" छञपती श्री शिवाजी महाराज "
3.33K subscribers
4.05K photos
116 videos
458 files
3.24K links
Download Telegram
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

*२७ सप्टेंबर इ.स.१६६५*
मुघलांशी पुरंदर तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणात आदिलशाही सरदार इखलासखानाबरोबर लढा देत होते.या दरम्यान पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजेंच्या छावणीत शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान आले आणि पाठोपाठ पुरंदरच्या तहाला मान्यता देणारे औरंगजेबाचे फर्मानही येत असल्याचे मिर्झाराजेंना समजले.मिर्झाराजेंनी राजगडावर निरोप पाठवून शंभुराजेना बोलवून घेतले.शंभुराजेनी फर्मान स्वीकारले,शंभुराजे मुघली मनसबदार बनले.शंभुराजेंना यावेळी पोशाख व रुप्याचा साज चढवलेला हत्ती भेट देण्यात आला. यानंतर शंभुराजे राजगडावर परतले.पुरंदर तहाला मान्यता देणारे अधिकृत फर्मानही मिर्झाराजेंच्या छावणीत आल्याचे शिवाजी महाराजांना समजले,महाराज यावेळी तळकोकणात होते.फर्मान स्वीकारण्यासाठी ते पुरंदरच्या रोखाने निघाले.फर्मान स्वीकारण्यासाठी शिवाजी महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत पोहोचले ती तारिख होती 27 सप्टेंबर 1665
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२७ सप्टेंबर इ.स.१६८७*
गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने 22 सप्टेंबर ला फितुरीने जिंकून घेतली.पण त्यापूर्वीच वेढा दिलेला गोवळकोंडा लवकर ताब्यात येत नसल्याचे पाहून औरंगजेबाने कुतुबशहाचा कर्नाटकातील प्रदेश जिंकण्यासाठी आपले सरदार व सैन्य रवाना केले होते. मूळचा कुतुबशाही सरदार असणारा कासीमखान हा नंतर मुघलांना सामील झाला.त्याची नेमणूक कर्नाटक प्रांत जिंकण्यासाठी करण्यात आली.बादशाहाने गोवळकोंडा जिंकण्यापूर्वीच कासीमखानाने जुलै महिन्यात बेंगलोर जिंकले होते.खानाला रोखण्यासाठी हरजीराजे महाडिक व केशव त्रिमल हे मराठे सरदार गेले होते पण ते तिथे पोहोचेपर्यंत खानाने बेंगलोर काबीज केले होते.त्यामुळे ते परत फिरले.मुघल सैन्याने भेद करून पिलकोंडा हा किल्ला घेऊन मच्छलीपट्टणम पर्यंत लूटमार केली होती.मुघल सरदार कासीमखानाने भेद करून पिलकोंडा हा किल्ला घेतला ती तारीख होती शके १६०९, अश्विन शुद्ध १ म्हणजे 27 सप्टेंबर 1687
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.facebook.com/shivhindvi
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२७ सप्टेंबर इ.स.१७०७*
शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले.

रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने परत दिल्याशिवाय देशमुख, कुलकर्णी समजत नाहीत व मुलुख आबाद होत नाही हे जाणून वतने देण्यास सुरुवात केली.

मराठेशाही समूळ नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास रामचंद्रपंत - शंकराजी नारायण यांचा मुत्सद्दीपणा व संताजी - धनाजी यांचा गनिमीकावा या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे अखेर नमते घ्यावे लागले आणि त्याच्या पश्चात मराठ्यांनी दिल्लीपावेतो धडक मारून मोगलांनाच आपले अंकित बनवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२७ सप्टेंबर इ.स.१७२९*
🚩 सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनास्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩
मराठा सरदारांमध्ये कार्यक्षेत्राची वाटणी झाली त्यात खानदेशात बागलाण आणि गुजरातचा सुभा सेनापती दाभाडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता .खंडेराव दाभाडे यांनी भिल्ल कोळी या नव्या वन्य जातीची दोस्ती संपादन करून सैन्याचे संघटन केले.१७१९ मध्ये सुरतेवर स्वारी करून मोगली फौजांचा पराभव केला. सोनगड येथे कायमचे ठाणे स्थापन केले .तेथून पुढे हळूहळू दाभाडे यांनी गुजरात वर चौथाई आणि खंडणी लागू केली. खंडेराव दाभाडे यांनी गुजरात वर अनेक वेळा स्वाऱ्या करून एवढ्या खंडण्या वसूल केल्या की गुजरातमधील मोगलांची सत्ता खिळखिळी होऊन मोडकळीस आली.खंडेराव दाभाडे यांनी गुजरात ची केलेली दुरावस्था पाहून बादशहाने हैदर कुलीखान म्हणून नवीन सुभेदार गुजरातवर पाठवला. त्यानंतरही गुजरातमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर राहिली .राजकीय स्थिरता गुजरातला कधीच प्राप्त होऊ शकली नाही. राजकीय अस्थिरता हा गुजरातचा जणू स्थायीभावच होऊन बसला .
खंडेराव दाभाडे एकनिष्ठपणे स्वामी सेवा करत असत. खंडेराव हे स्वामीनिष्ठ तर होतेच पण कायम छत्रपतीच्या आज्ञेचे पालन करीत.
वाढत्या स्वार्या आणि दगदगीने खंडेराव दाभाडे आजारी पडले. दिनांक २७ सप्टेंबर १७२९ रोजी सेनापती खंडेराव दाभाडे आजारी पडले व यांचा मृत्यू झाला.
🙏अशा या शूर सेनापती खंडेराव दाभाडे यांना स्मृतिदि
नानिमित्त विनम्र अभिवादन
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२७ सप्टेंबर इ.स.१९०७*
क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩*
*"जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩*

*शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती*

*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi

📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/

📲 WhatsApp :-
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

*२९ सप्टेंबर इ.स.१६३५*
स्वता शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजी राजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ सप्टेंबर इ.स.१६८०*
मराठ्यांच्या २०० मावळ्यांचा उंदेरीवर हल्ला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ सप्टेंबर इ.स १६८२*
छत्रपती संभाजीराजेंच्या भीतीने मुंबईकर इंग्रज सिद्दीला मुंबईत आश्रय देत नव्हते पण सुरतकर इंग्रजांच्या दडपणामुळे ९ मे १६८२ ला त्यांना सिद्दीला मुंबईत प्रवेश देणे भाग पडले. सिद्दी कासम मुंबईत आल्याचे समजताच मराठ्यांनीही आपली ४० गलबते खांदेरीवर पाठवली. तरीही सिद्दीने ऑगस्ट अखेरीस नागोठणे येथे जाऊन मराठी मुलखात लूटमार केली व बऱ्याच लोकांची नाके कापली आणि एका हवालदाराला पकडून नेले. तरीही सुरतकर मुंबईकरांना सिद्दीला १० हजार रुपयांचा सर्व प्रकारचा माल आणि त्यांच्या कुटुंबांना मुंबईत आसरा दयायला सांगत होते. सिद्दीला मदत करण्याच्या सुरतकर इंग्रजांच्या या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करत मुंबईकरांनी लिहिले की,"मागील वेळेप्रमाणेच याही वेळी सिद्दीचे लोक राहिल्याने अन्नाचे दुर्भिक्ष वाढेल,दृष्ट लोकांना आसरा देऊन त्यांच्याशी सामोपचाराने वागणे कठीण आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.facebook.com/shivhindvi
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२९ सप्टेंबर इ.स.१६८९*
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकवि साव्या शतकापर्यंत देव,देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी एकनिष्ठ राहिलेलं एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या शतकात हे महाडला आले महाड वरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले .त्यांचे महापुरुष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशहाच्या लुटालूटीत मरण पावले . त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती .नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णा जींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली. कान्होजी १६५० ला युद्धात मरण पावले . त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराजांचे बरोबर कर्नाटकात मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडिक यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते. हरजीराजे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते .जी मोहिम छत्रपती देतील ती मोहीम यशस्वी करूनच हरजीराजे येत होते.छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजीराजांना" राजेशाही " हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याच्या महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटक सह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंजावाती आक्रमणापासून वाचवला. त्यांनी त्यावेळी जिंजी व वेल्लोर,मद्रास ,म्हैसूर ,अर्काट, बंगळूर आधी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तामिळनाडू हरजीराजे ने जिंजीच्या आधिपत्याखाली आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९ मध्ये जिंजीस आले. तेथे राजधानी घोषित करून तेथूनच काही काळ राज्यकारभार केला.छ. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता. मात्र हरजीराजे नेहमी त्याच्या आड आले.
दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशावेळी हरजीराजे यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला ही त्यांची कामगिरी अद्वितीयच म्हणावी लागेल.
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचा हात विश्वासाने सन. १६६८ ला श्रीमंत हरजीराजे यांच्या हाती दिला व हा विवाह राजगडावर संपन्न झाला. पुढे शिवरायांच्या मृत्यू झाल्यानंतरही हरजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर ईमानाने वागले .म्हणूनच दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी त्यांच्याकडे ठेवली होती.ती संभाजीराजेंनीही परत त्यांच्याकडेच कायम ठेवली .
हरजीराजे त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपतींचे मन जिंकून घेतले व संभाजी राजेंच्या मृत्यु नंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गाजवले.औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान या सरदाराशी लढता लढता दि.२९ सप्टेंबर १६८९ ला हरजीराजे जिंजी येथे तोफेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.
पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली व हरजीराजे महाडिक यांनी कांचीही जिंकून घेतली, संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्
य पराक्रम गाजवले.पुढे हरजीराजे महाडीक यांचे पुत्र शंकराजी महाडीकांना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचे लग्न लावून दिले. १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भवानीबाई व शंकराजी राजेमहाडिक यांना तारळे महालाअंतर्गत 24 गावे व 72 वाड्यांची पाचही वतनाची सनद करून दिली. सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्यात आले.त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती .अशावेळी हनगोजी काटे देशमुख , सिदोजी , विठोजी साळवे- देशमुख , देशपांडे, मुकादम , कुलकर्णी , शेटे ,महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईना साकडे घातले .त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजे यांनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्तावित करून विस्कटलेली घडी बसवली.
धाकटया शाहूंराजांजवळ दुर्गाजीराजे महाडिक व कुशाबाराजे महाडिक हे सरदार होते.
कान्होजीराजे महाडिक , परसोजी राजेमहाडिक , हरजीराजे महाडिक यांनी मराठेशाहीत आपले पराक्रम गाजवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर केले. तारळ्यात या पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत .आजही राजेमहाडीक बंधूंचे आठ वाडे मोठ्या दिमाखात उभे असून, त्यात आजची राजे महाडिक घराण्यातील पुढची पिढी नांदते आहे.
🙏अशा ह्या राजेमहाडीक घराण्याच्या हरजी राजेमहाडीक या रणमर्दाला स्मृतीदिनानिमित्त त्रिवार मुजरा....🙏🏻🙏🙏🙏🙏
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२९ सप्टेंबर इ.स.१७२७*
सुलतानजी नाईक निंबाळकर निजामाला जाऊन मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ सिधोजी नाईक निंबाळकर यांची सरलष्कर म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी नेमनूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ सप्टेंबर इ.स.१७४६*
दक्षिणेकडची परिस्थिती, आणि त्यातही निजामादी लोकांची एकंदर कार्यपद्धती पाहता तिथली बरीचशी लोकं वैतागली होती, आणि स्वतंत्र होण्याची इच्छा व्यक्त करत होती. दि. २९ सप्टेंबर १७४६ रोजी पेशव्यांचा हस्तक नागो राम हा कर्नाटकातून अब्दुलमाजीदखानाच्या गोटातून लिहितो की या प्रांतात कोणीच धनी नाही. तेव्हा पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडून हा प्रदेश जिंकण्यासाठी परवानगी घ्यावी आणि हे सगळं आपलंसं करावं. यापुढे नागो राम जे लिहितो ते महत्वाचं आहे, "येथे चर्चाही लोक करितात की हा प्रांत पंतप्रधानांनी केल्यास या प्रांताचे प्राक्तन उघडेल ऐसी सर्वांस आशा आहे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩*
*"जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩*

*शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती*

*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi

📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/

📲 WhatsApp :-
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
*🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - २१⚔️*

शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली!

जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळविणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका-सवाल विचारायचे होते. पण राजे राजगडाकडे परतले नाहीत.

👉 खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधीत जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायणी, रामपूर, कलेढोण, बाळवा, अष्टी, कऱ्हाड अशी ठाणी दास्तानी लावीत, नेर्ले, कामेरी, बत्तीस-शिराळा, पारगाव, कोडोलीमार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले.

पुरता राजगड आता आनंदसागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरांवर खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर
असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणीबशातील राण्यांत चढीला लागले.

एके दिवशी खासेमहालात साऱ्या राण्यांच्या वेढ्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, “बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? ”
हो. कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही!” बाळराजे उत्तरले.

“ते का?” सोयराबाईंनी विचारले.

🔊 “थोरल्या आऊ म्हणतात, 'आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ! गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की, मनास खोडा पडत नाही. पाय वाकडा जात नाही! ”

त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हातांची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत
आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडली!

चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता सहा महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक
दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली, “जासुदांचे नाईक बहिर्जी आले आहेत. ”

जिजाबाई शंभूबाळांना हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्याची गर्दन वर उठत
नव्हती. जबान कशी खुली करावी, हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, “नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला.
आमचा अंत पाहू नका. ”

🔊 आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरल्या भरड्या आवाजात कसेतरी बोलला, “घात जाला मासाब! हबशी जव्हरच्या वेढ्यात महाराज पन्हाळगडावर फसलं! गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलाय! ”

“नाईक!” जिजाबाई कशातरीच ओरडल्या. त्यांचे अंगन्‌अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी
बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळगडाभोवती घिरट्या घेऊ लागले.
काळजात कैक कढ दाटून आले. “किती मरणांना बगल देत आमच्या शिवबाराजांनी दौडावं? सुखाचा माग धरून किती संकटं जिंदगीभर त्यांच्यामागं हात धुऊन लागावीत?
राजे! राजे! वेढ्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं “आऊपण ' फसलंय! तुमच्या या शंभूबाळांचं 'फर्जदपण ' वेढ्यात फसलंय! उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीय! काय करावं? ”

काहीच न बोलता जिजाबाई सदरबैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या.

प्रसंगी त्या साऱ्यांना धीरदिलासा देत आल्या होत्या. पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबे शिवाय जाणतं दुसरं कोण होतं?

राजगडावरून जिजाऊंची तातडीची फर्माने बारा मावळात मुलूखभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा, हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते.

जौहरने वेढा भरून पुरते दोन महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळागडावरचा नाग-सोनचाफ्याचा दर्वळसुद्धा हूल भरून बाहेर निसटणार
नाही असा बळकट -बाका वेढा सिद्दी जौहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाईखान, सादतखान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजलखान,
रुस्तुमेजमॉ, बडेखान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबतखान सिद्दी जौहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता!

नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या! पडत्या पावसात घोड्यावर खोगिरे चढली. जिजाऊंनी
कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊलोकांना कूचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या.

सदर
ेवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ही कसली गडबड चालली आहे, काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावलेय काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, “वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती
वेढा फोडायला!” ते बालबोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची
यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजलखानाच्या मोहिमेवर जाताना “शंभूबाळांना जपा ' असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. 'बाळराजांना जपा ' म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले! त्यांचा
हा अजाण पोर विचारतो आहे, “वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? ”

दोन्ही हातांचा वेढा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि, 'ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला
पीळ पडतो, त्याला “वेढा ' म्हणतात बाळराजे! ' असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले, पण त्यांनी आपल्या नातवाला काही-काही सांगितले नाही. बाळराजांच्याकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरभट ज्योतिष्यांच्या भाकीत-बोलांची याद आली, “आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत!” आणि उगाच जिजाबाईंना वाटले. “आता आपण गड उतरलो की, तुम्हाला फसविणाऱ्या सर्वांत मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ! ' आता
जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ, घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. “भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही ', हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या!

एकाएकी गडाच्या पालीदरवाजावरची नौबत दुडदुडली. पाठोपाठ वर्दी आली “सरनौबत नेताजीराव पालकर सिद्दी हिलालासह गड चढून येताहेत! ”

बाराबंदीवरून, कंगणीदार पगडीवरून पाणथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती.

“र्‍या सरलष्कर, राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत! त्यापूर्वी तुमचीच वाट
आम्ही बघतो आहोत. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या! मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं, असं आम्ही ऐकून आहोत! आमचे शिवबाराजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल!” कढभरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेलसे बोलल्या.

भिजल्या अंगाचे, भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, “मासाब, गडलोट करा पर असं तोडू नका! हत्यारं तुमच्या हाती द्याया आमी काय म्येल्या माऊलीच दूद न्हाई प्यालो. वेढा पडला म्हून इमान न्हाई पडत. राजं सोडवू मगच पायधूळ घ्याया येऊ. येतो आम्ही.” जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून
नेताजी वळले.

