आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
20.5K subscribers
619 photos
2 videos
76 files
448 links
Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही..
ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1
Download Telegram
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
Photo
रोज नव्या उमेदीने आयुष्य कसं जगायचं .?हा प्रश्न पडत असेल तेव्हा हे दृश्य त्यावरचं उत्तरं असु शकेल असं वाटतं …सिग्नलवर थांबलेल्या चार चाकीतून टिपलेलं हे दृश्य..
डोक्याला छप्पर नाही तरी सकाळ झाली की आपलं काम सुरु करायचं म्हणून फुलांना मांडायला घेतलं आहे …
केवढा पाऊस पडतोय रोजचा ..धो धो पाऊस कोसळतांना झोळीतल्या तान्ह्या लेकरांना कुठे बरं दडवत असतील हे कुटुंबीय…
अनेकदा सगळं स्थिरस्थावर असतांनाही आपण किती रडत असतो …नेहमीच आयुष्यात काहीतरी नाही किंवा या अडचणी अशाच का ?माणसं माझ्याशीच असं का वागता , नशीब माझीच परीक्षा का घेतं ? या सगळ्या प्रश्नांच्या सरबतीवर अगदी निराकार भावनेने बघत आहे ते आयुष्य स्वीकारत पुढे मार्ग काढणारीही माणसं जगात आहेत..दोन वेळचं जेवायला मिळालं की त्यांचा दिवस सार्थकी लागतो ..आपण मात्र दोन पिढींच्या जेवणाची भ्रांत करत आजचे अनेक क्षण घालवून बसतो..लेकराला कोणत्या international school मध्ये टाकायचा हा प्रश्न इथे पडत नाही परंतु जगण्याच्या लढाईत तग धरुन राहील एवढी मात्र खात्री असणारच कारण प्रतिकुल परिस्थितीचा ऊनवारा लिलया झेलण्याचं बाळकडू रोजंच मिळतंय त्यांना ..जगण्यासाठीच्या रोजच्या संघर्षास सलाम आणि सामर्थ्य लाभो ..
404👍44🔥29
अपेक्षारहित जगणं तसं अवघडच आहे पण न टाळता येणाऱ्या ढिगभर अपेक्षा रोजच जगणं अधिक अवघड करत असतात…कमीत कमी अपेक्षा हा आजच्या काळात बरं जगण्याचा त्यातल्या त्यात सोप्पा मार्ग आहे..माणूस आणि अपेक्षा हे नातंच इतकं अतुट आहे की कदाचित त्यातून सुटणं इतकं सोप्पं नसेलच म्हणुन सर्वांना बुध्दांसारखं निर्वाणाला पोहचतं येत नसावं..सगळीकडे बघा..प्रत्येकाच जगणं अपेक्षांनी काठोकाठ भरलेलं आहे …अपेक्षा ठेवणारे खूप आणि समजून घेणारं कुणीच नाही असं व्यस्त प्रमाण प्रत्येकाच्या आयुष्यात दिसतं आहे …अपेक्षांशी जोडून ठेवलेलं आनंदाचं कनेक्शन माणसाला स्वस्थ बसू देत नाही..छोट्या गोष्टीच होणारा अपेक्षाभंग नात्यांना नव्हे तर आपल्या स्वतःलाही आतून पुरता पोखरतांना दिसतो..जगाकडून आणि स्वतःकडूनही ढीगभर अपेक्षा करणारे स्वतःच्या आणि जगाच्या अपेक्षा पूर्ण करत करत जगणं तर विसरणार नाही ना असाच प्रश्न मनाला छळतो…म्हणून बुध्द सांगून गेले जगाच्या दुःखाच कारण इच्छा-तृष्णा-अपेक्षा😅💯
293🔥41👍35
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
आयुष्याच्या कोणत्याही कठीण काळात आपली आई त्या परिस्थितीत असती तर तिने काय केलं असं विचारायचं स्वतःला ..बर्याच प्रश्नांची उत्तर मिळून जातात…काळ जरी बदलत असला तरी आईच्या वागण्याचा Relevance काळाच्या पुढे असतो मैत्रिणींनो..💯
आज कलेक्टर ॲाफिसमधून मिटींग करुन निघत होती, लिफ्टमध्ये सहकारी मॅडमशी बोलत होते,खाली येऊन त्याच लिफ्टमधून बाहेर पडलेली शासन सेवेतील आपल्या चॅनेलची मेंबर एक व्यक्ती भेटली ..स्वतःचा परिचय करुन देत म्हटली मॅडम तुम्ही हे लिहिलेलं मला नेहमी खूप हिट होतं …तुमचं हे वाक्य मी मनात कोरून ठेवलंय ..खुप वेळा मदत करतं ..
