Mpsc Gateway
231 subscribers
227 photos
10 videos
60 files
35 links
MPSC ची तयारी सोपी करण्यासाठी channel जॉईन करा.
An initiative by Ramakant Mali,
Dy CEO/BDO 2022
GLO 2021
ASO 2018,
सहाय्यक अधीक्षक, कृषी विभाग 2021
Taxation and administrative officer 2018
Download Telegram
👍21
🔥मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..🔥

▪️ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
1) तमिळ (2004) T
2) संस्कृत (2005) S
3) कन्नड (2008) K
4) तेलगू (2008) T
5) मल्याळम (2013) M
6) ओडिया (2014) O
▪️2024 :
7) मराठी
8) पाली
9) बंगाली
10) आसामी
11) प्राकृत

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील 4 निकष लावले जातात :
1) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान
1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती
कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.
*माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन*

मुंबई, दि. ३:- आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.

आजचा हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।। या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे . निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो.

मराठी भाषा प्रगल्भ
आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले आहेत.
👍21
1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त परीक्षा यांच्या सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
Combine Gr.B Advt 2024 UMED MPSC.pdf
8.3 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Combine Gr C advt UMED MPSC.pdf
14.1 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
5_6071269931725361743.pdf
812.3 KB
#TRTI प्रशिक्षणासाठी कोचिंग इन्स्टिट्यूट सिलेक्ट करण्यासाठीच्या सूचना आणि लिंक,

इतर संस्था महाज्योती बार्टी यांची पद्धत अशीच असेल, ज्यांची निवड झाली आहे त्यांनी सूचना बघून घ्या