मुलं आहेत.... सलीम, सुलेमान आणि आयेशा....*
*वाटेतल्या तीच्या बोलण्यावरुन बरंच काही कळलं..... मला हे सगळं ऐकायलाच गंमत वाटत होती....एकाच आईची सहा मुलं... पहिले तीन वेगळा धर्म पाळतात... दुसरे तीन वेगळा धर्म पाळतात.... तरीही एकमेकांचे बहिण भाऊ म्हणुन राहतात.... कोणताही मत्सर एकमेकात नाही.... सावत्र पणाचा दुजा भाव नाही....काही मुलं मेघाला आई म्हणतात... तर इतर मुलं अम्मी....!*
*समाजातही असंच घडलं तर किती छान होईल....? असो....!*
*मी पोचलो, त्यांच्या फुटपाथ वरच्या कुटुंबात...*
*मेघा.. ही पंचेचाळीशीची बाई..... वाघ्या - मुरळीतली, मुरळी म्हणुन नाचायची. सहा पोरांसकट फुटपाथवरच सगळा संसार मांडलेला.... फाटक्या मळलेल्या वाकळा आणि चादरींची भेंडोळी... फुटकी मोडकी अस्ताव्यस्त पसरलेली भांडी... आजुबाजुला पडलेल्या चींध्या... सांडलेलं पाणी आणि कुणी कुणी दिलेलं उष्टं खरकटं ... यातच ती बसली होती... याच उघड्या कूटुंबात मी आज प्रवेश केला.... मी डायरेक्ट खाली बसलो... ती ओशाळली... माझ्या बसण्याची जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायला लागली...*
*घाणीत बसु नका वो डाक्टर... म्हणत, आजीनं बसायला मला एक फाटकं पोतं अंथरलं...*
*ज्या पद्धतीने,अदबीने तीने ते अंथरलं ते पाहुन मला ती माझ्यासाठी जरीकाठाचं रेशमी मौल्यवान वस्त्र माझ्यासाठी टाकते आहे असं वाटत होतं....*
*ज्या आपुलकीने ही मेघा आणि तीची आई माझ्याशी वागत होत्या ते पाहुन मला मी एखाद्या राजवाड्यात पाहुणचाराला आलेला पाहुणा आहे असं वाटायला लागलं....*
*खरंच होतं ना....? ज्या घरात अक्षय, सनी, सारीका, सलीम, सुलेमान आणि आयेशा.... आपल्या आई, अम्मी, दादी आणि आज्जी ही नाती सांभाळत राहताहेत....ते उघड्यावरचं घर राजवाड्यापेक्षाही छानच नाही का?*
*तपासुन औषध देता देता मी नेहमीप्रमाणेच मेघा आणि आज्जीशी गप्पा मारायला लागलो.... दोघींचीही कर्मकहाणी वेगळी.... त्यांचं जगणं, वागणं, भोगणं ऐकता ऐकता मीच गुंतत गेलो...*
*नाही म्हणायला एक खटकत होतं, आयेशा ही मुलगी खुपच लहान...आईच्या मांडीवर होती... पण ती सोडली तर इतर पाचही मुलं तीथंच अस्ताव्यस्त पसरली होती... लोळत पडली होती.... कुणाचे डोळे अर्धवट उघडे... कुणी उठण्यासाठी धडपडतंय... तर कुणी उठता उठता पडतंय ....*
*मला कळेना.... मी म्हटलं मेघा हे काय ?*
*म्हणाली डाक्टर भाउ, समदी पोरं नशा करत्यात... मी म्हटलं दारु ?*
*म्हणाली नाही, व्हाईटनर आणि व्हिक्सची नशा.... तीनं पुर्ण भरलेला एक डब्बा मला दाखवला, ते फेव्हिकाॕल सारखं अत्यंत तीव्र वासाचं अॕड्हेजीव्ह होतं.... मॕट, काचा चामडं चिटकवण्यासाठी वापरतात.... कपड्यावर टाकुन याचा वास घेतला की जब्बरदस्त नशा येते....*
*मी कुतुहलाने एक एक फोटो काढायला लागलो.... अस्ताव्यस्त पडलेल्या पोरांचे फोटो काढायला लागलो......आणि तेव्हढ्यात त्या पडलेल्या मुलांपैकी एकजण अत्यंत त्वेषाने उठुन दातओठ खात माझ्याकडे यायला लागला...*
*त्याच्या आज्जीकडे पाहुन म्हणाला.... ऐ दादी... ये किसको तु घरपे लायेली है...? ये हरामी पुलीस का खबरी है.... अपनी सब बाते पुलीस को बताके... अंदर करवायेगा ये सबको.... सारीका को इधर से लेके जाव.... सालेकी नजर इसी पे होयेंगी....*
*अस्सल मुंबईतली ही हिंदी आहे हे मला जाणवलं....*
*तो भयानक चिडला होता माझ्यावर.... साधारण 15-16 वर्षाचं काटकुळं पोरगं.... अंगात काळं बनीयन, गुडघ्यापर्यंत दुमडलेली जीन्स, राजेश खन्ना स्टाईल कानावर असलेले केस, डोळ्यात सुरमा.... आणि त्याच डोळ्यांतुन वाहणारा माझ्या बद्दलचा भयानक राग....*
