🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना भौतिकशास्त्राचे नोबेल आज जाहीर करण्यात आले. रेनर वेईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार जाहीर
#awards
#currentquiz

1) AYUSH मंत्रालय आणि रेल्वे अंतर्गत कार्यरत चिकित्सकांच्या (Doctor) समावेशासह केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्य करणार्‍या चिकित्सकांच्या सेवानिवृत्तीचे वय _ वर्ष करण्यात आले आहे.

उत्तर :

i) 62

ii) *65* ✔️✔️✔️

iii) 60

iv) 70

2) 26-27 सप्टेंबर 2017 दरम्यान दुसरी भारत-अमेरिका आरोग्य संवाद बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?

उत्तर :

i) *नवी दिल्ली* 🔻✔️✔️

ii) वॉशिंग्टन डी.सी.

iii) न्यूयॉर्क

iv) विशाखापट्टणम

3) दत्तक घेण्याशी संबंधित मासिक तत्वावर आयोजित केला जाणारा 'जन संपर्क' कार्यक्रम कोणत्या शासकीय मंडळाचा उपक्रम आहे?

उत्तर :

i) राष्ट्रीय दत्तक प्रक्रिया संस्था (NAMO)

ii) राष्ट्रीय दत्तक संसाधन प्रतिष्ठान (NARF)

iii) *केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA)* 🔻✔️✔️

iv) केंद्रीय दत्तक प्रक्रिया संस्था (CAMO)


4) सप्टेंबर 2017 मध्ये स्वयं-रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज प्रदान करून अपंग सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी कोणत्या राज्य शासनाने योजना सुरू केली?

उत्तर :

i) *जम्मू व काश्मीर* ✔️✔️✔️

ii) पंजाब

iii) हरियाणा

iv) आसाम



5) भारतीय दिवाळखोरी व नादारी मंडळ (IBBI) ने कोणत्या उपक्रमाला IBBI (सूचना उपक्रम) विनियमन, 2017 अंतर्गत एक सूचना उपक्रम (IU) च्या स्वरुपात नोंदणीकृत केले?

उत्तर :

i) केंद्रीय प्रशासन सेवा मर्यादित (CASL)

ii) *राष्ट्रीय ई-प्रशासन सेवा मर्यादित (NeSL)* ✔️✔️✔️

iii) राष्ट्रीय ई-प्रशासन सुविधा केंद्र (NeFC)

iv) केंद्रीय ई-प्रशासन सुविधा केंद्र (CeFC)

6) सप्टेंबर 2017 मध्ये भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ने कोणत्या प्रशिक्षकाला त्यांच्या समाज माध्यमामधील "आक्षेपार्ह" मजकूरावरून निलंबित केले?

उत्तर :

i) के. कुमुद

ii) क्रिष्णा कालिदास


iii) *क्रिपा शंकर पटेल* ✔️✔️✔️

iv) हरदीप सिंह

7) तुर्कमेनिस्तानच्या अश्गबात येथे खेळण्यात आलेल्या 2017 आशियाई इंडोअर आणि मार्शल आर्ट्स खेळांच्या पदकतालिकेमध्ये भारत कोणत्या स्थानी होता?

उत्तर :

i) *11 वा* ✔️✔️✔️

ii) 12 वा

iii) 10 वा

iv) 13 वा

8) 46,000 कोटी रुपयांच्या ‘समृद्धी’ मार्गिकासंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा.

a - हा महाराष्ट्र राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

b - ‘समृद्धी’ मार्गिका म्हणजे नागपूर-मुंबई एक्सप्रेसवे आहे.

c - पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये सहकार्यासाठी दक्षिण कोरियासह महाराष्ट्र राज्य शासनाचा गुंतवणूक करार झाला.

उत्तर

i) फक्त a

ii) फक्त b

iii) फक्त c

iv) *यापैकी एकही नाही*✔️✔️✔️
#STI_PSI_Rajyaseva_2018

♦️भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती

🔶भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.

🔶मूळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.

🔶आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.
वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.

🔶२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.

ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.

