Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं.
तेंडुलकरांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' या सारख्या पुस्तकांचा समावेश होतो.
यापैकी 'संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला होता.
त्याशिवाय त्यांना मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.
व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३) लेख बरेच गाजले.

♦️ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर (वय ७८) यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते रस्त्यावर उतरले होते. ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. मागील १७ वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता सुरू होता
अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
♦️मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’
♦️त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार

ज्ञानज्योती संयुक्त पूर्वपरिक्षेसाठी मुद्देसूद चालू घडामोडी संच👆👆👆
अत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. बुधवार पेठेतील शालूकर बोळात इचलकरंजीकरांच्या तबेल्यात या गणरायाची स्थापना झाली आणि त्याच वषीर् विसर्जन मिरवणूकही निघाली. त्यामुळेच हा भारतातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती ठरतो.
भाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. जून 1892मध्ये भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारात सर्व प्रजेला सोबत घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव पाहिला. पुण्याला परतल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी यावर चर्चा केली. भाऊसाहेबांना कल्पना पसंत पडली आणि सार्वजनिक गणेेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महषीर् अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत सातव, दगडूशेठ हलवाई, गंगाधर रावजी या मान्यवरांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला. त्या वषीर् भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी गणपती बसवले. 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यानंतर 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यात गणपती बसवून सार्वजनिक उत्सवामागे आपली ताकद उभी केली.
भाऊसाहेब रंगारी गणपतीची सुरुवात झाली तेव्हा गणपती राक्षसाला मारत असल्याची तीन फूट उंचीची मूतीर् कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली. आजतागायत तीच मूतीर् कायम आहे. त्यावेळी या गणपतीसमोर लोकमान्य टिळक, प्रा. शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, श्ाीधर जिन्सीवाले, सेनापती बापट, बिपीनचंद पाल, नानासाहेब दंडवते, हुतात्मा राजगुरू यांची व्याख्याने होत असत. प्रवचने आणि मेळेही भरत असत. 1900 ते 1907 या काळात गणपतीसमोर जिवंत वाघांच्या साह्याने देखावा उभा केल्याचे सांगितले जाते.
या गणपतीच्या स्थापनेपासूनच उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याची प्रथा आहे. ती आजतागायत कायम ठेवल्याचे मंडळाचे विश्वस्त संजीव जावळे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत मंडळांना पास देण्याची पद्धत याच मंडळाने सुरू केली असून गुलालाचा वापर न करण्यावरही हे मंडळ पूवीर्पासून ठाम आहे. ११४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळातफेर् आरोग्य शिबीर, धर्मार्थ दवाखाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
Join t.me/mpscguidance