🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
14 मे शंभूछत्रपती जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐
छत्रपती शिवरायांनी आपल्या तालमीतच संभाजी महाराजांना तयार केलेले होते. त्यामुळे बालपणापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज
हे तळपत्या सूर्यासारखे प्रकाशमान झाले.
त्यांच्या बालपणीच्या कर्तृत्वाचे काही किस्से👇
🗡आबे कारे (Abbe Carre ) म्हणून एक फेंच प्रवासी होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी हा फिरत फिरत गुजरातवरून गोवा आणि तिथून महाराष्ट्रात आला होता.
चौल - मुंबईच्या कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यांतील कुंडलीक नदीच्या मुखाजवळील एक बंदर. आबे कारे हा चौल येथे आल्यावर त्याला तिथल्या मराठा सुभेदाराने संभाजी महाराजांच्या विषयी काही माहिती सांगितली होती.
"लहानपणापासूनच युद्धकलेचे युवराज संभाजी राजांना शिक्षण दिलेले असले तरी १६७२ सालापासून संभाजीराजे आघाडीवर जाऊ लागलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज युवराज संभाजीराजांना एखाद्या मोठ्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगत असत."
आबे कारे त्याच्या आत्मचरित्रात लिहितो 
कि , " छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारच्या सर्व शत्रूंवर एकाच वेळी हल्ला चढविलेला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी दहा हजार शूर अश्या सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ( म्हणजे संभाजी राजांच्या ) ताब्यात दिला होता. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूरवीरही आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून युवराज संभाजीराजेही वडिलांसारखेच तरबेज झालेले आहेत. चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतके हे युवराज संभाजीराजे तयार झालेले आहेत.

युवराज संभाजीराजे मजबूत बांध्याचे असून अति स्वरुपवान आहेत. त्यांच्या भारदस्त रुपामुळे सैनिक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हा मोठाच गुण त्यांच्यात आहे. सैनिकांचे ह्या युवराजावर खूप प्रेम आहे. आणि ते त्यांना शिवाजी महाराजांसारखाच मान देतात. 
फरक इतकाच कि ह्या सैनिकांना युवराज संभाजीराजांच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे सारे श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस देतात.
कोणीही कर्तबगारी दाखविली तर युवराज संभाजीराजे त्याला बक्षीस दिल्यावाचून राहत नाही."
आबे कारे पुढे म्हणतो, " युवराज संभाजीराजेंना खंबायत आणि गुजरात प्रांतांवरील राजांवर स्वारी करण्याचा हुकूम देण्यात आला. आपल्या वडिलांनी आपल्याला इतकी महत्वाची व मोठी कामगिरी सांगितलेली पाहून युवराज
संभाजीराजांना मोठी धन्यता वाटली. आणि मोठ्या उत्साहाने कार्यप्रेरित होऊन ते आपल्या सैन्यानिशी विशेष पराक्रम करून दाखविण्यास उद्युक्त झाले. ज्यांच्यावर युवराज संभाजीराजे स्वारी करणार ते त्यांच्या केवळ दराऱ्यानेच पळून गेले.
त्यामुळे युवराज संभाजीराजांना यश आणि कीर्ती मिळविणे सोपे गेले. त्यांनी थोड्याच अवधीत बराचसा मुलुख कबजात आणला. या बालराजाची सर्वत्र इतकी स्तुती केली जाते कि त्यांच्या वडिलानांही त्यांच्या ह्या युवराजाचा हेवा वाटावा."
जॉन फ्रायर ह्या इंग्रज डॉक्टरनेही संभाजी राजांचे वर्णन केलेले आहे. हा डॉक्टर जॉन फ्रायर १६७३ साली हिंदुस्थानात आला होता. सुरत, मुंबई आणि जुन्नर येथे फिरल्यानंतर तो मुंबईहून कारवारमार्गे १६७५ मध्ये गोव्यात गेला.
१६७६ साली तो वेंगुर्रल्याला होता. आणि तेथून तो कारवार गोकर्ण भागात प्रवास करत होता. तो प्रवासात लिहितो, "मध्यंतरीच्या काळात आदिलशाही सरदारांच्या वेबनावाचा फायदा घेऊन मन मानेल तिकडे शिवाजी राजांचे सैन्य धुमाकूळ घालीत आहे. मराठ्यांच्या सैन्यातील संभाजीराजांच्या नेतृत्वाखालील तुकडी थेट गोवळकोंडा राज्यातल्या भागानगरपर्यंत गेली. शिवाजी राजांच्या ह्या मुलाने भागानगरमधील काही भागातून खंडणी गोळा केली आणि शहरात जाळपोळ केली. तोच बहलोलखान आडवा आल्याने त्याला चुकवीत दुसऱ्याच रस्त्याने हे संभाजीराजे परत फिरले. वाटेत संभाजीराजांनी हुबळी, रायबाग, आणि इतर बाजार पेठांवर छापे घातले आणि खंडणी गोळा केली."
ही माहिती डॉक्टर जॉन फ्रायरने त्यांच्या ऑकटोबर १६७८ च्या पत्रात लिहिलेली आहे.
इंग्रजांचा आणि संभाजीराजांचाही जवळून संबंध आलेला होता. सुरतेचे इंग्रज त्यांच्या १०-०१-१६७७ च्या मुंबईला पाठविलेल्या पत्रात म्हणतात, " आपल्या वखारींच्या लुटीबाबत शिवाजी राजांच्या फर्मानाची मात्र तितकी खात्री वाटत नाही
हे आमच्या ध्यानात आले आहे. परंतु शिवाजी राजांची भरभराट होऊन त्यांचे राज्य वाढत आहे. त्यामुळे आपल्याच राज्यात ते आमची लूट करतील अशी शंका घेववत नाही.
त्यांच्या मरणानंतरही काळजी करण्याचे कारण दिसत नाही. कारण त्यांच्या मुलाला (संभाजी राजांना ) मुकुट अधिकार प्राप्त झाला असून तो बराच समंजस दिसतो.
इंग्रजीत ते म्हणतात : " His son is already crowned and of sufficient understanding he appears."
लहानपणातच आईची माया हरपलेले, वडिलांच्या आणि आजीच्या छायेत आणि लढवैय्या फौजेत लहानाचे मोठे झालेले छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्मृतीस समर्पित...
🙏🙏🙏?
#gk
👉भारत सरकारकडून राष्ट्रव्यापी ‘स्‍वच्‍छ भारत’ अभियानाला या साली सुरुवात करण्यात आली - सन 2014.

