🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
♦️ग्लोबल हंगर इंडेक्स 2017 अहवालात भारत 100 व्या स्थानावर

➡️‘ग्लोबल हंगर इंडेक्स 2017’ अनुसार, उपासमारीत भारत 100 व्या स्थानी आहे.

➡️इंडेक्स जारी करणारी संस्था - इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युट

➡️2016 साली भारत 97 व्या क्रमांकावर , यावर्षी 3 क्रमांकाची घसरण

♦️अहवालविषयक महत्वाच्या बाबी

➡️31.4 गुण(100 पैकी) सह भारताचे 2017 सालचे GHI गुण अधिक असून ते ‘गंभीर’ श्रेणीमध्ये गणल्या गेले आहे.

➡️119 देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत 100 व्या स्थानी आहे व आशिया खंडात भारत केवळ अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पुढे आहे.

➡️ चीन (29), नेपाल (72), म्यानमार (77), श्रीलंका (84) आणि बांग्लादेश (88) ही राष्ट्रे भारतापूढे आहेत.
तर पाकिस्तान आणि अफगानिस्तान अनुक्रमे 106 व्या आणि 107 व्या स्थानी आहे.तीन वर्षांच्या कालावधीत, भारत
T.me/mpscguidance
➡️2014 साली भारत 55 व्या स्थानी होता तेव्हापासून भारत 45 क्रमांकाने खाली आला आहे.

➡️ निर्देशांकमध्ये ‘अत्यंत चिंताजनक’ श्रेणीत असलेला एकमेव देश मध्य आफ्रिका गणराज्य आहे.

➡️अहवालात मूल्यमापनासाठी वापरण्यात येणार्‍या ‘बालकाचे कमी वजन’ या घटकाला 'वास्टिंग (बालकाची खुंटलेली वाढ)' आणि ' स्टंटिंग (बालकाला येणारा थकवा)' या घटकांनी बदलले गेले आहे.

सन 2006 मध्ये पहिल्यांदा ‘वेल्ट हंगरलाइफ’ नामक जर्मनीच्या स्वयंसेवी संस्थेने ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ प्रसिद्ध केला होता, जी इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे.
* आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव 2017 (International Puppet Festival)
» कोलकत्ता येथे आयोजन
» 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पार पडेल..
» राष्ट्रीय ज्वलन संशोधन आणि विकास केंद्र (combustion research centre) तमिळनाडूमधील आयआयटी मद्रास येथे स्थापन करण्यात आले आहे.
» हे जगातील सर्वांत मोठे ज्वलन संशोधन केंद्र आहे.
» 12 ऑक्टोबर रोजी उद्घाटन झाले.
» 90 कोटी रुपये खर्च.
जॉइन » @mpscguidance
🔘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार :
» 2015-16 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार टी. एम. कृष्णा यांना जाहीर झाला आहे.
» इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी (31 ऑक्टोबर) त्याना हा सन्मान देण्यात येईल.
» 10 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जॉइन » @mpscguidance
मित्र शक्ति 2017 : भारत श्रीलंका संयुक्त लष्कर सराव
» पाचवा भारत-श्रीलंका संयुक्त लष्कर सराव
» 13 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान पुणे येथे पार पडणार
» 2012 मध्ये या सरावास सुरूवात झाली
🔘16 ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन
- दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो.
- या दिवशी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषि संघटनेची स्थापना झाली होती.
- यावर्षीची थिम: स्थलांतरणाचे भविष्य बदला. अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासात गुंतवणूक करा. (Change the future of migration. Invest in food security and rural development)
- नोव्हेंबर 1979 मध्ये जागतिक अन्न दिनाची स्थापना करण्यात आली.
- 16 ऑक्टोबर 1981 रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

▪️अन्न व कृषि संघटना (Food and Agriculture Organisation)
- संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था
- स्थापना : 16 ऑक्टोबर 1945
- यूनेस्कोची पालक संस्था
- मुख्यालय : रोम, इटली
- मोटो: ‘Let there be bread’
- सदस्य: 194 (EU सह)
________________________________
जॉइन करा » @mpscguidance
🔘आयएनएस किल्तान भारतीय नौदलात दाखल

👉 पाणबुडीविरोधी ‘आयएनएस किल्तान’ ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. खास पाणबुडी विरोधी तंत्रज्ञान आयएनएस किल्तानचे वैशिष्टय आहे.
👉 शिवालिक, कोलकत्ता क्लास वर्गातील युद्धनौकानंतर आयएनएस किल्तान ही भारतातच विकसित करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे.

