🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
राज्यसेवा पूर्व : चालू घडामोडी घटक
रवी सोनूने ,Excise SI ,रँक 18
विद्रोह म्हणजे फक्त नकार नसून नव्याची निर्मीती आणि तीही विधायक निर्मिती जी लोकांच्या जगण्याला सुंदर, निरोगी, माणूसकेंद्री बनविते..

● प्राच्यविद्यापंडित डॉ.आ.ह.साळुंखे सर

अमृतमहोत्सव सोहळा...🙏
⭕️खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सद्य स्थिती⁉️⁉️

⚠️STI निकाल एकूण खुला प्रवर्ग जागा 68.
निवडलेले मूळ खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी 38.

⚠️Excise SI निकाल एकूण खुला प्रवर्ग जागा 74 .
निवडलेले मूळ खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी 45.

👉मागील स्पर्धा परीक्षांचे कोणतेही निकाल तपासून बघितले तर खुल्या प्रवर्गातील मूळ विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने कमी होतेय .
म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये जवळपास 70-80% जागा ह्या आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी घेत आहे.
🛑मग आता प्रश्न असा पडतो कि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नेमके काय करायचे ⁉️
आतापर्यंत खुल्या प्रवर्गातील मुलींच्या जागा ह्या आरक्षित होत्या ,पण आताच आलेल्या कोर्टाच्या निर्णयाने त्या जागा सुद्धा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी खुल्या करायचा आदेश कोर्टाने दिला आहे .
नेमकं खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आता परीक्षा न देता कुक्कुटपालन ,शेळीपालन या धंद्याकडे वळावं का??

नक्की विचार करावा अशी गोष्ट आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राज्यसेवा पुर्व परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी ४ दिवसांची मुदतवाढ..

शेवट तारीख: २२ जानेवारी २०१८
⭕️खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सद्य स्थिती⁉️⁉️

⚠️STI निकाल एकूण खुला प्रवर्ग जागा 68.
निवडलेले मूळ खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी 38.

⚠️Excise SI निकाल एकूण खुला प्रवर्ग जागा 74 .
निवडलेले मूळ खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी 45.

👉मागील स्पर्धा परीक्षांचे कोणतेही निकाल तपासून बघितले तर खुल्या प्रवर्गातील मूळ विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने कमी होतेय .
म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये जवळपास 70-80% जागा ह्या आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी घेत आहे.
🛑मग आता प्रश्न असा पडतो कि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नेमके काय करायचे ⁉️
आतापर्यंत खुल्या प्रवर्गातील मुलींच्या जागा ह्या आरक्षित होत्या ,पण आताच आलेल्या कोर्टाच्या निर्णयाने त्या जागा सुद्धा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी खुल्या करायचा आदेश कोर्टाने दिला आहे .
नेमकं खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आता परीक्षा न देता कुक्कुटपालन ,शेळीपालन या धंद्याकडे वळावं का??

नक्की विचार करावा अशी गोष्ट आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚀अग्नी 5

श्रीहरीकोटा: भारताने आज सर्वात दूरचं लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी 5 या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी केली. ओदिशातील अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली.

अग्नी 5 मिसाईलची क्षमता तब्बल 5 हजार किमीपेक्षा जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे अणूबॉम्ब किंवा तत्सम हत्यारांची वाहनक्षमता या मिसाईलमध्ये आहे.

जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2012 मध्ये झाली होती. आता या क्षेपणास्त्राचा भारताच्या युद्धताफ्यात समावेश होणार आहे.

अग्नी 5 च्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.

भारताने यापूर्वी अग्नी 1,2,3 या क्षेपणास्त्रांचा युद्धताफ्यात समावेश केला आहे. ही तीनही क्षेपणास्त्र पाकिस्तानचा धोका ओळखून आणली आहेत. तर अग्नी 5 हे चीनचा सामना करण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.