ऐकुन छान वाटलं मलाही ..खूप सहज आपण दोन चार ओळी लिहाव्या आणि त्याचा इतका छान परिणाम असावा..
शिवाय रविवारी सारथी आयोजित सत्कार समारंभात राज्यसेवा २०२३ च्या निकालातील अनेक यशवंत भेटले,आपल्या चॅनेल आणि ॲाडिओजबद्दल भरभरून बोलले..छान वाटलं..
लिहित राहिलं पाहिजे खरं कारण तोच आपल्यातील दुवा आहे ..
318🔥22👍15
Forwarded from Piyush Ozarde
*पुणे जिल्हा परिषद कौशल्य विकास योजना २०२५*

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त संवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!
पुणे जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हा परिषद कौशल्य विकास योजना" अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे ११ महिन्यांसाठी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि दरमहा ₹२५,००० विद्यावेतन!

*पात्रता निकष:*
* किमान ५०% गुणांसह BE/B.Tech पदवीधर
* पुणे जिल्ह्याचे रहिवासी
* ३१ डिसेंबर २०२४ रोजी वय १९ ते ३० दरम्यान असावे
* संगणक, मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक

तुमच्या प्रतिभेला मिळणार जिल्हा परिषदेची साथ, गतीमान होईल प्रगतीची वाट!

*अंतिम मुदत: १५ जुलै २०२५ पर्यंत.*

त्वरा करा! आजच अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा!
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा किंवा https://punezp.recruitlive.in या संकेतस्थळाला भेट द्या.
#पुणेजिल्हापरिषद #कौशल्यविकास #रोजगारसंधी
55👍9🔥1
आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अगदी अढळ आहे..आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळे गुरू लाभत असतात…आयुष्यात गुरु नसते तर आपली नाव अगदी दिशाहीन झाली असती …भूमिका वेगळ्या तसे गुरुही वेगळे पण गुरू मात्र आवश्यकच..
आयुष्याच्या वाटेवर लाभलेल्या सर्व ज्ञात अज्ञात सजीव निर्जीव तसेच ग्रंथरुपी,अनुभवरुपी गुरुंना आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन 💐💐
Thank you Being Guru and lighting path.
“गुरुवीण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ बिकट डोंगरघाट”
234🔥7👍5
अपूर्व राजपूत यांच्या “तुझ्यापुढे तर काहीच नाही “ या काव्यसंग्रहातून साभार
113👍5
“एक पुरेशी असते
आशा जगण्यासाठी”
काल विठूरायाच्या पंढरीत टिपलेला हा फोटो आणि संवाद मनाला स्पर्शून गेला…
खर्याखुर्या सोन्याची भुरळ न पाडता संसार सोन्याचा करणाऱ्या किती तरी माऊल्या आहेत…
त्यांना विठूरायाच्या पंढरीतला दगडही सोन्यापेक्षा जास्त प्रिय आहे ..
भक्तीची ओढ आणि प्रॅायोरीटीच भान असलं की लखलखणारी सोने चांदी भुरळ घालू शकत नाही कारण आहे त्यात समाधानानं जगण्याचं वरदानच जणू तो पांडुरंग देत असतो …
छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणारी माणसं कमाल असतात 🫡
233👍24🔥9
Joy of little things 💫
तिने स्वप्न पाहिलं
ती लढली
आणि ती जिंकली..
पोस्ट कोणती का असेना
ती आपली ओळख निर्माण करणारी असते अन् आपल्याला confidence देणारी सुद्धा 🌿
गेल्या काही महिन्यात कित्येक अशा “त्या” भेटल्या ज्यांनी संसार ,लेकरं बाळ सांभाळून स्वतःची ओळख निर्माण केली.
