🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं.

तेंडुलकरांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' या सारख्या पुस्तकांचा समावेश होतो.

यापैकी 'संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला होता.

त्याशिवाय त्यांना मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३) लेख बरेच गाजले.