The StudyEra
2.22K subscribers
150 photos
9 videos
83 files
136 links
Mpsc Typing Skill Test, High Court Clerk Typing Exam तसेच इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा सबस्क्राईब करा.https://youtube.com/@thestudyera?si=18Na4sWxFIvtVNsp
Download Telegram
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️आजची खास ऑफर : हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
4
124-2025 Gr-C Pre 2025 - Result.pdf
1.4 MB
गट क पूर्व परीक्षा निकाल
➡️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
202605051824209807.pdf
3.4 MB
♦️भरतीप्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा बाबतचा शासन निर्णय दिनांक ०५ मे, २०२६

@TheStudyEra
♦️महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मे २०२६ रोजी निर्गमित केलेल्या या शासन निर्णयाचा (GR) संक्षिप्त सारांश खालीलप्रमाणे आहे:👇👇

♦️मुख्य उद्दिष्ट:
"विकसित महाराष्ट्र २०४७" अंतर्गत "किमान शासन आणि कमाल प्रशासन" सुनिश्चित करण्यासाठी पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि कालबद्ध करणे हे या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

♦️महत्त्वाचे बदल आणि सुधारणा:

🔹MPSC ची व्याप्ती वाढवली: आता गट-अ ते गट-क पर्यंतची सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यकक्षेत आणली आहेत.

🔹सेवाप्रवेश नियमात सुधारणा: एकूण ५५३ संवर्गांचे सेवाप्रवेश नियम सुधारण्यात आले आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्य चाचणी यांसारख्या अटींचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.

🔹नवीन सेवांची निर्मिती: १८ नवीन राजपत्रित सेवा निर्माण करण्यात आल्या असून त्यामध्ये ९३ विविध संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे.

🔹संयुक्त परीक्षांवर भर: विविध विभागांमधील समान कामाच्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा न घेता, 'संयुक्त परीक्षा' घेण्याचे धोरण स्वीकारले आहे.

🔹मुलाखती रद्द: गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क मधील कोणत्याही पदासाठी आता तोंडी परीक्षा किंवा मुलाखती घेतल्या जाणार नाहीत.

🔹मृत संवर्ग (Dead Cadres): आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे संवर्ग आता कालबाह्य झाले आहेत, त्यांना "मृत संवर्ग" घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ कायम राहतील.

🔹पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती: नामनिर्देशन कोट्यातील काही राजपत्रित आणि अराजपत्रित पदे आता थेट भरतीऐवजी अंतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

♦️अंमलबजावणी:

🔸ज्या पदांच्या जाहिराती या शासन निर्णयापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यांना हे नवीन नियम लागू होणार नाहीत.

🔸पोलिस भरती किंवा शिक्षक भरती (पवित्र पोर्टल) यांसारख्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

🔸सर्व विभागांना १५ दिवसांत त्यांचे सेवाप्रवेश नियम पुन्हा प्रकाशित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



@TheStudyEra
3
Forwarded from TypingPracticeHub
recruitbom20260515181818_copy.pdf
19.2 KB
♦️ Revised answer keys of Screening Test held on 26/04/2026 for the post of “Clerk” on the establishment of High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay and it’s Benches at Nagpur and Aurangabad.

@TypingPracticeHub
2🙏2
Forwarded from TypingPracticeHub
"आजचा कंटाळा उद्याचा पश्चात्ताप बनू देऊ नका!" 🛑⚠️

जेव्हा टायपिंगचा सराव करण्यासाठी कीबोर्डसमोर बसण्याचा कंटाळा येतो 🥱, बोटे चालत नाहीत आणि 'उद्या करूया' असा विचार मनात येतो, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा... "मी आज थांबलो, तर माझे स्वप्न पूर्ण होईल का?" 💭

मित्रांनो, दोन प्रकारच्या वेदना आहेत: पहिली 'शिस्तीची वेदना' (Pain of Discipline) आणि दुसरी 'पश्चात्तापाची वेदना' (Pain of Regret). ⚖️

शिस्तीची वेदना तुम्हाला काही महिने त्रास देईल, बोटे आखडतील 🤕, डोळ्यांवर ताण येईल... पण तीच वेदना तुम्हाला सेवेतील 'सन्मानाची खुर्ची' 🏛️ मिळवून देईल. याउलट, जर आज आळस करून वेळ वाया घालवलात, तर अपयशाची आणि पश्चात्तापाची वेदना मात्र आयुष्यभर सलत राहील! 💔

