🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
"तत्वतः" म्हणजे काय ??
हा प्रश्न जर स्पर्धा परिक्षेत विचारला तर भविष्यात
देशाला एकही अधिकारी मिळायचा नाही.
#शेतकरी कर्जमाफी
MPSC History:
🔹महात्मा जोतिबा फुले

जीवनपट

इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
-------------------------
जॉईन करा @mpscguidance
पीएसआय मुख्य परीक्षा सूचना 👆👆
 🏆MPSCGUIDANCE🏆

स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके , पुस्तके ,Facebook Pages , Apps ,Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत . पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणे  हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे . म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली www.mpscguidance.blogspot. com वरील निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे MPSCGUIDANCE blog चे अधिकृत Telegram Channel JOIN करा .
 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर  मिळेल .

महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही .

⭐️सर्व स्पर्धा परीक्षेविषयक माहिती,जाहिरात ,वेळापत्रक,प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना Daily Current GK Update PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून दिल्या जातील .

MPSCGUIDANCE
Daily Current Affairs,GK, व इतर स्पर्धा परिक्षेविषयक सर्व महत्वाची माहिती....👍
https://t.me/mpscguidance
STI Mains 2016 उत्तरतालिके संबधी निवेदन 👆👆👆
चालू घडामोडी प्रश्नसंच मे 2016 ते जून 2017 👆👆👆
| India Year Book-2017 |
| 18Mb |
| True Copy |
New Media Wing

For more MPSC material join us @mpscguidance