MPSC Library
1.35K subscribers
3.5K photos
3 videos
587 files
806 links
mpsclibrary.com

https://youtube.com/@mpsc_library

नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो! स्पर्धा परीक्षाविषयी सखोल व संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.नवोदित विद्यार्थ्यांपासून अनुभवी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आमचे ध्येय

Contact Us :- mpsclibrary.com@gmail.com
Download Telegram
UPSC शताब्दी वर्ष (Centenary Year) महोत्सव

🇮🇳 UPSC – 100 वर्षे गुणवत्ता व सार्वजनिक सेवेला समर्पित!

शुरू: 1 ऑक्टोबर 2025
अंत: 1 ऑक्टोबर 2026

UPSC अध्यक्ष = श्री अजय कुमार, म्हणतात:

इतिहासाचा आराखडा:

स्थापना 1 ऑक्टोबर 1926 (Government of India Act, 1919 व Lee Commission, 1924 च्या शिफारशींनुसार).

नंतर 1937 मध्ये Federal Public Service Commission, आणि संविधान स्विकारतानंतर (26 जानेवारी 1950) UPSC म्हणून नामांतर.

शताब्दी वर्षाचे वैशिष्ट्य:
• एक विशेष स्मरणोत्सव लोगो आणि टॅगलाइन जारी करण्याची योजना
• विविध नवीन उपक्रम आणि सुधारणा राबविणे
• कर्मचार्‍यांच्या सूचना व योगदानातून उत्सव अधिक समावेशक बनवणे

महत्त्व:
हा काळ थोडक्यांपलीकडे — UPSC च्या 100-व्या वर्षपूर्तीचा गौरव करत, संस्थेच्या विकासाचा आढावा घेण्याची, सुधारणांसाठी योजना आखण्याची व उज्ज्वल भविष्यासाठी रणनीती तयार करण्याची संधी आहे.

**#UPSC100Years #CentenaryCelebration #PublicService #Meritocracy
Join
@mpsc_library
🏵 १६ ऑगस्ट दिनविशेष

१.१) १७६५ = अलाहाबदचा तह

- बक्सारच्या युद्धानंतर (1764) बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांताचे दिवाणी हक्क कंपनीला प्रदान

१.२) १९३२ = रॅम्से मॅकडोनाल्ड चा जातीय निवाडा

१.३) १९८२ = लातूर जिल्ह्याची निर्मिती
- उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून

१.४) १८८६ : स्वामी विवेकानंद गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी.

१.५) २०१८ = अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी

#TodayInHistory
Join
@mpsc_library
🇮🇳 15 ऑगस्ट

त्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान = क्लेमेंट अ‍ॅटली

राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत
🎶 जन गण मन – रवींद्रनाथ टागोर → गायन वेळ 52 सेकंद
🎶 वंदे मातरम – बंकिमचंद्र चॅटर्जी (आनंदमठ) → गायन वेळ 65 सेकंद

लाल किल्ल्यावर सर्वाधिक ध्वजारोहण करणारे पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू – 17 वेळा
इंदिरा गांधी – 16 वेळा
नरेंद्र मोदी – 12 वेळा
मनमोहन सिंग – 10 वेळा

15 ऑगस्टलाच स्वातंत्र्य दिन साजरा करणारे देश

रिपब्लिक ऑफ काँगो
उत्तर कोरिया
दक्षिण कोरिया
बहरीन
लिकटेंस्टीन

झेंडा कोण फडकवतो?
15 ऑगस्ट – पंतप्रधान (लाल किल्ला)
26 जानेवारी – राष्ट्रपती (कर्तव्य पथ)

झेंडा फडकविण्याची पद्धत
15 ऑगस्ट – ध्वजारोहण (Flag Hoisting) : ध्वज खालून वर खेचला जातो.
26 जानेवारी – ध्वजफडकविणे (Flag Unfurling) : ध्वज गुंडाळलेला असतो, उलगडून फडकवला जातो.

