स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
26.8K subscribers
5.34K photos
187 videos
1.33K files
4.18K links
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Download Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा - 5 एप्रिल
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा- 17 मे यांच्या जवळपास असणार.....

राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
👍1
सध्या बऱ्याच जिल्हातील तलाठी चे निकाल लागले आहेत, कोणाला काही कोनाविषयी काही माहीत असेल आमच्याशी संपर्क करा आणि जो निकाल लागला आहे सर्वानी आपल्या परीने प्रयत्न करा माघे जसा आपण प्रयत्न करून घोळ बाहेर काढला तसाच आता पण येत आहे आम्ही काढला आहे नगर चे टॉपर पण त्याच सेंटर वरचे आहेत
धन्यवाद धनंजय मुंडे साहेब...💐💐💐
महाराष्ट्र मध्ये लवकरच हे घडणार. महापरिक्षा पोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांची चौकशी ही झालीच पाहिजे व महापरिक्षा पोर्टल हे बंद झालाच पाहिजे.
#महाव्यापाम #घोटाळा #महापरिक्षा_पोर्टल #तलाठी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस आपण हा व्हिडिओ टाकला। तसा ताई आपला शब्द नक्की पूर्ण करतील विश्वास आहे
नवनिर्वाचित आणि आता शपथविधीनंतर अधिकृतरित्या आमदार बनलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी-

गेल्या पाच वर्षात राज्यातील बहुतांशी तरूणांची आणि त्यातही सुशिक्षित बेरोजगार तरूणांची हालत लय बेक्कार झाली. कमी जागांची जाहिरात, पारदर्शीपणाचा अभाव यामुळे तरूणाई अस्वस्थ आहे. एकीकडे दिवसरात्र मरमर मरून अभ्यास करायचा, आईवडीलांनी शेतात काबाडकष्ट करून साठवलेला रूपया तुकडे तुकडे करून पोटाला चिमटा कढून वापरला, समाजाच यशस्वी(?) होण्यासाठीचे फुकटचे टोमणे खाल्ले,कुटूंबाकडून रोजच तणावाने भरलेले फोन ऐकले....तर दुसरीकडे सरकारने नोकरभरतीवर निर्बंध लादले.मेगाभरतीच्या नावाखाली वेगळीच भरती प्रक्रिया पार पडली.महापरीक्षा नावाचं भ्रष्टपरीक्षा पोर्टल चालू करून घोटाळ्यांचीच महापरीक्षा झाली. मैदानी चाचणीस अनुपस्थित उमेदवार अंतिम गुणवत्ता यादीत झळकले. पैशाच्या जोरावर असंख्य उमेदवार सरकारी यंत्रणेत शिरले. नगरपरीषद परीक्षेत तर मास काँपीचे अनेक व्हिडीओ समोर आले. तरी पोर्टलला अभय दिल गेल.

सरकार दरबारी मोर्चे काढून, निवेदन देऊन ही सुशिक्षित बेरोजगार तरूणाई थकली, पण यांच्या मागणीची साधी दखलही घेतली नाही.

दिवसरात्र प्रामाणिकपणे अभ्यास करणारया या पोरांची स्वप्न या पोर्टलने गिळंकृत केली.

एक लक्षात ठेवा जोपर्यंत मेंदूला आणि हाताला काम मिळत नाही तोपर्यंत सक्षम देश घडत नाही.

सत्तेवर येताच शेतकरयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेतला. पण याच शेतकरयांची पोर या महापरीक्षा पोर्टलमुळे आत्महत्तेचा विचार करतायत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या.

या पोरांची फक्त इतकीच मागणी आहे की आपण ' महापरीक्षा' पोर्टल रद्द कराव व सर्व शासकीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात यावी

आपण हे कराल अशीच सर्व सुशिक्षित बेरोजगारांची कळकळीची विनंती....!!!!!
धन्यवाद ताई .......तुमच्या प्रयत्नामुळे हे पोर्टल बंद झाले तर MPSC समन्वय समिती कायम आपली आभारी राहील ।।

Join- @mpscandolan
सुप्रिया ताई सुळे यांनी मा. मुख्यमंत्र्यांना दिलेले महापोर्टल संदर्भातील पत्र
👍👍👍🙏🙏

Join- @mpscandolan
सद्या महापरीक्षा पोर्टल बद्दल बरच बोल जात आहे किंवा चर्चा सुरू आहे.
काही मुलाचे मते ते बंद झाले पाहिजे तर काहींच्या मते त्यात सुधारणा झाली पाहिजे अस मत आहे.

