🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

238. रिओ+20 संमेलन 2012 सालच्या परिषदेत सर्वाधिक भर कोणत्या मुद्द्यावर देण्यात आला?

⚪️ग्रीन इकॉनॉमी

⚫️शाश्वत विकास

🔴हरितगृह वायू उत्सर्जन

🔵दारिद्र्य निर्मूलन
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

232. जगातील सर्वाधिक प्रजातीय विविधता आढळणारी 'महा जैव-विविधता केंद्र'(Mega Diversity Centres) जगातील एकूण किती देशात आढळून येतात?

⚪️35

⚫️27

🔴23

🔵18 अचूक उत्तर( एकूण 18 देशात जगातील 35 Biodiversity hotspot आढळून येतात)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

233. जैव-विविधता संरक्षणाचे in-situ (यथास्थळ संरक्षण) conservation चे उपाय खालीलपैकी कोणते ते अचूक ओळखा.

अ. जीवावरण राखीव
ब. राष्ट्रीय उद्याने
क. प्राणी संग्रहालये
ड. अभयारण्ये

पर्याय
⚪️अ,ब,क,ड

⚫️ब,क,ड

🔴अ,क,ड

🔵अ,ब,डअचूक उत्तर
(प्राणीसंग्रहालय हे Ex-situ अंतर्गत येते)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

234. 'तामुर' ही नदी कोणत्या राष्ट्रीय उद्यान/अभयारण्यातून वाहते?

⚪️कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान अचूक उत्तर

⚫️मानस राष्ट्रीय उद्यान(मनास नदी वाहते या उद्यानातून)

🔴काझीरंगा राष्ट्रीय उद्यान(ब्रम्हपुत्रा नदी वाहते या राष्ट्रीय उद्यानातून)

🔵जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

235. जैव-विविधता प्राधिकरणाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

⚪️पुणे

⚫️कलकत्ता

🔴डेहराडून

🔵चेन्नई अचूक उत्तर
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण मुख्यालय चेन्नई इथे आहे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

236. 'साइट्स(CITES)' हा पर्यावरण विषयक करार कशासंबंधी आहे?

⚪️जैवविविधता संरक्षण

⚫️वन्य जीवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रतिबंधअचूक उत्तर

🔴वन्य जीवांच्या जनुकीय संसाधनापासून होणाऱ्या लाभाच्या योग्य आंतरराष्ट्रीय वाटपाबाबत

🔵हरितगृह वायू उत्सर्जन घटवण्याबाबत
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

237. कोणत्या परिषदेत 2010 पर्यंत CFC क्लोरोफ्लूरो कार्बनचे संपूर्ण उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला?

⚪️1987 मॉट्रियल प्रोटोकॉल

⚫️1989 हेलनसिंकी परिषद

🔴1990 लंडन परिषदअचूक उत्तर

🔵1992 कोपनहेगन परिषद
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

पर्यावरण सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

238. रिओ+20 संमेलन 2012 सालच्या परिषदेत सर्वाधिक भर कोणत्या मुद्द्यावर देण्यात आला?

⚪️ग्रीन इकॉनॉमीअचूक उत्तर - सर्वाधिक भर रिओ परिषद 2012 मध्ये ग्रीन इकॉनॉमी वर देण्यात आला होता

⚫️शाश्वत विकास

🔴हरितगृह वायू उत्सर्जन

🔵दारिद्र्य निर्मूलन
माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे निधन

(०१) ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८९ वर्षाचे होते.

(०२) स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी मंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते.

(०३) शालेय जीवनातच १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या आंदोलनात त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि तुरूंगवास भोगला.

(०४) आणीबाणीच्या विरोधात त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला. कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी त्यांना तब्बल २५ वेळा कारावास भोगला होता.

(०५) अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.

(०६) माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी भाग घेतला होता. या चार हजार किलोमीटरच्या पदयात्रेत ते सर्वात अग्रभागी होते.

(०७) जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आणि त्या पदांची उंची वाढविली. पुण्याचे महापौर आणि राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात एका गुन्हेगाराचे साथीदार लाच म्हणून मोठी रक्कम घेऊन आले, तेव्हा वैद्य यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

(०८) सेवादलाचे हेच संस्कार पुढील पिढ्यांमध्ये रुजविण्याचा आग्रह वैद्य यांनी धरला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडणे, गृहमंत्री या नात्याने पोलिसांना फूल पँट देणे आणि सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनाची महागाईशी जोडणी करण्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले.

