AKSHARNAMA
865 subscribers
4K photos
3 videos
4.28K links
मराठीतलं पहिलंवहिलं डिजिटल डेली फीचर्स पोर्टल
Download Telegram
नानासाहेब नावाचा ‘परिस’ स्पर्श होताना... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7456
न्यायमूर्ती आणि लेखक म्हणून जनमाणसातील नानासाहेबांची प्रतिमा खूपच लखलखीत होती. महत्त्वाचं म्हणजे ही प्रतिमा धवल चारित्र्याच्या कोंदणात विराजमान होती. गेली साडेचार दशकं पत्रकारिता करत असताना प्रतिमा लखलखीत असणारे राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रातले नागपूर, मुंबई, दिल्लीत असंख्य भेटले; त्यापैकी बहुसंख्य त्याच प्रतिमेच्या कोशात गुरफटून गेलेले पाहण्यात आले...
माधव ‘नेत्रालय’, मोहन ‘जिव्हालय’ आणि नरेंद्र ‘स्वातंत्र्यालय’…. - जयदेव डोळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7457
‘आलय’ म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जे उत्तर द्याल ते मलाही माहीत आहे, पण खात्री करवून घेऊ म्हणून तुम्हाला विचारले. मला सांगा, ‘आलय’ म्हणजे घर ना? ‘देवालय’ म्हणजे देवाचे घर. आणखी उदाहरण द्यायचे तर ‘सचिवालय’, ‘न्यायालय’, ‘विद्यालय’, ‘रुग्णालय’, ‘औषधालय’ या चांगल्या गोष्टींची घरे जशी असतात, तसे जिथे मद्य मिळते, ते ‘मद्यालय’. म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा घर आहे आपल्या भाषेत...
प्रवाही भाषा, अर्थपूर्ण निवेदन, यामुळे ‌‘पटयारा‌’ थेट काळजाला भिडतं… आणि वाट्याला येणाऱ्या जगण्याकडं कसं बघावं, याची दिशाही दाखवतं…. - विलास पाटील
https://www.aksharnama.com/client/article_detail/7458
ही कहाणी एका कुटुंबाबरोबरच त्याच्या भोवतालाचीही आहे, हेही स्पष्टपणे आपल्यासमोर येतं. आणि त्याच बरोबरीने आपल्याला आणखी एका नाजूक धाग्याची जाणीव होते. तो म्हणजे परिस्थितीच्या जोखडाखाली कोणीही अडकलेला असो, समाज त्याची वेळी-अवेळी अडवणूक करतोच करतो. त्यासाठी दलित, पददलित, वंचित, उपेक्षित असण्याची गरज नसते. परिस्थिती अनुकूल नसणाऱ्या सवर्णांच्या वाट्यालाही ते दु:ख येतं...
‘साप्ताहिक मनोहर’ माझा मित्र झाला. जीवाभावाचा मित्र. वयाने मोठा असलेला मित्र, ज्याचं बोट पकडून मी पुण्यात सेटल झालो… अनेक अर्थानं - अविनाश कोल्हे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7459
‘मनोहर’च्या काही मुखपृष्ठकथांची शीर्षकं आजही आठवतात. ‘तरुणींना हवासा वाटणारा पण न ‘सापडणारा’ बॉयफ्रेंड’, ‘मारुतीची शेपटी ते पदमा खन्ना = होस्टेल’ ही मुलांच्या होस्टेलबद्दलची कव्हर स्टोरी, ‘आधुनिक तरुणी : परंपरागत व्रतवैकल्ये’, ‘पोरींनी लाजणे पोरांना धमाल आवडते!’, ‘कुढणाऱ्या मुली, बागडणाऱ्या मुली, उंडारणाऱ्या मुली... गर्ल्स होस्टेल’.... अशा अनेक मुखपृष्ठकथांमुळे मला पुणं सापडत गेलं...
‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ : ललितलेखन करणाऱ्या लेखकांसाठी हा मौल्यवान संदर्भग्रंथ आहे - शिल्पा द. गंजी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7460
कथा, कादंबरीसारख्या ‘सांगण्याच्या’ प्रकारातील आणि चित्रपट, नाटक या ‘दाखवण्याच्या’ प्रकारातील साहित्यकृती आणि कलाकृती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे ललितलेखन-कलेतील ‘मूळ घटक’ आणि ‘आकृतिबंध’ यांचा संच तयार करून, दंतकथा, पुराणकथा, परीकथा, बोधकथा, निसर्गकथा यांची असंख्य उदाहरणे व दाखले देत, त्यांचा मूळ स्वरूपात कसा अभ्यास करता येईल, हे या पुस्तकाद्वारे अफगाण यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (पूर्वार्ध) - सायली दशरथ थारळी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7461
सध्या चलाभास-निर्मितिसंस्था तंत्रज्ञानाच्या पंखांनी भरारी घेत आहेत. अमेरिकेपाठोपाठ जपानदेखील चलाभासाच्या जगात बरोबरीचं स्थान मिळवलं आहे. जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’ने लहानांपासून मोठ्यांना आपल्या किमयेची भुरळ पाडली आहे. जपान, जापानी संस्कृती आणि अर्थातच जपानी भाषा यांचं एक नैसर्गिक वाटेल, असं लाघवी चित्रण करून ‘स्टुडिओ जिब्ली’ने आपलं वेगळं स्थान अधिक ठळक केलं आहे...
