🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ज्यांच्याकडे Tez आहे त्यांनी एकेमेकांना काही रक्कम tez ने पाठवा ,नंतर तुम्हांला अजून 2 Scratch Card भेटतील.👍💰💰💰💰Best Luck
https://g.co/tez/QJ1Gj
🔹शी जिनपिंग राहणार चीनच्या आजीवन अध्यक्ष

चीनने 11 मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
चीनच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोन पदांसाठी बंधनकारक असलेली मर्यादा दोन तृतीयांश बहुमताने संपवली आहे. सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना' (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते. चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच 'सीपीसी' पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, शी जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू असून, हा कार्यकाळ 2023 मध्ये संपणार आहे. या झालेल्या बदलानंतर शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
t.me/eMPSCguidance
🔹संयुक्त राष्ट्रसंघाच्या अल्प विकसित देशांच्या श्रेणीमधून चार देश बाहेर पडण्यास पात्र

भूटान, किरबाती, साओ टोमे व प्रिन्सिपे आणि सोलोमोन बेटे या चार देशांना अल्प विकसित देशांच्या (Least Developed Nation-LDC) श्रेणीमधून बाहेर पडण्यास पात्र असून त्यांना त्यावरील श्रेणीत सामील करण्याची शिफारस 16 मार्च 2018 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ विकास धोरण समितीकडून (CDP) करण्यात आली आहे.

या चार देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न क्षमता वाढल्याने तसेच आरोग्य व शिक्षण परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. समिती आपल्या शिफारसी UN च्या आर्थिक व सामाजिक परिषदेकडे (ECOSOC) पाठविणार, जे पुढे त्यांचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे मांडणार.

सध्या LDC श्रेणीत 47 देश आहेत, ज्यातील 33 देश आफ्रिकेत आहेत, तर 13 देश आशिया-प्रशांत भागात आणि एक लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1971 साली LDC श्रेणीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ बोत्सवाना, काबो वर्दे, इक्वेटोरियल गिनी, मालदीव आणि सामोआ हे पाच देश या श्रेणीमधून बाहेर पडलेली आहेत.
t.me/eMPSCguidance
सारखे जिल्हे असणारे भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
राज्यसेवा_पूर्व_विज्ञान_सराव_पेपर.pdf
229.7 KB
राज्यसेवा 2018 व संयुक्त पूर्व परीक्षा 2018 पूर्व परीक्षांकरिता
विज्ञान सराव पेपर

Test - 1 विज्ञान
संकलन - प्रशांत खेडकर @khedkar_prashant

जॉईन करा - @RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
New Doc_1.pdf
350.1 KB
Test - 1 विज्ञान
उत्तरतालिका
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴नेहरू रिपोर्ट बनवणाऱ्या समितीमधील सदस्य

1. मोतीलाल नेहरु
2. सुभाषचंद्र बोस
3. तेजबहादूर स्प्रु
4. अली इमाम
5. एम.एस अणे
6. मंगल सिंग
7. शोएब कुरेशी
8. जी आर पटवर्धन
5_6161195581852090389.pdf
6.3 MB
महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा पद्धत
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
RK Comp Test paper 2.pdf
480.9 KB
RK IAS Academy, Pune
सामान्य अध्ययन पेपर-1
राज्यसेवा पूर्व 2018

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
RK Comp Test Paper 1.pdf
636.9 KB
RK IAS Academy, Pune
CSAT पेपर 2
राज्यसेवा पूर्व 2018

जॉईन करा
@RajyasevaSTI & @empscguidance
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

166. 'लॅक्टोज' या डायसॅकाराईड शर्करेत खालीलपैकी कोणते दोन मोनोसॅकाराईड शर्करा आढळतात?

⚪️ग्लुकोज + ग्लॅक्टोज

⚫️ग्लुकोज + फ्रुक्टोज

🔴ग्लुकोज + ग्लुकोज

🔵ग्लुकोज+ सुक्रोज
20 मार्च जागतिक चिमणी दिन
Forwarded from Government Job Express
मुंबई मंत्रालय भरती 2018 (मुंबई, ठाणे अंतर्गत)

एकूण पद संख्या : 40 जागा

पद :
1. डाटा एन्ट्री ऑपरेटर : 30 जागा
2. लघुलेखक : 10 जागा

शिक्षण : पदवी + MSCIT, टायपिंग आवश्यक

वय : 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा

पत्ता :
आस्थापना शाखा (कायासन-19), 5 व मजला, दालन क्र.553 (विस्तार), हुतात्मा राजगुरु चौक, मादाम
कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 400032, दूरध्वनी क्र. 22881897
वरील पदाच्या परिक्षास लागणारी विविध प्रकाशन ची पुस्तके उपलब्ध
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्वर औरंगाबाद
9762178178
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2018

अधिकृत संकेतस्थळ : https://www.maharashtra.gov.in
फिनलंड - 2018 वैश्विक आनंदीपणा निर्देशांकात प्रथम स्थानी

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या 156 देशांच्या ‘2018 वैश्विक आनंदीपणा निर्देशांक’ (Global Happiness Index) यामध्ये फिनलंड हा युरोपीय देश अग्रस्थानी आहे.