"आज एक दिवस प्रॅक्टिस नाही केली तर काय फरक पडतो?" 🤷‍♂️ हा एकच नकारात्मक विचार तुम्हाला मेरीट लिस्टच्या (Merit List) अनेक रँक खाली खेचण्यासाठी पुरेसा आहे. 📉 ज्या क्षणी तुम्ही विश्रांती घेत आहात किंवा मोबाईलवर वेळ घालवत आहात, बरोबर त्याच क्षणी अनेक विद्यार्थी आपला टायपिंगचा वेग वाढवण्यासाठी घाम गाळत आहे. 🏃‍♂️💻

यशस्वी लोक त्यांच्या 'Mood' (मनःस्थिती) वर नाही, तर त्यांच्या 'Commitment' (ध्येयनिष्ठेवर) चालतात! 🔥

कंटाळा झटकून टाका! एक दीर्घ श्वास घ्या 🧘‍♂️ आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने आणि एकाग्रतेने सरावाला लागा. 💻🚀

तुमची आजची मेहनत उद्याचा तुमचा अंतिम निकाल (Final Selection) ठरवणार आहे! 🏆💯

- थांबू नका, सातत्य टिकवून ठेवा! 🎯

@TypingPracticeHub
6🙏1
🎯 टायपिंगची तयारी करा आता घरबसल्या!🎯

High Court Clerk Typing आणि MPSC Skill Test परीक्षेची परफेक्ट तयारी आता करा 'Typing Practice Hub' सोबत!

आमची खास वैशिष्ट्ये:

🖥️ हुबेहूब परीक्षा इंटरफेस: परीक्षेच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव.

📱 मोबाईलवरही सराव: OTG कीबोर्ड जोडून मोबाईलवर सराव करण्याची सोय.

📑 भरपूर सराव: ५००+ कायदेशीर (Legal) आणि सामान्य पॅसेजेस सरावासाठी उपलब्ध (आणखी पॅसेजची संख्या वाढविण्यात येईल.)

📊 रिझल्ट ॲनालिसिस: तुमची अचूकता आणि चुकांचा रिअल-टाइम रिपोर्ट.

🚫 सॉफ्टवेअरची गरज नाही: कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता थेट ब्राउझरवर सराव करा!

💰आता ₹९९🔥 मध्ये करा १ महिना अमर्याद सराव!
🎁फ्री ट्रायल: पहिले १० पॅसेज सर्वांसाठी मोफत.
🔥Try Before You Buy !

🚀 आजच सुरुवात करा:
🌐AppLink
https://typingpracticehub.com/

📢 Telegram Channel: @TypingPracticeHub

♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची💻 PDF फक्त ₹२९/- मध्ये मिळेल!🔥

💬 संपर्क: @Helpdesktph
3🙏1
Forwarded from TypingPracticeHub
"फक्त उताऱ्यांचा (Passages) सराव करून स्पीड वाढेल का? 'Lessons' चे खरे महत्त्व समजून घ्या!" 🛑🎯

👉अनेक विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की, दररोज केवळ मोठे उतारे (Paragraphs) किंवा कठीण शब्द टाईप केल्यानेच टायपिंगचा वेग वाढतो. परंतु मित्रांनो, जर तुमचा पायाच (Foundation) कच्चा असेल, तर केवळ पॅसेज टाईप करून तुमचा वेग एका विशिष्ट मर्यादेच्या (उदा. ३० किंवा ३५ WPM) पुढे कधीच जाणार नाही! 📉

👉उच्च न्यायालय (High Court) Typing परीक्षांमध्ये अपेक्षित असणारा उच्च वेग आणि १००% अचूकता (Accuracy) साध्य करण्यासाठी पायाभूत 'Lessons' (धडे) अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचे महत्त्व खालीलप्रमाणे समजून घ्या:

♦️१. 'Muscle Memory' (स्नायूंची स्मरणशक्ती) निर्माण करणे: 🧠
जेव्हा तुम्ही विशिष्ट 'Lessons' (उदा. asdf jkl; किंवा qwer uiop) चा वारंवार सराव करता, तेव्हा तुमच्या बोटांना कोणत्या की (Key) साठी कुठे जायचे आहे, याची सवय लागते. डोळे स्क्रीनवर आणि बोटे कीबोर्डवर आपोआप चालणे, ही जादू केवळ 'Lessons' च्या सखोल सरावातूनच शक्य होते.