👉नेपाळचे हे राष्ट्रीय चलन आहे - नेपाळी रुपया.

👉पेरू या दक्षिण अमेरिकेतल्या देशाची ही राजधानी आहे - लीमा.

👉12 मे ला या व्यक्तीच्या स्मृतीत जागतिक परिचारिका दिन पाळला जातो - फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820).

👉जागतिक परिचारिका दिनानिमित्त भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो - फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार.

👉जागतिक व्यापार संघटना (WTO) या साली अधिकृतपणे कार्यरत झाले - सन 1995 (1जानेवारी).

👉संयुक्त राष्ट्रसंघाकडून क्योटो प्रोटोकॉल या साली अंगिकारला गेला - सन 1997.
Forwarded from Government Job Express
🔴 नगर परिषद-नगरपालिका प्रशासन संचालनालय परीक्षा २०१८ प्रवेशपत्र

बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी एकाच वेळी 2 पोस्टसाठी पेपर आले आहेत.
महापरिक्षेच्या कार्यालयास संपर्क साधला असता,त्यांकडून अशी माहिती प्राप्त झाली आहे. *ज्यांचे 2 पोस्ट साठी एकच वेळ आणि केंद्र आहे त्यांनी एकाच परीक्षा द्यायची असून,त्याचे मार्क दोन्ही पोस्ट साठी विचारात घेतले जातील*

काही अडचण असल्यास ह्या क्रमांकावर संपर्क करा 👇👇
180030007766

👉प्रवेशपत्र पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/regiDma
#english #Idiom_of_the_Day

📚 out of the question

✍🏾Meaning:

If something is out of the question, it cannot be considered because it's impossible or it's not allowed.

For example:

🔺Jose wants to study in the U.S.A., but it's out of the question. It's very expensive and we just can't afford it.

🔺The government says that cutting the military budget is out of the question. But Gracie says that if invading foreign countries were out of the question instead, it'd be easy to cut the budget.
━━━━━━━━━
#Idiom
🌀 @eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
FINAL_RESULT_70-2017.pdf
229.8 KB
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा - 2017

अंतिम निकाल

जॉईन करा
@Naukriexpress
#polity
ग्रामपंचायतीचा सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय ३ जुलै २०१७ रोजी सरकारने घेतला. मात्र, जनतेतून सरपंचाची निवड करावी, अशी सूचना सन १९८६ मध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या समितीने केली होती. राज्य सरकारनेया शिफारशीची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. पंचायतराज व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी समित्या नेमल्या. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी. बी. पाटील यांची समिती नेमण्यात आली. ‘पंचायतराज’चे पुनर्विलोकन करणाऱ्या या संस्थेची कार्यकक्षा व्यापक होती. जून १९८६ मध्ये या समितीने तिच्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या. त्यात ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायतराज व्यवस्थेकडे सोपवावी, महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी, अशा अनेक क्रांतिकारी शिफारशी या समितीने केल्या. या समितीने ‘पंचायतराज’ला एक वेगळी दिशा दिली. ७३ वी घटनादुरुस्ती होण्यापूर्वीच या समितीने क्रांतिकारी शिफारशी केल्या होत्या; परंतु राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारने पावले उचलली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २ ऑक्‍टोबर २००० रोजी पाटील समितीच्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली; परंतु जनतेतून सरपंच ही शिफारस मात्र लागू करण्यात आली नाही. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय २०१७ साली युती सरकारने घेतला.
Forwarded from Government Job Express
🔵आरसीएफ मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांची भरती

🔅 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) - १० जागा

शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एस्सी (कृषी) व एमएमएस / एमबीए (मार्केटिंग) किंवा मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/inDAn2

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/a9Ct2x

🔅 मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) - २५ जागा

शैक्षणिक पात्रता - ५५% गुणांसह केमिकल मध्ये बीई / बी.टेक / बी.एस्सी. इंजिनिअरिंग (इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2rJM7tQ

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/7axF9v

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - १२ जून २०१८
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/empscguidance
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल #polity #mains
संक्षिप्त :कर्नाटक विधानसभा निवडणूक #polity #mains