🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
🔹राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन


1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष

3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष

4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष

40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन

44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला
--------------------------------------------
जॉईन करा @mpscguidance
आज शिवराज्याभिषेक दिन
6 जून 1674 ला महाराजांनी रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला.. व त्यांचे गुरू संत तुकाराम यांनी दिलेली "छत्रपती" हि पदवी स्वतःस लावून घेतली(बादशहा ,सम्राट ,महाराज ई. बिरुद लावायची पद्धत मोडली) . याचे वर्णन अनंत सभासद ने "मऱ्हाटा पातशहा एव्हढा छत्रपती जाहला हि गोष्ट काही साधी जाहली नाही असे केले आहे"💐💐💐💐
350 वर्षानंतर जगातील एकमेव शासनकर्त्याचा राज्याभिषेक लोक का साजरे करतात ???
छत्रपती शिवराय आणि शेतकरी, इतिहासातील एक उत्तम उदाहरण...!
ब्रिटीश व्यापार्यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्यांना हाताशी धरून त्यांना पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. शेतकर्यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब खलिता पाठवला, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर तयार आहे की, तुम्ही आमच्या राजापूरच्या शेतकर्यांची जी हानी केली ती भरपाईसह योग्य प्रकारे भरून द्या. आणि ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्यांकडून आली की, मग मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. अखेर ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. दुसर्या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्यांना गाठून त्यांच्यामार्फत सर्व शेतकर्यांना त्यांचे जितके रास्त पैसे होते, त्यासोबत हानीभरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकर्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले..
राजा असावा तर असाच...!!!
।।जय शिवराय।।