🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
दिल्लीतील अत्यंत नामवंत कोचिंग क्लास मध्ये शिकवण्याचा अनुभव असलेले माझे मित्र रोंगे सर हे यांनी Test Series सुरु केली आहे ,कृपया UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवा .
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

123. पणजी , गोवा इथे पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये "इंडियन फिल्म पर्सनालिटी ऑफ द इअर" पुरस्कार - 2017 कोणत्या भारतीय अभिनेता/अभिनेत्रीस प्रदान करण्यात आला?

⚪️अक्षय कुमार

⚫️विद्या बालन

🔴अमिताभ बच्चनअचूक उत्तर

🔵प्रियांका चोप्रा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

124. लोकसभेच्या महासचिव पदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

⚪️1.अनुप मिश्रा

⚫️2. सचदेव अग्निहोत्री

🔴3. स्नेहलता श्रीवास्तव अचूक उत्तर

🔵4. नरेश चांडक
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

125. अ. 3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.
ब. WHO च्या अंदाजानुसार जगात 36.7 दशलक्ष एड्स बाधित रुग्ण आहेत.

क. 2017 एड्स दिनाचा विषय - Right to health हा होता.

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

पर्याय
⚪️1. अ,ब,क
⚫️2. अ,ब
🔴3. ब,कअचूक उत्तर(एड्स दिन 1 डिसेंबर रोजी )
🔵4. अ,क
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#History

126. कुंभमेळा भारतात सुरू करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या राजास दिले जाते?
⚪️हर्षवर्धनअचूक उत्तर
⚫️पुष्यमित्र शुंग
🔴चंद्रगुप्त मौर्य
🔵कुमारगुप्त
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#Science

विज्ञान सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

127. लिटमस कागद हा खालीलपैकी कोणत्या लायकेनपासून बनवलेला असतो?

⚪️1. रोसेला टिकटोरिया
⚫️2. ट्रॅकोडेसमियम
🔴3. कॅराजिनिंन
🔵4. जेलीरियम
🔹 MPSC चे निकाल ठप्प, आरक्षणावरून गोंधळ : सरकारची भूमिकाही अस्पष्ट



🔺 राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे निकाल/मुलाखती या समांतर आरक्षणाबाबतच्या एका वादाच्या मुद्द्यावरून दोन-अडीच महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत.



◾️ राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणा-या विविध परीक्षांचे निकाल/मुलाखती या समांतर आरक्षणाबाबतच्या एका वादाच्या मुद्द्यावरून दोन-अडीच महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. एकीकडे घोटाळ्यांनी एमपीएससी गाजत असताना आता निकालच लागत नसल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

राज्य शासनाने १३ आॅगस्ट २०१४ रोजी एक ‘जीआर’ काढून एमपीएससीमार्फत भरती करताना समांतर आरक्षण कशा पद्धतीने लागू करावे याची कार्यपद्धती निश्चित केली होती. समांतर आरक्षण हे महिला, माजी सैनिक आणि खेळाडू यांना दिले जाते. त्यात उदा. एखादे पद अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असेल व त्यातील उमेदवार मिळाला नाही, तर ते अन्य प्रवर्गास देता येणार नाही. नंतर सामान्य प्रशासन विभागाने असे स्पष्टीकरण काढले की, आरक्षित प्रवर्गातील महिला उमेदवार नसेल तर त्याच प्रवर्गातील पुरुष उमेदवारास संधी देता येईल. त्यानुसार बºयाच पदांबाबत निवड प्रक्रियाही राबवली. समांतर आरक्षण हे बहुतेक सर्वच पदांच्या निवडीत असल्याने एमपीएससीमार्फतचे सर्व निकाल अडकून पडले आहेत.

या समांतर आरक्षणाच्या या पद्धतीस न्यायालयात आव्हान देण्यात आले. काही प्रकरणांमध्ये सरकारची भूमिका फेटाळून लावणारे निकाल झाले. ज्या विशिष्ट प्रर्वगासाठी पद आरक्षित आहे त्या प्रवर्गाशिवाय दुसºया प्रवर्गातील अधिक गुण मिळालेल्या उमेदवारास संधी देण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने शासनाची बाजू योग्य ठरविली.

या पार्श्वभूमीवर, एमपीएससीने सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला मागितला. शासनाने १३ आॅगस्ट २०१४ रोजी काढलेल्या जीआरनुसारच निवड प्रक्रिया यापुढेही राबवावी, असे विभागाने स्पष्ट केले. तथापि, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचवेळी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने समांतर आरक्षण असलेल्या निवड, मुलाखतीसह सर्वच प्रक्रियेला स्थगिती दिली आणि महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरणाने (मॅट) आता अशा सर्व प्रकरणांवर निकाल द्यावा व तोवर प्रक्रियेवरील स्थगिती कायम ठेवावी, असा आदेश दिला आहे.

आता निवड प्रक्रिया शासनाच्या की न्यायालयाच्या आदेशाने राबवावी या पेचात लोकसेवा आयोग सापडला व ज्या-ज्या पदांमध्ये समांतर आरक्षण आहे त्यांचे निकालच अडीच महिन्यांपासून स्थगित केले आहेत. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी आयोगाची अवस्था झाली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची तिढा सोडविण्याबाबत अनास्था दिसत आहे.

🔴>भरती अडकली

जे निकाल वा मुलाखती अडलेल्या आहेत त्यात अभियांत्रिकी कॅडर, विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य सेवेतील नायब तहसीलदारापासून उपजिल्हाधिकाºयांपर्यंतची
१७ प्रकारची पदे (तहसीलदार, बीडीओ आदी) सहपोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे.

©
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «🔹 MPSC चे निकाल ठप्प, आरक्षणावरून गोंधळ : सरकारची भूमिकाही अस्पष्ट 🔺 राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घेण्यात येणाºया विविध परीक्षांचे निकाल/मुलाखती या समांतर आरक्षणाबाबतच्या एका वादाच्या मुद्द्यावरून दोन-अडीच महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत.…»
🌾🌾🌾सर्व शेतकरी बांधव ज्या आयोगाच्या शिफारशिंची लागू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत ,तो स्वामिनाथन आयोग नेमका काय आहे हे जाणून घ्या 👍
https://mpscguidance.blogspot.in/2016/10/swaminathan-committee-report-on.html
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant

128. ब्लु कॉलर कामगार/नौकरदार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस म्हंटले जाते?

⚪️1.प्राथमिक क्षेत्र
⚫️2. द्वितीयक क्षेत्र
🔴3. तृतीयक क्षेत्र
🔵4. चतुर्थक क्षेत्र
#Rajyaseva_2018
#Combined_Prelim_2018
#economics

अर्थशास्त्र सरावप्रश्न
संकलन- @khedkar_prashant

129. पंचम क्षेत्रात काम करणारे कामगार/नौकरदार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात?
⚪️1. गुलाबी कॉलर कामगार
⚫️2. लाल कॉलर कामगार
🔴3. पांढरे कॉलर कामगार
🔵4. सुवर्ण कॉलर कामगार
#Rajyaseva_2018

प्राचीन इतिहास सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant

130. युद्धस्थळी मारला गेलेला इतिहासातील दिल्लीचा एकमेव सुलतान कोण?
⚪️1. मुबारक शाह
⚫️2. अल्लाउद्दीन खिलजी
🔴3. इब्राहिम लोधी
🔵4. फिरोजशहा तुघलक
नवीन चलनात आलेल्या 50,200