*माझ्याकडं धडपडत येत म्हणाला... ए xxx के.... इधर से अब्बी के आब्बी कटनेका.... तेरी माँ का xxxxx तु इधर कायकु आया.... मालुम है मेरकु..... डाक्टर बनके नाटक कर रयेला है ....xxxxx*
*मी आईवरुन मला दिलेल्या शिव्या ऐकुन सुन्न झालो.... 15 वर्षाचं एक पोरगं , मला शिव्या देतंय, माझ्या अंगावर धावुन येतंय.... मी विचार करायला लागलो...*
*त्याचा माझ्याविषयी गैरसमज झाला होता....*
*एव्हाना मेघा आणि ती आज्जी त्याला सावरत होत्या.... दीनवाणेपणाने माझी पदर पसरुन माफी मागत होत्या.... मी तिथंच बसुन होतो.... वेड्यासारखा .... डोकंच चालेना....*

👍10
Forwarded from Swati Chavan
*मला बसलेला बघुन तो अजुन चवताळला.... म्हटला... आब्बीबे बैटेलाच है कुत्ते ? आरे कुत्तेके हाड बोलेंगे तो कुत्ता भागता हय.... तु xxx की औलाद ...मार खाके ही जायेगा क्या....?*
*माझ्या मुलाच्या वयाच्या पोट्ट्याने मला रस्त्यात इतकं अपमानीत करावं ? मी खरंतर शुन्य झालो होतो....*
*पण खरंच सांगायचं तर मला त्याचा राग येत नव्हता, शिव्या खाल्ल्याचं वाईटही वाटत नव्हतं, भिती तर अजीबात वाटत नव्हती....*
*कारण, त्याच्या जागी तो बरोबर होता... प्रेमाचं खोटं नाटक करुन फसवली गेलेली ही मंडळी असतात.... मी ही त्यातलाच नसेन कशावरुन ? असं त्याला वाटणं साहजीकच आहे....*
*अशा लोकांपासुन आपल्या आईचं, "सावत्र बहिणीचं" आणि आज्जीचं रक्षण करणारा तो मला वाट चुकलेला परंतु एक "समर्थ" मुलगा, नातु आणि भाऊ वाटला....! खरंतर त्याचा अभिमानच वाटला.... आपल्या परीनं तो आपल्या रस्त्यावरच्या या कुटुंबाचा कर्ता पुरुष होवुन जबाबदारी घेत होता....*
*लक्षाधीश असुन आपल्या आईबापाला घराबाहेर काढणारी मुलं मी पाहिलीत.... पण त्याही पेक्षा स्वतःकडे काहीच नसुन आपल्या कुटुंबाला आपल्या परीनं जपणारा हा सलीम मला मोठा वाटला.... आवडला....*
*मी आता जागेवरुन उठलो... माझ्याबद्दलचा त्याचा अविश्वास कुठ्ठही कमी नव्हता झाला.... त्याला वाटलं असावं मी आता त्याच्या अंगावर धावुन जाईन.....*
*स्वतःच्याच छातीवर बुक्की मारत म्हणाला..... आ xxxx आ.... मारेगा मेरकु ? हात तो लगा xxxx इदरीच तेरे हात काट डालता हुं.... मेरी माँकु और दादीको किस चीज के लीये फुसला रहा था तु ? तेरे नेटवर्कमे आनेवाले लोग नही हम xxxxxx*
*त्याच्यातला तो मुलगा आणि भाऊ पाहुन त्याही परिस्थितीत माझे डोळे पाणावले.... मी त्याच्याजवळ चाललो....*
*मागुन मेघा म्हणाली.... नका जावु डाक्टर भाऊ फुडं.... त्यो नशेत हाय काय बी करंल.... !*
*मनात म्हटलं मी ही नशेतच आहे..... त्याची वेगळी आणि माझी वेगळी......*
*माझ्या पोराच्या वयाचं पोरगं ते, प्रतिकारासाठी सावध उभं होतं..... मी जवळ गेलो, हात जोडले, म्हटलं, बेटा सलीम.. तेरी माँ मुझे भैय्या बोलती है.... तेरी दादी मुझे बेटा बोलती है.... इस हिसाब से मै तेरा मामा हो गया.... अब तु मामा को भी गाली देगा ? मामाके हात काटेगा बेटा ?*
*मै देख रहा हुँ, तु अपने माँकी बहन सारीका की और अपने दादी कि अपने तरीके से फिकर करता है.... मै सचमें डाॕक्टर हुँ.... मै भी रस्ते में ऐसेही रिश्ते बनाता हुँ... और अपने तरीके से निभाता भी हुँ....*
*मी आणखीही बोलत राहीलो, तो ऐकत राहिला.....*
*माझ्या शब्दांनी तो विरघळत चालल्याचं जाणवलं मला....*
*मी त्याला जवळ घेतलं.... मी काय करतो हे त्याला सांगीतलं.... तो पुर्ण पणे शरण आला मला.... माणुस म्हणुन.... शस्त्राविना मी लढाई जिंकली होती.....*
