🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
राज्यसेवा अधिकाऱ्यांचा एल्गार...!
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे.
निवड होऊन दोन वर्षांनंतरही नियुक्ती न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी,Dysp,तहसीलदार,BDO अशा विविध पदांवर निवड झालेले सुमारे 513 राजपत्रित अधिकारी आणि AMVI(सहायक मोटर वाहन निरीक्षक) चे 832 असे एकूण 1345 अधिकारी नियुक्तीसाठी अखेर रस्त्यावर...!
#state_services_pre_2020
#current_affairs

🔰महाराष्ट्र राज्याचे 6 वे राज्य निवडणूक आयुक्तपदी - यु.पी.एस.मदान यांची नियुक्ती

●1983 च्या बॅचचे IPS

●यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाचे प्रधान सचिवपदी कार्यरत होते.

●लोकसभा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणूनही कार्य
#निधन
रॉबर्ट मुगाबे :-
•••••••••••••••••••••••••••••

● रॉबर्ट मुगाबे, झिंबाब्वेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेले देशाचे पहिले पंतप्रधान, यांचं 95 व्या वर्षी निधन झालं आहे.
● नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या एका अंतर्गत बंडानंतर त्यांना पदच्युत करण्यात आलं होतं. ते जवळपास 3 दशकं सत्तेत होते.
● स्वातंत्र्यानंतर झिंबाब्वेमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते.
● 1980 साली ते पंतप्रधान बनले. त्यांनी 1987 साली पंतप्रधान पदच रद्द केलं आणि ते स्वतः राष्ट्राध्यक्ष बनले.
● आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात मुगाबे यांनी कृष्णवर्णीय समुदायासाठी आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी जी पावलं उचलली त्यांचं कौतुक झालं. पण त्यांनी जमिनीसंदर्भात जे वादग्रस्त कायदे आणले त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली. त्यांच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध आपल्या अधिकारांचा गैरवापर आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांनी व्यापला होता.
● मुगाबे यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1924 साली तत्कालील ऱ्होडेशियामध्ये झाला होता.
● ऱ्होडेशियामध्ये एका दशकाहून अधिक काळ त्यांनी तुरुंगात व्यतीत केला. सरकारवर टीका केल्याप्रकरणी त्यांना 1964 साली कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.
● सन 1973 मध्ये ते तुरुंगात असतानाच त्यांना झिंब्बाब्वे आफ्रिकन नॅशनल युनियन (झानू)चे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. झानूची स्थापन करणाऱ्यांपैकी मुगाबे एक होत.
🔰Talathi Exam Score List Revenue Department (Talathi Recruitment - All Districts) Examination -2019
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/RevScorelist