Mpsc समन्वय समिती या वर एक पर्याय सुचवित आहे.
सद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे राज्यातील विविध विभागातील गट-अ व गट- ब मधील राजपत्रित व काही अराजपत्रित पदे व गट-क लिपिक मंत्रालय मधील भरली जात आहे.

बाकी गट-ब अराजपत्रित , गट- क , गट-ड( चतुर्थ श्रेणी) या सारखी पदे पूर्वी जिल्हा निवड समिती , महाऑनलाईन व आता महापरीक्षा द्वारे भरली जात आहे . पण खूपदा यात गोंधळ , पेपर फुटी , भ्रष्टाचार या सारखे मुद्दे या भर्ती परीक्षेत उपस्थित होतात.

या वर उत्तम असा तोडगा काढता येऊ शकतो.
ज्या प्रमाणे केंद्रात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) हे वर्ग-1 ची व काही वर्ग-2 ची राजपत्रित पदे भरतात व त्यानंतर वर्ग-2 अराजपत्रित , गट-क , गट-ड या सारखी पदे केंद्रीय कर्मचारी चयन आयोग अर्थात SSC द्वारे भरली जातात.

त्याच धर्ती वर महाराष्ट्र कर्मचारी निवड आयोग ची स्थापना करण्यात यावी.. (Maharashtra Staff Selection Commission ) ( MSCC) असंवैधानिक चा दर्जा देण्यात यावा. या साठी विधानसभेत विधेयक पारित करण्यात यावे.

अर्थात यांचे अध्यक्ष IAS ऑफिसर असणार. लोकसेवा आयोग सारखे कामकाज चालणार , व्यवस्थित व गोपनीय पणे अभ्यासक्रम नुसार प्रश्नपत्रिका तयार होतील , कामाजात गोपनीयता राहील व राज्यसरकारचे या सगळ्या गोष्टी वर नियंत्रण राहील.

सद्या शासकीय पदे खाजगी संस्था द्वारे भरली जात आहे. व MSCC ची स्थापना झाल्यास शासकीय पदे शासनाच्या संस्थे द्वारे भरली जातील..
जर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडे हे काम दिल्यास त्याचकडे कामाचा ताण वाढेल व भर्ती प्रक्रिया रेंगाळत राहील म्हणून स्वतंत्र दुसरी संस्था निर्माण झाली पाहिजे.
ज्या प्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकाद्वारे चालविलेला राज्यकारभार म्हणजे लोकशाही

त्याच प्रमाणे राज्यसरकारचे विविध पदे राज्यसरकारच्या संस्था द्वारे भरली गेली पाहिजे.

म्हणून आमचे mpsc समन्वय समिती टिम कडून सर्वाना आव्हान आहे की महाराष्ट्रतील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना की जर तुम्हाला आमची संकल्पना पटत असेल तर ही आमची संकल्पना जास्तीत जास्त मुलांना कळवा व राज्यसरकार कडे वर्ग-2 ,3,4 ची सर्व पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी निवड आयोग ( MSSC) स्थापना करण्याची मागणी करा.
Join us @mpscandolan
#महापरिक्षा_पोर्टल_बंद
#mpsc_समन्वय_समिती

आज पुणे येथे mpsc समन्वय समिती ची पत्रकार परिषद झाली. सचिन ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय हा
♦️महापरिक्षा पोर्टल बंद करून झालेल्या परीक्षांची चौकशी ही sit किंवा cbi मार्फत करण्यात यावी.
♦️सध्या सुरू असलेले सर्व परीक्षांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी.
♦️सर्व परीक्षा ह्या mpsc मार्फत घेण्यात याव्यात

यावेळी पत्रकार बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. पोर्टल लवकर बंद होऊन चौकशी ही नक्की होईल अशी आशा आम्ही सर्व विध्यार्थी करतो.
#सोबत- पद्माकर होळंबे, महेश इंगोले,निलेश निंबाळकर, शरद चव्हाण, भुजंग पवार

राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य