" छञपती श्री शिवाजी महाराज "
3.25K subscribers
4.05K photos
116 videos
458 files
3.23K links
Download Telegram
आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६०
छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले.
प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/NzW-G9TdxSQ

📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६०
( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार )
शाहिस्त्या नगरमध्ये!
मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते.
महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० फेब्रुवारी इ.स.१७०७
(काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे)
रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला
औरंगजेब शिवराज्य संपवायला आला, आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली. महाराज म्हणायचे, "माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत, एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य जिंकायला ३६० वर्ष लागतील, मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला.

आपण जेवढे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवढे महाराज मोठे होतात. औरंगजेब म्हणायचा," माझे शहजादे, वजीर, सरदार, अमीर-उमराव, सैन्य याच्या पेक्षा एकटे छत्रपती संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा"...! महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते.

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.
औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २० फेब्रुवारी इ.स.१८०२
शिंदेंना इंग्रजांचा तह स्विकारला नाही
इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही, शेवटी कॉलिन्स वैतागून मे १८०२ मध्ये शिंदेंच्या दरबारातून परत गेला,त्या अगोदर उज्जैन हून कलकत्ता येते पत्र पाठवले त्या पत्रात असे स्पष्टपणे नमूद केले होते. "दौलतराव शिंदे तर आपले स्वतंत्र गमावणारा तैनाती फौजेचा तह करणारच नाही उलट बाजीराव पेशव्याने अशा प्रकारचा त करू नये म्हणून आपल्या प्रभावाचा पूर्णपणे उपयोग करण्यास तीळ भर ही कसर बाकी ठेवणार नाही,"

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/NzW-G9TdxSQ
📜 २० फेब्रुवारी इ.स.१८१८
अखेरचा सेनापती बापू गोखले युद्धात यांचा मृत्यू
अतिशय सत्प्रवृत्त आणि सज्जन असा सेनापती बापू गोखले नावाचा मराठी राज्याचा अखेरचा सेनापती होता. दुसऱ्या बाजीरावानी पळ काढला आणि पुढे पळतच राहिला. १८१८ च्या मे महिन्यापर्यंत पळत राहिला. जेजूरी, पाडली, माहूली, पुसावळे, मिरज, गोकाक(कर्नाटक), पुन्हा माहूली, पंढरपूर, सिद्धटेक असा इंग्रजांची फौज पाठीशी घेऊन पळत सुटला. त्याला साथ देत होता सेनापती बापू गोखले ! धन्याच्या प्रामाणिक सेवेपोटी आणि स्वामिनिष्ठेसाठी ओतूरकडे बाजीराव जात असताना बापू ब्राम्हण वाड्याकडे येऊन राहिला. त्या ठिकाणी बापूचा मुलगा गोविंद तापाने वारला. सगळे दुःख गिळून बापू बाजीरावास साथ देत होता. अखेरीस पंढरपूरजवळ 'गोपाळअष्टी' येथे २० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांशी लढताना तो ठार झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० फेब्रुवारी इ.स.१८१८
#इंग्रज_आणि_सिंहगड:-
नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला.
सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली.
ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६५८
( माघ वद्य चतुर्दशी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, रविवार )

आरमार बांधणीला सुरुवात :-
हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यातील पहिल्या आरमार बांधणीला सुरुवात केली. या आरमार बांधणीसाठी लागणारी लाकडे ही विरार, वसई येथून समुद्रमार्गाने गेल्याची नोंद आहे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/tZoQ1tRWE5c

📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ फेब्रुवारी इ.स.१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे.त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ फेब्रुवारी इ.स.१७०३
औरंगजेब विरुद्ध मराठे
औरंगजेब स्वतः सिंहगब वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच एकदा १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला.
तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घसदाना आणण्यासाठी छावणीतून बाहेर गेलेल्या औरंगजेबाच्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते. ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मरठूनद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण सनरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारणवर राग राग करू लागला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ फेब्रुवारी इ.स.१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले . त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या ,परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीने झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/tZoQ1tRWE5c
📜 २१ फेब्रुवारी इ.स.१९१५
विष्णु पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) या गावचे राहाणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णु पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.
दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारक :
१) विष्णु गणेश पिंगळे
२) कर्तारसिंह सराबा
३) सरदार बक्षीससिंह
४) सरदार जगनसिंह
५) सरदार सुरायणसिंह
६) सरदार बुटासिंह
७) सरदार ईश्वरसिंह
८) सरदार हरनामसिंह

