🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Environment
एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स-2018’ मध्ये भारताचा 177 वा क्रमांक

वैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण 180 देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत 177 व्या स्थानी आहे.

10 श्रेणीत विविध 24 मुद्द्यांवर संशोधन करून हा अहवाल तयार केला गेला आहे. यामध्ये वायूची गुणवत्ता, जल व स्वच्छता, कार्बन उत्सर्जन तीव्रता (GDP च्या प्रति संयंत्र उत्सर्जन), जंगलतोड आणि सांडपाण्यावर उपचार प्रक्रिया या बाबींचा समावेश आहे.

🧐ठळक बाबी

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नियमित प्रयत्न करणार्‍या देशांमध्ये स्वित्झर्लंड प्रथम स्थानी आहे. त्यानंतर फ्रांस, डेनमार्क, माल्टा आणि स्वीडन यांचे शीर्ष 5 मध्ये स्थाने आहे. यादीत शेवटच्या पाच देशांमध्ये भारत, बांग्लादेश, बुरुंडी, कांगो प्रजासत्ताक आणि नेपाळ यांचा समावेश आहे.

भारताच्या शेजारी राष्ट्रांचा - चीन आणि पाकिस्तानचा क्रम यादीत अनुक्रमे 120 आणि 169 वा आहे. चीन आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पर्यावरणावर लोकसंख्या वाढीचा भार आणि वेगाने वाढणार्‍या आर्थिक परिस्थितीचा भार दिसून येत आहे. वायूची गुणवत्ता हे सार्वजनिक आरोग्यासाठी एक प्रमुख कारण म्हणून उदयास आले आहे.
वर्ष 2016 मध्ये, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन यांच्या अहवालानुसार, संपूर्ण वर्षभरात पर्यावरणाशी संबंधित मृत्यू आणि आलेले अपंगत्व यांच्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषनामुळे झालेल्या मृत्युचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश इतके आहे. अतिसूक्ष्म PM2.5 कणामुळे मरणार्‍यांची संख्या गेल्या दशकात वाढलेली आहे. एका अंदाजानुसार, भारतात वायू प्रदूषणामुळे 16,40,113 मृत्यू वर्षाला होतात. भारत सरकारची कारवाई असूनही, घन इंधनापासून होणारे प्रदूषण, कोळसा आणि पीकांचे अवशेष जाळण्यामुळे होणारे प्रदूषण आणि मोटार वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे देशातील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. भारताच्या पर्यावरण मंत्रालयाकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया उपलब्ध नाही.

☺️एनवायर्नमेंट परफॉर्मेंस इंडेक्स बाबत

हा निर्देशांक शासनाद्वारे त्याच्या क्षेत्रात राबवविलेल्या पर्यावरण सुधारणा कार्यक्रम आणि त्याच्याशी संबंधित धोरणांचे आकलन करते. हा अहवाल पहिल्यांदा वर्ष 2002 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

हा अहवाल येल विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठ यांच्याद्वारे तयार केला जातो. यामध्ये जागतिक आर्थिक मंच (WEF) आणि जॉइंट रिसर्च सेंटर ऑफ यूरोपियन कमिशन देखील सामील असतात.

संपर्क व सुचना
@kiranjadhav
👉मित्रांनो सर्वाना एक महत्वाची सूचना
Google ने Doodle नावाची एक सुविधा विविध व्यक्ती ,संस्था इ. ना श्रद्धांजली किंवा त्यांची आठवण म्हणून सुरु केली आहे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय नौसेनेचे जनक म्हणून ओळखले जातात,त्यांच्याविषयी अजून पर्यंत एकही Doodle आले नाही. येत्या 19 फेब्रुवारी ला महाराजांची जयंती जगभर साजरी होत असते.
तरी ज्या लोकांना वाटत असेल कि महाराजांचे Doodle गूगल ने त्या दिवशी टाकावे,त्यांनी कृपया खालील ई-मेल ,दिलेल्या पत्त्यावर पाठवावा .सोबत doodle चे दिलेले चित्र पण पाठवा.
असे किमान 5000 मेल जरी गेले तरी 19 फेब्रुवारी ला सर्व भारतात महाराजांचा doodle दिसेल.तरी सर्वांनी ई-मेल करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा संदेश पाठवा.🙏🙏🙏
To: proposals@google.com

Subject: Request for Doodle of Chhatrapati Shivaji on 19 February 2018

Message:
Chhatrapati Shivaji was the first Indian king to realise and act upon the importance of a strong navy. The first keel of the Maratha naval vessel was laid down in a creek near Kalyan in the year 1654. He also oversaw construction of several naval bases across the coast of present-day Maharashtra. Shivaji Maharaj is considered the father of Indian navy.

19 February is celebrated all over world as a birth anniversary of the Great Chhatrapati Shivaji. So , I Request Google India team to please launch a Google Doodle on this 19 February 2018 in the memory of Chhatrapati shivaji "Father of indian Navy"

Thank You
#Rajyaseva_2018
#Geography
#Environment

संकलन - प्रशांत खेडकर

भूगोल व पर्यावरण प्रश्न

31. डायनोसॉर जातीची 'स्फनॉडोअर' पाल जगातील एकमेव कोणत्या देशात आढळते?

