🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
चालू घडामोडी:-

---------------------------------------------
१) डोनाल्ड ट्रम्प:-
• रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प याने पुरेशा फरकाने अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली (२८९ विरुद्ध २१८)
• त्यानी १९६८ मध्ये पेन्सिलवेनिया विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे
• १४ जून १९४६ रोजी जन्म झालेले ट्रम्प हे आतापर्यंत अध्यक्ष पद धारणकरणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत (वय ७० वर्ष) या अगोदर रोनाल्ड रीगन ६९ वर्ष ११ महिने असताना राष्ट्रपती झाले होते
• ते अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष आहेत

२) जुआन मॅन्युएल सँटोस:-
* हे कोलंबियाचे अध्यक्ष आहे (२०१० मध्ये सँटोस यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली)
* कोलंबिया येथील फार्क बंदखोराच्या संघटनेमधील यादवी युद्ध संपूष्टाट आणण्यासाठी जुआन मॅन्युएल सँटोस यांना २०१६ सालचा ' शांततेचा' नोबेल पारितोषिक जाहीर झाला

३) जोड्या लावा उत्तरे
• रजत चौहान – तिरंदाजी
• सुब्रता पॉल – फुटबॉल
• शिवा थापा – बॉक्सिंग
• व्ही आर रघुनाथ – हॉकी

४) पी.व्ही.सिंधू:-
• पी.व्ही.सिंधू ही ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकून देणारी पहिली महिला ठरली
• साक्षी मलिक ही कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे
• साक्षी मलिक ही भारतीयामधून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी महिला खेळाडू आह
• पी.व्ही.सिंधू ही भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात लहान वयाची खेळाडू ठरली आहे(वय २१ वर्ष)

५) देवेंद्र झाझरिया:-
• त्याने पॅरा लिम्पिकमध्ये, २०१६ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले
• त्यानी पॅरा लिम्पिकमध्ये, २००४ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले
• त्यानी २००४ मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त केला (२०१२ साली त्याला पद्मश्री हा किताबही देण्यात आला होता)

६) कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा २०१६:-
• सर्वात जुनी स्पर्धा आहे (१९१६)
• विजेता(२०१६):- चिली .उपविजेता :-अर्जेंटिना
• गोल्डन बॉल – अॅ१लेक्सिस सांचेझ (३ गोल)
• गोल्डन बूट – एडुआडरे व्हॅर्गास (६ गोल)
• गोल्डन ग्लोज – क्लाउडीओ ब्राव्हो

७) जोड्या लावा ;-
पद्म विभूषण - अविनाश दीक्षित
• पद्म भूषण - राम वी सुतार
• पद्मश्री - मधुर भंडारकर
• रामानुजन पुरस्कार - अमलेंदु कृष्णा

८) कमाॅव्ह;- २२६ टी :-
• नुकताच भारत आणि रशियाने कमाॅव्ह;- २२६ टी हेलिकॉप्टर सयुक्तपणे उत्पादित करण्याचा करार केला आहे (रशियाची रोस्टेक कंपनी द्वारा कामोव हेलीकॉप्टर ची निर्मिती भारतात एचएएल हिन्दुिस्ताषन एयरोनॉटिक्सा लिमिटेड... द्वारे केली जाणार आहे )
• कमाॅव्ह;- २२६ टी ही चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर जागा घेतील
• कमाॅव्ह हे दोन इंजिन असलेले लहान हेलिकॉप्टर आहे

९) बिमस्टेक (द बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अॅोन्ड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन) या सात राष्ट्रांच्या संघटनामध्ये भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड श्रीलंकेया देशांचा समावेश आहे दक्षिण आणि पूर्व या आशियाई खंडाना एकत्र आणणारी ही संघटना आहे . या संघटनेच्या सर्व सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना गोव्यातील ब्रिक्स परीषदेसाठी निमत्रीत करण्यात आले होते

१०) नीती आयोगाने नुकतीच कृषी व्यापार आणि शेतकरी मैत्री सुधारणा सूची (दर्शक) तयार केली आहे. कोणत्या राज्याने विविध सुधारणांच्या अमलबजावणीमध्ये प्रथमच स्थान प्राप्त केले आहे :-महाराष्ट्र

११) बराक ओबामा यांची पुस्तके:-
• आत्मचरित्र :-ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father)
• द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले
• पुस्तका वर आधारित आडियो बुक ला २००८ मध्ये प्रतिष्ठित ग्रैमी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले होते

१२) बराक ८:-
* डी.आर.डी.ओ आणि इस्राईल यांनी विकसित केलेले अत्याधुनिक क्षेपणास्त्र
* बराक ८ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे लांब पल्याचे क्षेपणास्त्र आहे
* माऱ्याचा पल्ला:- ६० ते ८० कि.मी
* वेग:- २ मॅच(प्रती सेंकद १ किमी)
* सरक्षणदलाची सवेंदलशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई सरक्षनासाठी प्रभावी

१३) कैलास सत्यार्थी:-
• त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५४ रोजी मध्यप्रदेशमध्ये विदिशा या गावी झाला
• त्यानी इलेक्ट्रिक इंजिनिअरींग पदवी प्राप्त केली
• त्यानी बचपन बचाओ आंदोलना ची स्थापना केली
• त्यानी ग्लोबलमार्च अगेन्स्ट चाईल्ड लेबरचे नेतृत्व केले

१४) भारताच्या कोणत्या राज्यामध्ये पहिल्या मेरीटाईम इंडिया परिषदेचे आयोजन करण्यात आले:-महाराष्ट्र
(मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे कन्व्हेंशन ॲन्ड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित पहिली मेरीटाईम इंडिया परिषद 14 एप्रिल 2016 रोजी आयोजित केली होती. कोरिया हा देश सहयोगी आयोजक असणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत जगातील 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.)

१५) १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने कोणतीयोजना सुरु केली? :-माझी कन्या