आयफोनचा दहावा वाढदिवस!
आयफोन यंदा दहा वर्षांचा झाला आहे. आयफोनविषयी १० खास गोष्टी सांगणारा हा इन्फोग्राफ....
@MPSCScience

#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पडून डायनॉसॉर्सचा मृत्यू
डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला
https://t.me/mpscscience/519
लघुग्रहाच्या आघातानंतर पृथ्वी थंड होत गेली व त्यामुळे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनॉसॉर्स नष्ट झाले असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे.
डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला व नंतर पृथ्वीवर माणसांचे साम्राज्य आले. जर्मनीतील पोस्टडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रीसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी लघुग्रह आघाताच्या वेळी सल्फ्युरिक आम्लाचे जे थेंब पडले होते तशा थेंबांची पुन्हा निर्मिती केली. त्या वेळी सूर्यप्रकाश झाकोळला होता व त्याचा पृथ्वीवर विपरीत परिणाम झाला. वनस्पती मेल्या. अन्नाच्या जाळय़ातून मृत्यूचे तांडव झाले व मोठय़ा प्रमाणात आघातात धूळ निर्माण झाली. संगणकीय सादृश्यीकरणात असे दिसून आले, की सल्फ्युरिक आम्लाचे थेंब पडल्यानंतर पृथ्वी कमालीची थंड पडली त्यामुळे डायनॉसॉर्सचा मृत्यू झाला.
महासागरांचे मिश्रण झाल्यानेही पृथ्वी थंड झाली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सागरी जीव नष्ट झाले. लघुग्रहाच्या आघातानंतर मेक्सिकोत चिक्सलब हे विवर बनले होते, त्यामुळे पृथ्वीचा इतिहास बदलला असे ज्युलिया ब्रगर यांनी म्हटले आहे. क्रॅटॅशियस काळाच्या अखेरीस मोठय़ा प्रमाणावर बदल झाले होते.
वैज्ञानिकांनी प्रथमच संगणकीय सादृश्यीकरणाचा वापर करून हवामान प्रारूप वातावरण, महासागर व सागरी बर्फास लावले आहे. त्या वेळी सल्फर असलेले वायू आघातानंतर तयार झाले होते व त्यामुळे पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश बंद झाला. परिणामी, तापमान २७ अंशावरून पाच अंशापर्यंत खाली आले व थंडीमुळे खूप बदल झाले. जागतिक वार्षिक पृष्ठीय हवा तापमान २६ अंशांनी घसरले होते व त्यामुळे तीन वर्षे तापमान गोठणबिंदूच्या खाली होते. सल्फेट एरोसेलमुळे थंड वातावरण बनले होते, असे जॉर्ज फेलनर यांनी म्हटले आहे. जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

🔹भाग उपग्रह सोडून पृथ्वीवर परत
स्पेस एक्स कंपनीकडू यशस्वी प्रक्षेपण
https://t.me/mpscscience/521
स्पेस एक्स कंपनीने त्यांचा फाल्कन ९ अग्निबाण उडवला. नंतर त्याचा पहिल्या टप्प्याचा भाग पृथ्वीवर परतला, त्याचा फेरवापर करता येतो. त्यामुळे अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह सोडण्याचा खर्च कमी होत असतो. सप्टेंबरमध्ये या कंपनीच्या अग्निबाणाचा स्फोट झाला होता त्यानंतरचे हे पहिलेच यशस्वी उड्डाण आहे. स्पेसएक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, पांढऱ्या रंगाचा लांबलचक अग्निबाण स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.५४ वाजता अवकाशात झेपावला व त्याने इरिडियम या मोबाईल व डाटा कम्युनिकेशन कंपनीचे दहा उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले. फाल्कन ९ अग्निबाण अवकाशात झेपावल्यानंतर त्याचे दोन भाग वेगळे झाले. उपग्रह अवकाशातील कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचा लांबलचक भाग पृथ्वीवर परत आला. त्यानंतर स्पेस एक्सच्या कॅलिफोर्नियातील प्रक्षेपण नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. त्याचे व्हिडिओ चित्रणही असून त्यात या अग्निबाणाचा लांबलचक भाग प्रशांत महासागरातील एका सागरी मंचावर सरळ उतरताना दिसत आहे. स्पेस एक्स कंपनीने आतापर्यंत उपग्रह सोडून झाल्यानंतर अग्निबाण जमीन व पाण्यात यशस्वीपणे उतरवले आहेत. त्यांचा फेरवापर करता येत असल्याने खर्च वाचतो. येत्या काही महिन्यांत स्पेसएक्स कंपनी इरिडियमचे ८१ उपग्रह अवकाशात पृथ्वी निकटच्या कक्षेत सोडणार आहे. सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या अग्निबाणाचा स्फोट होऊन २० कोटी डॉलर्सचा उपग्रह नष्ट झाला होता. हा उपग्रह फेसबुकची सेवा आफ्रिकेत इंटरनेट मार्फत पुरवण्यासाठी सोडला जात होता. ड्रॅगन कार्गो शिप अवकाश स्थानकात मालसामान घेऊन जात असताना जून २०१५ मध्येही एक स्फोट झाला होता.

