🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#csat
एका कंपनीत 3 जण तेलगू व 3 जण मराठी बोलणारे लोक आहेत.प्रत्येकाला असे 1 रहस्य माहित असते जे कि कोणाला माहित नसते. त्यांना हि रहस्ये एक मेकांना फोन करून सांगायची आहेत(Exchange).ज्यामुळे प्रत्येकाला 6 रहस्ये माहित होतील. एकाही तेलगू बोलणाऱ्याला मराठी येत नाही पण एका मराठी माणसाला तेलगू येते. वरील कामासाठी कमीत कमी किती फोन कॉल करावे लागतील.??
⚪️7 ⚫️10 🔴15 🔵9
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#HISTORY

NCERT सराव प्रश्न

प्रश्न क्रमांक 11 ते 14
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#NCERT_History

NCERT सराव प्रश्न

प्रश्न क्रमांक 14 , 15

अत्यंत महत्वाच्या संघटना योग्य जोड्याचा पर्याय ओळखा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
उत्तरे प्रश्न क्रमांक
11. - 1 . स्वामी विवेकानंद
12. - 3. मॅडम ब्लाव्हाटास्की
13. - 3. फक्त ब. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी थिओसॉफिकल सोसायटी हि त्यातील एकमेव संस्था होती.

सत्यशोधक समाज , ब्राम्हो समाज व प्रार्थना समाज या संस्था एकेश्वरवादी , पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणाऱ्या होत्या.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
उत्तर प्रश्न क्रमांक 14 - 4. फक्त ब - राधाकांत देव यांचा सती प्रथेस पाठिंबा होता. ते सती प्रथेस योग्य समजत.

प्रश्न क्रमांक 15- उत्तर पर्याय 1.

योग्य जोड्या

1. थिओफिलांथ्रोपिक सोसायटी - किशोरचंद्र मिश्रा

2. साधारण ज्ञान प्राप्ती समाज - ताराचंद चक्रवर्ती

3. गौडिय समाज - राधाकांत देव

4. सेवा समिती - हृदयनाथ कुंजरू
#Rajyaseva_2018
#Current_Affairs

सराव प्रश्न

1. नुकतेच कर्नाटक राज्यात 'मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना' सुरु करण्यात आली आहे. हि योजना कशाशी संबंधित आहे?

⚪️1. पवनऊर्जा निर्मिती द्वारे ग्रामीण विद्युतीकरण

⚫️2. कुपोषित स्त्रियांना मोफत अन्न धान्य

🔴3.दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांना मोफत LPG पुरवणे

🔵4. पवनऊर्जा निर्मितीद्वारे राज्यातील कार्यालयात वीज पुरवठा
#Rajyaseva_2018
#Current_Affairs


सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

2. ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ हे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ते कोणत्या खेळाडूचे आत्मकथन आहे?

⚪️1. एडम गिलख्रिस्त

⚫️2. राहुल द्रविड

🔴3. सनथ जयसूर्या

🔵4. सौरव गांगुली
#Rajyaseva_2018
#Current_Affairs

सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर

3. Transgender Welfare Board (किन्नर कल्याण मंडळ) स्थापन करण्याचा निर्णय घेणारे देशातील प्रथम राज्य कोणते?

⚪️1. नवी दिल्ली

⚫️2. उत्तर प्रदेश

🔴3. महाराष्ट्र

🔵4. त्रिपूरा
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
कर्नाटक राज्यात ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना’ सुरू होत आहे.

‘मुख्‍यमंत्री अनिला भाग्‍य योजना (MMABY)’ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत LPG जोडणी देणार आहे.

या योजनेत भारत सरकारच्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचा सहभाग नसणार आहे।
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर

सौरव गांगुली लिखित ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
चालू घडामोडी प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर

महाराष्ट्र - किन्नर कल्याण मंडळ असलेले प्रथम राज्य

महाराष्ट्र राज्य शासनाने 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीसह किन्नर कल्याण मंडळ (Transgender Welfare Board) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सयाजीराव गायकवाड तृतीय
सयाजीराव गायकवाड
#history
जन्म- १० मार्च, १८६३
मृत्यू- ६ फेब्रुवारी, १९३९

तिसरे महाराजा सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश. पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार, चुणचुणीत मुलगा.

१० मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवणाणे येथे त्यांचा जन्म झाला. कोणालाही सांगून खरे वाटले नसते पण अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेला गोपाळ पुढे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक म्हणून गेला आणि बडोद्याच्या राजगादीवर एक महाराजा म्हणून सिहासनावर आरूढ झाला. नसता आरूढ झाला नाही तर ‘हिदुस्थानातील एकमेव आदर्श राजा’ हा किताबही पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडून त्यांनी मिळवला. सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून खूपच प्रयत्न केले. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा आपल्या संस्थानात करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले. अत्यंत पुरोगामी विचाराच्या या महाराजाने राष्ट्रीय, सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. १८८६ मध्ये मुंबई येथील एका समारंभात उत्स्फूर्तपणे त्यांनी ज्योतिबा फुल्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. तसेच डॉ. आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली होती. अशा या आदर्श राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.

T.me/empscguidance