🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from VAibhAV
प्राचीन भारत Topic वर आधारित 50 प्रश्न
9 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश हागणदारीमुक्त
1
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Mayur Dumbre)
🔘चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न

@RajyasevaSTI

सूचना व शंका संपर्क
@Mayur_19pk
#Geography
🔹भारताची ‘मिसाईल पॉवर’

◾️गेल्या आठवड्यात भारताने पृथ्वी-2 आणि अग्नि-1 या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या केल्या. आपल्या संरक्षण सिद्धतेची ताकद जगाला खासकरून चीन आणि पाकला दाखवण्यासाठी या चाचण्या आवश्यक होत्या. या निमित्ताने भारताच्या या ताकदीचा घेतलेला हा आढावा. एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला.


🔺पृथ्वी-1

सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.

🔺अग्नि-1

अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.

🕸आकाश

जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.

🐍नाग

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.

🔸त्रिशूल

जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.

🔻अग्नि 2

एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.

🔻पृथ्वी 3

नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.

⚫️ब्राह्मोस

भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

🔴सागरिका

समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.

♻️धनुष

पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

🔺अग्नि-3

अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.

🔺अग्नि-4

पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.

🔺अग्नि-5

भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.

🔘निर्भया

जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.

🔺प्रहार

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.
#Geography

भारताचा वन अहवाल – २०१७ जाहीर

भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात २०१५ पासून तर २०१७ पर्यंतच्या दोन वर्षांच्या काळात ८,०२१ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. भारताचा वनअहवाल २०१७ सोमवारी पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी प्रकाशित केला. या अहवालात गेल्या दोन वर्षांत भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात एक टक्का वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रत्येक दोन वर्षांनी भारताचा वनअहवाल प्रकाशित केला जातो.

भारताचे एकूण वनक्षेत्र ७ लाख ८ हजार २७३ चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के आहे. वृक्ष आणि वनक्षेत्र मिळून ८ लाख २,०८८ चौरस किलोमीटर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.३९ टक्के आहे. २०१५च्या तुलनेत भारताच्या घनदाट जंगलात १.३६ टक्क्याने वाढ झाली आहे. जंगल क्षेत्रातील वाढ ६,७७८ चौरस किलोमीटर असून वृक्षाच्छादन १ हजार २४३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७७ हजार ४१४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेश ६६ हजार ९६४ आणि छत्तीसगड ५५ हजार ५४७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रासंदर्भात वनक्षेत्राच्या टक्केवारीनुसार लक्षद्वीप ९०.३३ टक्के आणि त्यापाठोपाठ मिझोराम ८६.२७ टक्के तसेच अंदमान व निकोबार बेटे ८१.७३ टक्केआहे. या सर्वेक्षणात प्रथमच जलाशयांचे मूल्यांकन करण्यात आले असून गेल्या दशकात वनक्षेत्रात २ हजार ६४७ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे.


दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील वनक्षेत्र

अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३ लाख ७ हजार ७१३ चौ. किमी आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौ.किमी. क्षेत्र वनव्याप्त असून ते भौगालिक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात ८ हजार ७३६ चौ.किमी. हे अति घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल, २१ हजार २९४ चौ. किमी विरळ जंगल तर ४ हजार १६० चौ. किमी खुरटे जंगल आहे. राज्यात एकूण ७ डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अति घनदाट जंगल ३१५, मध्यम घनदाट जंगल ७ हजार २४५, विरळ जंगल ८ हजार ५९ आणि खुरटे जंगल १ हजार ४१५ चौ. किमी आहे.

पाणथळ, खारफुटी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

या अहवालानुसार जंगलातील पाणथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पाणथळ क्षेत्र ४३२ चौ.किमी. आहे. तर ४२८ चौ.किमी. सह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे यादीत ३८९ चौ.किमी. सह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौ. किमी एवढी वाढ झाली असून यात एकटय़ा महाराष्ट्राचा वाटा ८२ चौ. किमी. एवढा आहे.

-सूचना व शंका संपर्क @kiranjadhav
MpSC पदांच्या भरतीबद्दल सद्य स्थिती
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी वरील प्रश्न

21. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या भारतीय राज्य वन अहवाल 2017 नुसार खालील विधानातून अयोग्य विधाने/विधान ओळखा.

अ. भारताचा 24.4% भाग वनांनी व्यापलेला आहे.

ब. अन्न व कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारत वन वार्षिक वाढीत जगात 8 व्या क्रमांकावर आहे.

क.सर्वाधिक वनांची वाढ आंध्रप्रदेश राज्यात झाली आहे.

ड. सर्वाधिक वन क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे.

इ. सर्वाधिक वनांचे प्रमाण अरुणाचल प्रदेश राज्यात आहे.

फ. भारताच्या एकूण वनांत खुल्या वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.


पर्याय-

⚪️ क,इ

⚫️ इ,फ

🔴ब,क

🔵अ, ब,क,इ,फ
#Rajyaseva_2018
#Environment

22. पर्यावरणात सजीवाना प्राप्त होणारा ऑक्सिजन खालीलपैकी कोणत्या जैव-रासायनिक चक्रातून प्राप्त होतो?