» आयएनएस किल्तानची वैशिष्ट्ये
- आयएनएस किल्तान हेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, 76 एमएम कॅलिबर मिडियम रेंज गन, दोन 30 एमएम मल्टी बॅरल गन्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि मिसाईल सिस्टमने सुसज्ज आहे तसेच किल्तान युद्धनौकेवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणा-या रेवती या दोन रडार यंत्रण बसवण्यात आल्या आहेत.
- कार्बन फायबरचा वापर करुन बांधण्यात आलेली ही भारतातील पहिली युद्धनौका आहे. कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते.
- लक्षद्विपमध्ये किल्तान नावाचे बेट आहे. त्यावरुन या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे. दिल्लीपासून हे बेट 1,947 किलोमीटर अंतरावर आहे.
- भारतीय नौदलाच्या एका विभागाने आयएनएस किल्तानचे डिझाईन तयार केले. कोलकात्यातील गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने ही युद्धनौका बांधली आहे.
________________________________

जॉइन करा » @mpscguidance
सरकारी कामगार अधिकारी सुधारित अभ्यासक्रम 👍
सरकारी कामगार अधिकारी मुलाखत सुधारित गुणक्रम 👍
#current
चालू घडामोडी: 17 ऑक्टोबर
___________
» प्रसिद्ध भारतीय अमेरिकन वकील अजय राजू यांना तिसरा अमेरिकन बझार फिलॅनथ्रोपी अवॉर्ड जाहीर झाला आहे.
___________
» आयुष फेस्टिवल ऑफ स्टॅप्स 2017:
- आयुष मंत्रालय व पोस्ट खात्याचा संयुक्त उपक्रम.
- 17-18 ऑक्टोबर दरम्यान पणजी येथे पार पडणार
- उद्देश: मुलांमध्ये स्टॅम्प गोळा करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे.
___________
» NIIF चा अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी सोबत 1 बिलियन डॉलर्सचा गुंतवणूक करार
- NIIF च्या स्थापनेनंतरचा पहिलाच गुंतवणूक करार
- NIIF मध्ये गुंतवणूक करणारी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी पहिलीच संस्था

काय आहे NIIF?
> नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इनफ्रास्ट्रक्चर फंड
> 2015 मध्ये स्थापना
उद्देश - स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्त्रोताकडून गुंतवणूक आकर्षित करणे.
___________
» भारतातील पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (All India Institute of Ayurveda) दिल्लीत
- दुसर्‍या राष्ट्रीय आयुर्वेद दिनी (17 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'दिल्ली' येथे उद्घाटन
___________
» 16 ऑक्टोबर : जागतिक स्पाईन (पाठीचा कणा) दिन
- 2017 ची थिम - यूवर बॅक इन अॅक्शन
___________
» 15 ऑक्टोबर : ग्लोबल हँड वॉशिंग डे
- 2017 ची थिम - आपले हात आपले भविष्य (Our hands, our future!)
___________
» इंद्रा-2017
- भारत-रशिया संयुक्त लष्कर सराव
- 19-29 ऑक्टोबर 2017 दरम्यान रशियात पार पडणार
- तीनही सेवा (नौदल, भुदल, वायुदल) सहभागी होत असलेला पहिलाच सराव
- आत्तापर्यंत 9 सराव पार पडले मात्र त्यात एकच सेवा सहभागी होत.
___________
# NewBooks

» दोज इव्हेंटफूल डेज
- लेखक- विद्यासागर राव (महाराष्ट्रचे राज्यपाल)
- उपराष्ट्रपती व्येंकया नायडू यांच्या हस्ते प्रकाशन
- तमिळनाडू येथील राज्यपाल पदाच्या 13 महिन्यांच्या कार्यकाळावर आधारित

» बियॉन्ड द ड्रीम गर्ल
- लेखक- प्रसिद्ध पत्रकार राम कमल मुखर्जी
- अभिनेत्री हेमा मालिनी यांचे जिवनचरित्र

» द कोअॅलिशन इयर्स 1996-2002 » माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांचे नवीन पुस्तक.
खूप मोठा बदल ...संयुक्त पूर्वपरीक्षा सर्व पदांसाठी 👍
कर सहाय्यक पूर्व परीक्षा कटऑफ
ज्यांचा चेेहरा उटण्यापेक्षा *नोकरीची जाहीरात* दिसल्यावर जास्त उजळतो,

अंगणातील दिव्यांपेक्षा ही *अभ्यासिकेतल्या दिव्याचा* प्रकाश जास्त भावतो,
ज्यांना
नव्या कपड्यांपेक्षा *नाईट ड्रेस* जास्त घालावा लागतो,

फटाक्यांच्या आतिषबाजी पेक्षा ज्यांना *स्पर्धा परिक्षेतील प्रश्नांची* जास्त ओढ लागते,

ओवाळणी पेक्षा *सिलेक्शन यादी* लवकर हवी असते ते सर्व
आणि फराळापेक्षा सुद्धा *आई वडीलांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाची* भूक असते,

अश्या सर्व अभ्यासू व कठीण परिस्थितीशी झुंजणार्या सर्व *भावी अधिकारी व अभ्यासातून घडणाऱ्या देशाच्या जबाबदार नागरिकांना*
दिवाळीच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