AKSHARNAMA
865 subscribers
4K photos
3 videos
4.28K links
मराठीतलं पहिलंवहिलं डिजिटल डेली फीचर्स पोर्टल
Download Telegram
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख चौथा
---------------------
महाराष्ट्रातले दोन ‘बडे’ बंडखोर : शंकरराव चव्हाण आणि बॅ. अब्दुल रहेमान अंतुले! - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7364
सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीत कोणी कोणी बंडखोरी मागे घेतली आणि आणि कोण अजून रिंगणात आहेत, याच्या बातम्या प्रकाशित होतीलच. त्यानिमित्तानं काँग्रेसमधील बंडखोरीच्या दोन ‘बड्या’ घटना आठवल्या. ‘बड्या’ असा उल्लेख करण्याचं कारण त्या दोघांनीही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं! महाराष्ट्राच्या राजकारणातले आजवरचे सर्वांत ‘बडे’ बंडखोर असा या दोघांचा उल्लेख केला, तर मुळीच गैर ठरणार नाही...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख पाचवा
---------------------
‘बाबुल मोरा नैहर छूटो जाए’... अर्थात सोलापूर मनातलं... जनातलं! - गणेश मनोहर कुलकर्णी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7365
खूप वर्षांपूर्वी दिल्लीतील अशोक चोप्रा नावाच्या रसिकानं ‘बाबुलमोरा...’ ही वाजिद अलि शाहने लिहिलेली ठुमरी कुणी कुणी गायली याचा शोध घेतला, तेव्हा पंचवीसेक गायकांची यादी तयार झाली. एकदा मी हेमंत कुमारांना विचारलं होतं, सर्वांत जीवघेणं कुणी गायलं आहे, तर ते जराही वेळ न दवडता म्हणाले, ‘अरे, नैहर तो सैगल की, ही तो छुटी थी...!’ मलाही सोलापूरबद्दल असंच वाटत राहतं...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख सहावा
---------------------
जागतिक शांततेच्या समोर ठाकलेले आव्हान दूर सारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखेच समकालीन थोर बौद्ध नेते यांची वचने आणि जीवन स्फूर्तीदायक ठरू शकेल - ख्रिस्तोफर क्वीन
https://www.aksharnama.com/client/article_detail/7366
१९५६ साली नागपूरला धर्मपरिवर्तनासाठी सर्व जमले असता, आधीच्या संध्याकाळी पत्रकारांनी आंबेडकरांना ते आणि त्यांचे अनुयायी दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्या प्रकारचा बौद्धधर्म स्वीकारणार आहेत, याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले, “भगवान बुद्धांनी स्वत: जे ज्ञान लोकांसमोर प्रकट केले, त्याच्या मर्यादांमध्ये आमचा बौद्ध धर्म राहील. आमचा बौद्ध धर्म नवा असेल, त्याचे वाहन नवे असेल. आपण त्याला ‘नवायन’ म्हणू.”...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख सातवा
---------------------
‘कन्नड’चे ते दिवस ‘घडण्या’चे होते, आणि ‘घडवणारी’ अनेक चांगली माणसं त्या काळात भेटली... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7367
तेव्हाची सामाजिक-आर्थिक परिस्थितीसुद्धा अतिशय हलाखीची होती. मात्र १९६०नंतरचा तो काळ... ही बंधनं सैल होण्याचे दिवस. समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागृती निर्माण होऊ लागली होती. माझ्या मॅट्रिकच्या वर्गात २६ मुलं होती, पण एकही मुलगी नव्हती. २६पैकी तब्बल २२ जण शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या समाजातले पहिले होते. शिवाजी महाविद्यालय आणि कन्नडचे दिवस माझ्यासाठी तरी माहिती व ज्ञानाचे अगणित दिवे उजळवणारे होते...

‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख आठवा
---------------------
राजकारण की टोळी युद्ध? Democracy Betrayed?... लोकशाहीच्या नावाखाली पुन्हा आपण मध्ययुगाकडे - सरंजामशाहीकडे – चाललो आहोत का? - विनय हर्डीकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7368
त्या काळात सरंजामदार आणि राजे उत्पादक शेतकऱ्याला लुटायचे, बडवायचे, ओरबाडायचे, त्यामधल्या काही जणांना सैन्यात जाऊन लुटारूच बनण्याशिवाय तरणोपाय राहणार नाही, असं कारस्थान रचायचे. तीच वैरभावना, एकमेकाला संपवण्याची भाषा, गॅंग बदलणे, नवी गँग तयार करणे किंवा गॅंगच्या पुढाऱ्याला बाजूला करून (कधी कधी प्रत्यक्ष ‘खलास’ करून) गँग ताब्यात घेणे!...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ : आतापर्यंत प्रकाशित झालेले लेख -
------------------------------------------------
एकेक मिसळ म्हणजे एकेक प्रेम-प्रकरण… आणि मिसळींचा ‘ब्लास्ट’ हा तारुण्यातील अनावर आकर्षणांचे प्रतीक आहे… - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7361
------------------------------------------------
सर रिचर्ड अॅ-टेनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ अर्थात ‘गांधी’ नावाचा महात्मा पडद्यावर चितारणाऱ्या सिनेमाची कथा… - सलील जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7362
------------------------------------------------
‘वाँटेड स्पिरिच्युअल जर्नलिस्ट!’ म्हणजे ‘गोदी मीडिया’ला आता ‘योगी पत्रकारा’ची आवश्यकता!! - जयदेव डोळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7363
------------------------------------------------
महाराष्ट्रातले दोन ‘बडे’ बंडखोर : शंकरराव चव्हाण आणि बॅ. अब्दुल रहेमान अंतुले! - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7364
------------------------------------------------
‘बाबुल मोरा नैहर छूटो जाए’... अर्थात सोलापूर मनातलं... जनातलं! - गणेश मनोहर कुलकर्णी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7365
------------------------------------------------
जागतिक शांततेच्या समोर ठाकलेले आव्हान दूर सारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखेच समकालीन थोर बौद्ध नेते यांची वचने आणि जीवन स्फूर्तीदायक ठरू शकेल - ख्रिस्तोफर क्वीन
https://www.aksharnama.com/client/article_detail/7366
------------------------------------------------
‘कन्नड’चे ते दिवस ‘घडण्या’चे होते, आणि ‘घडवणारी’ अनेक चांगली माणसं त्या काळात भेटली... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7367
------------------------------------------------
राजकारण की टोळी युद्ध? Democracy Betrayed?... लोकशाहीच्या नावाखाली पुन्हा आपण मध्ययुगाकडे - सरंजामशाहीकडे – चाललो आहोत का? - विनय हर्डीकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7368
------------------------------------------------
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख नववा
---------------------
ऑस्कर वाईल्डची ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ ही विनोदिका ‘क्षुल्लक’ असती, तर एकशेतीस वर्षं टिकली नसती! - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7375
---------------------
वाइल्डने लिहिलं आहे - “Cynicism is merely the art of seeing things as they are instead of as they ought to be.” सिनिसिझम ही गोष्टी जशा आहेत तशा बघण्याची कला आहे. गोष्टी कशा असाव्यात यावर सिनिसिझम आपलं लक्ष केंद्रित करत नाही. ‘इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ लिहीत असताना वाईल्डच्या मनात ही भूमिका होती.
सिनिसिझम खऱ्या मानवी प्रवृत्तींचं लालन-पालन करणारे आदर्श मानतो. खोटे सामाजिक आदर्श जेव्हा या आदर्शांच्या आड येऊ लागतात, तेव्हा सिनिसिझम त्यांची खिल्ली उडवू लागतो. या धारदार संघर्षामधून ऑस्कर वाईल्डचा विनोद निर्माण होतो. सामाजिक आदर्श समाजमानसात एवढे रुजलेले असतात की, त्यांची खिल्ली उडवणं बहुतांश लोकांना आयुष्यात कसलेही आदर्श न मानणाऱ्या उथळ मनोवृत्तीचं लक्षण वाटू लागतं. त्यामुळेच ऑस्कर वाईल्ड लिहितो की, माझी कॉमेडी विचारशील लोकांसाठी आहे, आणि क्षुल्लकही आहे.
वाईल्डची तरुण पात्रं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारताना दिसतात. आपल्या स्वार्थाविषयी, आपल्याला जे मनापासून हवं आहे, त्याविषयी त्यांच्या मनात अजिबात संकोच नाही. हे लोक लबाड आहेत, दांभिक नाहीत. या कॉमेडीमधील मध्यम वयातील पात्रं दांभिक आहेत. आदर्श पाळल्यासारखे दाखवत त्यांना स्वार्थ हवा आहे. तरुण पात्रांची मोकळीढाकळी आनंदी वृत्ती आणि मध्यमवयीन पात्रांची स्वार्थ साधण्याची कसरत, यातून या कॉमेडीमधील विनोद तयार झाला आहे.
