🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Q ४.२ अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असलेला खंड आहे. आशियाई लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?

अ) ५१ % ब) ६० % क) ७० % ड) ८० %

स्पष्टीकरण –

जागतिक लोकसंख्येची टक्केवारी –
१) आशिया ६० %
२) आफ्रिका १५ %
३) युरोप ११%
४) उत्तर अमेरिका ८%
५) दक्षिण अमेरिका ६%
६) ऑस्ट्रेलिया १%
७) अंटार्टकिा १% पेक्षा कमी
Q. २०११ साली संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने २०५० सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या २० देशांची यादी दिली गेली, या यादीत पुढीलपकी कोणत्या देशाचा समावेश नाही?

अ) व्हिएतनाम ब) पाकिस्तान

क) ब्राझिल ड) इंग्लंड

स्पष्टीकरण – मे २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जो अहवाल प्रस्तुत केला त्यानुसार, जागतिक लोकसंख्या २०४३ पर्यंत ९ अब्ज इतकी असेल. २०५० पर्यंत भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल.

२० देशांची यादी खालील प्रमाणे –
१) भारत, २) चीन, ३) अमेरिका
४) नायझेरीया, ५) इंडोनेशिया ६) पाकिस्तान
७) ब्राझिल ८) बांगलादेश ९) फिलिपाइन्स
१०) कांगो ११) इथोपिया १२) मेक्सिको
१३) टांझानिया १४) रशिया १५) इजिप्त
१६) जपान १७) व्हिएतनाम १८) केनिया १९) युगांडा २०) तुर्की
# SSC_CGL_17 notification will be on time (16th May).