(०९) १९४३ पासून ते राष्ट्र सेवा दलात सक्रिय आहेत. तेव्हापासून ‘लोकशाही समाजवाद’ ही विचारधारा त्यांनी स्वीकारली आणि अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
T.me/eMPSCguidance
Corruption Index 2017
केरळ संघाने जिंकला संतोष करंडक 2018

केरळ फूटबॉल संघाने कोलकातामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव करत सहाव्यांदा संतोष करंडक आपल्या नावे करून घेतला आहे.

संतोष करंडक ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अंतर्गत प्रादेशिक राज्य संघटना व शासकीय संस्थांद्वारा आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे.

1941 साली संतोष करंडक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. संतोष करंडक ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख फूटबॉल स्पर्धा आहे.
#current
मध्यप्रदेशातील ‘कडकनाथ’ कोंबडीला GI टॅग मिळाले


• चेन्नईच्या भौगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयाने ‘कडकनाथ’ कोंबडीसाठी भौगोलिक संकेतांक (Geographical Indication -GI) टॅग मध्यप्रदेशाला दिला आहे.


• ‘कडकनाथ’ ही एक वाण आहे, जी कोंबडीच्या वर्गात मोडते.
• ही कोंबडी पौष्टिकतेच्या दृष्टीने उत्तम असून
• त्यात 25-27% प्रोटीन, जीवनसत्त्व ‘ब-1’, ‘ब-2’, ‘ब-6’, ‘ब-12’, क, ई, नियासिन, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण भरपूर आहे.
• आता कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा सरकार या उत्पादनाच्या नावाचा अनाधिकृत वापर करू शकणार नाही
#current
3 एप्रिल . छत्रपती शिवराय पुण्यतिथी.विनम्र अभिवादन
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

239. 'हिंदुस्तानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली' हे प्रसिद्ध वाक्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

⚪️लोकहितवादी

⚫️दादाभाई नौरोजी

🔴गोपालकृष्ण गोखले

🔵आर.सी.दत्ता
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

240. "भारतातील रेल्वेच्या विस्तारास दुसऱ्याच्या पत्नीला सजवणे" असे विधान कोणी केले होते?

⚪️कार्ल मार्क्स

⚫️दादाभाई नौरोजी

🔴सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔵लोकमान्य टिळक
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴 आज 3 एप्रिल कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्मदिन
त्यानिमित्त गूगलने डूडल बनवून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

जन्म साल- 1903

सर्वात उल्लेखनीय व MPSC करिता विचारले जाऊ शकेल असे उल्लेखनीय कार्य--

1929 साली 'प्राग' या ठिकाणी झालेल्या 'Womens League for Peace and Freedom ' च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस भारतीय प्रतिनिधी म्हणून कमलादेवी उपस्थिती होत्या

जॉईन करा
@RajyasevaSTI
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

241. 'कुंपणाने शेत खाल्ले' असे आर्थिक निःसारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते?

⚪️दादाभाई नौरोजी

⚫️पी.आनंद चार्लु

🔴न्यायमूर्ती रानडे

🔵सुब्रमण्यम अय्यर
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

242. 'तलवारीचे तत्वज्ञान' हा लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे?

⚪️महात्मा गांधी

⚫️नामदार गोखले

🔴वासुदेव बळवंत फडके

🔵बाळ गंगाधर टिळक
#current

हॉकी मध्ये पहिले आणि शेवटचे सुवर्ण पदक भारताने कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये जिंकले होते?

⚪️1928,1976
⚫️1932,1980
🔴1928,1980
🔵1932,1984

T.me/eMPSCguidance
#Rajyaseva_2018
#PSI_STI_ASO2018
#history

इतिहास व समाजसुधारक सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

243. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील प्रथम 'दैनिक' होते. त्या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती?"

⚪️भाऊ महाजन

⚫️कृष्णाजी रानडे

🔴दादोबा तर्खडकर

🔵त्र्यंबक पर्वते