🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#currentquiz

चालू घडामोडी प्रश्नसंच : 26-27 नोव्हेंबर 2017
प्र. 1) बॅडमिंटन आणि पॅरा-बॅडमिंटन जागतिक चॅम्पियनशिप 2019 मध्ये संयुक्तपणे आयोजन करणारे पहिले शहर कोणते?
1) बेसल
2) लंडन
3) नवी दिल्ली
4) टोकियो

प्र. 2) शासकीय सेवांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 नोव्हेंबर रोजी अनावरण केलेल्या ‘उमंग’ या अॅपचे पूर्णरूप काय आहे?
1) Universal Mobile Application for New-age Governance
2) Unified Mobile Application for New-age Governance
3) United Mobile Application for New-age Governance
4) Union Mobile Application for New-age Governance

प्र.3) खलीलपैकी कोणत्या बँकेने वित्तीय सेवांसाठी ‘योनो’ हे युनिफाइड इंटिग्रेटेड अॅप विकसित केले आहे?
1) पंजाब नॅशनल बँक
2) आयसीआयसीआय बँक
3) एचडीएफसी बँक
4) भारतीय स्टेट बँक

प्र.4) आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2017 कोठे पार पडणार आहे?
1) कुरुक्षेत्र
2) अहमदाबाद
3) हरिद्वार
4) क्षिप्रा

प्र.5) योग्य विधान ओळखा
a) आंतरराष्ट्रीय भुगर्भिय काँग्रेस मुंबई मध्ये होणार आहे.
b) 36 वी ही परिषद 2020 मध्ये होईल.
c) बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सह-यजमान देश आहेत.
पर्याय
1) फक्त a व b बरोबर
2) फक्त b व c बरोबर
3) फक्त a व c बरोबर
4) सर्व a, b आणि b बरोबर

प्र. 6) भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
1) मुंबई
2) पुणे
3) कोची
4) नवी दिल्ली

प्र.7) चुकीचे विधान ओळखा
a) 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
b) 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाची अमलबजावणी सुरू झाली होती.
c) 26 नोव्हेंबर 2017 रोजी केंद्रीय एचआरडी मंत्रालयाने डिजिटल सिगनेचर उपक्रम सुरू केला आहे.
d) 26 नोव्हेंबर 2017 रोजी एनसीसीने आपला 69 वा स्थापना दिवस साजरा केला आहे.

प्र. 8) अंतराळात मोक्याच्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी इस्रो २०१९-२० मध्ये कोणता उपग्रह सोडणार आहे?
1) आदित्य एल-१
2) निसार एल -१
3) आदित्य एल-२
4) निसार एल – २

उत्तरे :-
1) बेसल, 2) Unified Mobile Application for New-age Governance, 3) भारतीय स्टेट बँक (YONO - You Need Only One), 4) कुरुक्षेत्र (हरियाणा, 25 नोव्हेंबर 2017, रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते उद्घाटन), 5) फक्त b व c बरोबर (दिल्ली येथे होणार आहे), 6) मुंबई, 7)2 (26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला होता.), 8) आदित्य एल-१
🙏सूचना🙏

Excise, RTO ,STI दिलेल्या विद्यार्थ्याना आयोगाने LC सादर करण्यासंदर्भात ई-मेल केले आहेत ...
तरी मित्रांनो आपल्या ज्या कोणी मित्र मैत्रीण यांनी वरील परिक्षा दिली असेल त्यांना त्यांचे ई-मेल चेक करण्यास सांगा . नाहीतर त्यांची संधी हुकू शकते ..
Plz हा msg share करा
🙏🙏🙏🙏
T.me/mpscguidance
लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस
#award

मधुकर नेराळे यांना महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार

नेराळे यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याचा राज्य सरकारकडून गौरव


राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी मधुकर पांडुरंग नेराळे यांची निवड करण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा मंगळवारी केली.

तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पाच लाख रूपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
@mpscguidance
सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, मालती इनामदार, अविष्कार मुळे, लता पुणेकर, दत्तोबा फुलसुंदर, विवेक कवठेकर, हेमसुवर्णा मिरजकर आणि जयमाला इनामदार या सदस्यांच्या समितीने नेराळे यांच्या नावाची निवड केली.