*आम्ही नंतर गोल बसुन चहा आणि क्रिमरोल मागवला...*
*चहा मागवतांना टपरीवाल्याला तो म्हणाला .... भाय जरा जादा क्रीमवाला क्रीमरोल दे दे....*
*हजार वेळा क्रीमरोल खाल्ले असतील पण तेव्हाचा तो चहा आणि क्रिमरोल ची रंगतच न्यारी....*
*मी म्हटलं, सलीम तु काय करतो रे बाळा ? तुला माझा एवढा राग का आला ?*
*म्हणाला मामा मै बंबय मे रहता है.... मै बारात मे नाचनेवाली घोडी को ट्रेनिंग देता है.... आख्खी बंबय मे मेरे जीतना उमर मे छोटा ट्रेनर नय... पैसा मिलता है... काम होता हय तो.... नय तो नय.... फिर बाकी टायम पाकिट मारता हुँ.... व्हि.टी. पे.... कभी दादर... यहां भीड ज्यादा होती है.... फिर थोडी गलत संगत लग गयी और ये व्हाईटनर का नशा लग गया....*
*हम रोड पे रहते है.... मेरी माँको देखके लोग आते है कुच भी पुछते है.... ये मेरी भैन है सारीका.... उसके बारे मे पुछते है.... मेरेको लगा तु भी उन्ही में से हय.....*
*मी शहारलो सर्व ऐकुन ....माझा राग का आला असेल त्याला याचा मी केलेला अंदाज बरोबर होता तर......*
*मी पाकिटमार आहे.... असं कुणी मला विश्वासाने सांगतंय.... यावरच मला विश्वास बसेना....*
*पुढं म्हणाला, मै उन लोगोंकाच पाकीट मारताय जो साले हरामी दिखते हय.... गरीब आदमी का मै पाकीट नय मारता.... हरामी आदमी को हम पयचानते लगीच....उसको पता बी नय चलेंगा,... साला कब और किसने पाकिट मारा.....*
*मी गंमतीनं म्हटलं.... चल माझं पाकीट मारुन दाखव .... बघु कळतंय का मला....*
*हसला, म्हणाला ....मामा बापजनम मे तेरकु पता नही चलेगा.... कब तेरा पाकीट मैने मारा.... लेकीन नही मारुंगा.... पँट फटेगी तेरी.... और हमारा असुल है.... मारा हुआ पाकीट हम कभी वापस नही करते.... तो तेरा नुकसान होयेंगा, पैसा जायेंगा.. पँट भी फटेंगी तेरी....*
*माझ्या पाकिटात खरंतर वडा पाव किंवा फारतर मिसळ खाण्याएवढेच पैसे असतात...बाकी पाकिटात सगळ्या चिठ्ठ्या चपाट्या.... कुणाला कुठलं काम... कोण देणार ? कुठं ? कुणाला कुबडी द्यायची ? कधी ? हेच सगळं....*

❤2👍2
Forwarded from Swati Chavan
*मी त्याला हे सांगीतलं आणि हसत म्हटलं.... सलीम तेरा मामा है तो डाॕक्टर, पर गरीब है.... ये चिठ्ठी छोडके कुछ नही मिलेगा मेरे पाकिटमें....*
*खुप विचार करुन म्हणाला.... इसीलीयेच मै तेरा पाकीट नय मारुंगा,... बेचारे लोगोंका नाम लीखा है तुने पाकिटमे ,किनको क्या देना है क्या नही .... मै लेगा पाकिट तो उन गरीब लोगोंका नुकसान होयेंगा....*
*मी काय म्हणु या मुलाला....*
*मी या मुलात खुप काही पहात होतो.... भले पाकिटमार असेल... पण त्या ही कामावर त्याची श्रद्धा आहे....*
*मघाशी कुटुंबावर प्रेम करणारा सच्चा मुलगा आणि भाउ पाहीला....*
*गैरमार्गाच्या का असेना... पण कामावर निष्ठा असलेला तीथंही असुल पाळणारा एक माणुस पाहीला....*
*पाकिट मारतानाही गरीबाला त्रास न होवु देणारा एक अप्रत्यक्ष समाजसेवक पाहीला...*
*आपण डाॕक्टरचं पाकीट मारल्यावर इतरांचं नुकसान होईल हा विचार धारण करणारा हा माणुस मी पाहीला....*
*कसं असतं.... एकाच झाडाची फुलं.... काही देव्हा-यात जातात.... काही तिरडीवर तर काही वारांगनेच्या गज-यात ....*
*पाउस पडतो.... हे पाणी कधी गंगेच्या पात्रात पडतं ... तर कधी गटारात.... गंगेत पडणारं पाणी तीर्थ होतं ....पण गटारात पडलेल्या पाण्याचं काय ...?*
*गटारात पडलेल्या पाण्याचा तरी यात दोष काय ?*
*पाणी तेच... फुलं तीच.... पण आपण कुठं जावं हे त्यांच्या हातात नसतं.... तसंच या सलीम सारख्या मुलांचं....*