लक्षात ठेवा
भारताचे अंतिम व्हॉईसरॉय : लॉर्ड माउंटबॅटन
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : लॉर्ड माउंटबॅटन
स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल : सी. राजगोपालाचारी

📌 #History | Join 👉 @mpsc_library
🏵 १७ ऑगस्ट दिनविशेष

१.१) १७ ऑगस्ट १९०९ =
मदनलाल धिंग्रा यांना फाशी
- कार्य = १ जुलै १९०९ ला त्यांनी कर्झन वायली यांची हत्या केली

१.२) १७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक विल्यम केरी यांचा जन्म

#TodayInHistory
Join
@mpsc_library
पंतप्रधान मोदींचं स्वातंत्र्यदिनानिमित्त आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण

➡️ लाल किल्ल्यावरुन १०३ मिनिटं केलं संबोधित

२०१४ - ६४ मिनिटं
२०१५- ८८ मिनिटं
२०१६ - ९४ मिनिटं
२०१७ - ५६ मिनिटं
२०१८ - ८३ मिनिटं
२०१९ - ९२ मिनिटं
२०२० - ९० मिनिटं
२०२१ - ८८ मिनिटं
२०२२ - ८३ मिनिटं
२०२३ - ९० मिनिटं
२०२४ - ९८ मिनिटं

#political
Join @mpsc_library
पंतप्रधान मोदींचे 15 ऑगस्ट 2025 भाषण – थोडक्यात

🔹 रेकॉर्ड – लाल किल्ल्यावरचे 12वे सलग भाषण, सर्वात मोठे भाषण – 103 मिनिटे.

🔹 राष्ट्रीय सुरक्षा
Operation Sindoorचा उल्लेख.
पाकिस्तानवर इशारा – "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही"; इंडस वॉटर ट्रिटी स्थगित.
दहशतवाद व घुसखोरीविरुद्ध कडक भूमिका.

🔹 आर्थिक घोषणा

दिवाळीपूर्वी GST सुधारणा – रोजच्या वस्तूंवरील कर कमी.

एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना

१ लाख कोटी रुपयांची पीएम विकसित भारत रोजगार योजना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली. खासगी क्षेत्रात प्रथमच नोकरीस लागणाऱ्या तरुण-तरुणींना एक रकमी १५ हजार रुपयांची मदत या योजनेतून दिली जाईल. ही नोकरी देशाच्या कंपन्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

Critical Minerals, खतं, सेमीकंडक्टर उत्पादनात आत्मनिर्भरतेवर भर.

🔹 इतर मुद्दे
शेतकऱ्यांचे रक्षण, कर कपात.
“Sudarshan Chakra” संरक्षण ढाल, भारतीय अंतराळ स्थानकाची योजना.
आपत्कालीन काळातील लोकशाहीचे धडे.
अवैध घुसखोरीविरुद्ध लोकसंख्या धोरण.

#political
Join
@mpsc_library
२५ हजार कोटींचे ‘एक्स्पोर्ट मिशन’

➡️ उद्देश : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय निर्यातीला चालना देणे व लघु-मध्यम उद्योजकांना बळकटी देणे.

योजनेची वैशिष्ट्ये
निर्यात प्रोत्साहन – उच्च जोखमीच्या ५० आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ३% अनुदान.

विशेष कर्ज सुविधा – ५-७% व्याजदरात निर्यात कर्ज.

तांत्रिक मदत – मोफत तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन.

उत्पादन वाढमेक इन इंडिया ला चालना.

ई-कॉमर्स फोकस – क्रॉस-बॉर्डर ई-कॉमर्स व्यवहार वाढविण्यास मदत.

➡️ १० हजार कोटींचा विशेष निधी – औषधनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया यांसारख्या १५ क्षेत्रांत गुंतवणूक.

➡️ नवीन तंत्रज्ञानावर भर – सौर ऊर्जा, जैव तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन.