अग्नी 5 क्षेपणास्त्राचं वजन सुमारे 50 टन आहे. त्याची लांबी 17 मीटर, रुंदी 2 मीटर आहे. याची वाहक क्षमता तब्बल 1500 किमी इतकी आहे. हे क्षेपणास्त्र 5 हजार किमीवरील लक्ष्य भेदू शकतं. इतक्या क्षमतेची क्षेपणास्त्र सध्या अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्सकडे आहे.
जॉईन टेलिग्राम
@mpscguidance
Forwarded from मराठ्यांचा इतिहास
# बहामनी_साम्राज्य
..याचे विघटन आणि मराठ्यांचा उत्कर्ष या दोन गोष्टींचा संबंध आहे.१४३६ ते १४८२ या कालखंडात बहामनी साम्राज्यावर अल्लाउद्दीन दुसरा,त्याचा मुलगा हुमायून,हुमायूनचा मुलगा निजामशाह व त्याचा भाऊ तिसरा महंमद यांनी राज्य केले.हा तोच कालखंड आहे ज्यात परकीय मुसलमान व दक्षिणी मुसलमान यात प्रचंड वैरभाव निर्माण झाला होता.
परकीय मुसलमानामधे तुर्क,अरब,मंगोल,इराणी या लोकांचा समावेश होता तर दक्षिणी मुसलमानामधे अफ्रिकन व सिद्दी लोकांचा समावेश होता.परकीय मुसलमान यांना कनिष्ठ समजत व दुजेपना करीत.धार्मिक कट्टरतेच्या बाबतीत परकीय मुसलमान हे दक्षिणी मुसलमानापेक्षा वरचढ ठरत.
१४४६-४७ मधे हा संघर्ष अतिशय तीव्र झाला.याला कारण घडले ते मलिक-उत्-तुज्जार या बहामनी सेनानीची भैरवगड-प्रचितगड-महिमतगड-खेळणा या मोहिमेदरम्यान झालेला पराभव व त्यांची स्थानिक मराठा जाहागीरदारांनी केलेली कत्तल.मलिकची कत्तल हा परिकय मुसलमांनानी केलेला विश्वासघात आहे असा समज दक्षिणी मुसलमानांनी सुलतानांच्या गळी उतरवला.यावेळी अल्लाउद्दीन दुसरा हा सुलतान होता.त्याने दक्षिणी मुसलमान पुढाऱ्यांना परकीय मुसलमान लोकांची कत्तल करण्यास अनुमती दिली.डाव साधून दक्षिणी मुसलमान लोकांनी एका मेजवानीचा घाट घातला व त्यात निमंत्रित केलेले हजारभर सय्यद व हजार बाराशे इतर परकीय मुसलमान पुढारी कापून काढले.
या हत्याकांडाने हादरलेल्या परकीय मुसलमान लोकांनी सुलतानाला खरी परिस्थिती सांगीतली,त्यावर सुलतान दक्षिणी मुसलमानांवर भयानक चिडला व त्यांचीही कत्तल उडवली.हा संघर्ष दिवसेंदिवस पेटतच राहिला.पन पुढे परकीय मुसलमान असलेला महमंद गवान हा बहामनीचा प्रधान झाला व परिस्थिती थोडी निवळली.याला गवानचा सर्वसमावेशक स्वभाव कारणीभूत होता.सर्वांना सोबत घेवून मंहमद गवानने तब्बल ३६ वर्ष बहामनी राजवटीची सेवा बजावली.
याच गवानने नंतर मराठा जाहगीरदारांचा विशाळगड-महिमतगड-प्रचितगड-भैरवगड-सगंमेश्वर व इतर कोकण बहामनी राजवटीस जोडले.बहुतेक यांच कारणावरुन पुन्हा एकदा परकीय व दक्षिणी मुसलमानामधे वाद उफाळून आला.बहामनीचे सर्वच सुलतान हलक्या कानाचे होते की काय समजत नाही..पन यावेळी सुद्धा सत्तेत असणार महंमद तिसरा हा सुलतान दक्षिणी मुसलमान लोकांनी गवान विरोधात केलेला कटाला बळी पडला. गवान विरोधात दक्षिणी मुसलमानांनी खोट्या गोष्टी सुलतानाला सांगीतल्या व पुरावा म्हणून ओरिसाच्या राजाला लिहलेले बनावट पत्र सादर केले.दारुच्या नशेत असणाऱ्या सुलतानाने गवानला मृत्युदंड फर्मावला..दरबारातच सुलतानाच्या शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या गुलामाने गुलाम जोहरने गवानचे दरबारातच तुकडे केले.आणि इथेच बहामनी राजवटीची मृत्युघंटा वाजली.
सुलतानाला नंतर हा कट समजला व तो पश्चाताप करीत मरुन गेला.त्याच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा गादीवर आला पन याच दरम्यान परकीय मुसलमानांचा पुढारी असलेल्या युसूफ आदिलखानाने १४९० मधे विजापूर येथे आदिलशाहीची स्थापना केली.यावेळी उडालेली बंडाळी पाहून त्यावेळचा वजीर निजामुल्क यांने सगळा शाही खजिना जुन्नरच्या शिवनेरी या बुलंद किल्यावर पाठवला.तिथे त्याचा मुलगा मलिक महमंद होता.बेबंदशाहीत वजीराचा खून झाल्यावर मलिक महमंदने निजामशाहीची स्थापना केली.फखाउल्ला इमादमुल्कने वऱ्हाडात इमादशाही तर कुतुब उलमुल्कने गोवळकोंड्यास कुतुबशाही स्थापन केली.राहिलेला बहामनीच्या प्रदेशावर कासीम बरीदचा मुलगा अमीर बरीद यांने बरीदशाहीची स्थापना करुन बहामनी साम्राज्याच्या अस्तावर शिक्कामोर्तब केले.