♦️२. अचूक बोटांचा वापर (Correct Finger Placement): 🖐️⌨️
पॅसेज टाईप करताना आपण अनेकदा घाईघाईत चुकीच्या बोटाने चुकीची की (Key) दाबतो. 'Lessons' मुळे प्रत्येक बोटाला त्याचे निर्धारित काम करण्याची शिस्त (Discipline) लागते. करंगळीपासून ते तर्जनीपर्यंत प्रत्येक बोट योग्य जागी पडले, तरच 'Touch Typing' यशस्वी होते.

♦️३. अचूकता (Accuracy) वाढवणे: 🎯
स्पर्धा परीक्षांमध्ये वेगापेक्षा अचूकतेला सर्वाधिक महत्त्व असते. जर तुमचे 'Lessons' पक्के असतील, तर कठीण स्पेलिंग्ज टाईप करताना बोटे अडखळत नाहीत आणि चुकांचे प्रमाण (Error Rate) लक्षणीयरीत्या कमी होते.

♦️४. 'स्थिरता' (Plateau) दूर करणे: 🚀
जेव्हा तुमचा स्पीड एका जागी अडकल्यासारखा वाटतो, तेव्हा पुन्हा एकदा मूलभूत 'Lessons' कडे परत जाणे हाच एकमेव खात्रीशीर उपाय असतो. तो तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची आणि नव्याने वेग पकडण्याची संधी देतो.

💡 लक्षात ठेवा: उत्तुंग इमारत बांधायची असेल, तर तिचा पाया भक्कम असावा लागतो. 🏢 थेट १० मिनिटांचा उतारा टाईप करण्यापूर्वी, दररोज किमान १५ मिनिटे बेसिक 'Lessons' चा सराव (Warm-up) नक्की करा.
एकदा का बोटांना योग्य 'Lessons' ची शिस्त लागली, की मग तुमचा वेग आणि अचूकता कुणीही रोखू शकणार नाही! 🔥

- थांबू नका, योग्य पद्धतीने सराव करत राहा! 🚀💯🏆

👉Lessons चा अचूक सराव करण्यासाठी आजच भेट द्या: https://typingpracticehub.com


@TypingPracticeHub
5🔥1
♦️महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
file.pdf
17.1 MB
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६

♦️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६
7👌1
Forwarded from TypingPracticeHub
🏛️ हायकोर्ट लिपिक टायपिंग परीक्षा विशेष!

♦️हायकोर्ट लिपिक टायपिंग 💻 परीक्षेच्या पॅटर्ननुसार डिझाइन केलेल्या ५०० दर्जेदार पॅसेजची PDF फक्त ₹२९/- मध्ये! 🔥

वैशिष्ट्ये:
🔹 ५०० सराव उतारे (PDF Format)
🔹 ४००+ शब्द प्रति पॅसेज
🔹 घरबसल्या प्रिंट काढून सराव करण्यासाठी उत्तम
🔹 परीक्षेच्या धर्तीवर आधारित (Legal, History, Science इ.)

टायपिंगचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त सराव साहित्य.

🔥फक्त २९ रुपये!🔥

🎯 तुमच्या यशाची तयारी आजच सुरू करा!

📌PDF मिळवण्यासाठी लगेच संपर्क करा: @HelpDeskTph
2
Group b m P1 2025.pdf
796.3 KB
♦️महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - प्रश्नपत्रिका

♦️ पेपर क्रमांक 1: मराठी व इंग्रजी

♦️परीक्षेचा दिनांक:- 17 मे, 2026

#CombineGroupBMains2025
Group b m P2 2025.pdf
1.4 MB
♦️महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - प्रश्नपत्रिका

♦️ पेपर क्रमांक: 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी

♦️परीक्षेचा दिनांक:- 17 मे, 2026

#CombineGroupBMains2025
@TheStudyEra
3🙏3
Forwarded from TypingPracticeHub
MS Word मध्ये सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ महत्त्वपूर्ण सूचना! 💻🔥

​जे विद्यार्थी Typing Practice Hub Web Application व्यतिरिक्त 'MS Word' मध्ये पॅसेजचा सराव करतात, त्यांच्यासाठी हा सराव नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. परंतु, MS Word मधील काही 'Default Settings' वेळेवर न बदलल्यास, प्रत्यक्ष परीक्षेत त्याचा फटका बसण्याची शक्यता असते.