🔹तंत्रज्ञानात अव्वल तरीही पर्यावरण स्नेही!
जगातील सर्वात जास्त पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान कंपन्या त्या आहेत, ज्यांच्या वीज वापरण्याच्या क्षमतेतील सर्वोच्च टक्केवारी ही अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्यूएबल एनर्जी आहे. जगभरात तंत्रज्ञानात अव्वल तरीही पर्यावरण स्नेही अशा या कंपन्या कोणत्या ते पाहा, या इन्फोग्राफमधून...

🔹डॉक्टरही थकतात...
सतत रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी पळणारे डॉक्टरही थकत असतील..., याचा आपण कधी विचार केला का? 'क्युरिअस' नामक एका मेडिकल जर्नलमध्ये याविषयीचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाच्या अभ्यासासाठी साधारण २०१२ पासून सर्वेक्षण सुरू होते. रुग्ण आणि देशाची आरोग्य सेवा ही पूर्णतः डॉक्टरांच्या उत्तम कामगिरीवर अवलंबून असल्याने 'डॉक्टरांचे आरोग्य' ही खरेतर एक सामाजिक समस्या आहे. या समस्येकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठीच सर्वेक्षणातून पुढे आलेल्या अहवालातील महत्त्वपूर्ण बाबींचा हा इन्फोग्राफ....

🔹जीमेलवरील घातक हल्ल्यापासून सावधान!
हॅकर्स आपल्या जीमेल अकाउंटमध्ये घुसखोरी करण्यासाठी अतिशय शिताफीने सापळा रचतात. आपण कसे नकळत आणि अगदी सहजपणे त्या सापळ्यात अडकतो, हे आपल्यालाही कळत नाही. हॅकर्संच्या अशा घातक हल्ल्यांपासून आपल्या जीमेल अकाउंटला कसे वाचवायचे आणि हा हल्ला ते नेमका कसा करतात, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा इन्फोग्राफ...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔹अंतराळातील तंत्रज्ञानच्या आधारे रस्त्यावर धावणार इलेक्ट्रॉनिक वाहने
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे एका प्रकल्पावर काम करत आहेत. या प्रकल्पामुळे अंतराळात वापरली जाणारे तंत्रज्ञान जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये वापरले जाऊ शकते. या प्रकल्पांतर्गत एका गाडीवर हा प्रयोगदेखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
इस्रो आणि एआरएआय मिळून लिथियम ऑयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहेत. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून इस्रो आणि एआरएआय ही माहिती दिली आहे. जर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती होऊ शकते. रस्ते आणि राज्यमार्ग सचिव संजय मित्रा यांना या तंत्रज्ञानावर चालणारे एक मॉडेल दाखवण्यात आल्याची माहिती इस्रो आणि एआरएआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञान रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरल्यास तो मैलाचा दगड ठरेल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इस्रो आणि एआरएआयने ज्या गाडीमध्ये अंतराळातील तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग केला, त्या गाडीमध्ये ४८ वोल्ट आणि ५० ऍम्पियरची बॅटरी लावण्यात आली होती. प्रयोगासाठी वापरण्यात आलेली गाडी २ तासांच्या चार्जिंगनंतर ९० किलोमीटर चालू शकते. ही गाडी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावू शकते.
https://t.me/mpscscience/535