🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
जनस्थान पुरस्कार:-२०१७
-------------------------------
* मराठी साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक व कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला.
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे.
* एक लाख रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
विजया राज्याध्यक्ष:-
* कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया राजाध्यक्ष यांनी मानिनी सदरातून ललित लेखनाला सुरवात केली.
* त्याचे नाव होते नित्य नवा दिस जागृतीचा. सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्याने ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून.
* १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांचे ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ , ‘बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)’, ‘आहे मनोहर तरी … वाचन आणि विवेचन’ हे समीक्षापर लेखन प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘अन्वयार्थ’, ‘दोनच रंग’ , ‘अनोळखी’ , ‘जास्वंद’ , ‘चैतन्याचे ऊन’ , ‘समांतर कथा’ हे कथासंग्रहही आहेत.
* या अगोदर हा पुरस्कार
विजय तेंडुलकर (१९९१),
विंदा करंदीकर (१९९३),
इंदिरा संत (१९९५),
गंगाधर गाडगीळ (१९९७),
व्यंकटेश माडगुळकर (१९९९),
ना. पेंडसे (२००१),
मंगेश पाडगावकर (२००३),
नारायण सुर्वे (२००५),
बाबुराव बागुल (२००७),
ना. धो. मनोहर (२००९),
महेश एलकुंचवार (२०११),
भालचंद्र नेमाडे (२०१३),
अरुण साधू (२०१५)
यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Jaalikattu:Tamilnadu
Kambala: Karnataka
ShankarPat: Maharashtra
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भाषेनुसार
Kambala :म्हैस शर्यत
MPSCguidance
विविध अहवालात भारताचा क्रमांक:-
------------------------------------------------------------------------

१) उद्योग विकासf निर्देशांक (जीआरडीआय):-
* जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने 30 विकसनशील देशांच्या यादीत 13 क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले
प्रथम:- चीन
दुसरा:- भारत
तिसरा:- रशिया

२) जागतिक शांतता निर्देशांक:-
पहीला:- आइसलँड
दुसरा:- डेन्मार्क
तिसरा:- ऑस्ट्रिया
१४१ वा:- भारत(२०१५ मध्ये भारताचा क्रमांक १४३ वा होता)

अशांत देश:-
पहिला:- सीरिया
दुसरा:- दक्षिण सुदान,
तिसरा:- इराक

३) जागतिक सामाजिक प्रगती निर्देशांक:-
प्रथम:-नार्वे
दुसरा:- स्वीडन
तिसरा:- स्वीत्झर्लंड
१०१ वा:- भारत

४) वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट :-
( २०१३च्या तुलनेत सहा अंकांनी घसरण)
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- आइसलंड
११७वा:- भारत

५) काळा पैसा देशाबाहेर जाणार्या यादीत:-
प्रथम:- चीन
दुसरा :- रशिया
३ रा:- मलेशिया
४था:- भारत

६) सयुंक्त राष्ट्र मानव विकास अहवाल -
प्रथम:- नार्वे
२ रा :- ऑस्ट्रेलिया
३ रा:- स्वीत्झर्लंड
१३० वा:- भारत((मागील वर्षी या यादीत भारताचा १३५ वा क्रमांक होता )

७) व्यवसाय सुलभतेमध्ये ( Doing Business ):-
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार १८९ देशाच्या यादीत भारताचा १३० क्रमांक गतवर्षीच्या तुलनेत भारताने १२ स्थानाची प्रगती
प्रथम:- सिंगापूर
२ रा :- न्युझीलंड
३ रा:- डेन्मार्क
१३० वा:- भारत

८) ब्रॅड फायनान्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुल्यांकानुसार भारताला जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रॅड म्हणून घोषित करण्यात आले
प्रथम:- अमेरिका
२ रा:- चीन
३ रा:- जर्मनी

९)) भ्रष्टाचार निर्देशांक :-
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या २०१५ मधील अहवालानुसार भारताचा ७६ वा क्रमांक आहे (गतवेळी भारत ८५ व्या क्रमांकावर होता
पहिले ३ देश
पहिला :- डेन्मार्क
२ रा :-फिनलंड
३ रा:- स्वीडन
शेवटचे ३ देश
सोमालिया
उत्तर कोरिया
अफगाणिस्तान
(ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था असून मे १९९३ मध्ये जर्मनीमध्ये या संस्थेची स्थापना झाली.विविध देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्याचे काम ही संस्था करते)

१०) उर्जा सुरक्षा निर्देशांक:-
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- नार्वे
तिसरा:-स्वीडन
९० वा:- भारत
___________________________________