मधुकर पांडुरंग नेराळे यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर आहे.
वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ आपोआप जोडली गेली. मधुकर नेराळेंनी सुरूवातीच्या काळात पंडित राजारामजी शुक्ला यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले.
त्यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर १९६५ पासून १९९४ पर्यंत होते. @mpscguidance
सन १९६९ साली स्वत:चे जसराज थिएटर स्थापन करून या संस्थेमार्फत ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून किर्तन वरुन तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र’, ‘काजळी’ या सारख्या वगनाटयांचे सादरीकरण करून भूमिका केल्या. त्यांनी मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले.

मधुकर नेराळे आणि मंडळी या कलापथकांचे दिल्ली, रायपूर, संबलपूर, भूवनेश्वर, कटक, जयपूर, जम्मू, पटना, दरभंगा, भागलपूर, रांची, बिलासपूर, नागपूर, गोरखपूर, जळगांव, भोपाळ या आकाशवाणी केंद्रावर व प्रत्यक्ष रंगमंचावर त्यांनी कार्यक्रम सादर केले.
१९९५-९६ साली संगीत नाटक अकादमी तर्फे हिमाचल प्रदेशात त्यांनी लोककलेचे कार्यक्रम सादर केले. @mpscguidance
१९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
मुंबई लक्षद्विप दैनिक परिवार तर्फे समाज भूषण पुरस्कार, एकता कल्चरल अकादमी विरार तर्फे गुणगौरव पुरस्कार, दुरदर्शन मुंबई तर्फे कलारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
तसेच लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्याबरोबर रंगमंचावर काम करण्याची त्यांना संधी लाभली. त्यांच्या याच योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना सरकारने जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
@mpscguidance
🎯 भारतीय शहरांची टोपणनावे 🎯

१. गोल्डन (सुवर्ण) सिटी - अमृतसर
२. भारताचे मैनचेस्टर - अहमदाबाद
३. सात बेटांचे शहर - मुंबई
४. स्पेस सिटी - बँगलोर
५. भारताचे बगीचा (गार्डन) शहर - बँगलोर
६. भारताची सिलिकॉन वैली - बँगलोर
७. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर - बँगलोर
८. अरबी समुद्राची राणी - कोचीन
९. गुलाबी शहर - जयपुर
१०. भारताचे प्रवेशद्वार - मुंबई
११. ट्विन सिटी - हैद्राबाद, सिकंदराबाद
१२. सणांचे शहर - मदुरई
१३. दख्खनची राणी - पुणे
१४. इमारतींचे शहर - कोलकाता
१५. दक्षिण गंगा - गोदावरी
१६. दक्षिणेकडील मैनचेस्टर - कोयम्बटूर
१७. सोयाबीनचा प्रदेश - मध्य प्रदेश
१८. नवाबांचे शहर - लखनऊ
१९. पूर्वेकडील वेनिस - कोचीन
२०. बंगालचे अश्रू - दामोदर नदी
२१. बिहारचे अश्रू - कोसी नदी
२२. निळा पर्वत - नीलगिरी
२३. पर्वतांची राणी - मसूरी (उत्तराखंड)
२४. पवित्र नदी - गंगा
२५. भारताचे हॉलीवुड - मुंबई
२६. किल्ल्यांचे शहर - कोलकाता
२७. पाच नद्यांचे राज्य - पंजाब
२८. तलावांचे शहर - श्रीनगर
२९. भारताचे पोलादी शहर - जमशेदपुर (टाटानगर)
३०. मंदिरांचे शहर - वाराणसी
३१. उत्तरेकडील मैनचेस्टर - कानपूर
३२. भारताचे स्वर्ग - जम्मू आणि काश्मीर
३३. मसाल्यांचे राज्य - केरळ
३४. भारताचे स्विट्ज़रलैंड - काश्मीर
३५. भारताचे बॉस्टन - अहमदाबाद
कोपर्डी प्रकरणात तिन्ही हारामखोरांना फाशी ...
💐💐💐💐💐💐
Excise दिलेल्या मुलींना आयोग LC Certificate मागावण्यासाठी ई-मेल पाठवत आहे ...ज्या कोणी excise mains दिली असेल इमेल त्यांनि chk kara @mpscguidance
अखेर तिन्ही नराधमांना फाशी झालीच .फक्त आता याची लवकर अमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा जेणेकरून समाजात कुणीही असे दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही🙏
ज्यांना वाटते कि ते जीवनात हरवले आहेत त्यांच्यासाठी
☺️👆👆
जॉईन करा
@mpscguidance