🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
कर सहायक पूर्व परीक्षा -2017
पहिली उत्तरतालिका...👆👆
🌧 प्रकल्प वर्षाधारी 🌧
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे 'प्रकल्प वर्षाधारी' सुरू केला आहे. या अंतर्गत विमानाने ढगांमध्ये रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे.
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
🏔🛣महाराष्ट्रातील घाट, पठार आणी शिखरे


प्रश्न क्र.१

खालील विधानांवरून डोंगररांग ओळखा

अ ) सह्याद्री पर्वतापासून हि डोंगररांग सुमारे १८ अंश उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने जाते.


ब ) हि डोंगररांग रायरेश्वरपासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे.


क ) या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात.


१ ) हरिश्चंद्र बालाघाट

२ ) सातमाळा-अजिंठा

३ ) शंभू महादेव

४ ) वरीलपैकी नाही



प्रश्न क्र.२

खाली महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांची उंची दिली आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

अ ) तौला १ ) १२३१ मी.

ब ) बैराट २ ) ११७७ मी.

क) हनुमान ३ ) १०६३ मी.

४ ) तोरणा ४ ) १४०४ मी.



१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१

२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४

३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२

४ ) अ-२ ब-४ क-१ ड-३



प्रश्न क्र.३


महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलप्रमाणे आहे

१ ) आंबोली, फोंडा, आंबा, कुंभार्ली, रनतुंडी, वरंध, बोर, माळशेज, थळघाट


२ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, कुंभार्ली,माळशेज, रनतुंडी, वरंध, थळघाट


३ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, माळशेज, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली, थळघाट


४ ) आंबोली, फोंडा, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली,आंबा, बोर, माळशेज, थळघाट



प्रश्न क्र.४


शिरघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?

१ ) शहादा-तोरणमाळ

२ ) नाशिक-जव्हार

३ ) राजगुरूनगर-कर्जत

४ ) यावल-इंदोर



प्रश्न क्र.५


पोलादपूर- भोर या ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ?

१ ) ढवळा घाट

२ ) पालघाट

३ )नारदाचा घाट

४ )सारसा घाट



प्रश्न क्र.६



खाली घाट आणि जोडणारी ठिकाणे दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

अ ) लळिंगवारी घाट १ ) धुळे-मुंबई

ब ) कोंडाईबारी घाट २ ) साक्री- नवापुर

क) सारसा घाट ३ ) सिरोंचा-चंद्रपूर

ड ) हनुमंते घाट ४ ) कोल्हापूर-कुडाळ



१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१

२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४

३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२

४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४


प्रश्न क्र.७


महाराष्टातील शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.

१ ) हनुमान, साल्हेर, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.


२ ) साल्हेर,हनुमान, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.


३ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तौला, तोरणा, महाबळेश्वर.


४ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तोरणा, तौला, महाबळेश्वर.



प्रश्न क्र.८


*महाराष्ट्रातील डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे खालीलप्रमाणे आहे*

१ ) वेरूळ,सुरजागड,निर्मळ, हिंगोली, मुदखेड, भामरागड


२ ) वेरूळ, मुदखेड, निर्मळ, हिंगोली, सुरजागड, भामरागड


३ ) वेरूळ, निर्मळ, हिंगोली, मुदखेड, सुरजागड, भामरागड


४ ) वेरूळ, हिंगोली, मुदखेड, निर्मळ, सुरजागड, भामरागड


प्रश्न क्र.९



महाराष्ट्रातील पठारे आणि जिल्हे दिले आहेत त्यांच्या योग्य जुळवा.

अ ) सासवड पठार १ ) नाशिक

ब ) खानापूर पठार २ ) सातारा

क )औंध पठार ३ ) सांगली

ड ) मालेगाव पठार ४ ) पुणे

१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१

२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४

३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२

४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४

प्रश्न क्र.१०
महाराष्टातील पठारांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) मालेगाव, अहमदनगर, तोरणमाळ, सासवड, औंध, खानापूर

२ ) मालेगाव, तोरणमाळ, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर

३ ) तोरणमाळ, मालेगाव, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर

४ ) तोरणमाळ, सासवड, मालेगाव, अहमदनगर औंध, खानापूर
🔹देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न'

रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि हॉकी संघाचा आधारस्तंभ सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

तसंच, क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विक्रम रचणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो, तर वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जातं.

यावर्षी या पुरस्कारांसाठी क्रीडापटू निवडणाऱ्या समितीत वीरेंद्र सेहवाग आणि पीटी उषा यांना स्थान देण्यात आलं होतं. या समितीनं खेलरत्न पुरस्कारासाठी दोघांची आणि अर्जुन पुरस्कारासाठी १७ जणांची शिफारस केली होती. त्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलं आहे.

▪️अर्जुन पुरस्कार विजेतेः

🏆 पॅरालिम्पिक पदकविजेता मरियप्पन थंगवेलू

🏆 वरुणसिंग भाटी

🏆 तिरंदाज व्हीजे सुरेखा

🏆 अॅथलिट खुशबीर कौर

🏆 अॅथलिट अरोकिया राजीव

🏆 गोल्फपटू एसएसपी चौरसिया

🏆 टेनिसपटू साकेत मायनेनी

🏆 चेतेश्वर पुजारा

🏆 हरमनप्रीत कौर
🌾 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था 🌱

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)