अशा त्या सर्वांना सलाम आणि शुभेच्छा🌟
#ोकून आशा चालत रहा तू🌈
🔥195115👍20
आयुष्यात खूप थकायला होईल तेव्हा …
Just have a deep breath and recall How Awesome you are..
आजवर केलेल्या चांगल्या गोष्टी आठवून बघा,जवळच्या माणसांनी दिलेली शाबासकीची थाप आठवून बघा..अनेक अवघड वाटणाऱ्या अनेक गोष्टी लिलया पार पाडल्यात याचं रिमांइडर द्यायचं ..मित्र परिवार आणि कुटुंबीयासाठी चांगल्या केलेल्या दोन चार गोष्टी आठवायच्या..लहानपणापासून ते आजवर केलेलं सर्व सकारात्मक आठवायचं ..डायरीमध्ये थोडं मनमोकळं करायचं…सुटकेचा निश्वास टाकून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागायचं ..
298👍28🔥2
Writing self suggestion note and following it,helps a lot.
जु्न्या डायऱ्या चाळतांना २०१७ च्या डायरीत हे additional पान सापडलं..
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतांना त्यावेळच्या प्रथितयश ABB कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ची संधी हुकल्याने मनाला अतीव दुःख झाले होते.
अपयश जिव्हारी लागलेलं त्यानंतर लिहिलेलं पुढची रणनिती आणि line of thought..
सगळं समजेल असं नाही पण या गोष्टी वर्क करतात नक्कीच..करुन बघा .
Introspection is must.
291👍34🔥29
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
Photo
एक हात मदतीचा..
सस्नेह नमस्कार ,
मी पुनम, आज तुम्हाला मदतीचे आवाहन करत आहे,माझे सख्खे मामा श्री वसंत पांडुरंग पगार रा आघार खुर्द ता मालेगाव जि नाशिक यांचा दि.०९/०५/२०२५ रोजी अपघात झाला असून त्यांच्या मेंदूला जबर मार लागला आहे . दि ०९/०५ पासून ते आजपर्यंत बेशुध्दावस्थेत आहे, सुरुवातीला दोन महिने नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटल येथे व गेल्या एक महिन्यापासून तालुक्याच्या ठिकाणी मालेगाव येथे उपचार चालू आहेत. मामांचा व्यवसाय शेती (अल्पभूधारक शेती )असून घरात इतर कुणीही कमावता व्यक्ती नाही .तीन मुले असून तिघेही शिकत आहे.आतापर्यॅत मामाचे ७-८ ॲापरेशन झाले आहेत.मेंदूच्या तीन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
आजवर हॅास्पीटलचा खर्च २५ लाखापर्यंत गेलेला असून यापुढेही अजून खर्च लागणार आहे .मी व माझे कुटुंबीय मिळून आजवर दहा लाखापर्यंत मदत केली आहे,यापुढेही करत आहोत.
मामांची परिस्थिती गंभीर असल्याने कुटुंबीय आर्थिक आणि मानसिक तणावात आहे. तीन महिन्यापासूनची ही परिस्थिती प्रचंड थकवणारी व निराशाजनक आहे. अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे.दिवसेंदिवस Complications वाढत आहेत परंतु पेशंट फाईट करतय म्हणून आम्हाला सुद्धा लढायचं आहे परिस्थितीशी.
माणसाच्या आयुष्याचं हे रुप कोणाच्याही नशीबी येऊ नये.
तरी मी आपणा सर्वांना विनंती करते की
आपल्याला शक्य होईल तेवढी मदत आपण खाली दिलेल्या account वरती टाकावी जेणेकरून पुढील वैद्यकीय खर्चासाठी त्याची मदत होईल.
Upi id- pagargayatri108@okaxis किंवा 9923671243@ybl
Bank name - Bank of Maharashtra
Account No.- 60195556273
IFSC code - MAHB0000845

तसेच सोबत QR कोड देखील देत आहे .
सोबत मामांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी तुमची एक प्रार्थना सुद्धा द्यावी ही नम्र आशा.
तुमच्या सर्वांच्या छोट्या-मोठ्या मदतीसाठी मी आपली सदैव कृतज्ञ राहील.