➡️ परिणाम
५०+ उद्योगांना लाभ
लाखो रोजगारनिर्मिती
राष्ट्रीय उत्पादन ३ अभियानाला गती
लघु उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी

👉 ही योजना २०२५-२६ पासून लागू होणार असून, भारताच्या निर्यात वाढीसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 🚀

#economy
Join
@mpsc_library
LIC AAO Recruitment 2025.pdf
173.7 KB
LIC AAO Recruitment 2025

👉 एकूण पदे - 350
👉 अर्ज कालावधी -16 ऑगस्ट 2025 ते 09 सप्टेंबर 2025.

👉 अर्ज लिंक :https://licindia.in/

#Advertisement
Join @mpsc_library
१८ ऑगस्ट दिनविशेष

१.१) १९९९
: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई

१.२) १७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म

१.३) १७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म

१.४) १९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म

१.५) १९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)

१.६) १९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन

#TodayInHistory
Join
@mpsc_library
भारताच्या पतमानांकनात झेप!

➡️ जागतिक संस्था S&P Global ने तब्बल १८ वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन ‘BBB-’ वरून ‘BBB’ (सकारात्मक) केले.

➡️ कारणे :

मजबूत आर्थिक वाढ
दमदार वित्तपुरवठा
रिझर्व्ह बँकेचे सुयोग्य पतधोरण
सुधारलेला सरकारी खर्चाचा दर्जा

➡️ वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे :

भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था
६०% वाढ देशांतर्गत वापरातून
अमेरिकेच्या आयात शुल्काचा मर्यादित परिणाम

➡️ परिणाम :
भारतीय कंपन्यांचा उसनवारीचा खर्च कमी
आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वसनीयता वाढली
कर्ज परतफेड क्षमतेवर विश्वास दृढ

➡️ पार्श्वभूमी :

जानेवारी २००७ पासून भारत ‘BBB-’ या किमान गुंतवणूक श्रेणीत होता.
मे २०२४ मध्ये ‘स्थिर’ वरून ‘सकारात्मक’ दृष्टीकोन दिल्यानंतर आता थेट सुधारणा.

📌 अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या “मृत अर्थव्यवस्था” वक्तव्यानंतर भारतासाठी हे उत्साहवर्धक यश!

#economy
Join 👉 @mpsc_library
📊 आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था (International Credit Rating Agencies)

📌 भूमिका
➡️ या संस्था एखाद्या देशाचा, कंपनीचा किंवा वित्तीय साधनांचा पतमानांकन (Credit Rating) करतात
➡️ त्या देशाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता, आर्थिक स्थिरता व जोखीम यावरून दर्जा (Rating) दिला जातो.

🌍 प्रमुख जागतिक मानांकन संस्था

1. S&P Global Ratings (Standard & Poor’s)
स्थापना : 1860 (USA)
मुख्यालय : न्यूयॉर्क, अमेरिका
रेटिंग स्केल : AAA (सर्वोच्च) ते D (Default)

2. Moody’s Investors Service
स्थापना : 1909 (USA)
मुख्यालय : न्यूयॉर्क, अमेरिका
21 ग्रेड्सची प्रणाली (Aaa ते C)

3. Fitch Ratings
स्थापना : 1914 (USA)
मुख्यालय : न्यूयॉर्क व लंडन

🇮🇳 भारतातील पतमानांकन संस्था

➡️ SEBI (भारतीय भांडवली बाजार नियामक) यांच्या देखरेखीखाली प्रमुख :
1. CRISIL (Credit Rating Information Services of India Ltd.) – S&P ची उपकंपनी
2. CARE Ratings (Credit Analysis and Research Ltd.)
3. ICRA (Investment Information and Credit Rating Agency) – Moody’s ची भागीदारी
4. India Ratings and Research – Fitch ची उपकंपनी

#economy
@mpsc_library
1
मदनलाल धिंग्रा (1883–1909)

क्रांतिकारक हुतात्मा – ब्रिटनमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करणारे पहिले क्रांतिकारकांपैकी एक.