*नशीबाचे भोग ? समाजाची उदासीनता ? की राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा ?*
*सलीमसारखी लाखो मुलं आहेत, ज्यांना वळण लावलं तर भारत खरंच समृद्ध होईल....*
*कुटुंबावर प्रेम करणारा.... जात धर्म न मानणारा, कामावर श्रद्धा ठेवणारा, पीडीतांसाठी मनात माया ठेवणारा....असाच भारतीय हवाय ना आपल्याला ?*
*मी मुद्द्यांवर आलो, म्हटलं बाळा काम करशील?*
*म्हटला.... करेंगा ना... पन ये मेरी नशेकी लत छुडाव पयले.... साला किसी के पास जायेंगा काम करनेको तो अपनी नशे की वजह से किसीका नुकसान होना नयी मांगता,...*
*काय हा माणुस ? इथंही दुस-यांचाच विचार.....!*
*व्यसन सोडण्यासाठी औषधं आहेतच पण जर व्यसनाधीन माणसाच्या प्रेमाच्या व्यक्तीने त्याला व्यवस्थित समजावुन सांगीतलं तरच ते व्यसन तुटतं.... नुसत्या औषधाने नाही.... हे त्रिकालाबाधीत सत्य आहे....*
*सलीमच्या घरात प्रेमाची माणसं खुप आहेत पण व्यसन सोडण्याविषयी ते कितपत त्याला सांगतील याविषयी शंकाच आहे....*
*मी मनोमन ठरवलंय... झालोच आहे आता मामा तर याला वाटेत सोडायचं नाही....*
*मामा म्हणुनच मी याच्याशी आता नातं ठेवुन माझ्या पद्धतीने मी याचं व्यसन सोडवेन.... कामाला लावेन....*
*माझ्यातल्या डाॕक्टर पेक्षा माझ्यातल्या मामाला तो नक्की मान देईल याचा मला जास्त विश्वास आहे.... !*
*खुप वेळ झाला, मी जायला उठलो.... मेघा आणि आज्जीचा निरोप घेतला... पुढच्या शुक्रवार पासुन रोज घरी येणार असं सांगुन गाडीवर बसलो.... किक मारणार.... एवढ्यात सलीमने हातानं थांबायची खुण केली.... म्हटलं काय रे ?*
*जवळ आला.... हातात एक डब्बा ठेवला....म्हटला.... मामा.... ये नशेका डब्बा है लेके जाव.... फेक दो...*
*मी अविश्वासाने पहात राहीलो..... मेघाचे डोळे पाण्यानं डबडबले.....*
*निघताना सलीम खाली पायाकडे झुकला, म्हणाला मामा.... नशेमे गाली दे दी मैने माफ कर दे.... आज जुम्मे को तु मिला.... शायद अल्लाह ने तेरकु भेजा.... आजकी नमाझ सच मे कबुल हो गयी.... बस तु एक बार बोल दे ....माफ किया सलीम....!*
*मी वाकलेल्या सलीमला छातीला लावलं.....हळुच कानात म्हटलं ....माफ कर दिया बेटा.....*
*सच ? म्हणत त्याने मला कडकडुन मिठी मारली.... आणि माझ्या पाठीवरुन हात फिरवत राहिला.......*
*माझा सगळा शर्ट त्याच्या अश्रुंनी भिजुन गेला होता...... आणि मेघा दुरुन आपल्या पदरानं डोळे पुसत होती.....*
*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*9822267357*
*abhisoham17@gmail.com*
*www.sohamtrust.com*
*शुक्रवार 23 फेब्रुवारी 2018.*

❤5👍4
Forwarded from B K
संयम आणि चिकाटी🔥
दैनंदिन आयुष्यात असे काही प्रसंग घडत असतात जर आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहिलं आणि त्याचा योग्य अभ्यास केला तर ते नक्कीच आयुष्याला कलाटणी देणारे असतात🔥जीवनात तुम्ही कोणतेही कार्य किती प्रामाणिकपणे अनेक अडचणींचा,विरोधकांचा(जळणाऱ्यंचा)सामना करत ते कसे पूर्ण करता हे महत्त्वच आहे💪
तुम्ही जशी प्रगती करत पुढे जाणार तसे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची संख्याही वाढत जाते मग ते क्षेत्र कोणतेही असो शिक्षणही तुमच्या कामावर/अभ्यासावर शंका घेतली जाईल,तुम्हाला शिव्या दिल्या जातील,नातेवाईक/लोक टोमणे मारतील,समाजातून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जाईल,मग अश्या गोष्टींना तुम्ही प्रतिउत्तर कसे देता आणि आपलं अस्तित्व परत कसं सिद्ध करता तेही स्वतःच्या जबाबरीवर💪अनेक आरोपांना तुम्ही एक शब्द न बोलता आपल्या कामातून ते कसं करून दाखवायचं हे कालच्या निकालातून शिकायला भेटते.🔥
