🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Sharing is Caring....👍👍
थॉमस पेनचे काही विचार.....
' ईश्वर एकच असून ,त्याच्यावरील आंतरिक श्रद्धा हीच महत्वाची आहे.त्यासाठी कुठलाही ग्रंथ प्रमाण मानण्याची गरज नाही, की कुठल्या मध्यस्थाची गरज नाही.जगातील सर्व माणसांचा धर्म एकच असून ,तोच मानवता धर्म होय. ईश्वरनिष्ठा आणि नैतिक सत्याचे आचरण हेच खरे धर्मजीवन होय.धर्मश्रध्दा ही प्रत्येकाची खाजगी बाब असून , तिच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही.धर्मग्रंथ पवित्र आणि पूजनीय मानले गेले असले, तरी ते ईश्वरप्रणीत नाहीत.ते मनुष्यनिर्मित असून ,भोंदु लोकांनी त्यांचे उगीचच स्तोम माजून ठेवले आहे.विश्वनिर्माता परमेश्वर एकच आहे.म्हणून त्याच्या शुभवर्तनाचा आशय एकच असला पाहिजे.माणसांमध्ये निर्माण झालेले भेद हे ईश्वरनिर्मित नाहीत.त्यांस धर्मसंस्था कारणीभूत आहेत....'
🔹 भारतात आल्यानंतर गांधीजी


🔰 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

🔗 चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..


🔰 साराबंधी चळवळ (सन 1918) :-

🔗 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल
करीत असत..

🔗 गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

🔗 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..

🔗 हा गांधीजीचा दूसरा विजय होता..


🔰 रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

🔗 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

🔗 या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

🔗 या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..

🔗 हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

🔗 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..

🔗 या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
_______________________________
आमचे चॅनेल जॉईन करन्यासाठी येथे क्लिक करा @mpscguidance
________________________________
Telegram.me/mpscguidance
Q ४.२ अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असलेला खंड आहे. आशियाई लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?

अ) ५१ % ब) ६० % क) ७० % ड) ८० %

स्पष्टीकरण –

जागतिक लोकसंख्येची टक्केवारी –
१) आशिया ६० %
२) आफ्रिका १५ %
३) युरोप ११%
४) उत्तर अमेरिका ८%
५) दक्षिण अमेरिका ६%
६) ऑस्ट्रेलिया १%
७) अंटार्टकिा १% पेक्षा कमी
Q. २०११ साली संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने २०५० सालातील जागतिक लोकसंख्येसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यात संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या २० देशांची यादी दिली गेली, या यादीत पुढीलपकी कोणत्या देशाचा समावेश नाही?

अ) व्हिएतनाम ब) पाकिस्तान

क) ब्राझिल ड) इंग्लंड

स्पष्टीकरण – मे २०११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जो अहवाल प्रस्तुत केला त्यानुसार, जागतिक लोकसंख्या २०४३ पर्यंत ९ अब्ज इतकी असेल. २०५० पर्यंत भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल.

२० देशांची यादी खालील प्रमाणे –
१) भारत, २) चीन, ३) अमेरिका
४) नायझेरीया, ५) इंडोनेशिया ६) पाकिस्तान
७) ब्राझिल ८) बांगलादेश ९) फिलिपाइन्स
१०) कांगो ११) इथोपिया १२) मेक्सिको
१३) टांझानिया १४) रशिया १५) इजिप्त
१६) जपान १७) व्हिएतनाम १८) केनिया १९) युगांडा २०) तुर्की