T.me/mpscguidance
♦️रोहिंग्याबाबत माहिती

ब्रह्मदेशातील (आजचा म्यानमार) आशकान प्रांतात गेली अनेक शतके राहत असलेली जमात, ‘रोहिंग्या’ या नावाने ओळखली जाते. भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर वर्षभरातच १९४८ साली ब्रिटिशांनी ब्रह्मदेशालाही स्वातंत्र्य दिले. दुर्दैवाने  तेव्हापासूनच या रोहिंग्यांच्या मागे अन्याय, अत्याचारचे शुक्लकाष्ट लागली. पण २०१२ पर्यंत त्यांच्यात संघर्षांला फारसे गंभीर स्वरुप प्राप्त झाले नव्हते. पण त्यांच्या संघर्षांची  बीजे मात्र तेव्हाच रोवली गेली होती. कारण त्या काळी एकूण लोकसंख्येत ९० टक्क्याहून अधिक असलेल्या बौद्ध धर्मीयांसाठी अल्पसंख्य रोहिंग्यांचा त्यांच्या भूमीवरील हक्क नाकारण्याचे धोरण सुरुवातीपासूनच स्वीकारले होते. म्यानमारच्या तेव्हाच्या शासनाने १९८२ साली नागरिकत्वाचा कायदा मंजूर केला त्यातही रोहिंग्यांना नागरिकत्वाचे हक्क देण्यात आले नाहीत. रोहिंग्यांच्या आजच्या शोकांतिक अवस्थेचे मूळ तेथील बहुसंख्य पण हटवादी आणि कुठल्याही मानवी मूल्यांची तमा न बाळगणाऱ्या व विद्वेषी भावनेच्या आहारी गेलेल्या बौद्ध धर्मियांच्या अमानुष भूमिकेत आहे. पण २०१२ पर्यंत या संघर्षांला फारसे हिंसक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची फारशी चर्चा झाली नाही. भारतात ‘रोहिंग्या’ हा शब्दही कुणाला माहीत नव्हता. पण या वर्षीच्या जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या काळात म्यानमारमध्ये हिंसक दंगली झाल्या. या दंगलीत १५० हून अधिक रोहिंग्या मारले गेले आणि जवळ जवळ दीड लाखांहून अधिकांना देशत्याग करून इतरत्र आश्रय घ्यावा लागला. या दंगलीत रोहिंग्यांबरोबर रखाईन (की राखीन) मधील बौद्ध व हिंदूही मारले गेले. पण ही दंगल मुस्लिम विरुद्ध हिंदू अशी नव्हती. तर धर्मवादी व विद्वेषी विचारांच्या आहारी गेलेले शासन, त्यांना पाठिंबा देणारी पण तसेच धर्मवादी विद्वेषी भावनांनी प्रभावित झालेले बहुंख्य बौद्ध जनता आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्यामधील हा संघर्ष होता व आहे. अर्थात सुक्याबरोबर ओले, या सूत्राप्रमाणे इतर अल्पसंख्याकांनाही या दंगलीची झळ पोहोचली. तरीही त्यावेळी रोहिंग्यांच्या प्रश्नावर, काही समन्माननीय अपवाद वगळता फारशी चर्चा झाली नाही. पण ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०१७ या जवळजवळ वर्षभराच्या काळात रोहिंग्यांवरील अत्याचाऱ्यांची तीव्रता आणि व्याप्तीही वाढली. परिणामत: आपल्या घरा दाराचा त्याग करून केवळ जीव वाचविण्यासाठी आजूबाजूच्या देशात आश्रय घेणाऱ्या निर्वासितांची संख्येतही बेसुमार वाढ झाली. रॉयटर या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार १,४०००० रोहिंग्यांनी म्यानमारमधून पळ काढला आहे. देशत्याग केलेल्यांची एकूण संख्या आठ लाखांपासून ११ लाखांच्या घरात आहे असा या वृत्तसंस्थेचा अंदाज आहे. एकटय़ा बांगलादेशात नोंद झालेल्या रोहिंग्या निर्वासितांची संख्या ३२ हजार आहे तर नोंदणी न  झालेल्या पण सरकारी छावण्यांत राहणाऱ्या निर्वासितांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. भारतात ४० हजार निर्वासित रोहिंग्या राहत आहेत. ही सर्वसामान्य संख्या आहे. याशिवाय मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांत आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची संख्या काही हजारांच्या घरांत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज’च्या अंदाजानुसार ही संख्या २५ हजारांच्या घरात आहे. हे निर्वासित जलमार्गाने या देशात पोहोचले. मानवी वाहतूक करणाऱ्या  लोकांनी त्यांना आपल्या बोटीतून त्या त्या देशांत पोहोचविले. पण हा प्रवास इतका कठीण व धोकादायक होता की काही लोकांना या प्रवासात जीव गमवावा लागला. यामध्ये इंडोनेशयात जाणाऱ्यांपैकी १००, मलेशियात २०० तर थायलंडमध्ये १० लोकांचा मृत्यू  झाला. यावरून रोहिंग्यांच्या समस्येचे स्वरूप किती गंभीर आहे, याची कुणालाही कल्पना येऊ  शकेल.


स्रोत - लोकसत्ता वृत्तपत्र
मित्रानो पैसे वाचवा

--आपण पैसे कमवत नाही
--आपले आईवडील आपल्याला देतात
--त्याचे महत्व जाणा
--आपण ते खर्च करताना worth आहेत का ते पहा
--आपण कुठेही काही खर्च करणार आहात तेव्हा व्यावहारिक शहाणपण असायला हवे
--अगोदर विचार करा
--भावनिक होऊ नका
--एखाद्या चे नाव खूप फेमस आहे म्हणून त्याचे गिऱ्हाईक होऊ नका
--पैसे वाचवणे म्हणजे कमावणे सारखे आहे
--त्याचा किती फायदा होईल याचा विचार करा
--ते पण करतय म्हणून मी पण खर्च करणार हा विचार करू नका
--बाहेर लोक बकरा शोधत आहे.तुम्ही त्यातील एक नसावे

ऑल द बेस्ट
⚽️ शांतता नाेबेल पुरस्कार २०१७ ⚽️

☑️ १) संपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान International Campaign To Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेला यंदाच्या शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

☑️ २) १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे या पुरस्काराचे वितरण होणार असून पुरस्काराच्या स्वरुपात ICAN ला ११ लाख डॉलर रक्कम मिळणार आहेत.

☑️ ३) जगात अण्वस्त्रांच्या वापरामुळे होणाऱ्या विध्वंसाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याबद्दल ICAN ला हा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

☑️ ४) शांततेसाठीच्या या नोबेलसाठी पोप फ्रान्सिस, सौदीतील ब्लॉगर रैफ बदावी, ईरानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ हे देखील स्पर्धेत होते.

☑️ ५) २००७ मध्ये सुरु झालेल्या ICAN या अभियानासाठी जगातील १०१ देशांमध्ये ४६८ सहयोगी संस्था काम करीत आहेत.
PSI Physical test changes in shedulde👆👆