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६८४
केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र
केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्‍या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/yDHKwlpV52g

📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६९८
छत्रपती राजाराम महाराज विशाळगडावर
जिंजी वरून निघताना सुरक्षिततेसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी खंडो बल्लाळ ह्याच्या मार्फत जिंजीच्या वेढ्यातील गणोजी शिर्के ह्यास दाभोळच्या वतना बदल्यात आपल्याकडे वळवले.

२६ डिसेंम्बर १६९७ रोजी वेढ्यातून बाहेर पडल्यावर महाराज व इतर वीस पुरुष बुरखा घालून शिरक्यांच्या महिलांच्या पालखीत बसले व गणोजीच्या तळावर आले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी शिरक्यांनी शिकारीचा मामला सांगून आपल्या काही माणसांबरोबर महाराज ,येसाजी दाभाडे हे व इतर पुरुषास शिकारीचा वेष परिधान करून छावणीतून बाहेर काढले. मार्गात जळतगतीने मार्ग कर्मन करत असताना येसाजी दभाडे चा प्रवासातील दगदग सहन न होऊन मृत्यू झाला. शिरक्यांनी महाराजांना पुढे रणी च्या किल्ल्या च्या आसमंतात लपून असलेल्या धनाजी जाधव ह्यांच्या फौजेकडे सुपूर्द केले. व मागाहून गिरजोजी यादव राजस्त्रियांना घेऊन आला. ह्या सर्व मामल्यास झुल्फिकार खानाची गुप्त समनती होती. तरीही ह्या प्रकरणात गणोजी शिर्के ह्यास छावणीत अटक झाली होती. वेल्लोर- कोप्पळ-भुदरगड असा परतीचा प्रवास करत राज कुटुंब सोबत महाराज २२ फेब्रुवारी १६९८ रोजी विशाळगडावर पोहचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २२ फेब्रुवारी इ.स.१७३९
सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/yDHKwlpV52g
📜 २२ फेब्रुवारी इ.स.१८७९
वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक
या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.
या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे,
त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या.
शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली.
सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१६२३
राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले यांचा स्मृती दिन.
राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला. निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता .दरबाराचे काम संपवून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला. हत्तीवरती माहुत होता. तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता. पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना ; त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना.कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजीं जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजी जाधवराव यांना खुप झोंबला .दत्ताजी जाधवराव हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले. स्वतः दत्ताजी जाधवराव हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळे केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले. यावेळी मालोजीराजांचे बंधू विठोजी भोसले व त्यांची दोन मुले संभाजी भोसले व खेळोजी भोसले खंडागळे यांच्या मदतीला धावून आले.
खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती. या प्रकरणामुळे जाधव-भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले पण ते फार काळ टिकले नाही. मलिक अंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र कायमचे दूर केले .मलिक अंबर लखुजीराजे यांचा कायमचा द्वेष करत होता. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यामध्ये कायमचे वितुष्ट निर्माण करण्याचे निजामाचे प्रयत्न होते; पण त्यात त्याला फारसे यश आले नाही.
आता काय म्हणायचे या दैवगतीला ? काय नाव द्यायचे ह्या यादवीला ? दत्ताजींच्या आणि संभाजीराजांच्या राण्यांचे ! दोघींच्याही भाळी वैधव्य आले.बांगड्या फुटल्या... कशासाठी ? काय कारण ?.. काही नाही ! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला. पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?
जाधवरावांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड , उमरद , रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसरा व्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,कन्हेरखेड,वडाळी व सारवडी या होत...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/QgIzVphauzo

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१६६५
(फाल्गुन वद्य ४, चतुर्थी शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार)

शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली...
छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवुन गलबते देण्यास नकार कळवला. इंग्रजांचा उर्मट निरोप पोहचात, त्यांनी कारवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची गुर्मी उतरवण्याची ठरवले, महाराज आपले पुढे गेलेले आरमार बोलवतात की काय अशी भीती इंग्रज आणि शेरखानास वाटू लागली. शेरखानाने इंग्रजांची समजुत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा अर्पण करत १२२ पौंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला. या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेल्या तारीख आहेत २१ आणि २२ फेब्रुवारी १६६५...
स्वराज्यावर मिर्जाराजे जयसिंग हा चालून येत आहे हे समजतास छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले आणि भिवगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१६८१
(फाल्गुन शुद्ध चतुर्दशी, शके १६०२, दुर्मती संवत्सर, वार शनिवार)
सरकारी खजिण्यातून मदतीचे औरंगजेबाचे आदेश!
मराठ्यांनी केलेल्या लुटीमुळे शहरात प्रचंड भितीचे वातावरण होते! जवळ जवळ महीना होत आला होता तरी नागरिक भयभीत होते. अशातच बु-हाणपुरच्या प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला मौलवी, विद्वान मंडळीनी बादशहाकडे अर्ज केला की, "असाच काफरांचा जोर राहिला तर आमची वाताहत होईल. अब्रू व संपत्ती नष्ट झाली आहे." या अर्जाने औरंगजेब आपल्या नाका सरदारांवर अजुनच चिडला. त्याने खानजहानला कळविले की, दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे. त्यानंतर औरंगजेबाने खानजहानची मनसब वाढविली होती ती कमी करून टाकली. औरंगजेबाने ज्यांची लुट झाली आहे त्यांना सरकारकडून खैरात म्हणून १० हजार रुपयांची मदत करण्याचे फर्मान सोडले. यावरून बुन्हाणपुरची काय अवस्था केली असेल महाराजांनी याची कल्पना येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१६८५
मराठ्यांनी बारदेशवर हल्ला चढविला!
त्यामुळे चिडून जाऊन दोन्ही वकिलांना नजरकैदेत ठेवले. मराठ्यांचे वकिल नाराज झाले व किल्ले रायगडला आलेल्या, पोर्तुगीज वकिल फ्रें. आंतोवियूद सांवजुसेफ यास त्याने या बाबतीत मध्यस्थी करणे किती गरजेचे आहे हे खडसावून सांगितले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१७१९
हुसेनअलिची बादशहाशी भेट ठरविण्यात आली!
मराठ्यांची फौज आणि हुसेनअली औरंगजेबाच्या तोतया नातवाला घेऊन दिल्लीला निघाली. एक हत्ती सजविण्यात आला होता. त्यावर एक आंबारी कसण्यात आली होती. सकाळपासूनच लोक, "औरंगजेबाच्या नातवाच्या" पाया पडले. यावेळी बादशहा फर्रखसियरचे धाबे दणाणले होते. हुसेनअली कोणता डाव खेळतो आहे याचा अंदाज काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण त्याला धड कोणतीही बातमी मिळत नव्हती. हुसेनअली दरबारात आला. बादशहाच्या कदमबोसीसाठी तो वाकला असता बादशहाने स्वहस्ते त्याला खांदे धरून वर उठविले आणि त्याला आलिंगण दिले. इतर बोलणी झाल्यावर बादशहाने मुइनुद्दीन हुसेनचा प्रश्न काढला. "मराठ्यांचे सर्व लोक कैदेतून सोडल्यावर मुइनूद्दीनला तुमच्या हवाली करण्यात येईल असे हुसेनअलीने सांगितले". बादशहा आणि हुसेनअली यांची ही बैठक ३, तीन तास चालली. मग हुसेनअली परत आला. हुसेनअलिची बादशहाशी भेट ठरविण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१७३९
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ फेब्रुवारी इ.स.१८७६
संत गाडगे महाराजांचा जन्म
गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/QgIzVphauzo
📜 २३ फेब्रुवारी इ.स.१८७९
हुतात्मा हरी मकाजी नाईक, म्हणजे इतिहासातील एक दडलेलं कर्तत्ववान व्यक्तीमत्व, क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी १८५७ च्या उठवानंतर इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटीश प्रशासनाला मदत करणाऱ्या धनदांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जाती धर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार न्हावी आणि मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा.
इसवी सन १८७७ च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली. सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरवात केली व एक बंड उभे केले. या बंडाची दिशा क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रमाणेच होती. ब्रिटीश प्रशासनाला हादरविण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरि मकाजी नाईक.
त्याच्यातील धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्याचे कर्तुत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले. क्रांतिवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरीच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देशसेवेसाठी करावयाचे होते व त्याची झळ गोरगरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेऊन फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सह्भागी झाला.
बंडाचे पहिले निशाण उभे केले ते २३ फेब्रुवारी १८७९ शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटीश प्रशासनासाठी काम करणा-या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचनचिठ्ठी आणि खतावण्या जाळून टाकल्या आणि गोरगरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. त्यानंतर दावडी निमगाव, पानमळा असे करीत करीत जेजुरी जवळील वाल्हे गावामध्ये ५ मार्च १८७९ रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकार कडून हरीला पकडून देणाऱ्यास अथवा त्याची माहिती माहिती कळविणाऱ्यास एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, " आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !"
नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस "तिथीने" साजरा झालेला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/krFMMxc3Qyk