त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो, हे जाणवून जिजाऊ
.
.
👇
क्रमशः...........!
.
.
*👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.*

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

*◆ संदर्भ - छावा कांदबरी - शिवाजी सावंत*

* लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.*

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

*🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||*
*|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩*
*🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - २२⚔️*

नेहमीच्या 'आऊबोलीत म्हणाल्या, “सरलष्कर, दमछाकीचा मुक्काम दोन दिवस घेऊन तवाने व्हा! मग जे करणं असेल ते करा! ”

जे करणे शक्‍य होते, ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केले. सिद्दी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेढ्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडच्या पायथ्याला
जाऊन भिडले. पण सावध हबश्यांनी उपराळ्याचा छापा मोडून काढला. सिद्दी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले.

पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूख भिजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा, राज्याचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा. संकटांना “थांब ' म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते!

👉जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या. शास्ताखान सिही जौहरला मिळणार नाही, यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने, जाणते
किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलावू धाडले. फिरंगोजी राजगडावर आले.

मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, “फिरंगोजीबाबा, आमच्या तर इंगळास वोळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने-कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं-
पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं?”

“मासाब, लई सल्पी कामदारी नेमून दिलीसा. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय. एल्गाराचा मनसुबा असंल.” फिरंगोजी मनचे बोलले.

“नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत.” जिजाऊंनी फिरंगोजींची समजूत काढली

मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून “मुजरा धाकलं राजं,” म्हणत फिरंगोजींनी शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ येऊन फिरंगोजींच्या मांडीभोवती आपल्या हातांचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, “आम्ही तुम्हाला वेढा भरणार
फिरंगोजीबाबा! नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला! ”

त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वत:शीच बोलल्यागत बोलले, “तुम्हावानी न्हानपन समद्यांस्नीच लाभलं असतं, तर लई
ब्येस झालं असतं धाकलं धनी! ”

जिजाबाईच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जौहरच्या वेढ्याला पुरते सव्वा-चार महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ अकरा महिने मागे हटले होते! उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊसलोटाकडे स्वत:ला हरवून बघताना
त्यांना वाटू लागले की, “सारं आभाळ उरी फुटावं. हत्तीसोंडेनें पाणधारा धो-धो कोसळाव्यात. राजांची काही बरी-वाईट खबर कानांवर पडण्यापेक्षा हा उभा राजगड
पाणलोटात विरघळून जावा! ' पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते.

धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात
आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. “बरेच दिवस झाले, आबासाहेब दिसत नाहीत? या विचाराने गोंधळलेल्या
शंभूबाळांनी धाराऊला विचारले, “धाराऊ, वेढा कसा असतो? कुठं राहतो? ”

धाराऊने चमकून बाळराजांच्याकडे बघितले. “मला काई ठावं न्हाई. असलं काही-बाही नगा इचारू.” धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही, याचा फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटीतील गुळखड्याला काळ्यामिठट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले! बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या
मुंग्या देवमहालाच्या उबाऱ्याला आत आल्या होत्या.
वाटीतील तो मुंग्यांनी घेरभरला गुळखडा बघताना धाराऊला कसेतरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्यामिट्ट॒ मुंग्या वारून, तिने तो गुळखडा उचलला आणि
दुसऱ्या वाटीत ठेवला!

शंभूबाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासेमहालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला.
त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू करून, छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला, “मासाब, कलच्या पुनवंच्या राती राजं जव्हरच्या वेढ्यातनं सलामत निसटलं!! ”

“विश्वास! राजे सलामत सुटले? सांग - लवकर. सारा करीणा सांग. कसे- कसे सुटले आमचे शिवबाराजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग.” जिजाबाई
बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थबथबले होते.

🔊 विश्वास भरल्या उराने सांगू लागला, “कलच्या पुनवंच्या राती राजं पन्हाळगडाच्या राजदिंडीनं स
हाशे बांदलांनिशी गड-उतार झालं. बांदलांनी पालकीत बसवून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राजं निसटल्याचा सासूद लागला. जव्हरचा जावाई शिद्दी मसूद दीड हजारांचं घोडदळ घेऊन
बांदलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखलराडीतनं - झाडझाडोऱ्यातनं बांदलांनी खांदे बदलत राजांची पालकी चौदा कोसांवर गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा
भगाटलं हुतं. खिंडीजवळ मसूदचं हबशी ऐन पिछाडीला आल्यालं बघून हिरडसमावळच्या बाजी प्रभू देसपांड्यांनी शिबंदीच्या दोन फळ्या. एक राजांच्या संगट देऊन त्यांसी विशाळगडाच्या वाटंला लावलं. बाजी आन्‌ त्येचा धाकला भाऊ फुलाजी, दोघं तीनशे बांदलांनिशी घोडखिंडीचा थोपा कराय मागं ऱ्हायलं. खिंडीला भिडलेल्या हबश्यांबरोबर
बाजी आणि बांदल सात प्रहर पट्टा खेळलं. राजं विशाळगडाच्या पायथ्याला आलं, तर गडाला सुर्व्यांचा आणि पालवणकरांचा घेर पडल्याला हुता. राजांनी 'हर हर म्हादेव ' म्हणत तो घेर फोडून काढला. दोन वेढं फोडून राजं विशाळगडावर हाईत. उद्या हकडं येनार हाईत. पर -?

🎠“काय झालं विश्वास? बोल.” जिजाबाईंना विश्वासचा खुलला आवाज बदललेला जाणवला. “पर मासाब, घोडखिंडीवर हबश्यांचा थोपा करताना सारं तीनशे बांदल आन्‌ बाजी आणि त्येंचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं!! उलट्या काळजाच्या हबश्यांनी साऱ्यांची प्रेतं घोड्याच्या टापांखाली चिखलात रगडत खिंड पार”

विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वत:साठी बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर बाजींची मुद्रा उभी राहिली.

गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामिकार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यांत तांबडधूळ फेकून सह्याद्रीचा
सिंह सुटला होता.🐯🐆

गजापूरची घोडखिंड बाजींच्या रणगाजीने 'गाजीपूरची खिंड ' झाली! त्यांच्या शोभणाऱ्या नावाने “बाजीपूरची खिंड ' झाली. बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्यांच्या
साक्षीसाठी 'पावनखिंड ' झाली!!🚩
.
.
👇
क्रमशः...........!
.
.
*👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.*

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

*◆ संदर्भ - छावा कांदबरी - शिवाजी सावंत*

* लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.*

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

*🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||*
*|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩*
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

*१ ऑक्टोबर इ.स. १६५७*
शिवराय कल्याणच्या दिशेने रवाना झाले!
( अश्विन शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, गुरुवार )

शहाजहानच्या आजारामुळे उत्तरेचे राजकारण तापू लागले होते. औरंग्याला सुद्धा दक्षिणेस रस उरला न्हवता. त्यामुळे ह्या स्थितीचा फायदा उचलण्याचे ठरवून आपल्या हशंबखान या सारदारास कल्याण भिवंडीच्या मोहिमेवर पाठवले. मात्र मोगली सरदार मोहम्मद युसूफ सुद्धा कल्याण चा ताबा घेण्यासाठी आला असता दोघांची गाठ पडून उडालेल्या चकमकीत हशंबखान धारातीर्थ झाल्याचे वृत्त कळताच महाराज कल्याण - भिवंडी च्या दिशेने जाण्यास राजगड उतरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१ ऑक्टोबर इ.स.१६७७*
मराठ्यांच्या इतिहासातील एक गूढ आणि अतर्क्य घटना म्हणजे शंभुराजेंचे दिलेरखानाच्या गोटात जाणे.लढाईत मराठ्यांचा पराभव करता येत नसल्याने औरंगजेबाने इतर मार्गाने त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चालवले होते.मुघल सुभेदार बहाद्दूर खानाने शिवाजी महाराजांच्या सैन्याशी अनेक लढाया केल्या होत्या, पण त्याला हवे तसे यश मिळाले नव्हते.उलट सतत अपयशी ठरल्याने मुघल दरबारात त्याची अपप्रतिष्ठा झाली होती.त्यातच औरंगजेबाला हेरामार्फत शंभुराजे नाराज असल्याची बातमी त्याला समजली.या संधीचा लाभ घेण्यासाठी औरंगजेबाने एक योजना बनवली.15 सप्टेंबर 1677 च्या दरम्यान त्याने दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखानाला दरबारी परत बोलावले आणि त्याच्या जागी दिलेरखान या अनुभवी सेनापतीची निवड केली.पुढच्या काळात दिलेरखानाने शंभुराजेंशी पत्रव्यवहार करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले.बहादूर खानाला परत बोलावून त्या जागी दिलेरखानाची नेमणूक केली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.facebook.com/shivhindvi
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१ आॅक्टोबर इ.स.१७००*
महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना
कृष्णा- वारणेच्या पुरांनी मुघलांना घडवली अद्दल
महापूरात औरंगजेबाला अपंगत्त्व
सैन्य, हत्ती-उंट वाहून गेले,
तीनशे वर्षापूर्वीच्या कागदपत्रात नोंदी

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिह्यात आलेल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या महापूराचा फटका मुघलसम्राट औरंगजेबालाही बसला होता. महापूरात त्याची तीन हजार सोन्याची नाणी, शेकडो सैनिक, हत्ती, उंट, घोडे वाहून गेले. माण नदीच्या पूरात तर त्याचा पाय मोडला आणि त्याला कायमचे अपंगत्त्व आले. महापूराने औरंगजेबाची कशी दैना उडविली, याची माहिती देणारी तत्कालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत.
दक्षिण महाराष्ट्रात पंधरवडय़ापूर्वी आलेल्या महापूराने रंकापासून रावापर्यंत सर्वांचीच दैना उडविली. अभूतपूर्व असे नुकसान या महापूराने केले. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी याच दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या महापूराने मुघलसम्राट औरंगजेबाचीही दैना उडविली होती. त्यावेळी कृष्णा, वारणा आणि माण नद्याला आलेल्या महापूरात औरंगजेबाच्या सैन्याची कशी धुळदाण उडाली, याच्या नोंदी तत्कालीन मुघल अखबारात आणि प्रत्यक्ष महापूर अनुभवलेला तत्कालीन लेखक साकी मुस्तैदखान, खाफिखान यांनी लिहून ठेवलेल्या वर्णनात केल्या आहेत. प्रसिध्द इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या अखबारांचे भाषांतर करुन ठेवले आहे. माण नदीच्या पूरात औरंगजेबाला अपंगत्त्व सन१७०० च्या एप्रिल महिन्यात सातारा किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब मिरजेकडे येण्यास निघाला. तो भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे १२सप्टेंबर रोजी खवासपूरला पोहचला. त्यावेळी १ ऑक्टोंबर १७०० रोजी माण नदीला अचानक पूर येऊन औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या. यामध्ये शेकडो सैनिक, उंट, हत्ती वाहून गेले. मुघल लष्कराची मोठी हानी या पूरात झाली. यावेळी छावणीत हजर असलेल्या साकी मुस्तैदखान याने माण नदीला आलेल्या या भयंकर पूराचे वर्णन करुन ठेवले आहे. या पूरात पाण्यात बुडण्यापासून जीव वाचवताना औरंगजेबाचा पाय मोडला. त्याला कायमचे अपंगत्त्व आले. माण नदीच्या महापूराने औरंगजेबाला चांगलीच अद्दल घडविली. वारणेच्या महापूराने मुघल सैन्याची दैना पुढे सन १७०२च्या जून महिन्यात विशाळगड जिंकल्यानंतर औरंगजेब मिरज-कराडकडे येण्यास निघाला. त्यावेळी मलकापूर, वडगांव मार्गे तो येण्यास निघाला. त्यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. मार्गातील लहान-मोठे नाले, ओढे, दुथडी भरुन वाहत होते. वडगांव जवळ वारणा नदीला पूर आला. एक जुलै ते चार जुलै १७०२ या काळात नद्यांना मोठा पूर आला. त्यावेळी औरंगजेब आणि त्याचे सैनिक यांची जी दैना उडाली त्याचे वर्णन साकी मुस्तैदखान याने करुन ठेवले आहे. तो म्हणतो ‘त्या भयंकर पावसाचे मी कसे वर्णन करु. दहा-दहा आणि वीस-वीस पावसाचा वर्षाव होत असे. कुणाला डोळे उघडण्याची अगर डोके वर काढण्याची सोय नव्हती. सामान वाहून नेणाऱया जनावरांची स्थिती काय वर्णावी. ज्यांना बुडून मरावयाचे होते, ते मेले. ज्यांच्या नशिबात वाचणे होते ते वाचले. पावसाचा वर्षाव तर निराधार सैनिकांच्या जीवाला त्रस्त करुन
रत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi

📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/

📲 WhatsApp :-
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
सोडत होता. थंड आणि झोंबणारे वारे माणसे आणि जनावरांचे प्राण हरण करीत होते.’ याच पूरात औरंगजेबाचा खजिना नदीपार होताना तीन हजार सोन्याची नाणी वाहून गेली. ही नाणी शोधण्यासाठी पुढे काही दिवस त्याने पगारी सैनिक नेमले हेते. महापूरात वाहून गेले औरंगजेबाचे तंबू या महापूरात औरंगजेब बादशहाचे सर्व तंबू भिजून वाहून गेले. त्यामुळे एका छोटय़ाशा तंबूत त्याला मुक्काम करावा लागला. यावेळीq वारणा नदी आणि वाटेत आलेल्या ओढय़ांना आलेल्या पूराचे वर्णन करताना मुस्तैदखान याने म्हटले आहे की, ‘ ती काय नदी होती! छे प्रलयकाळचे तुफानच ते. नदीची प्रत्येक लाट म्हणजे प्राण संकटच. एकेका नावेत माणसे तरी किती भरावीत. एक शवपेटीका आणि त्यात हजार मुडदे अशी त्याची स्थिती होती’. महापूर म्हणजे परमेश्वरी कोप मुघल इतिहासकार खाफिखान यानेही तत्कालीन पूराचे वर्णन केले आहे. तो म्हणतो ‘लोकांचे जे हाल झाले, ते मी कसे लिहू. घोडय़ांची निकामी झालेली शिखरे आणि मेलेल्या माणसांचे सामान पेटवून लोक थंडीचे निवारण करु लागले. ओढय़ाच्या काठावर पावला-पावलावर माणसे आणि जनावरे मरुन पडली होती. त्याची इतकी दुर्गंधी सुटली होती की, जीवंत माणसांना जीव नकोसा झाला’. यानंतर १७०२ च्या सप्टेंबर महिन्यात औरंगजेबाचे सैन्य मिरजेजवळ कृष्णानदी ओलांडत होते. त्याचे वर्णन करताना खाफिखान म्हणतो, ‘नदी पोहून जाताना किंवा नावा बुडाल्यामुळे, किंवा लाटांच्या माऱ्यामुळे किती माणसे त्या नरभक्षक नदीला बळी पडली, याची मोजदाद करण्याची बुध्दी आणि हिंमत कोणात आहे! परमेश्वराचा कोप झाला तर पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी तो असा दर्याच्या रुपाने वाहू लागतो. त्याच्या कोपाला तुफानी वादळाची जोड मिळते. स्वार्थी अप्पलपोटे आणि परमेश्वराकडे लक्ष न देणारे पापी यांना दैवाने त्या प्रदेशात ओढून नेले आणि त्यांची वित्त, अबू यांची भयंकर हानी केल्याशिवाय त्यांना बाहेर काढले नाही’. असा निष्कर्ष या महापूरात बुडालेल्या औरंगजेबाच्या सैन्याविषयी खाफिखान याने काढला आहे. तत्कालीन कागदपत्रे आणि इतिहास लेखकांनी लिहिलेल्या या वर्णनावरुन तीनशे वर्षांपूर्वी कृष्णा, वारणा आणि माण नदीला आलेल्या महापूराने औरंगजेब आणि त्याच्या सैन्याची कशी दैना उडविली, याचे इत्यंभूत वर्णन समजते. या महापूराने स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला चांगलीच अद्दल घडविली. या महापूरांनी त्याला कायमचे अपंगत्व बहाल केले. महापूरामुळे आलेल्या अपंगत्त्वाच्या या खूणा बाळगत औरंगजेबाने आयुष्याची अखेर दक्षिणेतच घालविली. ...महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१ ऑक्टोबर इ.स.१७५९*
निजामाला लोळवण्यासाठी पेशव्यांची मराठी सेना सदाशिवराव भाऊ यांच्या तरुण, तडफदार नेतृत्वाखाली १ ऑक्टोबर १७५९ ला पुण्याहून निघाली. त्याआधी बुन्हानपुरापासून अर्काटपर्यंत पेशव्याने आपले वकील हस्तक, सरदार, हेर पेरून ठेवले होते. निजामाच्या हालचालींची बित्तंबातमी पेशव्याला मिळत होती. ही मंडळी निजामाचे लोकही फोडत होती. पूर्वी अहमदनगर आणि दौलताबाद ही ठाणी सलाबतजंगाने लिहून दिली होती, पण ती कबज्यात आली नव्हती. पण पेशव्याने कविजंगाला आपलेसे करून जुन्नर, त्रिंबक, औरंगाबाद हा टापू आपल्या कब्जात आणला. अहमदनगर हातातून गेल्यामुळे ते ठाणे परत घेण्यासाठी निजामाने हैदराबादेहून धारूरकडे फौज रवाना केली. मागोमाग तोही चालून आला. निजाम निघाल्याची खबर आल्यामुळे सदाशिवरावभाऊ पेशव्यांची फौज घेऊन निघाला. पेडगाव घेऊन ते उद्गीरनजीक आले. तोपर्यंत पेशवा नानासाहेब स्वतः अहमदनगरला आला आणि किल्ल्यातच मुक्काम करून त्याने युद्धाची देखरेख सुरू केली. सदाशिवराव भाऊ समवेत विठ्ठल शिवदेव, अंताजी माणकेश्वर, दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार, बाबूजी नाईक वगैरे प्रमुख सरदार होते. निजामाची फौज बारा हजार, शिवाय दहा हजार गारदी, शंभर तोफा अशी असून मराठी फौज चाळीस हजाराची होती. ११ जान्युअरीपासून सामना सुरू झाला. तो ३ फेब्रुवारीपर्यंत चालला. इब्राहिमखान गारद्याच्या तोफखान्याने मराठ्यांना बेजार केले, पण मराठ्यांनी निजामाचा फौज चौफेर वेढून त्याची दाणा वैरण बंद केली. निजाम गोल करून धारूरकडे निघाला होता. तेथे त्याची काही फौजही होती. या दोन्ही फौजा एकत्र आल्यास ते महागात पडेल हे पाहून मराठी फौज निकराचे हल्ले चढवत होती. मराठ्यांनी औसा येथे तोफा आणून निजामाच्या फौजेवर जोराचा मारा केला आणि त्याची चंदावल म्हrणजे पाठीमागची फौज साफ बुडवली. कादर खान गारदी, शौकत जंग असे मातबर सरदार मारले. प्यादे किती पडले याला गणतीच नव्हती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩*
*"जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩*

*शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती*

*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये प
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

*२ ऑक्टोबर इ.स.१६७०*
#द्वितीय_सुरत_लूट!
छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात झालेला पुरंदरचा तह सण 1669 च्या अखेरपर्यंत कसाबसा टिकला.औरंगजेबाने महाराजांची वऱ्हाडातील जहागीर जप्त केल्याने महाराजांनीही मुघली मुलुख लुटायला सुरुवात केली. याबरोबरच पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले त्यांनी परत घेण्याची मोहीम सुरू केली.यादरम्यान मुघलांचा दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम आणि त्यांचा सरदार दिलेरखान यांच्यात वैर सुरू होते.या भांडणाचा उपयोग करून घेत शिवाजी महाराजांनी ऑगस्ट महिन्यात रायगड सोडला आणि ते मोरोपंतांसह जुन्नरला आले.जुन्नरची मोहीम पंताकडे सोपवून महाराज15 हजार फौजेसह कल्याणकडे वळले.महाराजांचा रोख होता मुघलांची ऐश्वर्यनगरी सुरतेवर.एप्रिल महिन्यापासून महाराज सुरतेवर चालून येणार असल्याच्या अफवा पसरल्या असतानाही सुरतेचा सुभेदार बेसावध राहिला.शिवाजी महाराज आपल्या 15 हजार सैन्यासह सुरतेच्या अलीकडे 20 कोसावर येऊन पोहोचले होते.शिवाजी महाराज सुरतेजवळ 20 कोसावर आल्याची बातमी सुरत शहरात पोहोचली ती तारीख होती 2 ऑक्टोबर 1670
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२ ऑक्टोबर इ.स.१६८३*
सन 1683 सालात संभाजीराजेंनी पोर्तुगीजांवर स्वारी केली. या मोहिमेत शहजादा अकबर राजेंच्या बरोबर होता.हे समजताच औरंगजेबाने सिद्दीला तिकडे जाण्यास सांगितले. यासंबंधी सुरतकर इंग्रजांची नोंद,"बादशाहाने सिद्दीस फर्मान पाठवून त्याला आपले आरमार सज्ज करून ताबडतोब किनाऱ्यावरून खाली डिचोलीस जायला सांगितले आहे.सुलतान अकबर तिथे आहे.त्याच्यावर पाळत ठेवण्याचे काम त्याच्यावर आहे.त्याला अडवणे म्हणजे पादशहाशी लढाई पुकारण्यासारखे आहे.पादसशहाच्या मनात कशी व केंव्हा चलबिचल होईल हे सांगता येणे शक्य नाही.तो भयंकर तिरसट आणि अस्वस्थ झाला आहे. सरदार अकबरावर ममता धरतात असा आधाराविना संशय घेऊन बादशहा मोठमोठ्या सरदारांचा अवमान करत आहे.आणि तेही त्याच्याशी काळजीने वागत आहेत.सुलतान अजमतारा,बेगम आणि दिलेरखान यांना निष्कारण बडतर्फ किंवा अवमानित केले आहे."इंग्रजांच्या या पत्राची तारीख होती 2 ऑक्टोबर 1683.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.facebook.com/shivhindvi
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२ ऑक्टोबर इ.स.१८०४*
२ ऑक्टोबर १८०४ रोजी पेशव्यांनी गायकवाडास अहमदाबादचा इजारा वार्षिक रू. ४ लाखांच्या करारान १० वर्षाच्या बोलीने दिला. त्याची वहिवाट भगवंतराव गायकवाडास सांगितली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२ ऑक्टोबर इ.स.१८६९*
महात्मा गांधी जन्मदिवस!
शके १७९१ च्या भाद्रपद व. १२ ला गुजरातमधील पोरचंदर या गावचे करमचंद गांधी यांना शेवटचे अपत्य झाले त्याचे नांव मोहनदास. हेच पुढे महात्मा गांधी म्हणून प्रसिद्धीस आले. गुजरातची भूमि मूळचीच मऊ व प्रेमळ आहे. श्रीकृष्णाची द्वारका गुजराथमध्येच आहे. या कृष्णाची प्रेमगीते गाणारी मिराबाई, प्रसिद्ध 'वैष्णवजन' नरसी मेहता, आदि भज्ञांच्या वास्तव्याने पवित्र बनलेल्या गुजराथमध्ये महात्मा गांधींचा जन्म झाला. मोहनदासांचे वडील करमचंद वर्णाने वैश्य व पंथाने वैष्णव होते. गांधींची आई पुतळीचाई साध्वी, भाविक, व्यवहारकुशल आणि व्रतवैकल्य करणारी होती. अशा या थोर आईचापांच्या पोटी मोहनदास गांधीजी जन्मास आले. महात्मा गांधींचे नांव भारतांतच नव्हे तर सर्व जगाच्या कानाकोपऱ्यांतून दुमदुमून राहिले आहे. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, त्याग, शांति, सच्चारित्र्य, क्षमा, आदि विसाव्या शतकांत पोरक्या झालेल्या दैवी गुणांनी आपल्यासाठी निवासस्थान म्हणून ' महात्मा गांधी' या महापुरुषाच्या विशाल हृदयाची निवड केली होती. आपल्या अभिनव अशा जकीय तत्वज्ञानाने गांधीनी सर्व जगाचे डोळे दिपवून टाकले ! त्यांचे तत्त्वज्ञान अंतराळांत भराया मारणारे नसून ते दरिद्रो माणसाच्या झोपडीतून जन्माप्त आले असल्यामुळे ते ' दरिद्रीनारायणा'च्या मालकीचे आहे. कविवर्य रवीन्द्रनाथ टागोरांना एका पत्रांत महात्माजी लिहितात.-" कविराज, तुम्ही म्हणता, प्रातःकालच्या समयीं पक्षी घरट्यांतून बाहेर पडून आकाशांत उंच उंच भराया मारतो आणि भराच्या मारता मारतां परमेश्वराचे गुणगान करतो त्याकडे पहा... पण माझ्या डोळ्यापुढे हिंदुस्थानांतील हे क्रोडो पक्षी दिसत आहेत. त्यांना अन्न नाही म्हणून उडण्याची शचिहि नाही. दिवसभर थकून रात्री जेव्हा हे पक्षी निजतात, त्यापेक्षा अधिक थकवा ते दुसन्या दिवशी उठतात तेव्हा त्यांच्या अंगी असतो!-" स्वतःच्या मायभूमीसाठी गांधीजी जगले आणि तिच्या अभ्युदयासाठीच आपल्या जीवनाचे त्यांनी बलिदान कलें.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩*
*"जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩*

*शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती*

*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्
ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi

📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/

📲 WhatsApp :-
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
*🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - २३⚔️*

राजगडाच्या पालीदरवाजावरची नौबत लयीत दुडदुडु लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या अकरा महिन्यांनंतर! पद्मावती माचीचे तटसरनौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदरचौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदरचौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिललगाव साद घातली,
“आबासाहेब! ”

राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, “जौहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सिताब फोडला पण... या दोन हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव!” हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कबड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरविले.
समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या! राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्त्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यांत भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणारा नव्हता!
हे असले “राजेपण ' जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले “आऊपण ' जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले “बालपण ' शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते!!

शास्ताखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले चौपन्न दिवस खानाशी भांडला. पंचावन्नाव्या दिवशी चाकणचे किल्लेदार
फिरंगोजी हातांतील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी “राजांचे दुखणे ' आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा
आदिलशहाच जबर जमेतीनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला! पुन्हा आक्रमण! पुन्हा घोडेधाड! टापांखाली पुन्हा मुलूखतोड!

पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली
बोलावून घेतले. सईबाईची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले,
👉🔊“बाळ शंभू, “वेढा ' म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलंत! ते आम्ही सांगतो. जे- जे सामने असलं की तोडता येत नाही, आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही त्याला - त्याला 'वेढा ' म्हणतात बाळराजे!!!”

राजांचा आवाज सईबाईच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यांतील काळ्याशार बाहुल्यांत आपणाला हवे असलेले “सावळेपण ' धुंडीत होते.
बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एकनजर बघत निर्धाराने म्हणाले, “नाही आबासाहेब! आम्हास 'वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता! किल्ल्याबाहेर
पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारं घेऊन धारकरी टपलेले असतात त्याला - त्यालाच 'वेढा ' म्हणतात आबासाहेब! ”

हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरविताना राजांच्या मनात येऊन गेले की,
“बाळराजे, वेढ्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधणं जमलं पाहिजे. कधी वेढ्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत !!

रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेमा जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती, तशी त्यांची “भोसलाई नजर ' आपोआपच तयार होत होती. नस्लबाज अरबी घोड्याच्या ऐटबाज शिंगराला वारेझोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकारायला शिकवावे लागत
नाही. जिजाऊंचा महाल सोडला, तर शंभूबाळांचा सारा समय अंतोजी- रायाजीच्या संगतीत जात होता. शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना - गडावरच्या अठरा कारखान्यांचा कानुजाबता राजांनी कसा बसविला आहे, हे शंभूबाळ रोजान्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते. दरजी महाल, चौबीना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या बारा महालांतील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे तै ऐकत होते. “धाकलं राजे ' म्हणून लहान-थोरांनी घातलेले अदबमुजरे रुजू करून घेत होते.

धाकुटपण पंतोजी-गुरुजींपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजाणपणी हटले जाते, त्यांना परिस्थितीच उदंड शिकवीत असते. आणि
ज्यांच्या पदरी मरण जीनावर टाकून दौडणाऱ्या राजाच्या पोटचा बल्चा होण्याचे फर्जदपण येते, त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते!!

दिवाळीच्