मराठी स्पंदन
258 subscribers
176 photos
5 videos
160 links
मराठी मन. मराठी स्पंदन.

मराठीतील दर्जेदार लेख, विनोद, कविता तसेच इतर साहित्य वाचण्यासाठी 'मराठी स्पंदन'ला सहभागी व्हा..
App Link: http://bit.ly/30goEEo
Download Telegram
अनुभव सांगतो शांत बसलेल चांगलं असतं शब्दाने नाती तुटतात..🔥
@marathi_spandan
पुलंचा हा सुंदर व्हिडियो बहुधा पाहिलेला नसेल..😍
ज्याला परिस्थितीवर कंट्रोल
करता येतो त्याला कुणी कितीही
त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी
फरक पडत नाही

🌞🌞शुभ सकाळ🌞🌞
@marathi_spandan
पसायदान

संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरुपात वसलेल्या आद्य रूपाचे वर्णन करता करता शेवटच्या अध्यायात त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळा ) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रुपी वाक यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात.

अधिक वाचा
https://wp.me/p9BvJC-1Y
सुप्रभात🌞🌞
यांच्या जगण्याच्या संघर्षात आपलासुद्धा खारीचा वाटा.

एक हात मदतीचा ......नवीन वर्षाचे दिनदर्शिका (कॅलेंडर) घेताना बस एक गोष्ट करा.

नवीन वर्ष जवळ येतंय.. तुम्ही वेगवेगळ्या दुकानातून, मोठ्या मोठ्या दुकानातून दिनदर्शिका (कॅलेंडर) घ्याल... ते दुकानदार आधीच श्रीमंत आहेत त्यांना अजून श्रीमंत करण्यात पॉईंट नाहीये...
त्या पेक्षा नवीन वर्षाचे दिनदर्शिका घेताना बस एक गोष्ट करा... रेल्वे स्थानक जवळ दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तीं बसतात दिनदर्शिका (कॅलेंडर) विकायला, त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता ,त्यांच्या कडून दिनदर्शिका घ्या.छोटी मदत होईल .

छोटी मदत होईल पण त्यांना त्याचा त्यांना खूप फायदा होईल.... कारण ते हि व्यवसाय करतायत .. जगण्यासाठी धडपड करतायत....
हा विचार नक्की पुढे पाठवा व विचार करा.... जेवढ्या लोकां पर्यंत पोहचेल तेवढा त्यांना फायदा होईल.... आणि व्यवसाय करायची एक जिद्द मिळेल.
यांच्या जगण्याच्या संघर्षात आपलासुद्धा खारीचा वाटा..🙏🙏
Happy New Year..🌞❤️
वार्षिक राशिभविष्य २०२३ - मेष

मेष राशीच्या जातकाचे यश स्वयंभू, स्वतःच्या ताकतीवर असते. वेगवेगळी आव्हाने स्विकारणे आणि ती यशस्वी करणे यांना आवडते. पण आवडीनिवडीबाबत यांच्या भूमिका ठाम असल्यामुळे बऱ्याचवेळा गैरसमज ओढवून घेतले जातात.

यावर्षी राशीच्या लाभस्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे तुमचे करियर, काम याबाबतीत थोडे उशीरा मिळाले तरी त्याची चांगली फळे नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत. समोरच्या माणसाचा ठाव नेमका तुम्हाला ओळखता येतो. या गुणाचा उपयोग करून संधीचा फायदा उठवाल. ग्रहांच्या कृपेचे छत्र लाभल्यामुळे बरीच उभारी येईल. अनेक कामे सहजगत्या होतील. तसेच राशीच्या व्यय व लग्नस्थानातून होणारे गुरूचे भ्रमण मिश्र फळे देणारे ठरेल. भाग्याची साथ चांगली मिळणार आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी व्यय स्थानातील गुरु नेप. चे भ्रमण मनःशांती ठरेल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे मार्गी लागतील. फक्त कोणत्याही गोष्टी टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. यावर्षी २८ नोव्हें. २३ पर्यंत राहचे भ्रमण राशीमध्येच होणार केतूचे राशीच्या सममस्थानातून होणार आहे. वैवाहिक जीवनात विनाकारण वाद घालायचे टाळा. थोडी चिकाटी आणि संयम ठेवला तर बाजी मारून जाल. गुप्त शत्रूंचा थोडा त्रास होईल पण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने योग्य दिशेने केलेले मार्गदर्शन उपयोगी पडेल. एखादे काम करायचा निश्चय कराल आणि ते काम तडीसही नेणार आहात.

