Vitthal Kangane Sir
111K subscribers
1.32K photos
47 videos
207 files
300 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन

• झाकीर हुसैन यांना सॅनफ्रेंन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन (Zakir Hussain ) यांची प्राणज्योत मालवली.

• झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. 'साझ' या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे.

• १९८८ मध्ये झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
नव्या वर्षात आर्थिक जनगणना

• तब्बल १२ वर्षांनंतर देशात आर्थिक जनगणना होणार आहे. ती २०२५ मध्ये राष्ट्रीय जनगणनेसोबत केली जाईल. केंद्र सरकारमधील सचिवांच्या समितीने हा निर्णय घेतला आहे.

• २०१९ मध्ये झालेल्या सातव्या आर्थिक जनगणनेच्या अहवालाला अर्ध्याहून अधिक राज्यांनी मान्यता न दिल्याने या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अशा प्रकारे आठवी आर्थिक जनगणना ही जीएसटी युगातील पहिली आर्थिक कसरत असेल. २०१३ मध्ये सहावी आर्थिक जनगणना झाली होती.

• मोदी सरकारची ही पहिलीच आर्थिक जनगणना असेल.

• पहिली आर्थिक जनगणना १९७७ मध्ये झाली. नंतर १९८०, १९९०, १९९८ व २००५ मध्ये झाली होती. २०१३ मध्ये सहावी आर्थिक जनगणना झाली, ज्याचा अहवाल जाहीर झाला आहे.
नुकताच मृत्यू पावलेले झाकीर हुसेन खालीलपैकी कोणत्या वाद्याशी निगडित होते?
Anonymous Quiz
5%
बासरी
8%
संतूर
85%
तबला
3%
ढोलकी
सर्वांनी twitter follow करा
महापारेषण महावितरण यासंदर्भात ट्विटर कॅम्पिंग करायची आहे
‼️ राहिलेल्या जाहिराती..‼️

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहिल्यानगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 

Coming soon.............2025

Be ready🔥
#RRB Railway Ministerial & Isolated Categories Short Notice

Total Post - 1036 🔥

Apply Online : 07 January  to 06 February
🔴गड किल्ल्यांवर मद्यपान केल्यास 1 लाखाचा दंड, 2 वर्ष तुरुंगवास.🚩

बेकायदा वृक्षतोडीसाठी 50 हजारांचा दंड.
💥💥💥💥💥💥💥
महाराष्ट्राच्या प्रशासनातील महिलाराज

सुजाता सैनिक(मुख्य सचिव)
रश्मी शुक्ला (पोलीस महसंचालक)
अश्विनी भिडे (मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव)
‼️ स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ::डॉ. अरुणा ढेरे.

____
संध्याकाळी youtuve la पहा 9 वाजता
अल्पसंख्याक हक्क दिन :

▪️18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
▪️अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला जातो.
▪️संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय किंवा वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांशी संबंधित व्यक्तींच्या हक्कांबाबत घोषणापत्र स्वीकारले होते.
▪️हा दिवस अल्पसंख्याकांना स्वातंत्र्याचा अधिकार आणि समान संधी राखण्यासाठी आणि त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो.
▪️अल्पसंख्याक हे देशातील महत्त्वाचे घटक आणि भागधारक आहेत आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कष्ट मेहनत संयम+विठ्ठल कांगण= यश
विधान परिषद व्हिडिओ पाहा कुठलंही मार्क जाणार नाही
स्पर्धा आहे खूप मोठी निराश तू होऊ नकोस...

निम्मे फिरतील माघारी त्यातला तू एक होऊ नकोस...

एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं फक्त तू हार मानू नकोस कारण...100

हारा वही, जो लढा नही...
पहिले राज्यस्तरीय ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन’

▪️कालावधी : २० ते २२ डिसेंबर
▪️ठिकाण : पुणे
▪️संमेलनाध्यक्ष:- शेखर गायकवाड
▪️स्वागताध्यक्ष :- राजेंद्र भोसले
▪️आयोजन : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या वतीने
▪️स्वरूप :  या संमेलनात आजी-माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन
💥💥💥💥💥💥💥💥💥💥