ऑस्कर वाईल्ड काहीही म्हणत असला, तरी ज्या लोकांना त्याच्या विनोदामागील सत्य जाणवतं, त्यांना ही कॉमेडी त्यांची जीवनदृष्टी बदलून टाकण्याएवढी समृद्ध वाटते. ती ‘क्षुल्लक’ असती, तर १३० वर्षं टिकलीच नसती!
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख नववा
---------------------
ऑस्कर वाईल्डची ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ ही विनोदिका ‘क्षुल्लक’ असती, तर एकशेतीस वर्षं टिकली नसती! - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7375
---------------------
सामाजिक आदर्श समाजमानसात एवढे रुजलेले असतात की, त्यांची खिल्ली उडवणं बहुतांश लोकांना आयुष्यात कसलेही आदर्श न मानणाऱ्या उथळ मनोवृत्तीचं लक्षण वाटू लागतं. त्यामुळेच ऑस्कर वाईल्ड लिहितो की, माझी कॉमेडी विचारशील लोकांसाठी आहे, आणि क्षुल्लकही आहे.
वाईल्डची तरुण पात्रं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारताना दिसतात. आपल्या स्वार्थाविषयी, आपल्याला जे मनापासून हवं आहे, त्याविषयी त्यांच्या मनात अजिबात संकोच नाही. हे लोक लबाड आहेत, दांभिक नाहीत. या कॉमेडीमधील मध्यम वयातील पात्रं दांभिक आहेत. आदर्श पाळल्यासारखे दाखवत त्यांना स्वार्थ हवा आहे. तरुण पात्रांची मोकळीढाकळी आनंदी वृत्ती आणि मध्यमवयीन पात्रांची स्वार्थ साधण्याची कसरत, यातून या कॉमेडीमधील विनोद तयार झाला आहे.
ही कॉमेडी आपली जीवनदृष्टी बदलून टाकण्याएवढी समृद्ध वाटते.
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख नववा
---------------------
इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट - ऑस्कर वाइल्ड
सत्यशील खरे की खोटे? - रूपांतर : श्रीनिवास जोशी
ऑस्कर वाईल्ड (Oscar Wilde) यांची ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ (The Importance of Being Earnest) ही विनोदिका म्हणजे कॉमेडी, १८९५ साली प्रसिद्ध झाली. या कॉमेडीने गेली १३० वर्षं जगभरातील प्रेक्षाकांना हसवलं आहे, आणि हसवता हसवता अंतर्मुखही केलं आहे. या नाटकाचं पूर्ण नाव आहे- ‘इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट : अ ट्रिव्हियल कॉमेडी फॉर सीरियस पीपल’. विचारशील लोकांसाठी लिहिली गेलेली एक क्षुल्लक कॉमेडी.
वाइल्डने लिहिलं आहे - “Cynicism is merely the art of seeing things as they are instead of as they ought to be.” सिनिसिझम ही गोष्टी जशा आहेत तशा बघण्याची कला आहे. गोष्टी कशा असाव्यात यावर सिनिसिझम आपलं लक्ष केंद्रित करत नाही. ‘इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ लिहीत असताना वाईल्डच्या मनात ही भूमिका होती.
ऑस्कर वाईल्ड काहीही म्हणत असला, तरी ज्या लोकांना त्याच्या विनोदामागील सत्य जाणवतं, त्यांना ही कॉमेडी त्यांची जीवनदृष्टी बदलून टाकण्याएवढी समृद्ध वाटते. ती ‘क्षुल्लक’ असती, तर १३० वर्षं टिकलीच नसती!