⚪️न्यूझिलँड

⚫️नॉर्वे

🔴स्वित्झरलँड

🔵आईसलँड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती व विविध कालखंड - सराव प्रश्न

संकलन - प्रशांत खेडकर
SHIVAJI KON HOTA - GOVIND PANSARE.pdf
11.2 MB
शिवाजी कोण होता ? गोविंद पानसरे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विविध पैलूंचा "निःपक्ष"पणे वेध घेणारे पुस्तक. नक्की वाचा👌👍
#Rajyaseva_2018
#Modern_History

संकलन - प्रशांत खेडकर
@Khedkar_prashant

इतिहास विषयावरील प्रश्न

32. सायमन कमिशनचा विरोध करणे अथवा समर्थन करणे यावरून 1928 साली खालीलपैकी कोणत्या पक्षात फूट पडली होती?

⚪️काँग्रेस

⚫️मुस्लिम लीग

🔴भारतीय कम्युनिस्ट पार्टी

🔵हिंदू महासभा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History
संकलन - प्रशांत खेडकर
आधुनिक इतिहास सराव प्रश्न
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडीवरील प्रश्न

27. खालील विधानातून योग्य विधाने ओळखा.

अ. स्कॉर्पियन श्रेणीच्या आय एन एस करंज या पाणबुडीचे जलावतरण मुंबई इथे पार पडले.

ब. आय एन एस करंज स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी आहे.

क. आय एन एस करंजची बांधणी प्रोजेक्ट 75 अंतर्गत झाली आहे.


पर्याय

⚪️अ, ब,कअचूक उत्तर
⚫️अ, ब
🔴अ, क
🔵ब,क
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी प्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर

28. नुकताच फ्रांस देशाचा सर्वोच्च लिजन दि ऑनर हा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीस प्रदान करण्यात आला आहे?

⚪️मुकेश अंबानी

⚫️लता मंगेशकर

🔴सौमित्र चॅटर्जी अचूक उत्तर

🔵इंद्रा नुयी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

29. जागतिक स्टील असोसिएशन द्वारे नुकत्याच जारी अहवालानुसार जगात क्रूड स्टील उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

⚪️पहिला

⚫️दुसरा

🔴तिसरा अचूक उत्तर

प्रथम स्थानी - चीन
द्वितीय - जपान
तृतीय - भारत
चतुर्थ - अमेरिका

🔵चौथा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न
संकलन- प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

30. नुकतेच कोणत्या राज्य शासनाद्वारे शून्य अर्थसंकल्प नैसर्गिक शेती प्रकल्प सुरू करण्यात आले आहे?

⚪️सिक्कीम ( सेंद्रिय शेती सुरू केली आहे)

⚫️केरळ

🔴पंजाब

🔵हिमाचल प्रदेश अचूक उत्तर
Zero Budget Natural Farming Project initiated By Himachal Pradesh
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography

पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती व विविध कालखंड - सराव प्रश्न

संकलन - प्रशांत खेडकर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆 उत्तरे - भूगोल
प्रश्न 1- पर्याय क्रमांक 2 paleozoic period

प्रश्न क्रमांक 2 - पर्याय क्रमांक 1
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
#Environment

संकलन - प्रशांत खेडकर

भूगोल व पर्यावरण प्रश्न

31. डायनोसॉर जातीची 'स्फनॉडोअर' पाल जगातील एकमेव कोणत्या देशात आढळते?

⚪️न्यूझिलँड अचूक उत्तर

⚫️नॉर्वे

🔴स्वित्झरलँड

🔵आईसलँड
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History

संकलन - प्रशांत खेडकर
@Khedkar_prashant

इतिहास विषयावरील प्रश्न

32. सायमन कमिशनचा विरोध करणे अथवा समर्थन करणे यावरून 1928 साली खालीलपैकी कोणत्या पक्षात फूट पडली होती?

⚪️काँग्रेस

⚫️मुस्लिम लीग अचूक उत्तर (सायमन कमिशनचा समर्थन करण्यावरून मतभेद होऊन महंमद शफी यांच्या नेतृत्वाखाली एक गट मुस्लिम लीग मधून फुटून बाहेर पडला होता)

🔴भारतीय कम्युनिस्ट पार्टी

🔵हिंदू महासभा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Modern_History
संकलन - प्रशांत खेडकर
आधुनिक इतिहास सराव प्रश्न
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
इतिहास सरावप्रश्न उत्तरे 👆👆👆👆

प्रश्न क्रमांक 30- अचूक पर्याय 3 ब,ड,इ,फ

प्रश्न क्रमांक 31 - पर्याय क्रमांक 2 - मुस्लिम लीग

प्रश्न क्रमांक 32 - पर्याय क्रमांक 4 अ, ब दोन्ही विधाने योग्य आहेत.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
👆👆👆👆आज दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी दिलेल्या सर्व सराव प्रश्नांची उत्तरे