MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🔹डॉक्टरही थकतात...

सतत रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी पळणारे डॉक्टरही थकत असतील..., याचा आपण कधी विचार केला का? 'क्युरिअस' नामक एका मेडिकल जर्नलमध्ये याविषयीचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाच्या अभ्यासासाठी साधारण २०१२ पासून सर्वेक्षण सुरू होते. रुग्ण आणि देशाची आरोग्य सेवा ही पूर्णतः डॉक्टरांच्या उत्तम कामगिरीवर अवलंबून असल्याने 'डॉक्टरांचे आरोग्य' ही खरेतर एक सामाजिक समस्या आहे. या समस्येकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठीच सर्वेक्षणातून पुढे आलेल्या अहवालातील महत्त्वपूर्ण बाबींचा हा इन्फोग्राफ....
जॉईन करा @MPSCscience
जॉईन करा @MPSCscience
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
🔹जीमेलवरील घातक हल्ल्यापासून सावधान!

हॅकर्स आपल्या जीमेल अकाउंटमध्ये घुसखोरी करण्यासाठी अतिशय शिताफीने सापळा रचतात. आपण कसे नकळत आणि अगदी सहजपणे त्या सापळ्यात अडकतो, हे आपल्यालाही कळत नाही. हॅकर्संच्या अशा घातक हल्ल्यांपासून आपल्या जीमेल अकाउंटला कसे वाचवायचे आणि हा हल्ला ते नेमका कसा करतात, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा इन्फोग्राफ...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अंतराळातील तंत्रज्ञानच्या आधारे रस्त्यावर धावणार इलेक्ट्रॉनिक वाहने

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे एका प्रकल्पावर काम करत आहेत. या प्रकल्पामुळे अंतराळात वापरली जाणारे तंत्रज्ञान जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये वापरले जाऊ शकते. या प्रकल्पांतर्गत एका गाडीवर हा प्रयोगदेखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

इस्रो आणि एआरएआय मिळून लिथियम ऑयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहेत. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून इस्रो आणि एआरएआय ही माहिती दिली आहे. जर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती होऊ शकते. रस्ते आणि राज्यमार्ग सचिव संजय मित्रा यांना या तंत्रज्ञानावर चालणारे एक मॉडेल दाखवण्यात आल्याची माहिती इस्रो आणि एआरएआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरल्यास तो मैलाचा दगड ठरेल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

इस्रो आणि एआरएआयने ज्या गाडीमध्ये अंतराळातील तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग केला, त्या गाडीमध्ये ४८ वोल्ट आणि ५० ऍम्पियरची बॅटरी लावण्यात आली होती. प्रयोगासाठी वापरण्यात आलेली गाडी २ तासांच्या चार्जिंगनंतर ९० किलोमीटर चालू शकते. ही गाडी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावू शकते.
https://t.me/mpscscience/535
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
🔹आधार पे अॅपद्वारे असे करा पेमेंट...

Join @MPSCScience

केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातील गरीब आणि अशिक्षित लोकांमध्येही डिजिटल पेमेंट लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकारने उचललेले पाऊल म्हणजे 'आधार पे अॅप'! या अॅपद्वारे केवळ तुमच्या फिंगरप्रिंटच्या आधारे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. चला तर पाहुयात या इन्फोग्राफिक्समधून, कसे करता येतील पेमेंट्स आधार पे अॅपच्या माध्यमातून...
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
रक्ताच्या कर्करोगाचे प्रकार

सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा सहावा क्रमांक आहे. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा सहावा क्रमांक आहे. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायेलोमा. ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग आहे. त्यानंतर लिम्फोमा आणि मायेलोमाचे रुग्ण आढळतात. दरवर्षी देशभरात ल्युकेमियाचे ३५,००० नवे रुग्ण, लिम्फोमाचे ३२,००० नवे रुग्ण तर मायेलोमाचे ७,००० नवे रुग्ण आढळतात आणि रक्ताच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांना रक्ताच्या कर्करोगाविषयी जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे.

रक्ताच्या कर्करोगामुळे रक्तपेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. याची सुरुवात बोन मॅरोमध्ये होते, जिथे रक्ताची निर्मिती केली जाते. बोन मॅरोमधील स्टेम सेल्स परिपक्व होऊन लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्समध्ये रुपांतरीत होतात. रक्ताच्या बहुतेक कर्करोगांमध्ये रक्तेपेशींच्या विकासाच्या प्रक्रियेत असाधारण प्रकारच्या रक्तपेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे अडथळा निर्माण होतो. या कर्करोगाच्या पेशी सामान्य कार्य करणाऱ्या लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणं, जंतूसंसर्गाला प्रतिकार करणं किंवा गंभीर प्रकारचा रक्तस्त्राव थांबवणं यासारख्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

कोणतंही कारण नसताना कमी झालेलं वजन, थकवा, अशक्तपणा जाणवणं किंवा धाप लागणं, चटकन जखम होणं किंवा रक्तस्त्राव होणं, लसिका गाठींचा आकार वाढणं, पोटात अस्वस्थ वाटणं, वारंवार किंवा पुन्हा-पुन्हा संसर्ग होणं, रात्री ताप येणं/ घाम येणं, हाडांमध्ये/सांध्यांमध्ये वेदना होणं, त्वचेला कंड सुटणं आणि हाडांमध्ये वेदना (बरगड्या, पाठ) इत्यादी रक्ताच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. कर्करोगाच्या प्रकारानुसार ही लक्षणं बदलू शकतात.
🐝 @BeePublication