"कर्तृत्व अस बनाव्यायच की जेव्हा तुम्ही bounce back करणार तेव्हा तुम्ही तर येणारच परंतु येते वेळेस अखी टीम घेवून येणार"🔥💪
.....🦋🌺✍🙏....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

👍6👌2😢1
Forwarded from ओम m शेळके
आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकाव वाटतं हे स्वाभाविकचं आहे मात्र परिस्थितीकडे बघून थांबावं लागतं कारण जे परिस्थिती शिकवते ते कुठलंच विद्यापीठ शिकवू शकतं नाही स्वप्न जरूर बघा ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करत राहा पण आपली वस्तुस्थिती मान्य करा जे आहे ते मान्य केलं की जे आपल्याकडे नाही त्याचा त्रास कधीच आपल्याला होतं नाही,,,💯हा एक माझा अनुभव आहे!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍5
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"आली घातक वेळ म्हणून स्वीकारले मरण"
"छातीवर झेलून गोळ्या जीव केला देशास अर्पण"🇮🇳
"सर्व शूरवीर लढले खूप देशाच्या सुरक्षेसाठी
परंतु आज का नाही थोडाही वेळ त्यांच्या स्मरणासाठी"?
भारतच्या प्रगतीच्या वाटेवर चालून येणारी काळी सावली ज्यात अनेक देशभक्ताना लाल रंजीतरक्ताची🇮🇳पिचकारी खेळावी लागली मग ते तुकाराम ओबले पासून ते संदीप उन्नीकृष्णन किंवा हेमंत करकरे साहेबांना पासून ते अशोक कामटे पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत असे सर्व वीर देशासाठी बिंदास झाले? ..जे शहीद झाले ते त्यांच्या परिवाराला काय म्हणून गेले असतील🙁?आम्ही येतो परत आणि त्यांना काय भेटलं असेल काय तर त्यांच्या मृत्यूंची खबर🇮🇳बहुदा त्यांच्या परीवराच काय झाल नंतर ह्याचा विचार पण मनात येत नाही.देव सदैव सर्व शूरवीरांच्या परिवारास नेहमी सुखी ठेवो🙏🏻देश तुमचे बलिदान कधीही विसरणार नाही🇮🇳देशभक्ती ही फक्त राष्ट्रीय सणांपूर्ती मर्यादित ठेवू नका,ती नेहमी नसानसात भिनली पाहिजे.
........🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

👌4
Forwarded from ओम m शेळके
*संघर्षामध्येच साथ सोडून जावे*
*इतकी हलकी आमची निष्ठा नाही*
*आपल्या माणसांची सोबत पुरेशी*
*यापेक्षा मोठी कोणती प्रतिष्ठा नाही.!*
कोणी लिहिले काय माहीत पण छान वाटलं राव म्हणून पोस्ट केले👍🙏

🔥8👍3🥰1
Forwarded from ओम m शेळके
जीवनातलं गणित वाटत तेव्हढं सोपं नसते राव कधी कधी भावनांची वजाबाकी आणि जबाबदारीची बेरीज करावी लागते कारण परिस्थितीपुढे भावनेला किंमत व जबाबदारीला हिम्मत कोणीच देत नाही असं न होता आपण प्रेमाचा गुणाकार आणि स्वार्थी वृत्तीचा भागाकार करायला हवा तरचं माणसातील माणुसपण जिवंत राहील राव!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍6❤2
Forwarded from B K
आपण रस्त्याने जात असतो तेव्हा रस्तावर अनेक काटे,चिखल येतात,जर आपण त्यांना दगड मारू तर ती घाण आपल्यावरच येऊ शकते म्हणून आपण त्यांचा बाजूने जातो,त्याचप्रमाणे काट्यासारखे,चिखलासारखे आयुष्यात अनेक नावे ठेवणारे,खाली खेचणारे(जळणारे),नकारात्मक बोलणारे,तुम्हाला कमी समजणारे,तुमच्यावर हसणारे लोक मिळतात अश्या लोकांना आपण उत्तर देण्यापेक्षा,त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा त्या गोष्टी तिथेच सोडून आपले कार्य पुढे चालू ठेवण्यातच खरी सुज्ञता आहे.
........🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.

