🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

329. 'पाणीपुरवठा' हा घटक अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात येतो?

⚪️प्राथमिक क्षेत्र

⚫️द्वितीयक क्षेत्र

🔴तृतीयक क्षेत्र

🔵चतुर्थक क्षेत्र

जॉईन करा- @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
कर सहायक मुख्य निकाल जाहीर

कट ऑफ ओपन जनरल - 276
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
FINAL_RESULT_68-2017- ASO main Examination-2017.pdf
688.2 KB
सहायक कक्ष अधिकारी निकाल
कट ऑफ 151
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

324. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?

⚪️14-B

⚫️71

🔴47-Aअचूक उत्तर
स्पष्टीकरण- हा राष्ट्रीय महामार्ग 6 किमीचा आहे. केरळमधील वेम्बनाड सरोवराच्या वेलींग्टन बेटावर हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

🔵63-C
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

325. NH 7 वाराणसी ते कन्याकुमारी हा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे.
या महामार्गाचे सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे?

⚪️उत्तरप्रदेश

⚫️मध्यप्रदेश

🔴महाराष्ट्र

🔵तामिळनाडू अचूक उत्तर

स्पष्टीकरण - NH7 व राज्ये
उत्तरप्रदेश- 128 किमी
मध्यप्रदेश- 504 किमी
महाराष्ट्र- 232 किमी
आंध्रप्रदेश व तेलंगणा- 753 किमी
कर्नाटक - 125 किमी
तामिळनाडू - 627 किमी


जॉईन करा- @RajyasevaSTI
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

326. भारतातील रस्त्यांची घनता कोणत्या राज्यात सर्वाधिक व सर्वात कमी आहे , ते अचूक ओळखा.

⚪️केरळ , जम्मू काश्मीर अचूक उत्तर

⚫️केरळ , अरुणाचल प्रदेश

🔴उत्तरप्रदेश , सिक्कीम

🔵उत्तरप्रदेश , नागालँड
#Rajyseva_Mains
#PSI_STI_ASO2018
#Geography

भूगोल सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

327. भारतात रस्त्यांची सर्वात कमी लांबी कोणत्या राज्यात आहे?

⚪️अरुणाचल प्रदेश

⚫️मणिपूर

🔴सिक्कीम अचूक उत्तर

🔵मेघालय


जॉईन करा- @RajyasevaSTI
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

328. स्वातंत्र्यापूर्वी भारतात अर्थव्यवस्थेचा कोणता प्रकार अस्तित्वात होता?

⚪️मिश्र

⚫️नियोजित

🔴मुक्त अचूक उत्तर(Market Economy , भांडवलवादी अर्थव्यवस्था)

🔵यापैकी नाही
#PSI_STI_ASO2018
#Rajyseva_Mains
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

329. 'पाणीपुरवठा' हा घटक अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात येतो?

⚪️प्राथमिक क्षेत्र

⚫️द्वितीयक क्षेत्रअचूक उत्तर

🔴तृतीयक क्षेत्र

🔵चतुर्थक क्षेत्र

जॉईन करा- @RajyasevaSTI
👆👆👆👆आज चॅनलवर दिलेल्या प्रश्न क्रमांक 324 ते 329 ची उत्तरे.
शंका संपर्क- @khedkar_prashant
आमचे परम मित्र निखिल कान्हे पाटील यांची ASO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
भगिणींसाठी आत्मसंरक्षण संबधित काही टिप्स 👍
👍1
राष्ट्रकुल देशांची CHOGM 2018 यशस्वीपणे संपन्न
#current #summit
20 एप्रिल 2018 रोजी ब्रिटनच्या लंडन शहरात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM 2018) संपन्न झाली. ही CHOGMची 25 वी बैठक होती. या बैठकीचा विषय “टूवर्ड्स ए कॉमन फ्यूचर” हा होता.

या बैठकीत महासागर प्रशासनासंबंधी राष्ट्रकुल ब्लू चार्टर, व्यापार व गुंतवणूकीसाठी कॉमनवेल्थ कनेक्टिव्हीटी एजेंडा, सायबर गुन्हेगारी यावर घोषणा तसेच सदस्य देशांमध्ये निवडणुकांचे अवलोकन याबाबत सुधारित राष्ट्रकुल दिशानिर्देश यासंबंधी मुद्द्यांवर भर दिला गेला.

यावेळी चार मुख्य उद्दिष्टे स्थापन करण्यात आली आहेत –

समृद्धी: राष्ट्रकुल देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढविणे.सुरक्षा: जागतिक दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर हल्ले यांसारख्या सुरक्षेसंबंधी समस्यांना दूर करण्यासाठी सहकार्य वाढविणे.न्याय वर्तन: राष्ट्रकुलमध्ये लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि सुशासन यांचा प्रचार करणे.शाश्वतीकरण: हवामान बदल आणि अन्य जागतिक संकटांच्या प्रभावांना हाताळण्यासाठी लहान आणि संवेदनशील राज्यांची लवचिकता वाढविणे.

ठळक बाबी

भारत आणि ब्रिटन यांच्यात आंतरराष्ट्रीय सायबर हालचालींविषयी माहिती सामायिक करण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला आहे.त्यातच सर्व 53 सहभागी राष्ट्रांच्या नेत्यांनी सायबर सुरक्षेसंबंधी त्यांच्या कार्यचौकटीचे मूल्यांकन करून त्याला बळकट करण्यासाठी सर्वसमावेशकपणे काम करण्याचे मान्य केले आहे. त्यांनी 2020 सालापर्यंत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई करण्यास सहमती दर्शवली. बैठकीत राष्ट्रकुलची सायबर सुरक्षा क्षमता मजबूत होण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ब्रिटनने 15 दशलक्ष पौंड एवढी आर्थिक वचनबद्धता जाहीर केली.याशिवाय, नेत्यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आपला पाठिंबा दर्शविला आणि व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी सहा सूत्री संपर्क-जोडणी विषयपत्रिका (agenda) अंगिकारला आहे.नेत्यांनी हवामानातील बदल, प्रदूषण आणि प्रमाणाबाहेर मासेमारी यांच्या विपरीत परिणामांपासून महासागरांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. 

राष्ट्रकुल बाबत

पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘राष्ट्रकुल’ म्हणून ओळखली जाते.

ब्रिटनच्या संसदेने स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला 1931 साली मान्यता दिली. त्यामुळे पूर्वीची इम्पीअरिअल कॉन्फरन्स ही संज्ञा कालबाह्य ठरून ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ही संज्ञा रूढ झाली. 1947 साली ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ या नावातून ब्रिटिश हा शब्द वगळण्यात आला. पूर्वप्रथेनुसार राष्ट्रकुलाचे प्रमुखपद ब्रिटिश राजमुकुटाकडे असते. 1965 साली राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले. राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM) पहिल्यांदा सन 1971 मध्ये सिंगापूरमध्ये भरविण्यात आली होती.

वर्तमानात राष्ट्रकुलमध्ये 53 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. राणी एलिजाबेथ द्वितीय या राष्ट्रकुलच्या प्रमुख आहेत. राष्ट्रकुलच्या 16 सदस्य देशांच्या देखील प्रमुख आहेत, ज्याला राष्ट्रकुल क्षेत्र म्हणून संबोधले जाते. राष्ट्रकुल हा जवळपास 2.4 अब्ज नागरिकांचा प्रदेश आहे. 

T.me/eMPSCguidance