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७०
( फाल्गुन पौर्णिमा, शके १५९१, संवत्सर सौम्य, गुरुवार )

शिवरायांना पुत्ररत्न :-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी "सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब" यांना राजगडावर पुत्र लाभ झाला,"रामराजे" नाव ठेवण्यात आले, रामराजे पालथे उपजले, राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले...
राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले - "रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालती..

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७४
#म्यानातून_उसळे_तरवारीची_पात
#वेडात_मराठे_वीर_दौडले_सात
कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपणांस स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. अंगावर शहारे आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांनी स्फूर्तीगीतातून जिवंत केला.
छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
दगडात दिसतील अजुन्बी तेथल्या टाचा ,
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचे

त्या सात योद्धांची नावे….
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१६८२
(फाल्गुन वद्य द्वादशी शके १६०३ दुर्मती संवत्सर वार शुक्रवार)

हसनअलीखान, रणमस्तखान कल्याण येथे आले. छत्रपती
संभाजी महाराज याचवेळी जंजिऱ्यास धडका देत होते. दादाजी रघुनाथ व विसाजी प्रभु हेही वेढा चालवीत होते. याच वेळी संभाजी महाराजांना हसनअलीखान कोकणात उतरल्याची बातमी दरम्यान समजली आणि त्यांनी जंजीरा किल्ल्याची जबाबदारी दादाजी प्रभुंवर सोपवली. त्यांना कल्याण भिवंडी कडे जावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर जंजीरा मोहिमेत शहाजादा अकबर होता. तो शहापुरला गेला. व छत्रपती संभाजी महाराज गांगोलिला गेले. जेधे शकावली प्रमाणे शके १६०३ माघमासी हसनअलीखान कल्याण भिवंडी जाळून फिरोन गेला. अशी नोंद आढळते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/krFMMxc3Qyk
📜 २४ फेब्रुवारी इ.स.१७३९
मोगल आणि नादिरशहा यांच्यात कर्नाल येथे मोठे
युद्ध झाले त्यात मोगलांचा मोठा पराभव झाला, नादीर च्या सैन्याने दिल्ली आणि उत्तर हिंदुस्तानात हैदोस घालत सुमारे २ लाख लोक कत्तल केले, अनेक स्त्रिया गुलाम म्हणून ताब्यात घेतल्या ,अनेक शहरे जाळली, मंदिरे जमीनदोस्त केली. दरम्यान नादीर ने मोठा दरबार भरवत स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह घोषित केले, नादीरला हिंदुस्थानात पाचारण करणाऱ्यांनी त्याला मराठ्यांच्या राजधानीवर म्हणजे साताऱ्यावर चालून जाण्याचे आणि छत्रपती शाहूंना संपवण्याचे सल्ले दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१७८३
सालबाईच्या तहावर नाना फडणीसांची स्वाक्षरी
पेशवेपदी आरूढ होण्याचे राघोबादादाचे स्वप्न इंग्रज व मराठे यांच्यात झालेल्या सालबाई च्या तहाने कायमचे धुळीस मिळाले. मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात चंचुप्रवेश करण्याच्या इंग्रजांच्या प्रयत्नांना राघोबा दादाच्या पेशवेपदी आरूढ होण्यासाठी त्यांची मदत मागण्याने बळ मिळाले ज्याची इंग्रज वाटच बघत होते. नारायणराव पेशव्याच्या खुनामुळे पेशवायीत माजलेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याच्या हेतूने इंग्रजांनी राघोबा दादास पेशवे पद मिळण्यासाठी साह्य करण्याचे कबुल केले.
