🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
भगिणींसाठी आत्मसंरक्षण संबधित काही टिप्स 👍
👍1
राष्ट्रकुल देशांची CHOGM 2018 यशस्वीपणे संपन्न
#current #summit
20 एप्रिल 2018 रोजी ब्रिटनच्या लंडन शहरात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM 2018) संपन्न झाली. ही CHOGMची 25 वी बैठक होती. या बैठकीचा विषय “टूवर्ड्स ए कॉमन फ्यूचर” हा होता.

या बैठकीत महासागर प्रशासनासंबंधी राष्ट्रकुल ब्लू चार्टर, व्यापार व गुंतवणूकीसाठी कॉमनवेल्थ कनेक्टिव्हीटी एजेंडा, सायबर गुन्हेगारी यावर घोषणा तसेच सदस्य देशांमध्ये निवडणुकांचे अवलोकन याबाबत सुधारित राष्ट्रकुल दिशानिर्देश यासंबंधी मुद्द्यांवर भर दिला गेला.

यावेळी चार मुख्य उद्दिष्टे स्थापन करण्यात आली आहेत –

समृद्धी: राष्ट्रकुल देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढविणे.सुरक्षा: जागतिक दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ले यांसारख्या सुरक्षेसंबंधी समस्यांना दूर करण्यासाठी सहकार्य वाढविणे.न्याय वर्तन: राष्ट्रकुलमध्ये लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि सुशासन यांचा प्रचार करणे.शाश्वतीकरण: हवामान बदल आणि अन्य जागतिक संकटांच्या प्रभावांना हाताळण्यासाठी लहान आणि संवेदनशील राज्यांची लवचिकता वाढविणे.

ठळक बाबी

भारत आणि ब्रिटन यांच्यात आंतरराष्ट्रीय सायबर हालचालींविषयी माहिती सामायिक करण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला आहे.त्यातच सर्व 53 सहभागी राष्ट्रांच्या नेत्यांनी सायबर सुरक्षेसंबंधी त्यांच्या कार्यचौकटीचे मूल्यांकन करून त्याला बळकट करण्यासाठी सर्वसमावेशकपणे काम करण्याचे मान्य केले आहे. त्यांनी 2020 सालापर्यंत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई करण्यास सहमती दर्शवली. बैठकीत राष्ट्रकुलची सायबर सुरक्षा क्षमता मजबूत होण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ब्रिटनने 15 दशलक्ष पौंड एवढी आर्थिक वचनबद्धता जाहीर केली.याशिवाय, नेत्यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आपला पाठिंबा दर्शविला आणि व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी सहा सूत्री संपर्क-जोडणी विषयपत्रिका (agenda) अंगिकारला आहे.नेत्यांनी हवामानातील बदल, प्रदूषण आणि प्रमाणाबाहेर मासेमारी यांच्या विपरीत परिणामांपासून महासागरांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. 

राष्ट्रकुल बाबत

पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘राष्ट्रकुल’ म्हणून ओळखली जाते.

ब्रिटनच्या संसदेने स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला 1931 साली मान्यता दिली. त्यामुळे पूर्वीची इम्पीअरिअल कॉन्फरन्स ही संज्ञा कालबाह्य ठरून ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ही संज्ञा रूढ झाली. 1947 साली ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ या नावातून ब्रिटिश हा शब्द वगळण्यात आला. पूर्वप्रथेनुसार राष्ट्रकुलाचे प्रमुखपद ब्रिटिश राजमुकुटाकडे असते. 1965 साली राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM) पहिल्यांदा सन 1971 मध्ये सिंगापूरमध्ये भरविण्यात आली होती.

वर्तमानात राष्ट्रकुलमध्ये 53 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. राणी एलिजाबेथ द्वितीय या राष्ट्रकुलच्या प्रमुख आहेत. राष्ट्रकुलच्या 16 सदस्य देशांच्या देखील प्रमुख आहेत, ज्याला राष्ट्रकुल क्षेत्र म्हणून संबोधले जाते. राष्ट्रकुल हा जवळपास 2.4 अब्ज नागरिकांचा प्रदेश आहे. 

T.me/eMPSCguidance
🔹 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंदर्भातील याचिका सुनावणीला आली असता, केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.