❤6👍2
Forwarded from Swati Chavan
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
*🔸अन्नपूर्णेचा हात...!🔸*
*#कथाविश्व.*
*नुकतंच लग्न झालेली..नवी नवरी ती... घरात आजेसासूबाई, सासूबाई, जाऊ नणंद अश्या स्त्री राज्य असलेल्या भरल्या घरात आलेली, स्वयंपाकघरातला तिचा पहिलाच दिवस, एकाहून एक सुगरण हातांनी तृप्त झालेली त्या घरातली अन्नपूर्णा आज हिच्या हाताची चव बघणार होती.*
*हिच्या मनात धास्ती, पहिलं कौतुक वगैरे ठीक आहे, पण त्यांच्यासारखं नाही च जमलं तर??? फजिती ग बाई अगदी!!!! तिला येणारा थोडा फार स्वयंपाक नावाप्रमाणेच... फार येतंय असं वाटताना थोडाच जमणारा असा, आजी- आई घरी असताना शेलकं काम करणारी ती... आज ही परीक्षा अंगावर आली तिच्या....*
*तुम्ही थांबा ना इथे... मला सांगा... ती सासूबाईंना म्हणाली. मनातलं ओळ्खल्यासारखं त्या म्हणल्या, अगं कर... काही चुकत नाही... इकडे शेगडीला हळदकुंकू वहायचं... देवघरात अन्नपूर्णेला नमस्कार करायचा, आणि सुरुवात करायची... काही अडलं, तर आहेच मी. आम्ही कुठे आभाळातून पडलो?? करता करता येतं अगं... येईल हो!!! एक दिवस तरबेज होशील बघच... आपल्या घरात अन्नपूर्णेचा हात आहे अगदी डोक्यावर सगळ्यांच्या...*
*सगळ्यांच्या.... तिच्या मनात तो शब्द घोळला... आता मी पण ह्या सगळ्यात... खुशीने ती कामाला लागली, आणि हो... तुझं करून झालं ना... की एक अगदी छोटीशी पोळी करायची शेवटी, त्यावर कणभर भात, जे काही आपण तोंडी लावणं केलं असेल ते वाढायचं, आणि मागच्या अंगणात तुळशीवृंदावन आहे ... तिथून थोडं पुढे जाऊन एक फरशी ठेवलीय उंचावर तिथे हा घास ठेऊन ये... पूर्वी गाय होती, तिचा गोग्रास असायचा, आता हा आपला छोटासा घास कावळा खाऊन जातो. काही असेना... एक जीव येऊन भूक भागवून तर जातो, कोण कोणत्या रूपाने येईल कोण जाणे, आपण ठेवायचं.. सासूबाईंनी सांगितलं.*
*त्यादिवशी, बरं जमलं तिला... अगदी उत्तम नाही, पण चवदार झालंच. ती अगदी खुश झाली. जमेल जमेल !!! अगदी सासूबाईंसारखाच जमेल एक दिवस...*
*दिवस, महिने, वर्ष जात राहिली, आता ती रुळली .. संसारात सर्वार्थाने प्रगती झाली.. नोकरीच्या निमित्ताने नवरयासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेली, घरातलं सगळं आता एकटीनेच करताना ही म्हणून धांदल उडत होती... लेकीची शाळा, ऑफिसच्या अडनिड्या वेळा.. पण तिथेही हा छोटुश्या घासाचा नियम मोडत नव्हती... जे काही करत असेल, त्यातलं न विसरता बाल्कनीतल्या तिच्या ठरलेल्या जागी ठेवायची.. कधी बाहेर जायचं ठरलं, तरी वाटीभर भात का होईना... लावून त्याच्या अगदी छोटया घासावर दही वाढायची.. तिच्या मनात हे पक्कं ठसलं होतं,,,, सगळ्यांना तृप्त करणारं,, प्रवासात आग्रहाने डबे भरभरून देणारं, कोणाला कधी विन्मुख न पाठवणारं तिच्या घरातलं अन्नपूर्णेचं व्रत,,, हा असा घास त्याचाच जणू काही अविभाज्य भाग होता तिच्यासाठी..*
*इकडेही तो घास येऊन खाऊन जाणारा होताच. नवीन ठिकाणी जम बसला, तसं तिने आधीची आवड म्हणून पुढचं शिक्षण पुन्हा चालू केलं. घरातून पूर्ण सहकार्य होतं.. आता तर दिवस पुरेनासा झाला... आणि त्यातच तो परीक्षेचा दिवस आला.. तिला अवघड वाटणारा विषय.. परत एकदा तोच ताण, तीच उत्सुकता, थोडीशी भीती.. सगळं तस्संच. सकाळी १० वाजता पेपर, सकाळी पटकन होईल असं काहीतरी न्याहारी साठी करू.. आणि आजचा एक दिवस डबाच आणू बाहेरून, एक दिवस चालतं तितकं.. घाईघाईत आवरून बाहेर पडली, लेक-नवरा अगदी ती जाईपर्यंत दारात उभे राहिले..*
