🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
02222795924
Excise Mains दिलेल्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या वरील क्रमांकावर वर संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता
🙏🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#science
मानवी डोळा
नोट्स - योगेश मुंजाळ सर
@RajyasevaSTI
@mpscguidance
पुण्यातील विविध संशोधन संस्था

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)
खोडद-नारायणगाव (पुणे):  येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. रेडिओ दुर्बिणीचे कार्य कसे चालते याचा ‘लाइव्ह डेमो’ येथे पाहता येतो.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) (पुणे) : 
-खगोलशास्त्रात संशोधन करणारी ही महत्त्वाची संस्था.
-वातावरणातील प्रकाशकिरण, एक्स रे, गॅमा रे, इन्फ्रारेड, रेडिओ लहरींचा अभ्यास करून त्याचे संशोधन या संस्थेत केले जाते.
- संस्थेतर्फे खोडद येथे जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप उभारण्यात आला आहे.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग (सी डॅक)
- विविध प्रकारच्या सुपरकम्प्युटर्सबरोबरच रिमोट व्होटिंग, बायोटेक्नोलॉजी, पेटंटस, रिमोट सेन्सिंग, भारतीय भाषांमध्ये कम्प्युटर्सचा वापर आदीबाबत सी-डॅकमध्ये संशोधन सुरू आहे.

आयुका
- ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुढाकारातून पुणे विद्यापीठाच्या आवारात १९८८ मध्ये ही संस्था स्थापन झाली.
- येथे विश्वनिर्मिती, विश्वाचे प्रसरण, सद्यस्थिती, कृष्णविवर, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय लहरी आदीबाबत संशोधन सुरू असते.
- अॅस्ट्रोसॅटच्या निर्मितीत आयुकाचे मोठे योगदान होते.
@mpscguidance
सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (सी-मेट)
-  देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर निर्मितीला चालना देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
- इलेक्ट्रिकल क्षेत्राला लागणाऱ्या विविध पदार्थांवर, छोट्या भागांवर येथे संशोधन चालते.
- पॉलिमर्स, सिरॅमिक्स, मिश्रधातूंची निर्मिती व विकास, नॅनोटेक्नोलॉजीवरही येथे काम चालते.

केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (खडकवासला) :
- सिंचनप्रकल्प व जलस्रोतांंविषयी संशोधन करणारी ही संस्था खडकवासल्याजवळ १९१६ मध्ये स्थापन झाली.
- येथे जलस्रोत, जलसंधारण, जलविद्युत आणि जलवाहतूक या संबंधी संशोधन चालते.
- सीडब्ल्यूपीआरएसच्या अलीकडे केंद्रीय जल अकादमी असून येथे पाण्याविषयीचे संशोधन चालते.
@mpscguidance
नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) भोसरीः
- एचआयव्ही हा विषाणू व एड्स या आजाराबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणारी ही संस्था.

आगरकर संशोधन संस्था
- महाराष्ट्र अॅकॅडमी फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (एमएसीएस) अंतर्गत १९४६ मध्ये ही संस्था स्थापन झाली.
- संस्थेत प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषी, भूशास्त्र, जैवतंत्रज्ञान आदी विषयातील संशोधन चालते.
- बायोगॅसनिर्मिती, सूक्ष्मजीवांचा औद्योगिक वापर, वनस्पती व धान्यांच्या नव्या प्रजातींविषयी या संस्थेने महत्त्वाचे संशोधन केले आहे.
@mpscguidance
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)
- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएलआयआर) अंतर्गत येणाऱ्या प्रयोगशाळांपैकी ही एक महत्त्वाची संस्था.
- सर्व प्रकारच्या रसायनांवरील मूलभूत संशोधनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक रसायने, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी व नॅनोटेक्नोलॉजी या विषयांवरील संशोधन येथे चालते.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संशोधन संस्था
-  मान्सूनवर या संस्थेत व्यापक संशोधन सुरू आहे.
- ढगांचे अंतरंग, वीज कोसळणे, हवामानबदल याबाबत येथे संशोधन चालते.
- देशातील प्रमुख शहरांमधील प्रदूषण व हवेची गुणवत्ता मोजणारा सफर प्रकल्पही येथूनच राबविण्यात येतो.

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)
- अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने १९५२ साली ही संस्था पुण्यात स्थापन झाली.
- प्राण्यांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या विषाणूंचा अभ्यास, त्यावर संशोधन करून लस विकसित करण्याचे काम येथे चालते.
- एन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस, मलेरिया व अन्य साथीच्या रोगांवरचे तसेच स्वाईन फ्ल्यू बाबतचे संशोधनही येथे सुरू आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)
- हवामानशास्त्रासंबंधीच्या देशभरातील सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवून त्याबाबत संशोधन करणारी ही संस्था सिमल्याहून पुण्यात हलविण्यात आली. त्यामुळे त्याला सिमला ऑफिसही म्हटले जाते.
- हवामानासंबंधीचे संशोधन, अंदाज वर्तविणे, तसेच विविध हवामानशास्त्र उपकरणांचे संशोधन, कृषीबाबत हवामानशास्त्राचा अभ्यास व अंदाज, भूकंपमापन, नोंदी आदी काम येथे चालते.
- हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी पूर्वीपासून वापरली जाणारी उपकरणेही येथे पाहता येतात.
♦️भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती

🔶भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.

🔶मूळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.

🔶आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.
वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.

🔶२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.

ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.


@mpscguidance


t.me/mpscguidance
🔶सिक्किम व नागालँड विधानसभेत काही सदस्य अप्रत्यक्ष निवडून येतात
🔶कलम 126-हंगामी सर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात
🔶कलम 127-तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक सरन्यायाधीश करतात
🔶कलम 128-निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती
🔶कलम 129-अभिलेख न्यायालय
🔶कलम 130-सर्वोच्च न्यायालय
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
चालू घडामोडी नोट्स
संकलन - मयूर डुंबरे सर
Part 5
@RajyasevaSTI
@mpscguidance