---------------------
अंक पहिला (पूर्वार्ध) : https://www.aksharnama.com/client/article_detail/7374
अंक पहिला (उत्तरार्ध) : https://www.aksharnama.com/client/article_detail/7373
अंक दुसरा (पूर्वार्ध) : https://www.aksharnama.com/client/article_detail/7372
अंक दुसरा (उत्तरार्ध) : https://www.aksharnama.com/client/article_detail/7371
अंक तिसरा : https://www.aksharnama.com/client/article_detail/7370
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख दहावा
---------------------
विनय खरंच एक ‘अजब’ रसायन आहे! काय म्हणू, वल्ली, अवलिया, बंडखोर, परखड, उनाड...? - रत्नाकर दशरथ राशीनकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7376
विनयच्या आई अतिशय स्पष्टवक्त्या, निर्भीड व परखड होत्या. अजिबात भिडस्तपणा नाही, मात्र त्यातून कोणालाही दुखावणं किंवा कमी लेखणं कधीच नसायचं. विनयमध्ये नेमके हेच गुण रुजले आहेत. माझ्या मते विनयचा स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा, परखडपणा ही त्याच्या आईची देण आहे. विनय, मी आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजीमधील प्रावीण्य याचं श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. ह. पु. पायगावकर सर यांना जातं...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख अकरावा
---------------------
पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाचा माझा ‘माथेफिरू’ बाप! - सावित्री साव्हनी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7377
प्रत्येक वेळी अपयशाचा आलेला अनुभव बरोबर घेऊन रिकाम्या हातांनी वडील जर्मनीला परतले. हव्या असलेल्या क्रांतिकारकांची यादी ब्रिटिशांकडे होती. त्यात वडिलांचे नाव होते. अशा क्रांतिकारकांना अंदमानला पाठवले जाई. आपला पाठलाग करणारा ब्रिटिशांचा गुप्त विभाग आपल्यावर केव्हाही झडप घालेल, म्हणून वडिलांनी मेक्सिकोमध्ये आश्रय घेतला. वडील तिथे राहून गरीब शेतकऱ्यांना मदत करू लागले. त्यांना ‘शेतकीतज्ज्ञ’ असा लौकिक मिळाला...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४ - लेख बारावा
---------------------
महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्व आपला ठसा उमटवत आहे, पण ‘संख्येच्या भाषे’त जगाला हे वास्तव कळण्यास अद्याप थोडा अवधी आहे... - परिमल माया सुधाकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7378
आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकही महिला विराजमान झाली नाही. महाराष्ट्रात राज्य विधानमंडळातील महिलांची एकूण संख्या आणि लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या कधीही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त नसावी. येत्या २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधील महिला उमेदवारांची टक्केवारी जेमतेम १० टक्के आहे...
‘अक्षरनामा’ दिवाळी २०२४
१२ विषयांवरील १२ लेख
https://www.aksharnama.com
अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे - रवि आमले
https://www.aksharnama.com/client/article_detail/7379
भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात....
टीका ‘सिलेक्टिव्ह’ नको! - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7380
राज्यातील महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर ‘उधळपट्टी’ म्हणून ज्यांनी टीका केली, ती महाविकास आघाडी आता निवडणूक जाहीरनाम्यात महिलांना दरमहा ३ हजार रुपये देणार, असं वचन देते. यांचा अर्थ सरकाराच्या तिजोरीवर आणि करदात्यांच्या खिशावर दुप्पट डल्ला. जनतेला राजकारणी कसं उल्लू बनवतात, याचं हे उदाहरण आहे. उल्लू बनवण्याच्या राजकीय पक्षांच्या या प्रकारांकडे माध्यमंही विवेकी नजरेनं न बघता ‘सिलेक्टिव्ह टीका’ करतात...
‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतराचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी - धनंजय गुडसूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7381
या कादंबरीत शेतकऱ्यांचे प्रश्न, शरद जोशींचा विचार, शेतकऱ्यांचं आजचं जगणं, शासनाकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक, निवडून येणाऱ्या प्रतिनिधींचं शेतकरीविरोधी वर्तन या साऱ्याचं वर्णन वास्तव दाखवणारं आहे. लेखक जणू काही या साऱ्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी आहे, असं वाटतं. याशिवाय राजकारणातील सूक्ष्म बाबीही इतक्या नजागतीनं टिपल्या आहेत की, आपण अवतीभोवती पाहताना हे चित्र दिसतं...
अन्यायाच्या विरोधातली माझी लढाई अजून संपलेली नाही. आताशी कुठे एक ठाणं काबीज केलंय... लढाई अजूनही सुरूच आहे... - अनिल देशमुख
https://www.aksharnama.com/client/article_detail/7382
हे एका विशिष्ट कालमर्यादेतील कथन आहे आणि हा कालखंड आहे फक्त २३ महिन्यांचा (फेब्रुवारी २०२१ ते डिसेंबर २०२२). म्हणजे जेमतेम दोन वर्षांचा काळ; पण माझ्या संपूर्ण आयुष्यालाही पुरून उरेल असा हा कालखंड आहे, म्हणूनच मी माझं हे आत्मकथन लिहिलं आहे. या जेमतेम दोन वर्षांच्या काळात मी ज्या परिस्थितीला सामोरा गेलो, तो अनुभव सांगण्याचं धाडस मी केलंय...
‘अक्षरनामा’, १६-१७ नोव्हेंबर २०२४
लिंक - https://www.aksharnama.com
---------------------------------------------------
अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे - रवि आमले
---------------------------------------