हा अहवाल आनंदीपणाची पातळी तपासणार्‍या उत्पन्न, आयुर्मान, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, विश्वास आणि भ्रष्टाचार यांसारख्या घटकांवर आधारित आहे.
#index
अहवालाच्या ठळक बाबी

क्रमवारीत शीर्ष 10 देशांमध्ये नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड्स, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. अमेरिका 18 व्या स्थानी आहे.

क्रमवारीत भारत मागील वर्षाच्या 122 वरून घसरून 133 व्या क्रमांकावर आला आहे.

2008-2010 ते 2015-2015 या काळात आनंदीपणात झालेल्या बदलांच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, टोगो हा याबाबतीत सर्वाधिक प्रगती साधलेला देश आहे. 2015 सालच्या क्रमवारीत शेवटी असलेल्या टोगोने एकूणच क्रमवारीत 17 स्थानांनी वर झेप घेतली आहे. तर व्हेनेझुएला हा सर्वाधिक अपयशी देश आहे.

फिनलंड या अहवालात सर्वसाधारणपणे सर्वात आनंदी स्थलांतरित आणि सर्वात आनंदी स्थानिक लोकसंख्या अश्या दोन्ही क्रमवारीत अग्रस्थानी आहे,

अहवालात लठ्ठपणा, औषधी गोळी घेण्याचे वाढते प्रमाण आणि उदासीनता या तीन उदयोन्मुख आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अमेरिकेत या तीनही समस्या इतर देशांच्या तुलनेनी वेगाने वाढत आहे.

फिनलंड विषयी

हा सर्वात स्थिर व सुरक्षित देश आहे. 2015 साली हत्येचा दर एक लाखामागे केवळ 1.28% होता. देशाची एकूण लोकसंख्या 55 लक्ष आहे. संगठित गुन्हे तेथे नाहीत. पोलीस अधिक विश्वसनीय आणि सक्षम आहेत. देशात पोलीस आणि इंटरनेट सुरक्षा यांना जगात दुसर्‍या क्रमांकाची गणल्या जाते. नागरिकांचा राजकीय नेता, न्यायव्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेवर विश्वास आहे. तेथे भ्रष्टाचार सर्वाधिक कमी आहे.

देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट आहे. तेथे कोणीही बेघर नाहीत. प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षा, भत्त्यांसह अनेक अधिकार आणि सुविधा उपलब्ध आहेत.

स्थलांतरितांसाठी आणि निर्वासितांसाठी हा देश लोकप्रिय आहे. देशात 3 लाखांपर्यंत स्थलांतरित लोक आहेत. तेथे कमी दरात भाड्याने घरे उपलब्ध होतात. देशात दर चौ. किलोमीटरमध्ये जवळजवळ 18 लोक आहेत.

देशात निवडणुका सुयोग्य स्थितीत होतात. देशात सर्वाधिक वैयक्तिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तेथे वृत्तसंस्थांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

संशोधन आणि प्रशिक्षण यावर मोठा खर्च केला जातो. त्यामुळे सर्वाधिक योग्‍य प्रतिभावंत तयार करणारा देश ठरला आहे. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, उच्च शिक्षणाची पातळीमध्ये जगात तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. व्यवसायासाठी हा यूरोपमधला तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

स्त्री-पुरुष समानतेमध्ये हा जगातला पाचवा देश आहे. सर्वाधिक महिला आमदार/खासदार असलेल्या देशांमध्ये तिसरा देश आहे.

देशात जन्मदर सर्वाधिक कमी आहे, मात्र देशात आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. असे आढळून आले आहे की समृद्धी व संपन्नता असूनही लोकांमध्ये उदासीनता आहे.
#current
राष्ट्रीय #current
Indian Science Congress

या ठिकाणी "रिचिंग द अनरिच्ड थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी" या विषयाखाली ‘2018 भारतीय विज्ञान काँग्रेस (ISC)’ भरविण्यात आली - इंफाळ.
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#polity

राज्यशास्त्र सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

167. खालील विधानांचा विचार करा.

अ. श्रीमंत-गरीब असा भेद न करता , सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी देणे आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य पुरवणे ही तरतूद राज्यघटनेच्या कलम 38-A मध्ये केलेली आहे.

ब. राज्याद्वारे मोफत कायदेविषयक सहाय्य तरतूद 42 व्या घटना दुरूस्तीने समाविष्ट करण्यात आली आहे.

पर्याय
⚪️अ,ब दोन्ही योग्य
⚫️अ,ब दोन्ही अयोग्य
🔴फक्त अ योग्य
🔵फक्त ब योग्य
Vasudeo Ronge Upsc Pune:
UPSC Pre 2018

Target-30

Environment & Polity Module

Under the guidance of
Dr. Sudarshan Lodha (AIR-571)
&
Vasudeo Ronge

Reg. Compulsory

Cont: 9717577536 / 8830115524
22_2018_Inspector_Certified_School.pdf
184.5 KB
महिला व बालविकास जाहिरात
जॉईन करा @eMPSCguidance