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध) - सायली दशरथ थारळी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7462
जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते...
सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…” - प्रवीण बर्दापूरकर | राजीव खांडेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7463
पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं...
‘नॅशनल हेरॉल्ड’ : वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7464
खरं तर एक पत्रकार म्हणून ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणाकडे वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा अशा तीन दृष्टीकोनातून बघायला हवं, असं मला वाटतं. म्हणूनच या प्रकरणात काय घडलं, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो भाजपेतर विचारसरणी असणाऱ्या अन्य सर्व राजकीय कार्यकर्ते, नेते, कथित विचारवंत, पत्रकारांची नाराजी ओढवून घेणारा आहे, यांची जाणीव प्रस्तुत पत्रकाराला नक्कीच आहे...
‘वढू आरोग्य प्रकल्पा’नं मोठी भरारी घेतली. त्याला भरघोस आर्थिक मदत मिळत गेल्याने तिथं ग्रामीण रुग्णालय उभारलं गेलं…. - अतुल देऊळगावकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7465
वढू येथील प्रकल्प १९७७मध्ये सुरू झाला, पण शहरी डॉक्टर्स खेडेगावात पाय ठेवायला तयार नव्हते. त्यातूनही कोणी आलं, तर त्यांचं गावकऱ्यांशी पटत नव्हतं. शशिकांत यांना गावात राहण्याचा अनुभव होता. आरोग्यसेवा गावागावांत पोचवण्याच्या विचारामुळे त्यांनी कार्यक्षेत्रासाठी शहर नाकारून स्वतःहून गावाची निवड केली होती. भाषा अगदी खेड्यातली वाटावी अशी होती. त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत ओलावा आणि आपुलकी होती...
यात्रा युरोपची : छ. राजाराम महाराज द्वितीय यांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकणारी रोजनिशी - रणधीर शिंदे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7466
या रोजनिशीतून राजाराम महाराजांच्या संपन्‍न अशा प्रागतिक दृष्टीच्या व्यक्‍तिमत्त्वाचा व त्यांच्या अंतरंगाचा, जीवनदृष्टीचा भरगच्च आविष्कार झाला आहे. राजाराम महाराजांच्या मनात युरोपीय राष्ट्रांविषयी कुतूहल व जिज्ञासा होती. नवे जग जाणून घेण्याची इच्छा होती. आधुनिक दृष्टीचे हे जग जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे, अशी दृष्टी यामागे आहे. या दृष्टीने ते युरोपातील आधुनिक जग व त्याची प्रक्रिया ते जाणून घेत आहेत...
‘असे होते गांधीजी’ : . नव्या भारतातल्या नव्या पिढीला म.गांधींचा खराखुरा अन् सर्वांगीण परिचय करवून देण्याचा प्रयत्न - जयदेव डोळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7467
पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आणि जयंती-पुण्यतिथी यांच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांत अवतरणारे धावते आढावे एवढीच काय ती उगवत्या अन् उमलत्या पिढीला मागचे काही सांगायची व्यवस्था शिल्लक आहे. मात्र या पिढीसह जन्मलेल्या अन् झर्रकन वाढून बसलेल्या डिजिटली माध्यमांनी इतिहासाची अशी काही विकृत अन् विपर्यस्त विषारी शिकवणी सुरू केली की, प्रस्थापित माध्यमांची अवस्था निराधार, केविलवाणी झालीय...
प्रांतिक प्रश्न आणि संस्थानांच्या विलिनीकरणाच्या दिशेने : या पाचव्या खंडातील पत्रव्यवहार वाचल्यावर राज्यकारभार किती गुंतागुंतीचा असतो, हे लक्षात येते - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7468
१९४७-१९४८मध्ये तर परिस्थिती अधिक बिकट होती आणि त्यामुळे गुंतागुंत अधिक वाढली होती. शिवाय गृहमंत्रीपदावर आणि सरकारात दुसऱ्या क्रमांकास्थानावर असल्यामुळे पटेलांना असंख्य बाबींबाबत निर्णय घ्यावे लागत. शिवाय सत्ताधारी पक्षाचे ते एक वजनदार नेते असल्यामुळेदेखील त्यांना पक्षांशी निगडित बाबीही हाताळाव्या लागत असत. हा पत्रव्यवहार वाचताना या बाबी त्यांनी समर्थपणे हाताळल्या, असेच म्हणावे लागते...