*सावकाश ग..!! आई अच्छा !!! पेपर अगदीच छान गेला, अगदी हुश्श होऊन घरी यायला निघाली,, विचारा विचारा मध्ये एकदम तिला आठवलं,, आज बाहेरून डबा आणायचा तर ठरलं.. पण माझा कावळ्याचा घास??? तो आज राहून गेला.. इतक्या वर्षात न झालेली गोष्ट झाली आज... नेमकी आजच...*
*त्याच विचारात जिने चढताना तिच्याच घरातून, बंद दारा आडून सुद्धा एक खमंग वास बाहेर दरवळलेला तिला जाणवला... घरात पाऊल टाकलं, आणि खांदयावर पंचा टाकून, ओट्याशी उभ्या असलेल्या नवऱ्याला बघून आश्चर्यचकित झाली.. कसा गेला पेपर... चेहराच सांगतोय चांगला गेला ना?? बरं बोलू नंतर. जा तू पटकन हात पाय धुवून ये... बघ तर मस्त मुगाच्या डाळींची खिचडी, आणि गरमगरम कढी केलीय... पापड पण भाजतो... ये तुझ्यासाठीच थांबलोय... जेऊ आणि मग ऑफिसला पळतो.. मुद्दाम दुपारची शिफ्ट घेतलीय मी...*
*ती बघतच राहिली... जा जा लवकर आवरून ये.. तो म्हणाला.*
*ती हात पाय धुवून येईपर्यंत टेबलावर आयतं पान बघून तिला अगदी गहिवरून आलं...*
*बस गं... सकाळपासून लक्ष नाहीये तुझं... आता सावकाश जेव... बघ, जमलंय का ते... भरभरून वाहणाऱ्या त्या सुखाचा पहिला घास घेतानाच काहीतरी आठवून उठायला लागली... तोच तिला अडवून नवरा म्हणला... बस बस घातलंय तुझ्या घासाच्या धन्याला पण.. जेव तू..*
*रोज तू अन्नपूर्णा होतेस.. आज ही अन्नपूर्णा सरस्वतीचा ध्यास घेऊ पाहतेय, तिला आज अशी कशी राहू देईन मी..???*

👍11❤2
Forwarded from Swati Chavan
*तिच्या मनात समाधान मावेनासं झालं होतं.. आज ह्या घरातली अन्नपूर्णा तृप्त झाली होती. तिला इतक्या कौतुकाचा घास मिळाला होता, तेही तिच्या घासाचा नियम आठवणीने पाळून...*
*तिला आईंचे.... सासूबाईंचे शब्द आठवले.. ह्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावर अन्नपूर्णेचा हात आहे. सगळ्यांच्या.....*
*खरंच... अन्नपूर्णा होण्यासाठी बाईच असायला हवं अस कुठंय... आज ज्या हातच्या घासानी ती सम्पूर्ण तृप्त झाली होती... ते हात अन्नपूर्णेचेच तर होते...*
*आई अगदी खरंय... आपल्या घरात तृप्तीचा घास देणाऱ्या अन्नपूर्णेचा हात सगळ्यांच्या... अगदी सगळ्यांच्या डोक्यावर आहे, ती कोणालाही काही कमी पडू देत नाहीये....!*
*आरती जोशी - ऋचा प्रभुणे.*

👍9❤2
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना
विठ्ठला मायबापा
ये पंढरपूरच्या पांडुरंगा
भेटली बर का
मला तुझ्या सारखी
अर्धांगिनी शोभेल अशी
ऊनवारा पाऊस असो
अथवा परिस्थिती कशी असो
तरी न दबकता न घाबरत
एक पाऊल मागे न टाकणारी
खंबीरपणे खांद्याला खांदा देऊन
सदैव तू म्हणजे मी आणि
मी म्हणजे तू तिथे बोलणारी
ना कोणता एक शब्द
ना कोणताही प्रश्न
ना अपेक्षा ना स्वार्थ
ना इच्छा ना मोह
न ठेवता साथ देणारी
विठ्ठला माझ्या मायबापा
माझ्यासोबत कोणत्याही
परिस्थितीमध्ये खंबीरपने
साथ उभी राहणारी
आज पर्यंत
ना कधी विठ्ठला
तुझ्याकडून ना धन संपत्ती
ना मोह मया ना लालच
ना लोभ ना कधी इच्छा अपेक्षा
ठेवल्या विठ्ठला मायबापा
पण आज तुझ्याचरणी
नतमस्तक होऊन
एकच गाराण मागत आहे
ऐक ना
विठ्ठ्ला मायबापा
ये पंढरपूरच्या पांडुरंगा
तिला सदैव आनंदी सुखी
आणि निरोगी खुश ठेव
तिच्या वाटेला दुःखाची
क्षणभर सावली पणं येऊन
देऊ नकोस बस
विठ्ठला मायबापा
आज तुझ्याचरणी
नतमस्तक होऊन
एकच गाराण मागत आहे
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