अ. कार्बन चक्र

ब. ऑक्सिजन चक्र

क. नायट्रोजन चक्र

ड. Phosphorus चक्र

इ. जल चक्र

पर्याय

⚪️ फक्त ब

⚫️ अ, ब

🔴अ, ब, इ

🔵वरील सर्व
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#NCERT_Economics

प्रश्न संकलन -Prashant Khedkar
@khedkar_prashant

अर्थव्यवस्था सराव प्रश्न

23. Fiat Money मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ. कागदी नोटा
ब. सोने
क. कर्जरोखे
ड. नाणे

पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब,ड
🔴अ,ड
🔵ब,क
#Rajyaseva_2018
#NCERT_Economics

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

अर्थशास्त्र सरावप्रश्न

24.
अ. स्थिर मूल्यानुसार काढलेला GDP हा वास्तव GDP म्हणून ओळखला जातो.

ब. चालू किमतीस काढलेला GDP Nominal अथवा किरकोळ GDP म्हणून ओळखला जातो.

क. सध्या GDP मोजणीसाठी आधारभूत वर्ष 2011-12 हे आहे.

वरील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा.

पर्याय.

⚪️अ,ब,क
⚫️अ, ब
🔴फक्त क
🔵वरीलपैकी एकही नाही
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी वरील प्रश्न

21. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या भारतीय राज्य वन अहवाल 2017 नुसार खालील विधानातून अयोग्य विधाने/विधान ओळखा.

अ. भारताचा 24.4% भाग वनांनी व्यापलेला आहे.

ब. अन्न व कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारत वन वार्षिक वाढीत जगात 8 व्या क्रमांकावर आहे.

क.सर्वाधिक वनांची वाढ आंध्रप्रदेश राज्यात झाली आहे.

ड. सर्वाधिक वन क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे.

इ. सर्वाधिक वनांचे प्रमाण अरुणाचल प्रदेश राज्यात आहे.

फ. भारताच्या एकूण वनांत खुल्या वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.


पर्याय-

⚪️ क,इ

⚫️ इ,फ अचूक उत्तर

स्पष्टीकरण- (सर्वाधिक वनांचे प्रमाण - लक्षद्वीप 90.33% या केंद्रशासित प्रदेशात तर मिझोराम 86.27% राज्यात आहे.
भारतात वनांचे सर्वाधिक प्रमाण घनदाट वनांचे आहे.)

🔴ब,क

🔵अ, ब,क,इ,फ
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Environment

22. पर्यावरणात सजीवाना प्राप्त होणारा ऑक्सिजन खालीलपैकी कोणत्या जैव-रासायनिक चक्रातून प्राप्त होतो?


अ. कार्बन चक्र

ब. ऑक्सिजन चक्र

क. नायट्रोजन चक्र

ड. Phosphorus चक्र

इ. जल चक्र

पर्याय

⚪️ फक्त ब

⚫️ अ, ब अचूक उत्तर
स्पष्टीकरण - जैव-रासायनिक चक्रापैकी केवळ कार्बन व ऑक्सिजन चक्रातून प्राप्त होणारा ऑक्सिजनच सजीव वापरू शकतात.
जल चक्रातून ऑक्सिजन तयार होत नाही).
🔴अ, ब, इ

🔵वरील सर्व
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#NCERT_Economics

प्रश्न संकलन -Prashant Khedkar
@khedkar_prashant

अर्थव्यवस्था सराव प्रश्न

23. Fiat Money मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ. कागदी नोटा
ब. सोने
क. कर्जरोखे
ड. नाणे

पर्याय
⚪️अ,ब,क,ड
⚫️अ,ब,ड
🔴अ,डअचूक उत्तर(Fiat money म्हणजे कागदी नोटा , नाणे , परकीय चलन होय)
🔵ब,क
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#NCERT_Economics

प्रश्न संकलन - प्रशांत खेडकर
@khedkar_prashant

अर्थशास्त्र सरावप्रश्न

24.
अ. स्थिर मूल्यानुसार काढलेला GDP हा वास्तव GDP म्हणून ओळखला जातो.

ब. चालू किमतीस काढलेला GDP Nominal अथवा किरकोळ GDP म्हणून ओळखला जातो.

क. सध्या GDP मोजणीसाठी आधारभूत वर्ष 2011-12 हे आहे.

वरील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा.

पर्याय.

⚪️अ,ब,क अचूक उत्तर
⚫️अ, ब
🔴फक्त क
🔵वरीलपैकी एकही नाही
#Rajyaseva_2018
#current_affairs

चालू घडामोडी सराव प्रश्न

प्रश्न संकलन - @khedkar_prashant

25. अ.साहित्‍य अकादमीच्या अध्‍यक्ष पदी कन्नड साहित्यातील चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली आहे.

ब. हम्‍पीमधील कन्‍नड विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू म्हणून चंद्रशेखर कंबार यांनी कार्य केले आहे.

क. साहित्य अकादमीची स्थापना 1956 साली करण्यात आली आहे.

वरील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा

पर्याय
⚪️अ,ब,क

⚫️अ, ब

🔴ब,क

🔵अ, क
Forwarded from VAibhAV
महत्तवाच्या प्रकरणांच्या मांडणीनुसार घटनादुरुसाती