आता साधारणपणे महिन्यानुसार या वर्षीचे राशीभविष्य काय आहे ते पाहू या,
https://bit.ly/3Clg7Bc
सुप्रभात..🌞🌞
वार्षिक राशिभविष्य २०२३ : वृषभ

निश्चयाचा महामेरू असे या राशीचे वर्णन करता येईल, पैसा मिळविण्यासाठी कष्ट करणारीवीच खर्चिक, राम नवनिर्मितीची ऊर्जा यांच्याकडे आहे. घरात रमणारी आणि बदल नको असलेली, पण तेवढीच रसिका स्वार्थ आणि परमार्थ अशी दोन्ही साधणारी ही राम आहे.

राशीच्या दशमस्थानातून शनीचे भ्रमण होरार आहे. धर्म आणि कर्माचा सुरेख संगम अनुभवाला येईल. ज्यांचे परदेशाशी संबंध आहेत त्यांनी आपली प्रगती करून घ्यावी. थोडे पाडस जोखीम घ्यायची तयारी ठेवावी लागेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितिजे साद घालतील. परंतु त्यांचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. जोडीदाराबरोबर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.

राशीच्या लाभ व व्यस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण लाभ देणारे ठरेल. तसेच आध्यात्मिक उन्नतीही साधून देईल. कर्ज काढताना अवरूण पाहून पाय पसरा असे सांगणारे ग्रहमान आहे. वैवाहिक जीवनात प्रवेश करणान्यांनी निर्णय व्यवहाराच्या पातळीवर जाऊन घेणे श्रेयस्कर ठरेल. मधुमेही व्यक्तींनी पथ्याची जास्त काळजी घ्यावी. पूर्णपणे मित्रांच्या भरवशावर राहून चालणार नाही, प्रसिद्धीचे योग येतील, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. यावर्षी २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहूचे भ्रमण राशीच्या व्यय स्थानातून तर केतुचे भ्रमण राशीच्या षष्ठस्थानातून होणार आहे. परदेशगमनाची इच्छा असेल तर ती फलद्रूप होऊ शकते, कोणत्याही बेकायदेशीर कामाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आपल्या मनातील गुम गोष्टी फलद्रूप व्हायच्या अगोदर कुठेही बोलू नका. उष्णतेच्या विकारांपासून सावध रहाणे इष्ट ठरेल.

आता साधारणपणे महिन्यानुसार या वर्षीचे राशीभविष्य काय आहे ते पाहू या,
https://bit.ly/3Clg7Bc
वार्षिक राशिभविष्य २०२३ : मिथुन

तुमची संशोधक वृत्ती, चिकित्सक स्वभाव आणि सदा गतीमान रहाण्याची आवड या गुणांचा यावर्षी तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. फक्त चंचल स्वभावाला थोडा आळा घालावा लागेल हे नक्की. यावर्षी दशमस्थानी व एप्रिल २०२३ नंतर राशीच्या लाभस्थानी, गुरूचे भ्रमण होणार आहे. व्यवसाय नोकरीबाबत हा गुरु चांगली फळे देईल. अचानक नोकरी बदल, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागणे, धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक, क्षेत्रात करिअर असणाऱ्यांना हे ग्रहमान फायदेशीर ठरेल. या क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता.

राशीच्या लाभस्थानी असलेला राह आर्थिक, सामाजिक क्षेत्रात पुढे नेणार आहे. शत्रूंना भारी पडाल. अनेक प्रकारचे लाभ होतील. एप्रिल २०२३ नंतर ज्यांना संतती होण्यासाठी चान्स घ्यायचा आहे त्यांनी अवश्य लाभ घ्यावा. विद्याथ्र्यांना अभ्यासात प्रगती करून घेता येईल. भाग्येश शनीचे भाग्यातून भ्रमण लाभदायी जाणार आहे. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. कायदेशीर बाबी योग्य त्या पूर्ण केल्यास हे परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे.

आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे डोळेझाक करून चालणार नाही. तुमच्या राशीमध्ये जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच इतरांपेक्षा वेगळा आहे. त म्हटले ताकभात हे तुम्हाला क्षणात समजते. या गुणाचा उपयोग यावर्षी करून घ्या. परंतु बुद्धीच्या जोरावर पुढे जाल.

आता महिन्यानुसार काय फलित मिळेल ते पाहू या.
https://bit.ly/3Xb8C7P
मी सकाळी सकाळी बाबांना -
"बाबा मला ते द्या ज्याच्यावर माझा अधिकार आहे!"

.
आणि
.
.
.
.
.
बाबांनी कानाखाली आवाज काढला ना भावा....
😬😳🤫🤭🙈🙉🙊
https://mazespandan.page.link/share