विठ्ठला मायबापा
ये पंढरपूरच्या पांडुरंगा
भेटली बर का
मला तुझ्या सारखी
अर्धांगिनी शोभेल अशी
ऊनवारा पाऊस असो
अथवा परिस्थिती कशी असो
तरी न दबकता न घाबरत
एक पाऊल मागे न टाकणारी
खंबीरपणे खांद्याला खांदा देऊन
सदैव तू म्हणजे मी आणि
मी म्हणजे तू तिथे बोलणारी
ना कोणता एक शब्द
ना कोणताही प्रश्न
ना अपेक्षा ना स्वार्थ
ना इच्छा ना मोह
न ठेवता साथ देणारी
विठ्ठला माझ्या मायबापा
माझ्यासोबत कोणत्याही
परिस्थितीमध्ये खंबीरपने
साथ उभी राहणारी
आज पर्यंत
ना कधी विठ्ठला
तुझ्याकडून ना धन संपत्ती
ना मोह मया ना लालच
ना लोभ ना कधी इच्छा अपेक्षा
ठेवल्या विठ्ठला मायबापा
पण आज तुझ्याचरणी
नतमस्तक होऊन
एकच गाराण मागत आहे
ऐक ना
विठ्ठ्ला मायबापा
ये पंढरपूरच्या पांडुरंगा
तिला सदैव आनंदी सुखी
आणि निरोगी खुश ठेव
तिच्या वाटेला दुःखाची
क्षणभर सावली पणं येऊन
देऊ नकोस बस
विठ्ठला मायबापा
आज तुझ्याचरणी
नतमस्तक होऊन
एकच गाराण मागत आहे
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
❤7👍3👏1
Forwarded from ओम m शेळके
स्वतःचा आनंद स्वतःला शोधता आला की कुठल्याही परिस्थितीतुन निर्माण झालेल्या दुःखाचा त्रास आपल्याला जास्त होत नाही हा आनंद मिळण्यासाठी पैशाची गरज नसते तर मानसिक समाधान हव असतं त्यासाठी माणुस धनाने गरीब असला तरी चालेल पण मात्र मनाने खूप श्रीमंत असावा लागतो तरचं आयुष्य सुखानं जगता येत नाही तर दुसऱ्यांच्या हातात खेळणं होऊन बसतं!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍5
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮 𝐤
प्रेम❤️ एकदा एका नदी ला तळ्याशी प्रेम झालं.... नदी तिचा प्रवास करत होती आणि तळ मात्र शांत होतं.... तळाने विचारलं नदीला तू माझासोबत थांबत का नाहीस???तेव्हा नदीने ही विचारलं तू माझ्या सोबत वाहत का नाहीस??? याच बोलणं झालं प्रेम ही झालं तरी एकेमेकांसाठी कधीच थांबू शकले नाही.... नदी मात्र एका पहाडामधून दुसऱ्या पहाडामधून वाहण्यात व्यस्त झाली.... तळ मात्र शांत एकाच जागी होतं.... असच चालू राहील.... आणि एकमेकांत दुरावा होतं गेला मग प्रेम ही कमी होतं गेलं..... प्रेम दोघानि जरी केल तरी एक मात्र तिथच थांबून राहतो आणि एकजण त्या प्रवासात वाहत राहते अगदी नदीसारखं❤️.... प्रेम किती हीखरं जरी असलं तरी एकमेकांसाठी कधी थांबू शकत नाहीत🥹☝️❤️💯 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️❤️🌺
👍14❤1
Forwarded from ओम m शेळके
जीवनात टेन्शन प्रत्येकाला असत मात्र ते घ्यायच की नाही हे आपल्या हातात असतं म्हणून तर जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं नाही तर त्याचा आपल्यालाचं खूप त्रास होतं असतो हल्ली माणसांचा स्वभावचं असा झाला आहे की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होत मग ते वस्तू असो वा व्यक्ती,,!बरोबर ना!,,✍🏻👍🏻❤️
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍4
Forwarded from B K
🔴 मुलाखतीची तयारी नेमकी कुठून सुरू करावी हे कळत नाही?
🔴 आपल्या प्रोफाईलचे सगळे घटक कसे कव्हर करावे हे कळत नाही?
✅ मुलाखतीची आदर्श तयारी कशी करावी याविषयी सूचना देणाऱ्या या नोट्स मुलाखतीच्या तयारीला योग्य दिशा देतील..
ह्या बद्दल कुणाला बुक हवं असेल एकदम फ्री मध्ये तर माझ्याशी personally msg करा..मी अधिकारी समुहातर्फे आणि शौर्यरत्न परिवारकडून मोफत दिलं जाईल.
Cont-7218160575(What)

👍2