धन्यवाद
268👍81🔥1
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
एक हात मदतीचा.. सस्नेह नमस्कार , मी पुनम, आज तुम्हाला मदतीचे आवाहन करत आहे,माझे सख्खे मामा श्री वसंत पांडुरंग पगार रा आघार खुर्द ता मालेगाव जि नाशिक यांचा दि.०९/०५/२०२५ रोजी अपघात झाला असून त्यांच्या मेंदूला जबर मार लागला आहे . दि ०९/०५ पासून ते आजपर्यंत…
Dear All,
Thank you for your support.
या आवाहनानंतर अनेकांनी शक्य ती मदत केली .अक्षरशः २० रुपये पासुन ते २००० पर्यंत मदत अनेकांनी केली. अनेक बॅचमेटसने हात पुढे केला.तुमचे सगळ्यांचे खूप आभार…गरजेच्या वेळी मदत करणाऱ्या सर्वांचे मानावे तितके आभार कमीच..काही गोष्टी मनाला भावून गेल्या जसं की त्या शहरात करणाऱ्या एक दोन aspirant नी आम्ही हॅास्पीटलमधे जाऊन मानसिक आधार देतो असं म्हणणं असो किंवा घरचं मेडिकल आहे तर मेडिकल सवलतीच्या दरात कसं मिळेल यासाठी मदत करतो असं म्हणणं असेल वा स्वतःच aspirant म्हणून जगतांना काटकसरीने दोन चहाचे २० रुपये मनं मोठ्ठं करत काढून देणे सगळं ध्यानात घेतलं आहे.
या सगळ्यातून आपल्या मदतीची तळमळ आमच्यापर्यंत पोहचली आहे.
सगळ्यांचे मामाच्या कुटुंबाकडून आभार.
टेक्निकल अडचणींमुळे कुणाची मदत करायची राहिली असेल तर वर दिलेल्या डिटेल्सवर करु शकतात.
कृतज्ञतापूर्वक आभार🙏💫
218👍16
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
यशदा ,पुणे वनामती ,नागपूर प्रबोधिनी ,अमरावती चंद्रमा ,चंद्रपूर गेल्या ८-१० महिन्यात या सगळ्या दिग्गज प्रशिक्षण संस्थाना भेट देता आली.. यशदा सोडुन बाकी ठिकाणी राहुन प्रशिक्षणाचे काही टप्पे पार पाडत आहोत.. खुप चांगला अनुभव आहे.. या संस्थांची नावे तर कमाल आहेत..…
Happiness is completely small dreams .
हा यशदाचा फोटो टाकून दोन वर्ष झाली असतील आता.
परंतु आज यशदामध्ये परिवीक्षाधीन कालावधीतील अंतिम टप्प्याचे प्रशिक्षण घेतांना सीपीटीपी सोडून इतर काही बॅचेसही इथे प्रशिक्षणासाठी आहेत .
त्यातील एक बॅच आजच आलेली.
त्यातील काही जण भेटले,काही ओळखी तर काही अनोळखी .बोलता बोलता एकाने सांगितलं ,”मॅडम ,तुम्ही एकदा यशदाचा फोटो टाकला होतात तेव्हा मी माझ्या लक्ष्मीकांतवर लिहिलं होतं की Yashada is waiting for you”
आणि आज ते वर्तुळ पूर्ण झालयं की आज मी यशदामध्ये प्रशिक्षणासाठी आलोय.इतरही सर्वांचा उत्साह फारच छान होता. नवीन नवीन गोष्टीची नवलाई असते ,त्यात एक वेगळा आनंद असतो.
ते ते क्षण जगून घेतले पाहिजे. स्वतःचीच छोटी छोटी वर्तुळ पूर्ण करण्यात आयुष्याचा आनंद असतो.
स्वप्नं पाहायची ती पूर्ण करायची .ही सायकल रिपीट करायची.
आता हे वाचून कुणाचा यशदाला येण्याचा निश्चय दृढ होणार हे नक्की आणि त्याचा आनंदच आहे.
सदैव शुभेच्छा 🌟
#स्वप्नाळू जनता
285🔥18👍17
कसे आहात..?
अभ्यास ,आयुष्य कसं चाललयं .?
खूप दिवस झाले बोलणं नाही
बोलुयात आज रात्री १० वाजता.
👍6031