♦️परीक्षेच्या दृष्टिकोनातून MS Word मध्ये सराव करताना खालील गोष्टींची काळजी घेऊ शकता: 👇

➡️​१. 'AutoCorrect' आणि 'Spell Check' बंद ठेवावे: 🚫
MS Word मध्ये एखादे स्पेलिंग चुकल्यास ते आपोआप 'Correct' (Capital) होते किंवा चुकीच्या शब्दाखाली 'लाल रेष' (Red underline) येते. प्रत्यक्ष परीक्षेत अशी कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे, सराव करताना 'AutoCorrect' आणि 'Check spelling as you type' हे पर्याय पूर्णपणे बंद ठेवावेत, जेणेकरून आपल्या खऱ्या चुका निदर्शनास येतील.

➡️२. 'Backspace' & 'Arrow Keys' च्या वापरावर नियंत्रण असावे: 🔙
MS Word मध्ये 'Backspace' & 'Arrow Keys' कितीही वेळा वापरता येत असला तरी मा. उच्च न्यायालयाच्या Typing परीक्षेमध्ये वापरता येऊ येऊ शकणार नाही. त्यामुळे सराव करताना स्वतःला अशी सवय लावू शकता की, एकदा शब्द टाईप करून पुढे गेल्यावर तो पुन्हा दुरुस्त करण्याचे टाळावे.

➡️३. नवीन परिच्छेदासाठी (Paragraph) 'Tab' चा वापर करावा: ⌨️
नवीन परिच्छेद सुरू करताना जागा सोडण्यासाठी अनेकदा 'Spacebar' चा वारंवार वापर केला जातो, जे अत्यंत वेळखाऊ आहे. परिच्छेदाच्या सुरुवातीला इंडेंट (Indent) देण्यासाठी नेहमी 'Tab' Key चा वापर करू शकता. ही एक योग्य आणि प्रशासकीय पद्धत मानली जाते.

➡️४. 'Word Count' कडे वारंवार बघणे टाळावे: 👁️📉
MS Word मध्ये खाली 'Status Bar' वर दिसणाऱ्या 'Word Count' कडे वारंवार पाहिल्याने एकाग्रता (Focus) भंग पावते आणि वेगावर परिणाम होऊ शकतो. यासाठी मोबाईलमध्ये किंवा घड्याळात १० मिनिटांचा टायमर लावून सराव करू शकता आणि वेळ संपेपर्यंत स्क्रीनच्या खालील बाजूस पाहणे टाळावे.

➡️५. डोळ्यांच्या सोयीसाठी 'Page Settings' योग्य असावी: 📄
सराव करताना शक्यतो 'Times New Roman' किंवा 'Arial' (प्राधान्य Arial font ला द्यावे) फॉन्ट आणि १३ ते १५ ची 'Font Size' वापरू शकता. तसेच, ओळींमधील अंतर (Line Spacing) १.४-१.५ ठेवू शकता.
​━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 स्मार्ट तयारीसाठी एक पाऊल पुढे!🔥
MS Word मधील सराव फायदेशीर आहेच, पण प्रत्यक्ष परीक्षेसारखा हुबेहूब अनुभव (Live Timer, WPM/Accuracy Calculation आणि Exam Interface) हवा असल्यास, आपण आजच https://typingpracticehub.com वर आपला सराव सुरू करू शकता! 🚀

​येथे आपल्याला Legal Passages आणि मा. हायकोर्टाच्या पॅटर्ननुसार डिझाईन केलेला डॅशबोर्ड उपलब्ध होईल. 🏛️💻

TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🏆💯
​━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@TypingPracticeHub
6🙏1
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏
♦️ज्या विद्यार्थ्यांना High Court Clerk परीक्षेसाठी आपला टायपिंग स्पीड आणि अचूकता (Accuracy) वाढवायची आहे, त्यांच्यासाठी आपली ही सिरीज अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
👉ही सिरीज सर्वांसाठी पूर्णपणे मोफत (Free)🔥सुरू करण्यात आलेली आहे.🔥🔥

♦️आपल्या 'Special Typing Mastery Series' मध्ये तुम्हाला नियमितपणे मिळते:
Typing Tip of the Day
Legal Words Challenge
Daily Practice Paragraph
Interview Tips & QnA (आता मुलाखतीचे मार्गदर्शनही!)

आतापर्यंत दिलेल्या 'Special Typing Mastery Series' च्या सर्व टिप्सची एकदा उजळणी करा. हायकोर्टाच्या नियमांनुसार अचूकतेला (Accuracy) खूप महत्त्व असते, त्यामुळे Legal Words आणि Paragraph टाईप करून चुका टाळण्याचा सराव करा.