कथुआतील मुलीवर झालेला बलात्कार व तिची हत्या यामुळे देशात संतापाचे वातावरण असतानाच उत्तर प्रदेश व उत्तराखंडातही तशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. विरोधी पक्षांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लंडनमध्ये या घटनांचा निषेध केला होता. अमेरिका व इंग्लंडमध्ये या घटनांच्या विरोधात निदर्शनेही झाली. महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनीही पॉक्सो कायद्यातील बदलांचे संकेत दिले होते. अशा प्रकरणातील दोषींना फाशीच मिळायला हवी, असे आपले म्हणणे आहे, असे त्या म्हणाल्या होता.
#current
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Economics & Current Affairs Special Batch
(अर्थशास्त्र व चालू घडामोडी विशेष बॅच)
- 23 एप्रिल 2018 पासून सुरू

🔴मार्गदर्शक- Prashant Khedkar Sir

🔶कालावधी - 45 दिवस
(29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांचे विशेष मार्गदर्शन)

वेळ सकाळी - 8 ते 10

प्रवेश क्षमता - 60
♦️(पूर्व नोंदणी आवश्यक)♦️

♦️फीस- 1000₹

🔴वैशिष्ट्ये-
1. प्रत्येक संकल्पना सोडवण्यावर भर
2. अर्थशास्त्र सर्व संकल्पना, नवीन आकडेवारी नोट्स
3. अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल संपूर्ण मार्गदर्शन व सराव
4. प्रत्येक आठवड्यास चाचणी परीक्षा
5. रोज 30 मिनिट चालु घडामोडी मार्गदर्शन
6. 29 एप्रिल 2018 व 6 मे 2018 रोजी 6 तासांची विशेष कार्यशाळा(अर्थशास्त्र व चालू घडामोडी)

🔴पूर्व नोंदणीसाठी संपर्क
8484814111 किंवा नाव व मोबाईल क्रमांक खालील लिंकवर पाठवा- @khedkar_prashant

🔴Class Address -
गुरुदेव क्लासेस , राष्ट्रभाषा हिंदी
भवन , एस.बी. प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
Forwarded from Prashant STI
MPSC
PSI/STI/ASO
Tax Assistant-Clerk
नगरपालिका भरती

🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच

मार्गदर्शक - प्रशांत खेडकर सर

बॅच-23/04/2018
वेळ- सकाळी 8 ते 10
संपर्क- 8484814111
किंवा
@khedkar_prashant
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴अर्थशास्त्र व चालू घडामोडी बॅच

प्रवेश क्षमता - पूर्वी 60 दिलेली होती .

मात्र , नोंदणी पूर्ण होऊनही सातत्याने मागणी होत असल्याने प्रवेश क्षमता वाढवून - 120 करण्यात येत आहे.

ज्यांनी पूर्व नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित नोंदणी करावी.

( 23-04-2018 रोजी स्पॉट नोंदणी केली जाईल)

नोंदणीसाठी संपर्क- 8484814111 किंवा @khedkar_prashant

Class Address
गुरुदेव क्लास ,राष्ट्रभाषा हिंदी भवन, सरस्वती भुवन प्राथमिक शाळेसमोर , नाथ झेरॉक्स जवळ , औरंगपुरा , औरंगाबाद
जगातील वसुंधरा दिन 22 एप्रिल
@eMPSCguidance
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

330. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा शासन कोणत्या पद्धतीने करते?

⚪️ देशातील सर्व उत्पन्न स्रोतांकडून उभारले जातात

⚫️शासन RBI काढून पैसा प्राप्त करते.

🔴परकीय देशांकडून कर्ज घेते

🔵अंतर्गत कर्ज उभारले जाते.

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

331. नरेंद्र मोदी यांनी 'जिवंत स्मारके'(Living Monuments) ही संज्ञा कोणत्या केंद्रीय योजनेस/अभियानास दिली आहे?

⚪️सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार अभियान

⚫️उज्ज्वला योजना

🔴स्वच्छ भारत अभियान

🔵महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना

जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

332. MSME देशातील कोणत्या समस्यांचे निराकरण करू शकतात.

अ. बेरोजगारी

ब. क्षेत्रीय असंतुलन

क. राष्ट्रीय उत्पन्न असमानता

ड. दारिद्र्य

इ.कमी दरडोई उत्पन्न

फ. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा

पर्याय

⚪️अ,ड,इ

⚫️अ,क,ड,इ

🔴अ,क,ड,इ,फ

🔵अ,ब,क,ड,इ,फ


जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

333. क्रयशक्ती समता आधारावर(PPP) भारत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश आहे?

⚪️5 वा

⚫️4 था

🔴3 रा

🔵2 रा
🌀UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी खास चॅनेल

🎯Target UPSC🎯

IAS, IPS,IRS पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून UPSC च्या तयारीसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल Target UPSC

Please support by sharing it.

Contact :9665521086
https://t.me/Target30UPSC