Sahyadri MPSC
6.57K subscribers
4.29K photos
44 videos
1.19K files
1.45K links
Mpsc/Upsc preparation

Quality Enrichment Material on Daily basis.
-------------------------------------
Contact Admin
@Exambook53


अनुभव
राज्यसेवा मुख्य 2022 2024
3 PSI मुख्य
2 STI मुख्य
Excise SI मुख्य
MA Pol. Science (SET NET)
Download Telegram
♦️ वनरक्षक #FAKE जाहिरात बाबतीत..
1
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

- कवी नारायण सुर्वे
22
Forwarded from Sahyadri MPSC
📘 मुंबई उच्च न्यायालय भरती

कनिष्ठ लिपिक – Test Series 2026
Exam Book Academy, पुणे

या टेस्ट सिरीजमध्ये परीक्षेचा अचूक अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच आणि सखोल विश्लेषण यांचा समावेश आहे.

🔹 Test Series ची वैशिष्ट्ये :

✔️ एकूण 10 Full Length Tests

✔️ MCQ Pattern वर आधारित प्रश्न

✔️ Previous Year Question Paper आधारित प्रश्नांची रचना

✔️ प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचे सविस्तर विश्लेषण

✔️ स्पष्टीकरणासह PDF उपलब्ध

✔️ PDF ची प्रिंट काढून सोडवण्याची सुविधा

✔️ Personal Mentorship

👉 ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

📞 संपर्क : 9561392012 / 9420800236


👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक

https://dvfgcy.on-app.in/app/oc/787025/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
2
आशाताई' -दि लास्ट एम्परर - राज ठाकरे

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.

लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.

तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच, ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.

'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.

असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.

मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.

'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.

व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.

जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.

मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील, ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !

जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !

आशाताईंना विनम्र श्रद्धांजली.

राज ठाकरे
6
♦️MPSC च्या जाहीरातीनंतर नऊ महिन्यांत निकाल !

👉भरती प्रक्रियेला वेग देण्यावर आयोगाचा भर.

👉आयोगाकडून होणाऱ्या भरती प्रक्रियेला गती देण्यावर भर आहे. रखडलेल्या काही परीक्षा, निकाल आणि मुलाखती वेळेत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

-महेंद्र हरपाळकर, सचिव, MPSC
👍7
MPSC-Grorp-B-2025-Arthsahay-Yojanecha-Tapshil.pdf
1.2 MB
♦️संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025 - महाज्योती अर्थसहाय्य योजना
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होणाऱ्या संवर्गांची संख्या वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे.

👉यापूर्वी 53 संवर्गांची भरती आयोगामार्फत व्हायची.

👉सरकारने अतिरिक्त 100 संवर्गांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे 153 संवर्गांची भरती होईल.

#MPSC
6
Forwarded from Sahyadri MPSC
📘 मुंबई उच्च न्यायालय भरती

कनिष्ठ लिपिक – Test Series 2026
Exam Book Academy, पुणे

या टेस्ट सिरीजमध्ये परीक्षेचा अचूक अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच आणि सखोल विश्लेषण यांचा समावेश आहे.

🔹 Test Series ची वैशिष्ट्ये :

✔️ एकूण 10 Full Length Tests

✔️ MCQ Pattern वर आधारित प्रश्न

✔️ Previous Year Question Paper आधारित प्रश्नांची रचना

✔️ प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचे सविस्तर विश्लेषण

✔️ स्पष्टीकरणासह PDF उपलब्ध

✔️ PDF ची प्रिंट काढून सोडवण्याची सुविधा

✔️ Personal Mentorship

👉 ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

📞 संपर्क : 9561392012 / 9420800236


👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक

https://dvfgcy.on-app.in/app/oc/787025/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
1
♦️सरकारी पदभरतीत सुलभता!

#MPSC
2
♦️शासकीय पदभरतीत मोठे बदल..
लिंक आज सुरू होणार आहे.... जे आधीच कर सहायक पदी निवडले गेले आहेत त्या लोकांनी
NO PREFERENCE सिलेक्ट करणे
Forwarded from MPSC
012_2025_State_Services_Pre_Exam_2025_Electrical_Engg_Services_Result.pdf
66.6 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - विद्युत अभियांत्रिकी सेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
Forwarded from Sahyadri MPSC
📘 मुंबई उच्च न्यायालय भरती

कनिष्ठ लिपिक – Test Series 2026
Exam Book Academy, पुणे

या टेस्ट सिरीजमध्ये परीक्षेचा अचूक अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच आणि सखोल विश्लेषण यांचा समावेश आहे.

🔹 Test Series ची वैशिष्ट्ये :

✔️ एकूण 10 Full Length Tests

✔️ MCQ Pattern वर आधारित प्रश्न

✔️ Previous Year Question Paper आधारित प्रश्नांची रचना

✔️ प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचे सविस्तर विश्लेषण

✔️ स्पष्टीकरणासह PDF उपलब्ध

✔️ PDF ची प्रिंट काढून सोडवण्याची सुविधा

✔️ Personal Mentorship

👉 ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

📞 संपर्क : 9561392012 / 9420800236


👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक

https://dvfgcy.on-app.in/app/oc/787025/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
THE POWER OF CONSISTENCY🔥🔥
6
♦️ MPSC उमेदवारसाठी 'निपुण सेतू'.
5_6271298249601065602.pdf
88.9 KB
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
1
5_6271298249601065606.pdf
32 KB
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
♦️वरील सूचना राज्यसेवा मेन्स 2025 पेपर सोडवत असताना लक्षात असू द्यात..

👉प्रश्नांचे उपप्रश्न एका मागोमाग सलग सोडवा
👉Random सोडवू नका
👉प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू करा
👉रिकाम्या जागा काट मारा