👇 आतापर्यंतच्या सर्व टायपिंग टिप्सच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.👇


1️⃣ सध्या गतीपेक्षा अचूकतेला महत्त्व द्या
https://t.me/TypingPracticeHub/59

2️⃣ कीबोर्डकडे बघण्याची सवय आजच सोडा! https://t.me/TypingPracticeHub/62

3️⃣ मोठे स्पेलिंग बघून घाबरू नका! https://t.me/TypingPracticeHub/65

4️⃣ Shift Key वापरण्याची योग्य पद्धत! https://t.me/TypingPracticeHub/70

5⃣ तुमचा स्पीड तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतो
https://t.me/TypingPracticeHub/76

6⃣ कोर्टाच्या उताऱ्यांमधील खरा अडथळा - विरामचिन्हे
https://t.me/TypingPracticeHub/80

7⃣ Number Row ची भीती घालवा! https://t.me/TypingPracticeHub/85

8⃣ खाली न बघता पुन्हा Home Row वर कसे यावे? https://t.me/TypingPracticeHub/89

9⃣ सुरुवातीचे २०-३० सेकंद ठरवतील तुमचा स्पीड! https://t.me/TypingPracticeHub/96

🔟 लॅपटॉपच्या कीबोर्डवर सराव करणे धोक्याचे ठरू शकते
https://t.me/TypingPracticeHub/104

1️⃣1️⃣ कीबोर्डच्या आवाजाची सवय करा! https://t.me/TypingPracticeHub/128

1️⃣2️⃣ टायपिंग आणि नखांची लांबी! https://t.me/TypingPracticeHub/144

1⃣3⃣ स्पेसबारसाठी कोणता अंगठा वापरावा?
https://t.me/TypingPracticeHub/153

1⃣4⃣ एक चूक झाली तर पुढचे ३-४ शब्द वाचवा! https://t.me/TypingPracticeHub/168

1⃣5⃣ व्यक्ती आणि ठिकाणांची नावे टाईप करताना वेग कमी करा!
https://t.me/TypingPracticeHub/187

1⃣6⃣ वारंवार येणारे शब्दगट (Phrases) पाठ करा!
https://t.me/TypingPracticeHub/195

1️⃣7️⃣ डोळ्यांची काळजी आणि स्क्रीनची ब्राइटनेस!https://t.me/TypingPracticeHub/234

1️⃣8️⃣ शेवटच्या एका मिनिटात स्पीड वाढवू नका!
https://t.me/TypingPracticeHub/244

1️⃣9️⃣ फक्त टेस्ट देऊ नका, रिझल्टचे विश्लेषण करा!
https://t.me/TypingPracticeHub/252

2️⃣0️⃣ सलग सरावापेक्षा 'विश्रांतीसह सराव' (Short Breaks) अधिक फायदेशीर!
https://t.me/TypingPracticeHub/263

2️⃣1️⃣ रोमन अंकांची (Roman Numerals) अचूक नोंदणी!
https://t.me/TypingPracticeHub/271

2️⃣2️⃣ तारखांचे विविध स्वरूप (Date Formats) अचूक टंकलिखित करणे!
https://t.me/TypingPracticeHub/275

2️⃣3️⃣ लघुरूपे (Abbreviations/Acronyms) आणि पूर्णविरामांचा अचूक सराव!
https://t.me/TypingPracticeHub/281

2️⃣4️⃣ रक्कमेची आकडेवारी (Monetary Values) आणि चिन्हांची अचूक टायपिंग!
https://t.me/TypingPracticeHub/286

2️⃣5️⃣ 'Apostrophe' ( ' ) आणि 'अवतरण चिन्हे' (" ") यांचा अचूक सराव!
https://t.me/TypingPracticeHub/291

2️⃣6️⃣ संपूर्ण शब्दांसाठी 'Caps Lock' चा प्रभावी आणि अचूक वापर (All Caps Formatting)!
https://t.me/TypingPracticeHub/297

2️⃣7️⃣ '-able' आणि '-ible' या प्रत्ययांनी (Suffixes) शेवट होणाऱ्या फसव्या कायदेशीर शब्दांचा अचूक सराव!
https://t.me/TypingPracticeHub/306

2️⃣8️⃣'विशेष चिन्हे' (Special Symbols - &, %, @) आणि 'Shift' की चा अचूक समन्वय!
https://t.me/TypingPracticeHub/313


@TypingPracticeHub
3🙏1
Forwarded from The StudyEra
♦️High court Clerk Typing Exam ची तयारी करणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे निर्णय घेऊ शकतात.... ✔️

➡️50-60 : अभ्यास करा सोबत टायपिंग प्रॅक्टिस करा.