जन्म – १८ फेब्रुवारी १८८३, अमृतसर (पंजाब). लंडनमध्ये शिक्षण घेताना क्रांतिकारी विचारांशी ओळख झाली.

लंडन हत्याकांड – १ जुलै १९०९ रोजी लंडनमध्ये ब्रिटीश अधिकारी कर्झन वायली यांची गोळी घालून हत्या केली. हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आंतरराष्ट्रीय प्रतिध्वनी ठरला.

अटक व फाशी – त्यांना तात्काळ अटक झाली व १७ ऑगस्ट १९०९ रोजी पेंटनव्हिल तुरुंगात फाशी देण्यात आली.

प्रेरणा – त्यांनी दिलेला बलिदान परदेशात भारतीय स्वातंत्र्याचा आवाज पोहोचवणारा ठरला.
त्यांचे उद्गार प्रसिद्ध झाले :
"देशासाठी बलिदान हेच माझे परम कर्तव्य आहे."

👉 त्यामुळेच त्यांना "विदेशातील पहिले शहीद क्रांतिकारक" असेही संबोधले जाते.

#personality
Join @mpsc_library
👍1
IOCL-WR-Apprentice-Recruitment-2025-Notification.pdf
848.7 KB
IOCL Apprentice Recruitment 2025

👉 एकूण पदे - 405
👉 अर्ज कालावधी -16 ऑगस्ट 2025 ते 15 सप्टेंबर 2025.

👉 अर्ज लिंक :https://www.apprenticeshipindia.gov.in/

#Advertisement
Join @mpsc_library
बॉब सिम्प्सन : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अस्त

➡️ माजी कसोटीपटू, कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्प्सन यांचे ८९ व्या वर्षी निधन.

➡️ १९५७-१९७८ या काळात ऑस्ट्रेलियासाठी ६२ कसोटी व २ एकदिवसीय सामने खेळले.

➡️ ३९ कसोटी सामन्यांत कर्णधारपद, कारकिर्दीत ४,८६९ धावा, १० शतके, २७ अर्धशतके, ७१ बळी आणि ११० झेल.

➡️ १९६४ च्या अॅशेस मालिकेत पहिले कसोटी शतक – त्रिशतकाची नोंद.

➡️ १९८६-१९९६ प्रशिक्षकपद – ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ सुरू. १९८७ चा विश्वचषक विजय
४ अॅशेस मालिका जिंकल्या

➡️ स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – ११० झेल.
➡️ पंतप्रधान अँथनी अल्बानीजक्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

#personality
Join 👉 @mpsc_library
नेताजी सुभाषचंद्र बोस

➡️ जन्म – २३ जानेवारी १८९७, कटक (ओडिशा)
➡️ शिक्षण – कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज, नंतर इंग्लंडमध्ये ICS परीक्षा उत्तीर्ण
➡️ राजकारणात प्रवेश – काँग्रेसमध्ये; १९३८ व १९३९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष
➡️ विचार – “स्वातंत्र्य भीक मागून नव्हे तर लढून मिळवायचे”
➡️ Forward Bloc ची स्थापना – १९३९
➡️ आजाद हिंद फौज (INA) – सिंगापूर येथे जपानी मदतीने स्थापली
➡️ प्रसिद्ध घोषणा – “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा”
➡️ आझाद हिंद सरकार – १९४३ मध्ये स्थापन
➡️ प्रभाव – ब्रिटिशांना भारत सोडावा लागण्यात INA चा मोठा वाटा
➡️ मृत्यू – १८ ऑगस्ट १९४५ (तैवान विमान अपघात; तरीही रहस्य कायम)

🌟 परीक्षेसाठी महत्वाचे :
फॉरवर्ड ब्लॉक स्थापक
INA ची भूमिका
काँग्रेस अध्यक्षीय निवडणूक व गांधीजींसोबत मतभेद

#History
Join
@mpsc_library