‘वक्फ’चा इतिहास, आधुनिक भारतामधील कायदे, त्यांत होत गेलेले बदल, नवीन कायद्यामधील वादाचे मुद्दे, आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका… - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7469
नवीन बिलामधील तिन्ही वादग्रस्त मुद्दे घटनाबाह्य आहेत, असे अनेक कायदे-पंडित म्हणत आहेत. आता यावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते आहे, यावर सगळ्यांची नजर लागून राहिलेली आहे. या कार्यक्रमात शेवटी आपण हा ‘लॅंड-जिहाद’ आहे का, याचा अंदाज घेऊ. त्यासाठी भारतात सुपीक जमीन किती आणि वक्फ बोर्डांकडे जमीन किती, हे पाहू. भारतात साधारण चाळीस ते पन्नास कोटी एकर सुपीक जमीन आहे, असे कृषिमंत्रालयाचे म्हणणे आहे...
‘हिंदाडी विस्तारवादा’चा आज उदंड झालेला दशानन, हा ह्या सगळ्या पाताळयंत्री आंतरप्रक्रियांचे एक रूप आहे! - सलील वाघ
https://www.aksharnama.com/client/article_detail/7470
जोवर सामाजिक आणि भाषिक सौदार्हाचे वातावरण देशभर, महाराष्ट्रात होते, तोवर त्रिभाषासूत्राचा विचार तितका खुपला नाही, जाचक वाटला नाही. पण आता सत्तेच्या अरेरावीचा जो स्तर, दर्जा आपल्याला दिसतो, त्या खुनशी वातावरणात हा त्रिभाषासूत्राचा विचार प्रचंड अनैतिक, अत्यंत त्याज्य आणि रद्दणीय झालेला आहे. मराठी भाषेच्या मुळावर उठलेला हा हिंदीधार्जिणा विचार अगदी खडबडून जागे होऊन तातडीने झटकून टाकला पाहिजे...
‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ - पोलीस-नक्षल-सरकार-भांडवलदार यात चिरडल्या गेलेल्या सर्वसामान्य आदिवासींचे म्हणणे ठासून सांगणारे, त्यांचा आवाज उजागर करणारे संशोधन - कुसुमताई अलाम
https://www.aksharnama.com/client/article_detail/7471
महाराष्ट्रात अतिसुरक्षित समुदायातील माडिया हा समुदाय या भागात आहे. हा समुदाय नक्षलप्रभावित परिसरात पोलीस-नक्षल संघर्षात होरपळून निघालाच आहे, पण आता खाण संघर्षात पिचला जातोय. त्याचा जीवनसंघर्ष मांडणारे तरुण लेखक-संशोधक अविनाश पोईनकर लिखित ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हे पुस्तक वाचून प्रत्येक लोकशाहीवादी माणूस अस्वस्थ होईल...
पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात राजकीय नेते कसे वागले, पत्रकार कसे वागले, सोशल मीडिया कसा वागला, त्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7472
देशाच्या रक्षणाचे मुद्दे अतिशय कॉम्प्लिकेटेड असतात. जे सरकार प्रश्न हाताळत आहे, त्याला थोडी ‘स्पेस’ द्यायची असते. अशा वेळी थोडा काळ टीका रोखून धरायची असते. कुणीही कसलाही संयम पाळायला तयार नाही. कुणालाच काहीही पडलेलं नाही. कुणीच कुणाला सोडायला तयार नाही. हिंदीमधली जी म्हण यू-ट्यूबवर वापरली जात आहे, ती अगदी खरी आहे : ‘आपदा में अवसर ढूंढना’!...
‘ऐवज’ म्हणजे किमती जिन्नस, जो नेहमी जपून ठेवला जातो. हे पुस्तकही त्याच्या नावाप्रमाणेच बहुमोल ठेवा आहे! - आ. श्री. केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7473
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची जाण आणि तिचे महत्त्व जाणणाऱ्या एका कलाकाराच्या आठवणींचा ठेवा म्हणजे अमोल पालेकर यांचे ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ हे पुस्तक. ‘ऐवज’ म्हणजे किमती जिन्नस, जो नेहमी जपून ठेवला जातो. हे पुस्तकही त्याच्या नावाप्रमाणेच बहुमोल ठेवा आहे. यात लेखकाने त्याच्या लहानपणीच्या आठवणींपासून नाटक-चित्रपट कारकिर्दीपर्यंतचे अनुभव सांगितले आहेत… तेही ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात, मात्र ते कालानुक्रमे नाहीत.
आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे... - अभिजीत केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7474
इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे...
वाचनाने सत्य आणि असत्याचा फरक कळतो. परिणामी धार्मिक उच्छाद मांडणाऱ्या संस्था, संघटनांचे अस्तित्व आपोआप धोक्यात येते! - अमित इंदुरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7475
या लढाईला देशाला वैचारिक गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई किंवा एक महत्त्वपूर्ण आंदोलन म्हणून याकडे बघितले पाहिजे. अर्थात ही लढाई विचारांची असल्यामुळे यात कोणत्याही धारदार शस्त्रांची गरज पडणार नाही. ही लढाई जिंकण्याकरता या देशातील महापुरुषांचे मानवतावादी विचार आपल्याला शस्त्र म्हणून वापरावे लागतील...