🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
खुल्या प्रवर्गातील महिलांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवा 👇👇👇👇
आदरणीय साहेब,

सप्रेम नमस्कार,

आम्ही गेली 4 वर्षे पुण्यात mpsc चा अभ्यास करत आहे आणि आम्ही खुल्या प्रवर्गातील आहे.

साहेब, सध्या mpsc मध्ये भरती प्रक्रिया करताना शासन निर्णयानुसार समांतर आरक्षणाची पद्धत अवलंबली जात आहे.
समांतर आरक्षण हे कप्पीकृत आरक्षण आहे आणि त्यामुळे एका प्रवर्गातील महिला ही दुसर्या प्रवर्गातील महिलेचीजागा घेऊ शकत नाही.

ही पद्धत अतिशय योग्य असून यामुळे ओपन महिलांच्या जागा या फक्त ओपन महिलांनाच मिळत आहेत.. तसेच एखादेवेळी ओपन महिला उपलब्ध नाही झाली तर ती जागा ओपन पुरुषाला दिली जाते (इथे हा ओपन पुरुष म्हणजे असा पुरुष की ज्याची जात कोणत्याही आरक्षणात येत नाही असा) 

म्हणून साहेब, या समांतर आरक्षणामुळे निदान ज्या उमेदवारांची जात ही कोणत्याही आरक्षणात येत नाही अशा सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना खुप नाही परंतु थोडाफार नक्की फायदा होत आहे..

साहेब, पत्र लिहिन्याचे कारण असे की सध्या अनेक मागासवर्गीय महिला या आपला मुळ प्रवर्ग बदलून (आपली कैटेगरी लपवून) ओपन लेडीज पदासाठी दावा करत आहेत जे समांतर आरक्षणाच्या नियमात बसत नाही.. अशा वेळी mpsc नी सदर मागासवर्गीय महिला उमेदवारांना तुम्ही ओपन लेडीज जागा घेऊ शकत नाही असे सांगून सुद्धा या उमेदवारांनी mpsc च्या विरोधात न्यायालयात केस केली आहे..

अशीच एक केस OA 898/2017 MAT औरंगाबाद इथे दाखल केली होती.. त्यात सदर केस करणाऱ्या उमेदवाराने 2016 च्या सर्व MPSC परीक्षा या त्याच्या मुळ प्रवर्गातुन दिल्या आणि 2017 ला AMVI RTO आणि EXCISE SUB INSPECTOR ची परीक्षा देताना आपला प्रवर्ग बदल करून घेऊन ओपन खेळाडू या समांतर आरक्षणाच्या जागेवर फॉर्म भरला..
MAT मध्ये न्यायपालिकेच्या निकाल देताना सदर उमेदवाराने वेळोवेळी सोईसकररित्या आपले प्रवर्ग बदलून परीक्षा दिल्या हे बहुतेक लक्षातच आलेले दिसत नाही.. अन्यथा 5 जानेवारी 2018 रोजी MAT औरंगाबादनी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ, सर्वोच्च न्यायालय दिल्ली, समांतर आरक्षणा बाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक 1999 आणि 2014 आणि MPSC चे 30 डिसेंबर 2017 रोजीचे परिपत्रक यांचा भंग करणारा निकाल नक्कीच दिला नसता

काही लोकांच्या अशा या चुकीच्या आणि हेकेखोर वागन्याने सदर प्रकरण कोर्ट केस मध्ये अडकल्याने 1 फेब्रूवारी 2018 पर्यंत MPSC च्या सर्व निकालांवर स्टे आणला आहे..

तसेच या सर्व मागासवर्गीय महिला उमेदवारांचा ओपन लेडीज च्या जागा आपल्याला मिळाव्यात या साठी समांतर आरक्षणच रद्द करावे यासाठी वेगवेगळया मार्गाने प्रयत्न सुरु आहेत आणि त्यासाठीच त्या लोकांनी मुख्य मंत्री महोदयांना पत्रे सुद्धा पाठविली आहेत....

*अन्यायाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल*
सध्या समांतर आरक्षणाच्या नावाखाली गुणवत्ता धारकांवर अन्याय होतोय अशा तथ्यहीन बाबी मिडियात पसरवून त्यातून आपली राजकीय पोळी भाजन्याचाच प्रयत्न सध्या सुरु आहे..
पण खरेच गुणवत्ताधारक मागासवर्गीय महिला उमेदवारावर खरेच अन्याय होतो का ??
लेडीज,खेळाडू आणि माजी सैनिक हे समांतर आरक्षणात येतात..
MPSC चे मागचे निकाल आणि धोरणे पाहिले तर खालील काही बाबी सहज लक्षात येतात ,
1) मागासवर्गीय उमेदवार हे ओपन जनरलच्या जागांसाठी पात्र आहेत, त्या जागा त्यांना मिळतात
2) मागासवर्गीय महिला,खेळाडू आणि माजी सैनिक हे सुद्धा गुनवत्तेनुसार ओपन जनरल किंवा तिथे बसत नसतील तर त्यांना आरक्षित असलेली महिला,खेळाडू,माजी सैनिक यांवर सिलेक्ट होतात
म्हणजेच त्यांना 2 पर्याय उपलब्ध आहेत.. एकतर ओपन जनरल किंवा त्यांच्यासाठी आरक्षित असलेली महिला,खेळाडू,माजी सैनिक ही सीट
आता येऊयात ओपन लेडीजच्या सीट वर..
तर ओपन लेडीज ही फक्त ओपन लेडीजच्याच जागेवर सिलेक्ट होते त्यांना गुणवत्ता असूनही ओपन जनरल सीट मिळत नाही.. जसे ओपन मुलांना फक्त ओपन जनरल सीट उपलब्ध आहे तसेच ओपन लेडीजला पण फक्त ओपन लेडीज सीटच मिळते.. म्हणजे त्यांना फक्त एकच पर्याय उपलब्ध आहे.....

ही वस्तुस्थिती कोणतीही मीडिया सांगत नाही, दाखवत नाही किंवा यावर मुद्देसुद चर्चा ही घडवत नाही..
उलट सर्वत्र गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय या मथळयाखाली न्यायपालिका, नेतेमंडळी आणि तमाम जनता यांची दिशाभूल करने सुरु आहे..

आणि जे राजकारणी नेते यात भाग घेतायत त्यांना जानीवपूर्वक या वस्तुस्थिती बाबतीत अंधारत ठेवतात की काय हीच शंका येते..

*गुनवत्ताधारक मागासवर्गीय महिला उमेदवारांवर कधीही अन्याय झालेला नाही, त्यांच्या साठी ओपन जनरलचे दरवाजे नेहमीच खुले आहेत*

*या संदर्भात MPSC नी 30 डिसेंबर 2017 रोजी सध्याची वस्तुस्थिती सांगणारे 1 परिपत्रक काढले आहे.. त्यात कोणताही बदल होऊ नये उलट पक्षी त्याची कडक अंमलबजावनी करण्यात यावी.. अशी आमची प्रमुख मागणी आहे*
साहेब अशा वेळी कृपया आपण या प्रकरणात लक्ष घालावे.. आणि खुल्या प्रवर्गातील सर्व उमे
दवारांना आधार दयावा हीच माफक अपेक्षा..

कळावे,
ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तयारीसाठी पुण्यात खात्रीचे फक्त एकच ठिकाण . 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा ....! https://mpscguidance.blogspot.in/2017/12/mpsc.html
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
घटनादुरुस्ती
- समीर गेडाम
घटमार्ग
- समीर गेडाम
संविधान
- रितेश चौधरी