🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC 2018 मधील परीक्षांचे वेळापत्रक
👆👆👆
जॉईंन करा
@mpscguidance
*=============================*
*विविध अहवालात भारताचा क्रमांक :-*
*=============================*
*१) उद्योग विकास निर्देशांक (जीआरडीआय):-*

* जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने 30 विकसनशील देशांच्या यादीत 13 क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले

प्रथम:- चीन
*दुसरा:- भारत*
तिसरा:- रशिया

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*२) जागतिक शांतता निर्देशांक:-*

पहीला:- आइसलँड
दुसरा:- डेन्मार्क
तिसरा:- ऑस्ट्रिया

*१४१ वा:-भारत(२०१५ मध्ये भारताचा क्रमांक १४३ वा होता)*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*3)अशांत देश:-*

पहिला:- सीरिया
दुसरा:- दक्षिण सुदान,
तिसरा:- इराक

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*३) जागतिक सामाजिक प्रगती निर्देशांक:-*

प्रथम:-नार्वे
दुसरा:- स्वीडन
तिसरा:- स्वीत्झर्लंड

*१०१ वा:- भारत*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*४) वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट :-*

( २०१३च्या तुलनेत सहा अंकांनी घसरण)
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- आइसलंड

*११७वा:- भारत*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*५) काळा पैसा देशाबाहेर जाणार्या यादीत:-*

प्रथम:- चीन
दुसरा :- रशिया
३ रा:- मलेशिया

*४था:- भारत*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*६) सयुंक्त राष्ट्र मानव विकास अहवाल :-*
प्रथम:- नार्वे
२ रा :- ऑस्ट्रेलिया
३ रा:- स्वीत्झर्लंड

*१३० वा:- भारत (मागील वर्षी या यादीत भारताचा १३५ वा क्रमांक होता)*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*७) व्यवसाय सुलभतेमध्ये ( Doing Business ):-*

जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार १८९ देशाच्या यादीत भारताचा १३० क्रमांक गतवर्षीच्या तुलनेत भारताने १२ स्थानाची प्रगती

प्रथम:- सिंगापूर
२ रा :- न्युझीलंड
३ रा:- डेन्मार्क

*१३० वा:- भारत*
T.me/mpscguidance
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*८) ब्रॅड फायनान्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुल्यांकानुसार भारताला जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रॅड म्हणून घोषित करण्यात आले.*

प्रथम:- अमेरिका
२ रा:- चीन
३ रा:- जर्मनी

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*९) भ्रष्टाचार निर्देशांक :-*

ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या २०१५ मधील अहवालानुसार भारताचा ७६ वा क्रमांक आहे.

*(गतवेळी भारत ८५ व्या क्रमांकावर होता)*

*पहिले ३ देश*

पहिला :- डेन्मार्क
२ रा :-फिनलंड
३ रा:- स्वीडन
शेवटचे ३ देश
सोमालिया
उत्तर कोरिया
अफगाणिस्तान

(ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था असून मे १९९३ मध्ये जर्मनीमध्ये या संस्थेची स्थापना झाली.विविध देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्याचे काम ही संस्था करते)

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*१०) उर्जा सुरक्षा निर्देशांक:-*

प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- नार्वे
तिसरा:-स्वीडन

*९० वा:- भारत*

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#history
#भारतातील पहिल्या महिला डॉ. रखमाबाई राऊत यांची जयंती...
डॉ. रखमाबाई राऊत यांची जयंती... त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी, तर मृत्यु २५ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे आजोबा ह्यांना ब्रिटीश सरकार कडून ” जस्टीस ऑफ पिस” हे सन्मान पत्र मिळाले .कारण ते त्या काळात #सत्यशोधक_पध्दतीने विवाह लावून देत असत. रखमाबाई १५ वर्षाच्या असतांना त्यांच्या वडलांचा मृत्यु झाला.
1. रखमाबाईं या जे.जे. हॉस्पीटल ,मुंबई येथे असीस्टंट म्हणून कार्यरत होते. 1889 ला MD साठी इंग्लडला पाठवले.
2. त्या 1894 साली ” लंडन स्कूल ऑफ मेडिकल” ची परीक्षा पास झाल्या.
3. त्यांनी महिलांसाठी “वनीता” समाजाची निर्मिती केली.
4. रेडक्रॉस ची गुजरातला शाखा उघडली.
5. 1894 ला मुंबईच्या काया हॉस्पीटल मध्ये त्यांची नियुक्ती झाली.
6. गुजरात मध्ये जेंव्हा प्लेगच्या साथीचा कहर झाला तेंव्हा मालवी हॉस्पीटल मध्ये रुजू झाल्या.
7. पहील्या महायुद्धात जखमी झालेल्या सैनीकांची त्यांनी सेवा केली.
8. त्यामूळे ब्रिटीश सरकारने त्यांना ” कैसर -ए- हिंद ” पुरस्कार दिला.
9. रेडक्रॉसने ही त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले.
अशी ही पडद्यामागची महानायिका लोकांसमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न , बहुजन समाजाच्या असल्याने त्या प्रकाश झोतात येऊ शकल्या नाहीत.
पहिल्या भारतीय महिला डॉक्टरला सॅल्यूट..

मराठमोळी साडी...नीटनेटका भांग... गळ्यात स्टेथोस्कोप अशा वेषभूषेत रूग्णांना तपासत असलेल्या एका महिलेला आज गुगलने एका खास डूडलद्वारे अभिवादन केलंय. गुगलवरचं हे चित्रं पाहून या महिला कोण? असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडेलही. पण ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून त्या आहेत पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रुखमाबाई राऊत.

आज त्यांची १५३ वी जयंती असून त्यानिमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांच्या कार्याला सलाम केलाय.

रुखमाबाई राऊत यांना रुक्माबाई या नावानंही ओळखलं जातं. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. त्यांनी रुग्णांची सेवा केलीच, पण भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता.
बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेलं आहे.

रुखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबईत झाला होता. त्याकाळात बालविवाह व्हायचे. त्यामुळे त्यांचं लग्न वयाच्या ११ व्या वर्षीच दादाजी भिकाजी यांच्याशी झालं. पण लग्नानंतर त्या पतीच्या घरी राहत नव्हत्या. आईच्या घरी राहूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. याचवेळी त्यांनी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १८८४ मध्ये दादाजींनी वैवाहिक अधिकार पुर्नस्थापित करण्यासाठी बॉम्बे उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही रुखमाबाईंना वैवाहिक अधिकाराचं पालन करा अथवा तुरुंगात जा अशी तंबी दिली. मात्र रुखमाबाईंनी अजाणत्या वयात सहमती शिवाय झालेला विवाह आपण मानत नसल्याचं सांगत पतीकडे नांदायला जाण्यास नकार दिला. न्यायालयात सुरू असलेल्या या आगळ्यावेगळ्या खटल्याला प्रसारमाध्यमांनीही खूप प्रसिद्धी दिली. त्यानंतर दादाजीही काही रक्कम घेऊन घटस्फोट घेण्यास तयार झाले.

या खटल्यातून सुटका झाल्यानंतर रुखमाबाईंनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्या डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात ३५ वर्ष योगदान दिलं. याच काळात त्यांनी बालविवाहाच्या विरोधात चळवळ उभारली. सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं होतं. वयाच्या ९१ व्या वर्षी म्हणजे २५ डिसेंबर १९९१ मध्ये त्यांचं निधन झालं.

@mpscguidance
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स 🖕🖕🖕🖕🖕🖕