🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from मराठ्यांचा इतिहास
पानीपत ची मोहीम
दिनांक १४ जानेवारी सन १७६१ रोजी पानिपतावरील समस्त समर भूमीच्या सनदी मालकांना कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शब्दांतून आणि निनादकाकांच्या स्वरांतून कायम कानात गुंजणारे हे काव्य उच्चारून विनम्र आदरांजली!!
समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी…. रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले !
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले !
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले !
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची !
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची !
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा !
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा !
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !
स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !
श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो !
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो !
“हे सह्याचाल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो !
“त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे !
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे !
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे !
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !
_______________/\___________________
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादीँक शुभेच्छा... from
Mayur Dumbre
Prashant Khedkar
Dheeraj Chavan
🙏
निवृत्त न्यायाधीश यांचा हस्तक्षेप
STI mains 2017..... cut off बद्दल कृपया कोणीही विचारू नये. फक्त एवढेच सांगतो 135 च्या पुढचे Open Category चे safe आहेत ,त्यामुळे निकाल लागेपर्यंत पुढचा अभ्यास चालू ठेवा.
🙏🙏🙏🙏
माझे मित्र एकनाथ बंगाळे यांची Excise SI पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
माझे मित्र प्रशांत दळवी यांची Excise SI पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
माझे मित्र रविभाऊ सोनूने यांची Excise SI पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
माझे मित्र विजय आगळे पाटील यांची Excise SI पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