🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔹तुम्हाला माहितीये का, या आधीही राज्यातला शेतकरी संपावर गेला होता!

तुम्हाला माहिती आहे का, देशातल्या शेतकऱ्यांचा हा काही पहिला संप नाही. स्वातंत्रपूर्व काळात रायगडच्या चरी कोपरीमध्ये देशातील पहिला शेतकऱ्यांचा संप झाला होता.  जगाच्या इतिहासामध्ये 7 वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप.

स्‍वातंत्रयपूर्व काळात,  रायगड जिल्‍हयात अलिबाग तालुक्‍यातील चरी कोपर गावात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा मेळावा भरला होता. खोती पदधतीमुळे कोकणातील शेतकरी गांजले होते . कुळांनी जमीन कसायची आणि 75 टक्के वाटा सावकारांना द्यायचा ही अन्यायकारक पद्धत इथं सुरू होती. एक प्रकारची वेठबिगारीच होती. कोकणातील खोतीविरूदध लढयाचे रणशिंग याच मेळाव्‍यात फुंकले गेले. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली हजारो शेतकरयांनी संप पुकारला.

देशातील शेतकऱ्यांचा हा पहिला संप होता. शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. तब्‍बल 7 वर्षे चाललेल्‍या या संपाचे नेतृत्‍व नारायण नागू पाटील यांनी केले तर शेतकरयांना न्‍याय मिळवून देण्‍यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म‍हत्‍वाची भूमिका बजावली होती. त्या संपाच्या इतिहासावर एक नजर टाकूया...

▪️'चरी कोपर'च्या शेतकऱ्यांच्या संपाचा इतिहास:

27 ऑक्टोबर 1933 रोजी चरी कोपर गावात पुकारला संप

संपामध्ये रायगड जिल्ह्यातील 25 गावांचा सहभाग होता

सावकाराच्या जाचक खोत पद्धतीविरोधात उठवला आवाज

जमीन कुळांनी कसायची आणि सावकार 75 टक्के वाटा घ्यायचे !

कोकणातील खोत पद्धतीला विरोध करण्यासाठी पुकारला लढा

शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी लढ्याचं नेतृत्व केलं

संपाच्या काळात कुळांनी जमीन कसायची सोडून दिली

तब्बल 7 वर्षे हा शेतकरी लढा चालला

संपाच्या काळात अनेक कुटुंबांची वाताहत

शेतकऱ्यांना न्याय देण्यात डॉ.आंबेडकरांची महत्वाची भूमिका

तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई यांनी संपकऱ्यांची भेट घेतली

जमिनी कुळांच्या नावावर झाल्यानंतरच अखेर 1939 साली संप मिटला

या प्रदीर्घ लढ्यानंतरच 'कूळ कायदा' अस्तित्वात आला

या लढ्यामुळेच कुळांना हक्काच्या जमिनी मिळाल्या

🙏 साभार - अनंत मुळीक ( जोगेश्वरी, मुंबई )
STI मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा....💐💐
MPSC has introduced new question paper code series as M, N, O, P..
It is used today for STI MAIN EXAM..