युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.54K subscribers
466 photos
6 videos
159 files
135 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
दर्जेदार लेख, आकृत्या तसेच माहिती मराठी मध्ये ऊपलब्ध करून देता यावी. जेणे करून त्या गोष्टींचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे.

आपल्याला जर या चॅनलचा ऊपयोग होत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना या चॅनल ची लिंक पाठवा.

धन्यवाद 🤗
लिंक 👇🏾

https://t.me/UPSCin_Marathi
#प्रेरणादायी#Motivational

डॉ. साके भारती 🙌🏾

आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्हात नागुलगुद्दम हे गाव अचानक चर्चेत आले आहे, या चर्चेच्या केंद्रस्थान या गावातील एक मजूर महिला डॉ. साके भारती ह्या आहेत. आपण अचंबित झाला असाल की नावासमोर डॉक्टर असतानाही त्या मजूरी का करत असाव्यात?

साके भारती यांचे नाव चर्चेत येण्यामागे हा मजूर ते डॉक्टर प्रवासच मुख्यतः कारणीभूत आहे. कारण साके भारती यांनी नुकतेच त्याचे पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे, ते देखील 'रसायनशास्त्र' या विषयात. तथाकथित जातीय उतरंडीतील निम्न जातीत जन्मलेल्या, मद्यपी पिता व गरिबीमुळे लहानपणीच शाळेत जाण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे गेलेल्या तसेच अल्पवयातच लग्न झालेल्या साके भारती यांनी या सर्व अडथळ्यांना पार करून शेवटी पीएचडी मिळवली आहे.

साके भारती ह्या भारतातील वंचित-दुर्बल-बहुजन महत्वाकांक्षाच्या प्रतिक आहेत. अत्यंत खडतर प्रवासात त्यांना समाजातील सर्व स्तरातून कुचंबणा सहन करावी लागली, तरी देखील त्यांची समाजाप्रती असलेली करुणा अजिबात कमी झालेली नाहिये. कारण जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याबद्दल काय वाटते? तेव्हा त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती, त्या म्हणतात जर मला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली, तर मी माझ्या मुलीला खूप शिकवून डॉक्टर बनवेल. जेणे करून समाजातील वंचित-गरजू लोकांचा ती उपचार करू शकेल. कारण पैशाअभावी उपचार नाकारला गेल्यामुळे त्यांच्या आजुबाजूला अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

साके भारती यांच्या या प्रवासात त्यांचे पती शिव प्रसाद यांनी देखील खूप महत्त्वपूर्ण साथ दिली आहे. ते स्वतः कमी शिकलेले असले तरी त्यांनी दहावी नंतर आपल्या पत्नीचे शिक्षण चालू राहण्यासाठी नेहमी कष्ट घेतले. त्यांचे हे कर्तुत्व एक चांगला जोडीदार कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

अत्यंत खडतर प्रवासात अविरतपणे प्रयत्न करून स्वतःचे ध्येय साध्य करणार्‍या साके भारती यांचे अभिनंदन तसेच त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला व मेहनतीला सलाम. 🙏🏾🙌🏾

अशाच अधिक माहितीसाठी आमच्याशी टेलिग्रामवर जोडले जा, खालील लिंकवर 👇🏾क्लिक करा

Join 👉 telegram.me/UPSCin_Marathi