🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

📃सर्व ZP जाहिरात

👉अर्ज भरण्यास सुरुवात:-
26 मार्च ते 16 एप्रिल 2019


Website👇 www.mahapariksha.gov.in
🚩आयोगाचा अहवाल वैधच

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारचा उच्च न्यायालयात युक्तिवाद
● भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग(निवृत्त) यांना अमेरिका शासनाचा Legion Of Merit या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
》हा पुरस्कार प्राप्त करणारे दुसरे लष्करी अधिकारी
》यापूर्वी 1946 साली जनरल राजेंद्रसिंग जडेजा याना हा सन्मान
● दिल्लीत ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत (CTI)-2019’ परिषद संपन्न

》3 मार्च 2019 रोजी दिल्लीत दोन दिवस चालणार्‍या ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत 2019’ (Construction Technology India -CTI) या प्रदर्शनी-नि-परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
》या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाने केले. 25 देशांमधून 32 नवीन तंत्रज्ञानासह 54 पुरवठादारांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
》राजकोट (गुजरात), रांची (झारखंड), इंदौर (मध्यप्रदेश), चेन्नई (तामिळनाडू), आगरतळा (त्रिपुरा) आणि लखनऊ (उत्तरप्रदेश) या सहा शहरांना प्रायोगिक प्रकल्पासाठी ''प्रत्यक्ष प्रयोगशाळा'' म्हणून निवडले गेले असून त्या अंतर्गत 1,000 घरांचे बांधकाम केले जाणार, ज्यासाठी अभिनव तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हे बांधकाम कमी किमतीचे, टिकाऊ आणि नैसर्गिक संकट काळात टिकाव लागणारे असेल.
》याप्रसंगी ‘व्हल्नरेबिलिटी अॅटलस ऑफ इंडिया’च्या तिसर्‍या आवृत्तीचे अनावरण केले. देशभरामधील शहरांमध्ये बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन करण्यासाठी याचा वापर केला जाणार.
》संपूर्ण देशाच्या अस्तित्वात असलेल्या धोकादायक स्थितीचे संकलन आहे.
● डॅन कोलोव निकोला पेट्रोव कुस्ती स्पर्धा

》स्थळ - बल्गेरिया
》भारतीय मल्ल - बजरंग पुनिया यांना सुवर्णपदक
◆65 किलो वजनी गट- फ्री स्टाईल कुस्ती
》पूजा धांडा - 59 किलो वजनी गट - महिला
◆सुवर्णपदक
》साक्षी मलिक - 65 किलो वजनी गट - रौप्यपदक
》विनेश फोगट - 53 किलो वजनीगट - रौप्यपदक
शिक्षक भरतीत मराठ्यांवर अन्याय
Forwarded from Government Job Express
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खास दिल्लीत UPSC Pre cum Mains Free Coaching . विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्यावा. संचालक परिहार साहेबांनी आमच्या विनंतीला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार .
● 25 वे उच्च न्यायालय

- आंध्र प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय हे भारताचे 25 वे न्यायालय ठरले आहे.
- 1 जानेवारी 2019 पासून न्यायालय कार्यरत झाले आहे.
- आंध्राची राजधानी अमरावतीमधील "Justice City" येथे या न्यायालयाचे मुख्यालय असेल.
-------------------------------------
- Andhra Pradesh Reorganisation Act 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांसाठी वेगवेगळ्या उच्च न्यायालयाची तरतुद करण्यात आली होती.
- सध्या तेलंगणा राज्याचे उच्च न्यायालय हैद्राबाद येथे आहे. त्यात न्या. TBN राधाकृष्णन मुख्य न्यायाधीश आहेत तर इतर 16 कार्यरत न्यायाधीश आहेत.
- आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश न्या. सी. प्रविण कुमार हे आहेत. तर इतर 11 कार्यरत न्यायाधीश आहेत, यामध्ये 3 महिला न्यायाधीश आहेत.
-----------------------------------
- भारतीय राज्यघटनेचे कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एका उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे.
- 7 वी घटनादुरूस्ती 1956 ने दोन किंवा अधिक राज्ये आणि संघराज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन्याचा अधिकार संसदेला दिला आहे.
- भारतातील संयुक्त उच्च न्यायालये(6): बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, पंजाब व हरयाणा, गुवाहाटी, केरळ.