➡️60-70 : टायपिंग प्रॅक्टिस करा सोबत थोडा थोडा पुढील परीक्षेचा अभ्यास करा.

➡️70+ : जोरात टायपिंग प्रॅक्टिस करा......

➡️80+ : नुसत टायपिंग एके टायपिंग.

♦️टायपिंग ची परीक्षा कधी होईल ? या चर्चेत पडण्यापेक्षा तुम्ही टायपिंग परिक्षेकरीता पूर्णपणे तयार आहात काय हा प्रश्न स्वतःला विचारा.🤔

@TheStudyEra
💯1
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

सामान्य अध्ययन (GS) पेपर
2
Forwarded from TypingPracticeHub
"तुमचा टायपिंगचा वेग (WPM) एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबला आहे का?" 📈🚧

👉सराव करत असताना अनेक विद्यार्थ्यांचा असा अनुभव असू शकतो की, सुरुवातीला वेग चांगला वाढतो, पण एका विशिष्ट टप्प्यावर (उदा. ३० किंवा ३५ WPM) आल्यावर तो वेग तिथेच स्थिर होतो. त्यानंतर कितीही सराव केला तरी त्यात लक्षणीय वाढ होत नाही.

👉मित्रांनो, हा टप्पा येणे अगदी नैसर्गिक मानले जाते. जेव्हा आपला वेग एकाच ठिकाणी अडकतो, तेव्हा निराश होण्याऐवजी आपण आपल्या सरावाच्या पद्धतीत खालील काही महत्त्वाचे बदल करू शकता: 👇

♦️१. वारंवार होणाऱ्या चुका ओळखणे (Identify Repeated Mistakes): 🔍
➡️वेग न वाढण्याचे एक मुख्य कारण हे असू शकते की, आपण काही विशिष्ट शब्दांमध्ये किंवा कठीण 'Keys' वर वारंवार त्याच चुका करत असतो. या चुका शोधून काढून त्यावर जाणीवपूर्वक काम करणे फायदेशीर ठरू शकते.

♦️२. वेगापेक्षा 'अचूकतेवर' (Accuracy) पुन्हा लक्ष केंद्रित करणे: 🎯
➡️जेव्हा वेग एका जागी थांबतो, तेव्हा तो बळजबरीने वाढवण्याचा प्रयत्न केल्यास चुकांचे प्रमाण वाढू शकते. त्यापेक्षा, पुढील काही दिवस वेगाकडे थोडे दुर्लक्ष करून केवळ १००% अचूकतेने टाईप करण्याचा सराव करू शकता. चुका कमी झाल्या की वेग आपोआप पुन्हा वाढू लागतो.

♦️३. कठीण शब्दांवर विशेष लक्ष देणे (Focus on Legal Words): 🧠
➡️साधे शब्द आपण वेगाने टाईप करतो, पण मोठे 'Legal Words' आले की बोटे थांबतात आणि लय (Rhythm) बिघडतो. त्यामुळे जे न्यायालयीन शब्द कठीण वाटतात, त्यांचा जाणीवपूर्वक आणि संथ गतीने सराव केल्यास बोटांची 'Muscle Memory' अधिक मजबूत होऊ शकते.

👉मनातील कोणतेही दडपण बाजूला ठेवून, एक दीर्घ श्वास घेऊ शकता 🧘‍♂️🌬️ आणि एका नव्या धोरणासह आजच्या सरावाला सुरुवात करू शकता. सातत्य ठेवल्यास हा तात्पुरता अडथळा पार करून आपला वेग नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल! 💻🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 आपल्या चुकांचे अचूक विश्लेषण करून वेग वाढवण्यासाठी:
आपल्याला नेमक्या कोणत्या शब्दांत अडचणी येत आहेत हे सविस्तर पाहण्यासाठी आणि हायकोर्टाच्या अधिकृत पॅटर्ननुसार सराव करण्यासाठी आजच आपण आपला डॅशबोर्ड तपासून पाहू शकता.🔥
https://typingpracticehub.com

TypingPracticeHub - रोजचा सराव, १००% खात्रीशीर यश! 🚀💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

@TypingPracticeHub
4
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#