🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Excise SI Law Questions Answers
Forwarded from MPSC Guidance
ज्ञानेश्वर पाटील यांच्या PSI Law Notes
👆👆👆👆
आनंदाची बातमी

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी निवडावयाच्या उमेदवारांच्या प्रमाणात सुधारणा....

15 ते 16 पट उमेदवार घेणार...
​​​​हॉकी शी संबधित स्पर्धा

Join 👉@mpscguidance

Trick :- RD BARMAN

R - रंगास्वामी कप
D - ध्यानचंद ट्रॉफी
B - बेगम रसूल बैहम कप
A - आँगा खाँ कप
R - राजा रणजीत सिंह ट्रॉफी
M - मरुगप्पा कप
A - अजलांशाह कप
N - नेहरू ट्रॉफी

NOTE - नेहरू कप(बॉस्केटबाल)
नेहरूगोल्डन कप (फुटबॉल)
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीच्या दिवशी सोबत न्यावयाची मूळ प्रमाणपत्रे -

1. जन्मतारखेसाठी शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा वय व नागरिकात्वाचा दाखला किंवा जन्म तारीख नमूद असलेला शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिकेचा / दवाखान्याचा / ग्रामपंचायतीचा जन्म दाखला.

2. मूळ पदवी / पदव्युत्तर पदवी गुणपत्रके आणि शैक्षणिक पात्रतेचे इतर दाखले.

3. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्यासंबंधीचा दाखला.

4. वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(ड), वि.मा.प्र., इमाव, महिला (खुला गट) या वर्गवारीचा असल्यास उमेदवार क्रिमीलेअरमध्ये मोडत नाही, असे दर्शविणारे व दोन्ही परिच्छेदात उमेदवाराचेच नाव असलेले व विहित प्राधिका-याने दिलेले नॉनक्रिमीलेअर (NCL) प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र.

5. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

6. आपण खेळाडू आरक्षणाचा दावा केला असल्यास क्रीडा संचालनालयाने खेळ विषयक अर्हता पूर्ण करीत असल्याचे प्रमाणित केलेले क्रीडा प्रमाणपत्र.

7. लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र.

8. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेतील सवलतीकरिता माजी सैनिक असल्याचा पुरावा.

9. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात पुरावा.

10. अधिवास प्रमाणपत्र.

11. पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी किमान एक ओळखपत्र आवश्यक.

जॉइन करा » T.me/mpscguidance
#polity
#GS2
🔹 घटना समिती
👉 जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या सभासदांची निवडणूक झाली.
👉२५ जुलै १९४६ ला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
👉एकूण जागा- २९६ इतक्या होत्या. त्यापैकी -
काँग्रेस पक्षाला- २१२,
मुस्लीम लीगला – ७३
इतर पक्षांना ११ जागा मिळाल्या.
👉संस्थानासाठी असलेल्या ९३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. त्यांचे प्रतिनिधी नियुक्त झाले.
👉मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला.
👉घटना समितीवर पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या.
T.me/mpscguidance
👉घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते.
👉तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला, िहदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.
👉९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले.
👉पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते.
👉११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले.

अधिक माहितीसाठी जाँईन करा 👉 @mpscguidance
🔹अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: 26 सप्टेंबर

दरवर्षी 26 सप्टेंबरला जगभरात. 'अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons) पाळला जातो. हा दिवस जगाला अण्वस्त्रापासून मुक्त करण्यासाठी समर्पित आहे, हे की संयुक्त राष्ट्रसंघाचे खूप जुने उद्दिष्ट आहे.

▪️उद्देश -
उच्च प्राधान्य म्हणून जगाला अण्वस्त्रापासून मुक्त करण्यासाठी जागतिक समुदायांना आपल्या बांधिलकीची पुष्टी करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी नागरिकांना आणि नेत्यांना अण्वस्त्रे नष्ट केल्यास त्यापासून होणार्‍या वास्तविक फायद्यांविषयी जागृती निर्माण केले जाते.

1978 साली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आपल्या प्रथम विशेष सत्रात पुष्टी केली की अण्वस्त्राच्या निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 1975 सालापासून, न्यूक्लियर नॉन-प्रोलीफरेशन ट्रिटी हा जवळपास प्रत्येक आढावा बैठकीचा एक प्रमुख विषय आहे.

▪️पार्श्वभूमी

अण्वस्त्रांच्या जगभरातून पुर्णपणे निर्मूलनाच्या उद्देशाने 26 सप्टेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आण्विक शस्त्रसंन्यास (nuclear disarmament) वरच्या उच्च स्तरीय बैठकीनंतर ऑक्टोबर 2013 मध्ये पहिल्यांदा ठराव (A/RES/ 68/32) प्रस्तावित करण्यात आला. त्यानुसार दरवर्षी 26 सप्टेंबरला जगभरात अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्यांदा हा दिवस पाळला गेला.