🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
पूरस्थिती
पहिल्या पोलीस महानिरीक्षक कांचन चौधरी यांचे निधन
रशियाचा "फेडोर" अंतराळ रोबोट
वन दुरुस्ती कायदा 2019
50 लाख हेक्टर जमीन सुपीक बनवणार
क्रीडा क्षेत्र आढावा
🏏🏹राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान🏸🎾

🏵राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार🏵
- दीपा मलिक, बजरंग पुनिया 


🏵अर्जुन पुरस्कार 🏵
ताजिंदरपाल सिंग , मोहम्मद अनास याहिया (अॅथेलेटिक्स), एस. भास्करन (शरीरसौष्टव), सोनिया लाटकर (बॉक्सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स-बॅटमिंटन), अंजुम मौदगिल (शूटिंग), हरमित राजूल देसाई (टेबल टेनिस), पूजा ढांडा (घोडेस्वार), गुरप्रित सिंह संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (अॅथलेटिक्स), सुंदर सिंह गुर्जर (पॅरा स्पोर्ट्स-अॅथलेटिक्स), बी. साई प्रणित (बॅटमिंटन), सिमरन सिंह शेरगिल (पोलो) 

🏵मेजर ध्यानचंद पुरस्कार
मॅन्युअल फ्रेडरिक्स (हॉकी), अरुप बासक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्तीपटू), नितिन किर्तेन (टेनिस), सी. लालरेसंगा (तिरंदाज)

🏵द्रोणाचार्य पुरस्कार : विमल कुमार (बॅटमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंघ धिल्लों (अॅथलेटिक्स) 

🏵द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार : मर्जबन पटेल (हॉकी), रामबीर सिंह खोखर , संजय भारद्वाज

🌀तेनसिंग नोर्गे पुरस्कार : प्रभात कोळी
🔰आतापर्यंत 6 इस्लामिक देशांकडूनमोदींना त्या देशातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत

🏵‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला.

🏵पॅलेस्टाईन 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵सौदी अरेबिया 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

🏵अफगाणिस्तान 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.

🏵मालदीव ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Ans Key MSO M ASO P2 2019.pdf
409.4 KB
ASO Mains 2019 Paper 2 First Ans Key
MSO M ASO P2 2019.pdf
🔰बँकांचे महाविलीनीकरन #economics
आता फक्त 12 राष्ट्रीयीकृत बँक
#CutoffPrediction

👇STI आणि ASO 2019 मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पेपर 1 व पेपर 2 चे Score ,Category सहीत मला @dc_7777 या लिंक वर पाठवा.
नेहमीप्रमाणे Merit list व Cutoff चा अंदाज आपण काढुया

- धीरज चव्हाण (STI 2018 2nd Rank ,ASO 29th Rank)
#CutoffPrediction

👇STI आणि ASO 2019 मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पेपर 1 व पेपर 2 चे Score ,Category सहीत मला @dc_7777 या लिंक वर पाठवा.
नेहमीप्रमाणे Merit list व Cutoff चा अंदाज आपण काढुया

- धीरज चव्हाण (STI 2018 2nd Rank ,ASO 29th Rank)
■ भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ■
════════════════
● महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे.

● सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.

● ते महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल असतील.

● सी. विद्यासागर राव यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती, त्यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला.

★ भगत सिंह कोश्यारी ★
● भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेतबागड गावात झाला. झाला.
● उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे.
● उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
● 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला.
● 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
● 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते.
● भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.
● त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते.
● 1975 मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते.

◆ महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

◆ नवीन राज्यपाल ◆

● भगत सिंह कोश्यारी : महाराष्ट्र
● कलराज मिश्रा : राजस्थान
● बंडारू दत्तात्रय : हिमाचल प्रदेश
● आरीफ मोहम्मद खान : केरळ
● तमिलीसाई सौंदराजन : तेलंगणा


⚪️ कालराज मिश्रा ⚪️
● कालराज मिश्रा काही काळापूर्वीपर्यंत हिमाचलचे राज्यपाल होते.
● कालराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही आहेत.ते केंद्र आणि यूपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते.
● सन २०१० ते २०१२ पर्यंत ते प्रदेश भाजपाचे प्रभारी होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी होते.
● ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार आणि एकदा देवरियाचे लोकसभेचे सदस्य होते.

⚪️ बंडारू दत्तात्रेय ⚪️
● बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त आंध्र प्रदेश युनिटचे अध्यक्ष राहिले आहेत.
● मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कामगार आणि रोजगार मंत्री होते.
● 1965 मध्ये ते आरएसएसमध्ये दाखल झाले. आणीबाणीच्या वेळी ते तुरूंगातही गेले होते.

⚪️ आरिफ खान ⚪️
● आरीफ खान दोनदा कॉंग्रेसमध्ये,तसेच जनता पक्ष व बसपाकडून प्रत्येकी एकदा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत.
● शाह बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल करण्याच्या कायद्याच्या विरोधात राजीव गांधी सरकार ला त्यांनी राजीनामा दिला होता.
● 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2007 मध्ये त्यांनी भाजप सोडला आणि राजकारणापासून अलिप्त झाले.
● तिहेरी तालक तसेच कलम 370 वर आरिफ खान यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले होते.

⚪️ तमिलीसाई सौंदराजन ⚪️
● या व्यवसायाने डॉक्टर आहेत.
● यापूर्वी त्यांनी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
● या नियुक्तीपूर्वी ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव होत्या.
● त्यांना ‘तमिळनाडूच्या सुषमाजी’ म्हणून ओळखले जाते.