मराठे व इंग्रज यांच्यातील प्रथम युद्धास डिसेंबर १७७४ पासून सुरुवात झाली. हा संघर्ष सुमारे सात वर्षे चालला. वेगवेगळ्या आघाड्यांवर दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच लहान मोठ्या चकमकी, लढाया, तह झाले. झालेले तह दोन्ही पक्षांनी पाळले नाहीत. निर्णायक स्वरूपात जय पराजय कुणाचाही होत नव्हता. इंग्रजांना हैदर अली भारी पडत होता, नागपूरकर भोसले पण इंग्रजांच्या बाजूने मध्यस्थी करत होता. हैदर अलीने इंग्रजांविरुद्ध मोठे विजय मिळवल्याने तो त्यांचाशी कुठलाही तह करण्याच्या विरुद्ध होता व तसे त्याने नाना, महाद्जीस बजावले पण होते. नाना हैदरच्या भूमिकेशी सहमत होता तर महादजी हैदर तयार नसल्यास त्याला सोडून तह करावा अशा मताचा होता. नाना व महादजी ह्या दोघांना इंग्रजांशी करावयाच्या तहाची सूत्रे आपल्याच हातात असावी असे वाटत होते. शेवटी नानांनी नमते घेतले व महाद्जीने १७ मे १७८२ रोजी ग्वाल्हेर पासून वीस मैलावर असलेल्या सालबाई येथे इंग्रजांशी तह ठरवला. हैदर आली १७८२ च्या डिसेंबर मध्ये मरण पावल्यावर २४-२-१७८३ ला नानांनी या तहास मान्यता दिली.
या तहानुसार इंग्रजांनी राघोबास आश्रय देऊ नये,भडोच, साष्टी व ठाणे इंग्रजांकडे राहावी, इंग्रजांनी व मराठ्यांनी एकमेकांच्या दोस्तांस त्रास देऊ नये, मराठ्यांनी फ्रेंच वा अन्य कुठल्याही युरोपियन सत्तेशी संधान बंधू नये, पेशव्याने हैदर ने इंग्रजांचा घेतलेला मुलुख परत करण्यास त्याला भाग पडावे, इ. या तहास महाद्जीने हमीदार राहून शर्ती मोडणाऱ्या पक्षाचा बंदोबस्त करावा असे पण ठरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ फेब्रुवारी इ.स.१८२४
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचे हे पहिले बंड मानले जाते. इंग्रजांची आर्थिक नाडी आवळण्याचा त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला. २४ फेब्रुवारी १८२४ या दिवशी इंग्रजांचा ‘भांबुडा' येथील कडेकोट बंदोबस्तात असणारा खजिना उमाजींनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या साहाय्याने लुटला आणि इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६३७
शहाजीराजे आदिलशाहीत दाखल - फर्जद किताब मिळाला.
फेब्रुवारी १६३७त महाबली शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले. शहाजीराजांनी या सर्वांस आपला स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा, संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्रीसह पुण्यास राहून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे. तिथे ते २५ फेब्रुवारी रोजी आदिलशहाच्या चाकरीत दाखल झाले. आदिलशहाच्या संमतीने शहाजीराजांनी विजापूर जवळच्या कंपिली गावी आपणांस राहण्यासाठी एक वाडा बांधला. मोठा बगिचा केला व तेथे ते राहू लागले. काही दिवसानी कंपिली गावात बांधलेला वाडा आपणासाठी आदिलशहाने द्यावा अशी खटपट घोरपड्यानी अदिलशहापाशी केली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांची बदली बंगरुळास केली व कंपीचा वाडा घोरपड्यास राहण्यासाठी दिला. महमद आदिलशहा तरुण, तल्लख व महत्त्वाकांक्षी होता. मोगलांशी गोडी झाल्याने उत्तरेकडून आपल्यावर स्वारी होणार नाही हे आदिलशहाने लक्षात घेतले आणि कर्नाटक जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजे यांना विजापूर सरदार रणदुल्लाखान याज समवेत नेमले. यावेळी आदिलशहाच्या नजरेसमोर दक्षिणेतील तुंगभद्रा व रामेश्वरपर्यंतचा हिंदूराजांनी व्यापलेला प्रदेश होता. हा प्रदेश आदिलशहा व कुतूबशहा यांनी जिंकणे त्यांच्या फायद्याचे होते. म्हणून ह्या दोन शाह्यांनी करार करून ठरविले की कर्नाटकचा पूर्व भाग कुतूबशहाने व पश्चिम भाग आदिलशहाने जिंकावा.
शहाजी राजे विजापूरच्या चाकरीत हजर झाल्यावर आदिलशहाने रणदुल्ला खानास त्याजबरोबर
देऊन कर्नाटकांतील हिंदू राजांस जिंकण्यास पाठविले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/bng1lCTmTZk

📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६६०
बादशहाचे फर्मान ऐकून सर्व मोगल सरदार मराठ्यांवर स्वारी करण्यास तयार झाले. त्यांना आगेकूच करण्याचा हुकूम शायिस्तेखानाकडून मिळाला. तेव्हा नौबतीच्या इशाऱ्यात मोगली फौज निघाली ती औरंगबादला आली. औरंगाबाद ही दक्षिणेच्या सुभेदाराची राजधानी. तिथे आल्यावर शायिस्तेखानाने तेथे काही दिवस राहून तेथील बंदोबस्त केला. औरंगाबादेस त्याने आपला मुलगा अबूलफत्तेखान याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. नंतर तो तेथून निघाला तो अहमदनगरास दिनांक ११ फेब्रुवारी १६६०त फौजेसह येऊन दाखल झाला. दिनांक २५ फेब्रुवारी १६६० रोजी त्याने अहमदनगर सोडले. वाटेत महाराजांना पाण्यात पाहणारे घाटगे, जाधवराव, कोकाटे, गाढे आदी मराठे सरदार खानास येऊन मिळाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २५ फेब्रुवारी इ.स.१७२८
सरदार रायाजीराव जाधवराव यांना वीरमरण
घुमट म्हणजे श्रीमंत सरदार रायाजीराव जाधवराव यांची समाधी होय. भारतीय इतिहासातील गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी "पालखेडची लढाई". पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैद्राबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला. या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छत्रपती शाहूंचे विश्वासु म्हणून सहभागी झाले होते. २५ फेब्रुवारी १७२८ रोजी नाशिकमधिल पालखेड जवळील निपाणी प्रदेशात झालेल्या धुमश्चक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरन आले. परिणामतः २८ फेब्रुवारीला निजाम नाक धरून मराठ्यांना शरण आला. जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून ही प्रशस्त छत्री/समाधी भुईंज(सातारा) गावाच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ फेब्रुवारी इ.स.१७४२
नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथरावही आता जवळजवळ आठ वर्षांचे झालेच होते. त्यामुळे नानासाहेबांनी रघुनाथरावांचे लग्न काढले. राधाबाई या अजूनही 'कर्त्या' असल्यामुळे बहुदा त्यांनी आपल्या 'बर्वे' घराण्यातील एक मुलगी सुचवली असावी, असे वाटते. म्हणून मौजे जळगाव (मूळ शाखा डुबेरे?) येथील गणेशपंत बर्वे सावकारांची कन्या जानकीबाई (माहेरचे नाव?) यांचा दि. २५ फेब्रुवारी सन १७४२, फाल्गुन शुद्ध द्वितीया शके १६६३, दुर्मतीनाम संवत्सरी गुरुवारी नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथराव यांच्याशी करण्यात आला. राधाबाईंची आणखी एक नातसून घरात आली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://youtu.be/bng1lCTmTZk

📜 २५ फेब्रुवारी इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब्रवारीला चाकण उर्फ संग्रामदुर्ग किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